विल्यम शेक्सपियर, कॉपीराईट आणि भारत
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी २३ एप्रिल, इ.स. १६१६ ला ते सहित्यिकांच्या स्वर्गात वास करण्यास गेले. त्यांची पुण्यतिथी जगभर जागतीक पुस्तकदिवस आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरी केली जाते.
छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स
आजच्या दिवसासहीत या महिन्यात गूगलबातम्यावर भारतातील एकमेव कॉपीराईट बद्दलच वृत्त दिसलं त्यात जेटलीमहोदयांनी प्रियांकाबाईंना तुमचा भारतावर कॉपीराईट नाही हे सांगितलं. बाकी भारतीय जनता निवडणूकीच्या दंग्यात रंगलेली असताना आमेरीकेत एका भारतीय वंशाच्या माणसाने त्याच्या संशोधनाने आमेरीकेच्या सर्वोच्च न्यायालया समोर कॉपीराईट क्षेत्रातल एक मोठच आव्हान उभ केल आहे. सॅटेलाईट वरून प्रक्षेपीत होणारे टिव्ही सिग्नल महाशयांच्या पोस्ट तिकीटा एवढ्या आकाराच्या इंस्ट्रूमेंटने पकडता येतात म्हणे. आमेरीकेतील टिव्ही कंपन्यांनी या शोधाला त्यांच्या कॉपीराईटच उल्लंघन होत म्हणून आक्षेप घेतला आहे.
आपल्याकडे कॉपीराईटच ज्ञान थोड थोड वाढायला लागल आहे. ज्या गोष्टींच्या कॉपीराईटच्या उल्लंघनाने एखाद्याच उत्पन्न बुडत ती उल्लंघने बिनदिक्कत केली जाताना दिसतात दुसरीकडे ज्या लेखनावर कपर्दिकेचे उत्पन्नही होण्याची शक्यता कमी अशा साहित्याचेही कॉपीराईट आग्रहाने जपण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत ! महाराष्ट्र शासनाच वेबसाईट पुर्वी अगदी अलिकडेपर्यंत कॉपीराईट फ्री असल्याची त्यावर सुचना होती. शिवाय येथील माहिती जास्तीत जास्त कॉपीपेस्ट करून शासकीय नितींचा प्रसार करा अस आवाहन होत. आता त्याच संस्थळावर कॉपीराईटची नोटीस आहे. संस्थळांना डुप्लिकेट फेकसाईट तयार होऊ नयेत म्हणून कॉपीराईटची नोटीसची गरज असतेच अर्थात त्याची काळजी घेण्या करता कंटेट यूज पॉलीसी पूर्ण माघारी नेण्याची गरज नव्हती पण आले आधिकार्यांच्या मना तिथे कुणाचे चालेना.
केतकरांचा ज्ञानकोशाचा कॉपीराईट संपूनही ३० वर्षे झाली. एक चांगल्या उपक्रमा अंतर्गत तो आता आंतरजालावर उपलब्धही झाला आहे. वेबसाईटच्या रचनेवर कॉपीराईट असू शकतो पण केतकरांच्या लेखनावर कसा असू शकेल? पण सरसकट कॉपीराईट संपलेल्या लेखनावरही कॉपीराईटेड ठेवण्याचे प्रयत्न विस्मीत करतात पण त्यांनी या लेखनातील स्पेस किंवा पंक्च्यूएशन मध्ये सुधारना केल्या म्हटले तरी कॉपीराईटचा आधिकार चालू राहू शकतो. असाच काहीसा प्रकार करून खाप्रे डॉट ऑर्गने जुने बरेच साहित्य उपलब्ध केले आहे पण त्यावर विशेष प्रक्रीया केल्याचा दावा करून कॉपी राईट स्वतःकडे ठेवले आहे.
दुसर्या बाजूला जुनी ग्रंथ डिजीटायज करतो आहोत म्हणून विवीध संस्थांचे पदाधिकारी वृत्तपत्रीय छायाचित्रात झळकताना दिसतात. कॉपीराईटेड तर कॉपीराईटेड आंतरजालावर उपलब्ध तर करा तर तेही नाही. भारतातले जुने डॉक्यूमेंट पहाण्या करता दुसर्या देशातील पेड साईटला सर्वीसेसचे पैसे मोजायचे ?
कॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद नावाचा एक लेख किमान स्वरूपाची माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध रहावी म्हणून आणला होता. त्याचा इंग्रजीतून अनुवाद करणे अजून जमले नाही. कुणी मराठी विकिपीडियन गूगलवरून शोध घेत येतील कॉपीराईट विषयक लेखात कधी मधी दोनचार शब्द लिहितील हि आशा. आशा सोडायची नसते हे खरे पण इतर लोक का वाट पहातील ? योगायोग असा की कॉपीराईटडेच्या दिवशी एका उत्साही मराठी विकिपीडिया सदस्याने कॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद लेखाचा मराठीत अद्याप अनुवाद केला गेला नाही म्हणून पानकाढा विनंती लावली (अर्थात मराठी लोकांसाठी स्ट्रॅटेजीकली महत्वाचा म्हणून ती विनंती मी काढली हा भाग वेगळा.)
या विषयावर लिहिण्यासारखे बरेच काही आहे पण हायकाय नायकाय ने एकुण ग्रस्त आहे.

प्रतिक्रिया
उत्तम लेख!
सर्वच आमेरीक वृत्तपत्रात
कैच्याकै वाटतय
मी गूगल न्यूजवर कॉपीराईट
लय भारी!!
मुद्दा कोणी काय कसे रिसीव करावे हा नाही.
असं कसं भौ??
स्मिथ अँड वेसन पिस्तुल... उदाहरण कॉपीराइटच्या वरील मुद्यावर
१००% मान्य.
चर्चेत उत्साही सहभागा करीता धन्यवाद.
एक विनंती