Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आपला अभिजित on Sat, 03/13/2010 - 00:45
  • Log in or register to post comments
  • 16095 views

प्रतिक्रिया

Submitted by शुचि on Sat, 03/13/2010 - 00:55

Permalink

शेवटच्या

शेवटच्या या प्रकरणात .... बाळ रुळल्याचं वाचलं अन डोळ्यात पाणी आलं..... अ-प्र-ति-म लेखमाला. *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 03/18/2010 - 02:19

In reply to शेवटच्या by शुचि

Permalink

+१

शब्द संपले.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता चौगुले on Tue, 02/19/2013 - 11:20

In reply to शेवटच्या by शुचि

Permalink

+१

असेच झाले
  • Log in or register to post comments

Submitted by समिधा on Sat, 03/13/2010 - 01:02

Permalink

खुपच छान

खुपच छान आहेत दोघांचे फोटो. =D> सगळे लेख आत्ताच वाचले ......... दोघांचा फोटो बघुन आनंदाने डोळ्यात पाणी आल.. तुमच्या कुटूंबाला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. समिधा
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Wed, 03/17/2010 - 23:40

In reply to खुपच छान by समिधा

Permalink

स्टॅडींग ओव्हेशन

अगदि हेच म्हणतो. स्टॅंडींग ओव्हेशन टु अभिजीत,हर्षदा आणि मनस्वी. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by piu on Sat, 03/13/2010 - 01:07

Permalink

सुरेख

सुरेख लेखमाला !! तुमचे व तुमच्या पत्निचे अभिनन्दन!! मनस्वि व निमिश फारच भाग्यवान आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 03/13/2010 - 01:09

Permalink

सर्व लेख

सर्व लेख झाले की प्रतिसाद लिहिन असं ठरवलं होतं आणि आता लेखमाला पूर्ण झालिये तर 'आपण काय बोलणार' अशी भावना झालिये! लेखमालेबद्दल दोनच शब्द.. केवळ अप्रतिम! तुम्हा दोघांना सलाम!! मनस्वीचंही फार कौतुक वाटतं!! तिच्याकडूनही धडा घेण्यासारखा आहे!! तुमचं चौकोनी कुटुंब सदैव आनंदात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. .. आणि शेवटचा फोटो खासच आहे!! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments

Submitted by अस्मी on Mon, 03/15/2010 - 16:33

In reply to सर्व लेख by मेघवेडा

Permalink

असेच म्हणते!!!

सर्व लेख झाले की प्रतिसाद लिहिन असं ठरवलं होतं आणि आता लेखमाला पूर्ण झालिये तर 'आपण काय बोलणार' अशी भावना झालिये! लेखमालेबद्दल दोनच शब्द.. केवळ अप्रतिम!
असेच म्हणते!!! - मधुमती
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 03/13/2010 - 01:26

Permalink

काय बोलू?

गदिमांना शरण जातो फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार! माती, पाणी, उजेड, वारा तूच मिसळशी सर्व पसारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार! (साश्रू)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Sat, 03/13/2010 - 01:37

In reply to काय बोलू? by चतुरंग

Permalink

अगदी

अगदी अगदी... -(साश्रू) अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 03/13/2010 - 02:50

In reply to काय बोलू? by चतुरंग

Permalink

अगदी हेच

अगदी हेच आलं मनांत. अभिजीत, तुझं, हर्षदा आणि मनस्वीचं मनापासून अभिनंदन. फोटो सगळेच छान आले आहेत. निमिष आणि मनस्वीचं बालपण खूप गोजिरं असेल... नक्कीच! आणि ते तुम्हा सर्वांना एका धाग्यात कायमचं बांधणारं ठरेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sat, 03/13/2010 - 21:25

In reply to अगदी हेच by प्राजु

Permalink

हेच

अभिजीत, तुझं, हर्षदा आणि मनस्वीचं मनापासून अभिनंदन. फोटो सगळेच छान आले आहेत. निमिष आणि मनस्वीचं बालपण खूप गोजिरं असेल... नक्कीच! आणि ते तुम्हा सर्वांना एका धाग्यात कायमचं बांधणारं ठरेल. अगदी असेच.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Sat, 03/13/2010 - 01:28

Permalink

शेवटाचा फोटो

शेवटाचा फोटो हा तूमची फलष्रुती म्हणायला हरकत नाही. तूम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 03/13/2010 - 01:37

Permalink

मस्त, मस्त,

मस्त, मस्त, मस्त!!! ग्रेट लेखमाला! आपल्या कुटुंबाला हार्दीक शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments
Profile picture for user अरुंधती

Submitted by अरुंधती on Sat, 03/13/2010 - 01:41

Permalink

शुभेच्छा!

केवळ अप्रतिम झाली आहे लेख-माला! आणि ती तुमच्या प्रत्यक्ष अनुभवातून साकारल्यामुळे त्याला अजून वेगळेच परिमाण लाभले आहे. तुम्ही घेतलेल्या व पूर्ण केलेल्या निर्णयाबद्दल तुमचे व तुमच्या सर्व परिवाराचे अभिनन्दन व हार्दिक शुभेच्छा! फोटोज बोलके आहेत! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Sat, 03/13/2010 - 05:32

In reply to शुभेच्छा! by अरुंधती

Permalink

अगदी हेच म्हणते

तुमचे व तुमच्या सर्व परिवाराचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा. यश नक्कीच मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल.. on Sat, 03/13/2010 - 02:00

Permalink

अप्रतिम!!

सलाम तुम्हाला !! तुमचे व तुमच्या सर्व परिवाराचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! स्वप्निल
  • Log in or register to post comments

Submitted by अश्विनीका on Sat, 03/13/2010 - 04:02

Permalink

अप्रतिम

अप्रतिम लेखमाला. मूल दत्तक घेण्याचा आपला निर्णय खूप कौतुकास्पद आहे. आपले व आपल्या कुटुंबाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. दत्तक घेण्यासाठी लहान बाळांची मोठी वेट लिस्ट असली तरी मोठ्या मुलांची संख्या अशा संस्थेत लहान बाळांच्या तुलनेत बहुधा जास्त असावी असे वाटते. आमच्या ओळखीत ४-५ वर्षापूर्वी एका जोडप्याने 'श्रीवत्स' मधून दोन अडिच वर्षाचा मुलगा दत्तक घेतला. ह्या जोडप्याने एका मुलाची निवड आधीच करून ठेवली होती पण मुलाला घरी आणण्यापूर्वी १ महिना (भावी) आईला रोज संस्थेत जाउन मुलाबरोबर काही तास घालवावे लागणार होते. तशी अटच होती. त्या सांगत असत की मी संस्थेत गेले की इतर मुले पण माझ्याभोवती जमा होत. ह्या आईने आपल्या बरोबर पण खेळावे , बोलावे असे सर्वच मुलांना वाटे . ह्या सर्व निरागस मुलांमधून फक्त एकाशीच जवळीक साधायची आणि त्याला एकट्यालाच घरी घेउन जायचे हा विचार त्यांच्यासाठी फार त्रासदायक होता. (जरी एक मूल घरात येणार हे सुखदायक असले तरी ..महिनाभर इतर मुलांचा ही लळा लागल्याने). आता हा मुलगा ५-६ वर्षाचा मोठा झाला आहे आणि त्यांच्या घरात छान रूळला आहे. - अश्विनी
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Sat, 03/13/2010 - 09:42

Permalink

हॅट्स ऑफ !

तुझं, हर्षदाचे आणि सर्व कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन. रोज मिपावर आलो की आधी तुझ्या ह्या लेखमालेचे पुढचे भाग आले आहेत का ते बघायचो. मनस्वी आणि निमिषच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा ! --------- ता.क. -- तुझा ता.क.ही आवडला :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 03/13/2010 - 09:46

Permalink

छान रे...

छान रे. एका छोटेखानी पुस्तकाचं मटेरियल आहे याच्यात... :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 03/13/2010 - 10:17

Permalink

शेवट वाचे

शेवट वाचे वाचे पर्यंत भरून / गलबलून आलं होतं... नंतर कळलं की मी एकटाच नाहीये... सलाम लेका... तुम्हा सगळ्यांनाच. मला हे जमेल की नाही याबद्दल खात्री नाही देता येणार. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सुप्रिया on Sat, 03/13/2010 - 11:15

Permalink

अप्रतिम

अप्रतिम लेखमाला. बस्स् इतकचं बोलू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 03/13/2010 - 11:25

Permalink

सलाम

सलाम मालक. बास अजुन काय बोलु. :)
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Sat, 03/13/2010 - 14:14

Permalink

अभिनंदन!!!!

अभिजितराव, एक धाडसी व कौतुकास्पद निर्णय घेउन तो यशस्वीरीत्या पुर्णत्त्वास आणल्यामुळे, तुमचं व तुमच्या पत्निचं अभिनंदन!!! =D>
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Sat, 03/13/2010 - 20:57

In reply to अभिनंदन!!!! by समंजस

Permalink

+१ सहमत

--प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 03/13/2010 - 15:44

Permalink

मिपाचा

मिपाचा दर्जा खूप खूप उंचावला.. जियो अभिजितराव! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Tue, 03/16/2010 - 11:03

Permalink

धन्यवाद, मिपा!

दत्तक मुलाचा निर्णय डिसेंबरमध्ये अमलात आला, तेव्हापासून त्याविषयी नक्की कधी लिहावं, याबद्दल साशंक होतो. निमिष आमच्या घरात रुळल्यावर आता लिहावं, असं ठरवलं. कुठे, किती आणि कसं लिहावं, हे ठरत नव्हतं. पहिल्या लेखाची सुरवात केली, नि वाटलं छान रंगतेय कहाणी. दोन किंवा जास्तीत जास्त तीन भागांत संपेल, असं वाटलं होतं. पण रंगत वाढत गेली. वाचकांच्याही छान प्रतिक्रिया आल्या. माझ्या वैयक्तिक कहाणीत त्यांनाही खूप रस असल्याचं वाटलं, म्हणून थोडं आणखी फुलवून लिहिलं. आधी स्वतःच्या ब्लॉगवर लिहायचं मनात होतं. पण ब्लॉगविश्वाला हल्ली फारच मर्यादा आलेय. मग `मिपा'च्या साम्राज्यातच आपली तुतारी फुंकावी असं निश्चित केलं. `नवरत्नां'ची कदर करणारी बरीच `नर (आणि नारी) रत्नं` इथे आहेत, याची खात्री होतीच!! घरी लिहायचं, ऑफिसात जाऊन ते युनिकोडात टाकायचं नि मग मिपावर पोस्ट करायचं, असे उद्योग तीन दिवस करावे लागले. भलताच त्रास तो! :T पण हे सगळं करण्यात गंमत आली. वाचकांच्या उत्साही प्रतिसादामुळं या कष्टांचं चीजही झालं. प्रत्येकाचा नाव घेऊन उल्लेख शक्य नाही, पण सर्वांना धन्यवाद!! `मिपाचा दर्जा उंचावला' हा तात्यांचा प्रतिसाद ही या लेखमालेची सर्वांत मोठी पावती म्हणायला हवी. ही मालिका ब्लॉगवर सुरू केली, पण शेवटचे भाग मिपावर आधी टाकले, यातच सर्व काही आलं!! :) दहा भागांचा हा `छळ' मनापासून सहन करून प्रतिक्रियाही दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद! :) ...आणि भविष्यकाळातील `छळा'साठी शुभेच्छा!!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद्_पुणे on Wed, 03/17/2010 - 18:42

Permalink

अभिजीत

तुमचे, मनस्वीचे आणि तुमच्या पत्निचे अभिनंदन...अप्रतिम लेखमाला..
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 03/17/2010 - 22:17

Permalink

अभिजीत ....

अभिजीत .... छ्या, काही सुचत नाही आहे. निमिष आणि मनस्वी दोघं मोठे झाल्यावर लिहायला लागले तर कधी ना कधी "आमचे आई-बाबा" या विषयावर भरभरून लिहीतील ... अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on गुरुवार, 03/18/2010 - 02:15

Permalink

__/\__

=D> =D>
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/18/2013 - 18:42

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 05/06/2013 - 01:19

Permalink

अप्रतिम

सुंदर लेखमाला.. सेंण्टी झालो यार !!
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Mon, 05/06/2013 - 19:30

In reply to अप्रतिम by कपिलमुनी

Permalink

सेंण्टी झालो मी पण

सलाम घ्या देवा _/\_ नेमकं काय वाटतंय सांगायला शब्द नाहीयेत, निव्वळ अप्रतिम. सुरेख गाणं झालं की काहीच उरत नाही बोलायला तसं झालंय,
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 05/06/2013 - 18:19

Permalink

पूर्ण लेखमाला आज वाचली. १०-९

पूर्ण लेखमाला आज वाचली. १०-९-८ करत सगळे भाग उघडले नि सुरुवातीपासून वाचत आलो. सातव्या आठव्या भागानंतर शब्दच दिसेनात. गलबलून आलं. नि:शब्द.
  • Log in or register to post comments

Submitted by ढालगज भवानी on Mon, 05/06/2013 - 18:22

In reply to पूर्ण लेखमाला आज वाचली. १०-९ by प्यारे१

Permalink

समे हीअर!! गलबलून येते

समे हीअर!! गलबलून येते वाचताना.
  • Log in or register to post comments

Submitted by कोमल on Mon, 05/06/2013 - 19:17

In reply to पूर्ण लेखमाला आज वाचली. १०-९ by प्यारे१

Permalink

+१००

अगदी असेच झाले..
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/06/2013 - 18:24

Permalink

मस्त..

झक्कास..
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 04/21/2014 - 14:31

Permalink

कित्ती सुंदर लिहीलय!! हा भाग

कित्ती सुंदर लिहीलय!! हा भाग तर संपुर्ण लेखमालेतील सर्वोत्तम लेख आहे.. त्यात बाळाचं वर्णन ऐकुन तर एकदम जुने दिवस आठवले.. धावपळ.. दुधाच्या बाटल्या.. लॅक्टोजेनचे डबे..!! सध्या घरात ताई दत्तक बाळ घेत आहे. तिने ठरवल्यावर जेव्हा चौकशी केली तेव्हा ३-५ वर्षाचे वेटिंग सांगण्यात आले. मलाही इतका वेळ ऐकुन खुप धक्का बसला. पण गंमत म्हणजे जेव्हा ती संस्थेला भेटायला गेली तेव्हा एक सव्वा वर्षाची मुलगी केवळ काळी आहे म्हणुन कुणाकडे दत्तक जात नाहीये.. खरं तर ती अत्यंत निरोगी मुलगी आहे, डोळेही खुप सुंदर आहेत. पण "कॅलेंडर बेबी" नसल्याने (आणि त्यात काळी असल्याने..) कुणी तिला घेत नाही असे कळाले.. आम्ही ताबडतोब तिला पसंत केले! म्हण्लं आम्हाला हिच भाची हवी.. ताबडतोब प्रोसिजर सुरु झाली आहे.. कदचित येईलही ती ८-१० दिवसात!!! आम्ही धडाक्याने खरेदी सुरु केली आहेच..
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 04/21/2014 - 16:59

In reply to कित्ती सुंदर लिहीलय!! हा भाग by पिलीयन रायडर

Permalink

भारीच! नव्या बाहुलीशी खेळा

भारीच! नव्या बाहुलीशी खेळा आता!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 04/21/2014 - 18:29

In reply to कित्ती सुंदर लिहीलय!! हा भाग by पिलीयन रायडर

Permalink

वा वा!!! अभिनंदन!!! तिच्याशी

वा वा!!! अभिनंदन!!! तिच्याशी बॉन्डींग करण्याचा प्रयत्न आत्तापासूनच सुरु करा. माझ्या मुलीच्या शाळेत एक भारतीय मुलगी आहे जिला अमेरीकन पालकांनी दत्तक घेतलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 04/22/2014 - 13:09

In reply to वा वा!!! अभिनंदन!!! तिच्याशी by शुचि

Permalink

हो.. तिच्या साठी खुप खेळणे ,

हो.. तिच्या साठी खुप खेळणे , कपडे, पुस्तकं वगैरे घेत आहोतच.. पण ताई साठी "डोहाळजेवण" करावं अशीही इच्छा आहे. तिचे हे पहिलेच मुल. तिची हौस कधी पुर्ण होणार? म्हणुन आम्ही तिला एक दिवस खास बागेत नेऊन, तिच्या आवडिचे पदार्थ करणार आहोत.. तिला आणि तिच्या मिस्टरांना गिफ्ट्स देऊ. तिला बाळ होणार म्हणुन तिचं कौतुक करु!! एक दिवस खास तिचा!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/22/2014 - 16:25

In reply to हो.. तिच्या साठी खुप खेळणे , by पिलीयन रायडर

Permalink

वरच्या प्रतिसादात "कॅलेंडर

वरच्या प्रतिसादात "कॅलेंडर बेबी नसल्याने" असा शब्दप्रयोग आलाय. याचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 04/22/2014 - 16:29

In reply to वरच्या प्रतिसादात "कॅलेंडर by बॅटमॅन

Permalink

म्हणजे कॅलेंडर मध्ये जशी

म्हणजे कॅलेंडर मध्ये जशी सुंदर बाळं असतात.. गोरी गोरी.. गुबरी गुबरी.. एकदम गुग्लि वुग्ली वुश्श टाईप.. तशी.. लोकांना जनरली तशीच बाळं हवी असतात..
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना मन्दार on Tue, 04/22/2014 - 15:15

Permalink

खुप छान लिहिला आहे

सगळी लेखमाला एकदम वाचुन काढली. खुप च छान लिहिली आहे.. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sun, 03/06/2016 - 13:37

Permalink

१०, ९, ८

१० पासुन १ पर्यंतचे सगळे धागे उघडुन पहिल्यापासुन सलग एकत्र वाचले. आधीच्या धाग्यांवरचे प्रतिसाद वाचले नाहीत. अप्रतिम. छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाजी on Mon, 03/07/2016 - 17:35

Permalink

वाव! मस्तच.

अभिजित, हा भाग आत्ताच वाचला. फार आवडला. आत सवडीने सर्व भाग वाचणार आहे. भाते, हा धागा वर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Mon, 03/07/2016 - 17:57

Permalink

वाह

अप्रतिम लेखमाला. सगळे धागे आजच वाचले. खरच, प्रियाजी यांच्यासारखंच म्हणते - भाते, हा धागा वर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com