शिल्पे घडविली बहु कुशलता..
तर!! सांगायची गोष्ट अशी, की मिपाकर कुठेही गेले की धागा हा निघालाच पाह्यजे (असं म्हणतात). बरं, असे काही प्रवासवर्णाचे धागे लिहायचे म्हणजे जाम टेंशन येतं. त्यात लेण्यांबद्दल लिहायचं म्हणजे आणखीच टेंशन!! तरीही म्हटलं आता लोक एवढा आग्रह करतातच आहेत तर खरडाव्या चार ओळी.
पुष्कळ दिवसांपासून हो-नाही करत लांबत चाललेला वेरुळ लेण्यांच्या भेटीचा विषय पुन्हा एकदा निघाला. आणि व्हॉट्स अॅप, प्रत्यक्ष भेटीतून प्लान बनू लागले. दोन दिवसांचाच प्लान करायचा असं कळल्यावर बर्याच जणांनी हात वर केले, म्हणजे सहमती दर्शवली. पुढे कोणत्याही सहल/ट्रेकच्या अलिखित नियमानुसार काही जणांच्या दातांच्या ट्रीटमेंट (दाताच्या ट्रीटमेंट असणे हा एक अख्ख्या मिपावर जगप्रसिद्ध वाक्प्रचार आहे, अर्थ माहित नसल्यास अर्थातच अभ्यास वाढवा.) आड आल्या आणि पुणे येथून जाण्यास इन मीन चार मंडळी उरली. ती चार मंडळी म्हणजे अस्मादिक, धन्या, प्रशांत आणि जे वेरुळला येणार म्हणून सगळ्यांनी उत्सुकता दाखवली असे वल्ली. नंतर इस्पिकचा एक्का हे आधी अजिंठा बघून मग वेरुळ आमच्यासोबत करणार असल्याचे कळले.
ठरल्याप्रमाणे पुणे स्टेशनावर भेटून आमचा प्रवास सुरु झाला. सकाळचीच वेळ असल्याने एफेम वर सुरेश वाडकर चालू होते. मग त्यांची कोणती गाणी चांगली, कोणती अमुक एका प्रसंगी सतत लावली जातात इथपासून सुरु झालेली चर्चा जगजित-चित्राच्या गजलांपर्यंत येऊन पोचली. सूर्य अंमळ वर आल्यामुळे पोटात हत्ती धावायला सुरुवात होण्याची लक्षणं दिसत होती त्यामुळे एका धाबावजा हाटेलापाशी थांबून पोटपूजा झाली. मग पुन्हा प्रवास सुरु. पुन्हा गप्पा टप्पा. दरम्यानच्या वेळेत ठराविक मंडळींनी आदल्या दिवशीच्या झोपेची थकबाकी गोळा करुन घेतली. तोवर साधारण साडेदहा पावणेअकराला वेरुळास पोहोचलो.
जरा चहापाणी घेतलं आणि थेट लेण्यांकडे निघालो.
हा लेण्यांकडे जाणारा मार्ग.
लेण्याच्या बाहेरील भिंतींवर दिक्पाल, वरुण-इंद्रादि देवतांची शिल्पे आहेत. लेण्यात प्रवेश केल्या केल्या समोरच हे गजांतलक्ष्मीचं अत्यंत सुंदर शिल्प आहे.
पुढे ही महिषासूरमर्दिनी
हे थोडं वल्ली मोड मध्ये. "हे रती-मदन. आणि त्यांच्यातील प्रेमाच्या गोडव्याचं प्रतीक असलेला ईक्षुदंड"
पुढील तीन सरित्शिल्पे:
मकरवाहिनी गंगा
कूर्मवाहिनी यमुना
पद्मस्थित सरस्वती
विदारण नृसिंह
शेषशायी विष्णू
रावणानुग्रह
गजासूर वध
महायोगी शिव
महाभारत घटनापट
लिंगोद्भव शिव
गंगावतरण
छतांवर काढलेल्या चित्रांचे अजूनही शिल्लक असलेले काही अवशेष
नक्षीदार कळस
जटायू वध
मार्कंडेयानुग्रह
वराह व भूदेवी
स्थौण नृसिंह
शिलालेख
कैलास लेण्याच्या कळसावरील नक्षीकाम
स्कंद
शिवपार्वती विवाह
'तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला सुशील सद्गुणी सुंदरसा नवरा' अशी हिमालयपंतांनी झायरात केल्यावर स्थळ घेऊन आलेले ब्रह्मदेव.
अक्षक्रीडेत गुंग शिवपार्वती
कूर्मचिती
पुढे जैन लेण्यांतील काही शिल्पे. या लेण्यांत तितकासा उजेड नसल्याने फारशी छायाचित्रे घेता आली नाहीत.
अंबिका
सर्वानुभूती यक्ष
अजूनही बर्यापैकी सुस्थितीत असलेली जैन लेण्यांच्या गाभार्यातील चित्रे.
जैन लेण्यातील एक शिलालेख
सर्व लेणी पाहून झाल्यानंतर औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यात आली. तिथून निघून बिरुटे सरांकडे पाहुणचार घेऊन सगळी मंडळी मार्गस्थ झाली.
सर्व शिल्पं पाहताना एक ओवी सतत आठवत होती..
चित्रे रेखिली बहुकुशलता। वारु आणि गजरथा॥
चित्रकारे चित्रे रेखितां। आळस काही न केलां॥
वाचने
7142
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
प्रकाशचित्रांसहितचा छोटासा
(सूड मोड आॅन) आॅस्सम!! (सूड
In reply to (सूड मोड आॅन) आॅस्सम!! (सूड by किसन शिंदे
+++१११
अखेर श्री. वल्लीबुवा गडकरी गुरुजींच्या
लै भारी.
मस्त रे सूड!
चांगलाच सूड काढला आहे
In reply to चांगलाच सूड काढला आहे by कंजूस
दशावतार सहल मागच्या महिन्यात
सचित्र वृत्तांत आवडला
In reply to सचित्र वृत्तांत आवडला by दिपक.कुवेत
हेहे
In reply to हेहे by धन्या
वूई एंजॉय जर्नी, नॉट
In reply to वूई एंजॉय जर्नी, नॉट by यसवायजी
टाळ्या.. +११११
आवडला वृत्तांत ! कूर्मचिती
हेच
In reply to हेच by रामदास
चिती म्हणजे यज्ञवेदी.
मस्त रे सूड! ओवेसोमे
मस्त
आवडले!
सर्व फोटो, सुंदर आले आहेत.
'तरुण कुलीन गोरा, पाहिजे
In reply to 'तरुण कुलीन गोरा, पाहिजे by प्रचेतस
एक प्रश्न !!
In reply to एक प्रश्न !! by सूड
नाय रे.
ओढा! ओढा लेको पैसे! करा चैन!
छान झालीये तुमची वेरूळ भेट!
मस्त