Skip to main content

पुस्तकांचा लिलाव.

पुस्तकांचा लिलाव.

लेखक रामदास
Published on बुधवार, 08/10/2008

याद्या 1060
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

वजनावर पुस्तके विकणार्‍यांचा आणि घेणार्‍यांचा मी निषेध करतो.... वजन कन्सेप्ट पुस्तकाच्याबाबतीत तरी मला पटत नाही... वजनावर पुस्तक विकायला काय तो भाजीपाला आहे? पुस्तकात जे ज्ञान असते ते लाख मोलाचे असते, किमान त्यातील ज्ञान आपल्याला आकळत नाही म्हणून वजनावारी विल्हेवाट लावावी हे मला पटत नाही... (पुस्तकप्रेमी) सागर

In reply to by सागर

साहित्य म्हणजे कच्चा माल पुस्तक म्हणजे माल वाचक म्हणजे गिर्‍हाईक लेखक म्हणजे कच्चामाल वितरण करण्याची क्षमता नसलेला उत्पादक मुद्रक म्हणजे कच्चा मालाचे पक्क्या मालात रुपांतर करणारा यांत्रिक प्रकाशक म्हणजे अधिकृत ठोक विक्रेता दुकानदार म्हणजे किरकोळ विक्रेता रद्दीवाला म्हणजे मालाचे भंगारात रुपांतर करुन विकणारा विक्रेता साहित्यसंमेलन म्हणजे या सर्वांचा बाजार या सर्वांचे रोल थोडे फार बदलतात. प्रकाश घाटपांडे

एक वेळ घर विका, गाडी विका, स्वतःला विका पण पुस्तके विकु नका. सल्ला मानणे गरजेचे नाही. जे वाटले ते सांगितले.

In reply to by अवलिया

एक वेळ घर विका, गाडी विका, स्वतःला विका पण पुस्तके विकु नका. सल्ला मानणे गरजेचे नाही. जे वाटले ते सांगितले. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (पुस्तकप्रेमी)

In reply to by अवलिया

एक वेळ घर विका, गाडी विका, स्वतःला विका पण स्वतःकडील पुस्तके विकु नका.
+१ -(आणखी एक पुस्तकप्रेमी) ऋषिकेश

एक वेळ घर विका, गाडी विका, स्वतःला विका पण पुस्तके विकु नका. सर सलामत तर पगडी पचास....अशी म्हण आहे. घर विकले तर राहणार कुठे आणि पुस्तके तरी कुठे ठेवणार? आणि आपल्यालाच विकले तर मग पुस्तकांची काय जरूर आहे? आपण शाबूत राहीलो तर हवी तितकी पुस्तके विकत घेता येतील.

In reply to by प्रमोद देव

>>घर विकले तर राहणार कुठे आणि पुस्तके तरी कुठे ठेवणार? लौकिक अर्थाने हे खरेही असेल. अर्थात स्वतःजवळ असलेली उत्तमातील उत्तम पुस्तके किती दिवस ठेवायची याचे उत्तर मला सांगता येणार नाही. पण वाट्टेल तेव्हा हवे असलेले पुस्तक शोधून वाचण्याची मजा काही औरच असते. अर्थात माझं हे माझ्यापुर्तं वयक्तिक मत आहे. सुदैवानं विकत घेऊन पुस्तक संग्रही आणि वेळ मिळेल तेव्हा वाचायची सवय असल्याने, पुस्तक कोणाला वाचायला द्यायचंही जीवावर येतं तेव्हा विकणं तर बहोत दूर की बात !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्थात स्वतःजवळ असलेली उत्तमातील उत्तम पुस्तके किती दिवस ठेवायची याचे उत्तर मला सांगता येणार नाही. पण वाट्टेल तेव्हा हवे असलेले पुस्तक शोधून वाचण्याची मजा काही औरच असते. अर्थात माझं हे माझ्यापुर्तं वयक्तिक मत आहे. सुदैवानं विकत घेऊन पुस्तक संग्रही आणि वेळ मिळेल तेव्हा वाचायची सवय असल्याने, पुस्तक कोणाला वाचायला द्यायचंही जीवावर येतं तेव्हा विकणं तर बहोत दूर की बात !!!
१०१% सहमत...लहान असतांना टी.व्ही. चा खोका भरून पुस्तके होती, मग अजून वाढली आणि तो टी.व्ही. चा खोका फाटायला लागला... आई पुस्तके रद्दीत देऊ म्हणाली तेव्हा मी बानेदारपणे -- आधी मला रद्दीत दे, मग पुस्तके असे म्हतल्याचे आठवते...पुस्तके म्हणजे जीव की प्राण!!

In reply to by मनिष

>>आधी मला रद्दीत दे, मग पुस्तके आपला बाणेदारपणा आवड्ला. :)

In reply to by मनिष

मनिष, बाणेदारपणा खरंच आवडला.... पण, मग शेवटी आईने काय दिलं रद्दीत. ;) बिपिन.

In reply to by प्रमोद देव

अहो देव साहेब तुम्ही अगदि शब्दशः अर्थ नका काढत जावु हो... उत्तम पुस्तके संग्रही असावीत, केवळ जास्त झाली किंवा पैसे हवेत म्हणुन विकु नये, असे मला सुचवायचे होते. आजकाल अलंकारिक बोलणे पण अवघड झालय... असो.

घर विकायचे की पुस्तके....असा प्रसंग आल्यास प्राथमिकता कोणाला द्याल?

In reply to by प्रमोद देव

अर्थात घर विकायला... जास्त पैसे येतील... फिक्समधे टाकुन भाडे देण्याची सोय होईल. ट्रक मधे टाकुन पुस्तके नवीन भाड्याच्या (रेंट) घरात नेवुन वाचु. जास्तीच्या पैशात अजुन पुस्तके घेवु... राग मानु नका

In reply to by अवलिया

अहो नाना,राग कसला त्यात? चर्चा म्हटली दोन्ही अर्थ काढले जाणार. मग तो शब्दश: असेल अथवा लाक्षणिक असेल. प्रत्येकाच्या चश्म्यावर ते अवलंबून असेल. पुस्तकांपेक्षा घराला जास्त किंमत आहे म्हणून तुम्ही घर विकाल हे म्हणालात...ह्यातच सगळं आलं. इथे तुम्ही व्यवहार पाहीलात आणि ते योग्यही आहे. पुस्तकांचे साहित्यिक मुल्य कितीही मोठे असले तरी आधी व्यवहार पाहायला लागतोच. त्यामुळे पुस्तके विकायला गेलात तर त्यांना एक तर रद्दीच्या भावात तरी विकावे लागेल नाही तर एखादा रत्नपारखी भेटल्यास दामदुप्पट किंमत देईल..इतकेच . पण तरीही त्याला व्यवहारात फारशी किंमत नाहीये. म्हणूनच तुम्ही घर विकायला निघालात. पुस्तके मानसिक गरज भागवतात हे खरंय. पण एकाच कुटुंबातल्या सगळ्याच सदस्यांना त्याबद्दल तितकी आपुलकी वाटेल अथवा त्यांचा उपयोग होईल असे नाही म्हणता येत. त्या ऐवजी घर हे सगळ्यांच्या आपुलकीचे आणि उपयोगाचे आहे. म्हणून खरे तर ...एकवेळ घर विका,पण पुस्तके विकू नका....हे परस्परसंबंध विधान पटत नाही. अर्थात कुणी काय विकावे....हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा! :) त्याऐवजी....पुस्तके कधीच विकू नका,ते वैचारिक धन आहे..वगैरे.....असे एकतर्फी विधान केल्यास मात्र ते मान्य होण्यासारखे आहे. कृपया त्याच्याशी दुसर्‍या कुणाचा संबंध जोडू नका म्हणजे झाले.

In reply to by प्रमोद देव

मी घराला प्राथमिकता देईन कारण समस्या सोडवायला घर विकायची गरज असेल तर पुस्तके विकून ती समस्या सुटणार नाहि. तेव्हा घर विकून ती समस्या सोडवीन पुढेमागे घर घेता येईल् परिस्थिती सुधारल्यावर घर घेऊ शकेन आणि मधल्या काळात ती पुस्तके मला साथ देतील -(पुस्तकप्रेमी) ऋषिकेश

In reply to by प्रमोद देव

तुलना पाहता माणूस अगोदर घर विकतो घरातील वस्तू नंतर आणि मला वाटतं पुस्तकांचा नंबर फार शेवटचा असतो. तेव्हा घर विकायचे की पुस्तके यात अगोदर घर विकले जाईल,कारण पुस्तकाला घराइतकी किम्म्त नसेल आणि पुस्तके विकून घराच्या किमतीइतके पैसे येत असतील तर पुस्तकांना प्राधान्य !!!

>>त्या निमीत्ताने आतापर्यंत न वापरलेला पर्याय वापरण्याची एक कल्पना मनात आली. अच्छा हे सगळे कौल लेखनप्रकार वापरायला मिळावा म्हणून? लोक समजतायत कौल टिकवायची की पुस्तके? :-) चालू द्या.

In reply to by सहज

अशी भानगड आहे काय? अच्छा अच्छा अच्छा बर ठीक आहे. स्वगत- पुढल्या वेळेस सहजरावांशी चर्चा करुन आधी अर्थ काढावा रामदासांच्या हालचालींचा! नाना

काका, विचार चांगला आहे. पण माझेही मुक्तसुनित सारखेच झाले आहे... आज नाही, पण मी येईन तेव्हा असे करता येइल का? बिपिन.

>>वजनावर हवी आहेत.रुपये ५०० प्रती किलोस.सगळी पुस्तकं. तुम्ही २० रु किलोवर पुस्तके घेता असे समजले. ----- आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो. :)

त्या पुस्तकांचे काय झाले.?