दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा
सोडे (ड्राय प्रॉन्स):
रस्सा:
साहित्यः
१. दुधी - १/२ कि.
२. सोडे - १ वाटि
३. कांदा उभा चीरुन - १ मध्यम
४. ओलं खोबरं - १/२ वाटि
५. लसुण पाकळ्या - ४
६. आख्खे धणे - १ चमचा
७. जीरं - १/२ चमचा
८. सुख्या लाल मिरच्या - २
९. हळद - १/२ चमचा
१०. मसाला - २ चमचे (टिप नं १ बघा)
११. तेल
१२. चींचेचा कोळ किंवा १/२ लिंबाचा रस
१३. चवीनुसार मीठ
१४. बारीक चीरलेली कोथिंबीर
कॄती:
१. सोडे स्वःच्छ धुवुन बाजुला ठेवा
२. एका फ्राय पॅन मधे १ चमचा तेल तापलं कि अनुक्रमे त्यात कांदा, लसुण पाकळ्या, खोबरं, धणे-जीरं आणि सुख्या लाल मिरच्या घालुन परता
३. खमंग परतल कि मिक्सरमधे वाटुन त्याची मुलायम पेस्ट करा
४. आता एका नॉनस्टिक पॅन / कढई मधे ५ पळ्या तेल तापलं कि १ चमचा मोहरी घाला
५. मोहरी तडतडली कि हिंग, हळद घाला. आता वाटलेली पेस्ट घालुन परतत रहा
६. कडेने तेल सुटु लागलं कि २ चमचे मसाला घाला
७. मसाल्याचा कच्चा वास गेला कि चीरलेला दुधी आणि सोडे घाला
८. गरजेपुरतं पाणी, लिंबाचा रस घालुन मंद आचेवर रस्सा शीजु द्या. मधुन मधुन पाण्याचं प्रमाण चेक करुन रस्सा ढवळत रहा
९. दुधी शीजला कि गॅस बंद करुन बारीक चीरलेली कोंथींबीर पेरा
१०. गरमागरम रस्सा भाताबरोबर किंवा तांदुळाच्या भाकरीबरोबर हाणा. आज डब्यात हाच मेनु आणलाय.
टिपा:
१. साहित्यात जो मसाला म्हणालोय जो खासकरुन नॉनव्हेज करता वापरतात. मागे स्नेहातैने ह्याची पाकृ पण दिलेली आठवतयं. अगदि नसेलच तर कांदा-लसुण मसाल्यानी पण चव येईल
२. दुधी एवजी वांगी-सोडे पण रस्सा करतात...माझ्या मते ती सीकेपी स्टाईलने अधीक चवीष्ट बनते
३. रस्सा म्हटलं कि बटाटा हा हवाच...तो जरुर घाला. माझा राहिला :)
वाचने
19464
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
भारी आहे पाककृती.
छान पाकृ
वाह,
दिपक.कुवेत साहेब, हे सोडे
धन्यु पैसाते आणि एक्का साहेब
In reply to धन्यु पैसाते आणि एक्का साहेब by दिपक.कुवेत
करंदीपेक्षा निम्म्या
In reply to करंदीपेक्षा निम्म्या by डॉ सुहास म्हात्रे
ओ येस्स
In reply to ओ येस्स by दिपक.कुवेत
पनवेल-उरणला ताजा माल मिळेल..
In reply to पनवेल-उरणला ताजा माल मिळेल.. by पिंगू
पिंगू
In reply to पिंगू by दिपक.कुवेत
हाहाहा.. एंजोय.. पुढे काही
जल्ला ....
ईईईईईईईईईई .........
In reply to ईईईईईईईईईई ......... by अत्रुप्त आत्मा
नुसतं खातेत आसंच नाय. लै
In reply to नुसतं खातेत आसंच नाय. लै by डॉ सुहास म्हात्रे
@यकदा खाल्लं की जिभेची सवय
In reply to ईईईईईईईईईई ......... by अत्रुप्त आत्मा
बुवा
In reply to बुवा by दिपक.कुवेत
आम्चं सुटलं ब्वा !
In reply to आम्चं सुटलं ब्वा ! by प्यारे१
झाड-पाल्याला जीव नसतोच ना
In reply to झाड-पाल्याला जीव नसतोच ना by शुचि
कुठे शाकाहार मांसाहाराच्या
In reply to आम्चं सुटलं ब्वा ! by प्यारे१
हो रे प्यारे
In reply to हो रे प्यारे by दिपक.कुवेत
हाहाहा अहो कुवेत साहेब,
In reply to हाहाहा अहो कुवेत साहेब, by शुचि
हा हा हा
In reply to हा हा हा by दिपक.कुवेत
होय मलाही वळले नाही पण आमच्या
In reply to हाहाहा अहो कुवेत साहेब, by शुचि
देव्हार्यात बस शुचिमामी.
In reply to देव्हार्यात बस शुचिमामी. by प्यारे१
जौ दे रे प्यारे
In reply to जौ दे रे प्यारे by दिपक.कुवेत
दुधी सर्वात "सात्विक" भाजी
In reply to बुवा by दिपक.कुवेत
(No subject)
In reply to ईईईईईईईईईई ......... by अत्रुप्त आत्मा
बुवा, कुफेहेपा? सुकटाला ईईई
आम्ही अजुन पापलेट आणि सुरमई
In reply to आम्ही अजुन पापलेट आणि सुरमई by त्रिवेणी
एकदा विकत आणा आणि करुन बघा..
अप्रतिम
मासळी बाजार मांडलंनीत रे
हा लेख /पाकू सोडून "मराठी
In reply to हा लेख /पाकू सोडून "मराठी by कंजूस
अय्यराऽऽ!!
In reply to हा लेख /पाकू सोडून "मराठी by कंजूस
अय्यो...
निसर्गचक्र.
In reply to निसर्गचक्र. by प्रभाकर पेठकर
हे निसर्गचक्र आहे. अपराधी
In reply to निसर्गचक्र. by प्रभाकर पेठकर
आई गं काका...
मस्त पा.क्रु.
In reply to मस्त पा.क्रु. by मुक्त विहारि
अरे वा
छान.
मस्त... दमदार पाककृती
एक पदार्थ आवडीचा आणि एक
In reply to एक पदार्थ आवडीचा आणि एक by तुमचा अभिषेक
अभि
In reply to अभि by दिपक.कुवेत
शक्यय, दुधीशी तसा पंगा नाही
पावभाजीची सुरुवात ७२ साली
In reply to पावभाजीची सुरुवात ७२ साली by कंजूस
पावभाजी....
In reply to पावभाजी.... by प्रभाकर पेठकर
पावभाजीचा प्रवास अगदी बरोबर
In reply to पावभाजीचा प्रवास अगदी बरोबर by कंजूस
जरुर कंजुस साहेब
In reply to जरुर कंजुस साहेब by दिपक.कुवेत
दिपु काका मी वाफवुनच करते ..
अरे वा गाडगीळ साहेब
जबरी....
दिपु काका एकदम लवली दिसतीय
In reply to दिपु काका एकदम लवली दिसतीय by जेनी...
कस्काय बॉ जमतं तुम्हाला नोकरी न किचन ???
छान रेसिपी. सोड्या बरोबर
दिपक.कुवेत फोटो मस्त आहे
सोडे आणि सुकी करंदी यातील फरक
खुमासदार फोटो अन खमंग पाकृ !