नुकतेच नाशिक सप्तशृंगी गडाची ट्रीप केली
पुण्याहून राज्य सरकारी परिवहन मंडळाच्या बस( २* २ एशियाड ) ने नाशिक ला गेलो
नाशिकहून साध्या बसने ( S T चा लाल डबा!) आधी नांदुरी मग तिथून सप्तशृंगी गडावर गेलो
गडावर सोयी सुविधांचा अभावच आहे
भक्तनिवास आहे पण त्यांची निट देखभाल होत नाही हे लगेच कळून येत होते खोल्या स्वछ नव्हत्या तसेच त्याच्या आवारातच (passage मध्ये)लोक आपापल्या पथाऱ्या पसरून झोपत होते
प्रसादाच्या जेवणाची सोय त्यामानाने बरी होती
सर्वत्र अस्वच्छता,धुळीचे साम्राज्य आणि पचापचा थुंकणारे लोक यांचा अक्षरश: वैताग येत होता
तिथले stalls पाहून 'देऊळ ' picture ची आठवण झाली
शक्य असेल तर गडावर मुक्काम न करता नाशिकला मुक्काम करून तिथून देवी दर्शनापुरती गडाची ट्रीप करणे जास्त सोयीस्कर आहे
गड चढताना होणाऱ्या भोवतालच्या निसर्ग दर्शनामुळे आणि मग देवीच्या दर्शनामुळे ह्या गोष्टींचा तात्पुरता का होईना विसर पडला आदिशक्तीचे दर्शन घेऊन मन तृप्त झाले
गडावरून उतरून साध्या बसने नाशिक मग तिथून त्र्यंबकेश्वरला गेलो
ह्या दोन्ही प्रवासात खिडकीतून बाहेर थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे ह्या थाटात वावरणारे भारतीय लोक ! त्यात बसचे वाहक चालक पण! (मी पुढच्या seat वर बसलेले असल्यामुळे मला हे फारच प्रकर्षाने दिसत होते)
का आपण ह्या देशात जन्माला आलो असे वाटत होते
त्र्यंबकेश्वर ला पोचल्यावर तिथे शेगाव संस्थानच्या भक्तनिवासात राहिलो ते मात्र खूपच छान आहे
तिथे त्यांचे सुरेख मंदिर पण आहे. ( मंदिरापासून १ km अन्तर)
त्र्यम्बकेश्वारला जास्त चांगले वाटले (सुट्ट्या सुरु व्हायच्या आहेत अजून म्हणून थोडी बजबजपुरी कमी होती)
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परत पुण्यात अशी छोटेखानी सहल पार पडली.
पुण्यात येताना खाजगी बसने आलो त्यामुळे थोडी गैरसोय झाली
राज्य सरकारी परिवहन मंडळाच्या बसची सोय त्यापेक्षा चांगली आहे ( तिकीटाची किंमत पण जास्त आहे ना खाजगीपेक्षा !)
आपण जरा routine मधून change आणि ताजेतवाने होण्यासाठी म्हणून प्रवासाला जातो त्यात पण देवाच्या ठिकाणी जाताना मनात श्रद्धा आणि भक्तीभाव ठेवून जातो पण तिथेच अशा गोष्टी पाहून मन खट्टू होते
आणि श्रद्धा आणि भक्तिभावाची जागा वैताग आणि चिडचीडीने घेतली जाते आपोआपच.
अध्यात्म हे असेच कष्टसाध्य आहे हि आपली लाडकी भारतीय मानसिकता त्यामागे आहे असे वाटत राहिले .
हि मानसिकता लवकर बदलो आणि सर्व देवस्थान च्या ठिकाणी किमान स्वच्छता आणि पावित्र्य जपले जावो हीच त्या देवाला प्रार्थना.
वाचने
16713
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
मग सप्तशृंगीला अवश्य जाच.
In reply to हम्म by पैसा
मला शेगावची व्यवस्था फार
In reply to हम्म by पैसा
देवळांतली घाण !
In reply to मला शेगावची व्यवस्था फार by जातवेद
च्याय्ला. फटूंच्या अपेक्षेने
हेच म्हणतो
In reply to च्याय्ला. फटूंच्या अपेक्षेने by बॅटमॅन
फोटोज copy paste होत नाहीयेत
In reply to च्याय्ला. फटूंच्या अपेक्षेने by बॅटमॅन
पिकासा वापरा.
In reply to फोटोज copy paste होत नाहीयेत by Prajakta२१
नेमके काय नि कसे उपाय करता
या उलट ..
अगदी सहमत आहे. दक्षिणेत लहान
In reply to या उलट .. by चौकटराजा
महाराष्ट्रातीलही कित्येक
In reply to या उलट .. by चौकटराजा
हो आहेत, पण तिथेही काही अण्भव
In reply to महाराष्ट्रातीलही कित्येक by प्रचेतस
मांजरंच ते. बाकी मांजरे
In reply to हो आहेत, पण तिथेही काही अण्भव by बॅटमॅन
अर्थातच. मांजराला काय कळतेय
In reply to मांजरंच ते. बाकी मांजरे by प्रचेतस
असे असावे ..
In reply to अर्थातच. मांजराला काय कळतेय by बॅटमॅन
हल्ली तीर्थक्षेत्रांचे
(अपवाद- शेगाव).
In reply to हल्ली तीर्थक्षेत्रांचे by त्रिवेणी
(अपवाद- शेगाव).+१६३० मंदीर आणी उद्यानात अगदी माफक दरात, स्वच्छ-सुंदर व्यवस्था.सगले पर्वदले पन तुलजपुरच्य आइ
?
In reply to सगले पर्वदले पन तुलजपुरच्य आइ by परिजात
हे घ्या बाळबोध मध्ये
In reply to सगले पर्वदले पन तुलजपुरच्य आइ by परिजात
ब्रोब्रंय!
In reply to हे घ्या बाळबोध मध्ये by चौथा कोनाडा
पारीजात,
In reply to सगले पर्वदले पन तुलजपुरच्य आइ by परिजात
हुम्म्म
In reply to पारीजात, by शुचि
हाहाहा
In reply to हुम्म्म by इरसाल
पंढरपूराचे देऊळ स्वच्छच आहे
जायच आहे सप्तशृंगीला. धन्यवाद
शुभेव्छा
In reply to जायच आहे सप्तशृंगीला. धन्यवाद by स्पंदना
तुमच्यातकडनं 'वडाप' जात आसंन
In reply to जायच आहे सप्तशृंगीला. धन्यवाद by स्पंदना
हात नाय दाखवणार आम्ही.
In reply to तुमच्यातकडनं 'वडाप' जात आसंन by प्यारे१
अहो कंजुस साहेब बरोबर आहे
भारतीय मनोवृत्ती बदलायला
मोक्ष्दा
बाप रे! नविनच माहीती!
In reply to मोक्ष्दा by मोक्षदा
आणि..
In reply to मोक्ष्दा by मोक्षदा
मी गेलो होतो इकडे ट्रेकिंग
फोटोची लिंक आणि हे लिहायचे विसरलेच होते!
प्रसादाचा लाभ
सप्तशृंगीगड वणी
भक्तनिवास?