Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भाते on Mon, 04/07/2014 - 14:28
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
दहावीचा निकाल लागल्यावर चिंता, काळजी आणि ऊत्सुकता होती ती महाविद्यालयाची. मध्यमवर्गीय कुटुंबांतुन आलेला असल्यामुळे तोपर्यंत माझे जग फक्त शाळा आणि घर इतकेच मर्यादित होते. महाविद्यालयात पाऊल टाकेपर्यंत मला त्या बाहेरून गोंडस पण आतुन भयानक असलेल्या जगाची कल्पनाही नव्हती. बरोबर कोणीही मित्र नसल्याने मी घाबरतच पहिल्यांदा महाविद्यालयात पाऊल ठेवले. माझ्या स्वागतासाठी तिकडे एक चौकडी माझी वाट पहात ऊभी होती. तिन मुलं आणि एक मुलगी. एकाने हसत मला माझे नाव विचारले. घाबरतच मी त्यांना माझे नाव सांगितले. दुसरा, इतरांकडे पहात म्हणाला, "मराठी!" मी काहिही न बोलता फक्त मान डोलावुन होकार दिला. तिसरा बाकीच्यांकडे पहात मला म्हणाला, "टाईमपास सिनेमा पाहिला असशीलच ना तु?" माझ्या ऊत्तराची वाट न पहाता पहिला माझ्याकडे बघुन म्हणाला, "दगडू शाळेत शिपायासमोर प्राजक्ताला म्हणुन दाखवतो तो संवाद म्हणुन दाखवं बघू!" माझ्या डोळ्यात आता पाणी आले होते. रडायला तर येत होतं पण सगळ्यांसमोर मी रडूही शकत नव्हतो. इतकी चेष्टामस्करी करूनही त्यांचे समाधान झाले नसावे. दुसऱ्याने त्या चौकडीतल्या मुलीकडे पहात, आपल्याकडचे पेन माझ्यासमोर धरत मला सांगितले, "आता हे गुलाब तिला देऊन १४३ म्हणुन दाखवं बघु." इतका वेळ डोळ्यांत दाटलेले अश्रु आता माझ्या गालांवरून ओघळू लागले होते. बहुदा त्या मुलीला माझी दया आली असावी. आपल्या मित्रांकडे पहात ती हसुन म्हणाली, "जाऊ द्या रे त्याला. नविन आहे तो." एकाने माझ्या खांद्यावर हात ठेवत मला सांगितले, "आता चांगली तयारी झाल्याशिवाय पुन्हा इथे येऊ नकोस, समजलं! जा आता." दोन्ही हातांनी डोळे पुसत मी तिकडुन निघुन गेलो. थोडया अंतरावर जाऊन मी खिशातुन हातरुमाल काढुन स्वत:ला सावरत होतो. मला माझे रडणे आवरत नव्हते … इतक्यात समोरून मी एका चश्मिश मुलीला येताना पाहिले. त्या मुलीने सलवार कमिज आणि ओढणी असा साधासाच ड्रेस घातला होता. खांद्यावरची बॅग सांभाळत ती मुलगी आत येत होती. मघाशी मला त्रास देणाऱ्या त्या चौकडीने त्या मुलीला थांबवले. मला त्रास देऊन समाधान न झाल्याने ते आता पुन्हा या मुलीला सुध्दा त्रास देणार या विचाराने मला त्यांचा प्रचंड राग आला. एकाने हसत तिला तिचे नाव विचारले. ती मुलगी शांतपणे म्हणाली, "सीमा." चौकडीतल्या त्या मुलीने तिला विचारले, "सीमा म्हणजे काय?" सीमा त्या चौघांकडे पहात हसुन म्हणाली, "सीमा म्हणजे मर्यादा." चौकडीतल्या त्या मुलीने पुन्हा सीमाला विचारले, "टाईमपास सिनेमा पाहिला असशीलच ना तु?" सीमाने काहिही न बोलता मान डोलावुन होकार दिला. लगेच त्यांच्यापैकी एक म्हणाला, "प्राजक्ता घरी आरश्यासमोर ऊभी राहुन म्हणते तो संवाद म्हणुन दाखवं बघू!" सीमाने मान वरून त्यांच्याकडे पाहिले. काही क्षण थांबुन तिने थोडेसे अडखळत का होईना, पण तो संवाद म्हणुन दाखवला. पाठीमागे ऊभे राहुन मी हे सगळे पहात होतो. त्या मुलीचे मला खरचं खुप आश्चर्य आणि कौतुक वाटत होते. मग आपल्या मित्राकडुन पेन काढुन घेत त्या मुलीने ते पेन सीमाच्या हातात दिले व ती हसुन म्हणाली, "आता हे गुलाब यापैकी कोणालाही देऊन १४३ म्हणुन दाखवं बघु." सीमाने ते पेन आपल्या हातात घेतले आणि मिनिटभर पेन न्याहाळुन झाल्यावर ती पेन समोर करत तिच्या समोर ऊभ्या असलेल्या मुलाला म्हणाली, "मला तु आवडतोस." पाठीमागे ऊभे राहुन हे सर्व पहात असलेल्या मला प्रचंड धक्का बसला होता. हे सगळं इतक्या शांतपणे आणि सहजतेने करायला कसे जमत होते तिला? सीमाचा हात आपल्या हातात घेत त्या चौकडीतली ती मुलगी हसुन म्हणाली, "यापुढे तुला कुठलीही मदत लागली तर मला अवश्य सांग. जा आता." सीमा तिच्याकडे बघुन हसुन म्हणाली, "थॅंक्स." मग आपल्या खांद्यावरची बॅग सांभाळत ती चालु लागली. हे सगळे न रहावुन मी पटकन तिच्यासमोर जाऊन ऊभा राहिलो आणि तिला विचारले, "कसं जमलं गं तुला हे सगळं करायला?" रडल्यामुळे माझे डोळे लाल झाले होते. सीमाने एकदा माझ्याकडे पाहिले आणि मान पाठीमागे वळवुन त्या चौघांकडे पहिले. मग पुन्हा माझ्याकडे बघत ती शांतपणे हसुन म्हणाली, "आपण इतके कणखर असायला हवं कि जगातली कुठलीही गोष्ट आपले मन विचलित करू शकणार नाही." तिच्या या वाक्याने माझे आयुष्य बदलले… कायमचेचं!
  • Log in or register to post comments
  • 19221 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Mon, 04/07/2014 - 14:38

Permalink

चला कट्टे करायचा फायदा झाला....

व्रुत्तांत लिहीता लिहीता लेख पण लिहायला लागलात. आता लेख वाचतो. (आता थांबू नका, जमेल तसे लिहीत रहा.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 04/07/2014 - 15:24

In reply to चला कट्टे करायचा फायदा झाला.... by मुक्त विहारि

Permalink

+१

अगदी अगदी. छानच लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 04/07/2014 - 21:01

In reply to चला कट्टे करायचा फायदा झाला.... by मुक्त विहारि

Permalink

मुवि, नेहमी आपल्या

मुवि, नेहमी आपल्या उत्साह्वर्धक, प्रोत्साहनपर प्रतिक्रिया वाचते. कधी फाफेंना "वा! कधी नव्हे ते फाफेची प्रतिक्रिया वाचायला मिळाली" अशी तर कधी वरील प्रतिक्रिये प्रमाणे. अशा प्रतिक्रियांनी त्या त्या व्यक्तीचे मॉरल नक्कीच इम्प्रूव्ह होत असणार :) आपल्या प्रतिक्रिया आवडतात. त्यांचा नकीच फायदा होत असावा. - अर्थात हे माझे वयक्तीक मत झाले. पेठकर, आपण व अन्य काही जण आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया वाचाव्याशा वाटतात. असो कीप इट अप.:)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 04/07/2014 - 14:51

Permalink

जबरा

मस्त... हे वाक्य तर खासच... "आपण इतके कणखर असायला हवं कि जगातली कुठलीही गोष्ट आपले मन विचलित करू शकणार नाही."
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन पाठे on Mon, 04/07/2014 - 15:56

Permalink

ढासू लिहिलय....पण दोन प्रश्न

ढासू लिहिलय....पण दोन प्रश्न पडलेत मला १)दहावीचा निकाल अजून लागला नाही? २)कथा जुनी म्हणावी तर टाईमपास सिनेमा जानेवारी २०१४ ला लागलाय? ह..........म्मं
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Mon, 04/07/2014 - 16:10

Permalink

बोंबला!

मिपावर लेख लिहितानासुध्दा एखाद्या कादंबरीसारखी प्रस्तावना लिहावी लागते हे मला माहित नव्हते. ही घ्या प्रस्तावना, जी लेखाच्या सुरुवातीला द्यायची राहुन गेली. सदर कथा, यातिल पात्र व घटना, काल्पनिक असुन वास्तवाशी त्यांचा तिळमात्रही संबंध नाही आणि असल्यास तो केवळ योगायोग समजावा. ह.घ्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 04/07/2014 - 17:27

Permalink

विश्रांती मोड ऑफ-

विश्रांती मोड ऑफ- आवडल-विश्रांती मोड ऑन
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Mon, 04/07/2014 - 18:35

Permalink

अरे वा

भात्यातुन असे वाचनभेदि बाणहि निघतात हे माहित नव्हतं.....आता मुवि म्हणत आहेत त्या प्रमाणे "लिहायचा थांबु नकोस!"
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 04/07/2014 - 18:42

Permalink

वा भाते साहेब,

वा भाते साहेब, बोलता कमी पण लिहिता सुरेख. सुंदर लेख लिहिते रहा
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Mon, 04/07/2014 - 21:42

Permalink

जाऊ द्या रे त्याला. नविन आहे तो."

नया है वह ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com