त्या दिवशी ऑफिसला उशीर होणार अशी कल्पना होतीच. संध्याकाळचे सात वाजून गेले तरी काम चालू होतं. एरवी मिळणारी लिफ्ट आज मिळणार नव्हती त्यामुळे कसं जायचं याचे आडाखे मनात बांधले होते. कामाच्या व्यापात १० कसे वाजले कळलंच नाही. ट्रेन ने सगळ्यात पटकन प्रवास होईल असं म्हणून कांजूरमार्ग स्टेशन वर पोहोचलो.
रात्रीचे सव्वा दहा वाजले होते. सीएसटी च्या बाजूकडील सर्व तिकिट खिडक्या बंद होत्या. एटीव्हीएम व कूपन मशीन्स चालू होती, पण नेहमीचा ट्रेन प्रवास नसल्याने माझ्याकडे स्मार्टकार्ड किंवा कूपन यापैकी काही नव्हतं त्यामुळे पंचाईत होती. मी त्या बंद खिडकीच्या किलकिल्या फटीतून आतल्या माणसाला विचारलं, "तिकीट कसं काढणार साहेब?" "त्या बाजूला जा.", असं उत्तर मिळालं. आता पूर्ण फलाट पार करायचा होता. तसाच रेल्वे, शासन यांच्या नावाने मनातल्या मनात स्तुतिसुमनं उधळत फलाट पार करून पलिकडच्या म्हणजेच कल्याण च्या दिशेच्या तिकीट घरापर्यंत पोहोचलो.
तिथेही तीच गत होती. सगळ्या खिडक्या बंद. मशीन्स चालू पण त्यांचा मला उपयोग नाही. तिथे अक्षरश: शुकशुकाट होता. आता काय करायचं, असा विचार करत असताना एक साधारण तिशीचा मुलगा तिथे आला. त्याच्याकडे स्मार्टकार्ड होतं. तो आपलं तिकीट काढायला एटीव्हीएम मशीनजवळ गेला असता मी माझ्या हातातली दहाची नोट पुढे करत विचारलं, "भाऊ एक ठाणा सिंगल काढून देणार का?" "देतो ना", तो म्हणाला. त्याचं तिकीट काढून झाल्यावर त्याने एक ठाणा सिंगल काढून माझ्या हातात ठेवलं. मी ती दहाची नोट त्याला देऊ केली. आपल्याकडे सुट्टे नाहीत हे बघून तो म्हणाला, "राहूदे". मी माझंही पाकीट पुन्हा पुन्हा बघितलं पण सुट्टे माझ्याकडेही नव्हते. मी म्हणालो, "माझ्याकडेपण नाहीयेत यार, पण तू घे ना... असं नको" "नाही रे; राहूदे", तो पुन्हा म्हणाला. "अरे असं नको करूस, माझ्याकडे सुट्टे नाहीत, पण तू दहा ठेव. मला आत्ता गरज होती कारण इथे एकही तिकीट खिडकी चालू नाहीये आणि माझ्याकडे कार्ड किंवा कूपन नाही.", मी सांगितलं. तरीही त्याने पैसे घ्यायला नकारच दिला. मी फलाटापर्यंत त्याच्याबरोबर चालत होतो, त्याला पैसे देऊ करत होतो, पणा त्याने घेतले नाहीत. शेवटी ‘पाच रुपयांसाठी काय एवढं रे!’ असं हसत म्हणाला. मीही मग नाईलाजाने थॅंक्स म्हटलं, आणि समोर आलेल्या ट्रेन मधे तो चढला.
मी त्याचा विचार करत तिथे उभा होतो. मला आश्चर्य वाटत होतं ते त्याच्या पाच रुपये असे सोडून देण्याचं नव्हे, तर त्याच्या वृत्तीचं. पाच रुपये किंवा पाच लाख रुपये, हे महत्वाचं नसतं, पण महत्वाची असते ती दानत. देण्याची वृत्ती. असं बघायला गेलं तर तो मुलगा फार श्रीमंत घरातला वाटत नव्हता, अगदी साधारण दिसणारा असा तो मुलगा होता. त्यामुळे त्याच्याकडे खूप पैसे असून म्हणून त्याला पाच रुपयांचं फारसं महत्व नाही, अशातला भाग नव्हता.
त्या मुलाचा विचार करत असताना मला आसपासची श्रीमंत माणसं आठवत होती जी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या मूलभूत कंजूसपणाचं दर्शन जगाला घडवत असतात. ती माणसं जी लाखावारी पैसे कमवूनही, खर्च करणं तर सोडा, पण अडलेल्या कुणाला मदत करायलाही कचरतात. अशांचा विचार करत असतानाच मला या मुलाचं, त्याच्या दानतीचं खूप कौतुक वाटत होतं. कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
दुस-या दिवशी ट्रेन चा प्रवास करायचा नव्हता, पण तरीही सकाळी आदल्या दिवशीचं ते तिकीट पाकिटात दिसलं. घरातून बाहेर पडल्यावर जवळच्याच देवळात गेलो. तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा"
त्या मुलाचा विचार करत असताना मला आसपासची श्रीमंत माणसं आठवत होती जी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या मूलभूत कंजूसपणाचं दर्शन जगाला घडवत असतात. ती माणसं जी लाखावारी पैसे कमवूनही, खर्च करणं तर सोडा, पण अडलेल्या कुणाला मदत करायलाही कचरतात. अशांचा विचार करत असतानाच मला या मुलाचं, त्याच्या दानतीचं खूप कौतुक वाटत होतं. कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
दुस-या दिवशी ट्रेन चा प्रवास करायचा नव्हता, पण तरीही सकाळी आदल्या दिवशीचं ते तिकीट पाकिटात दिसलं. घरातून बाहेर पडल्यावर जवळच्याच देवळात गेलो. तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा"
वाचने
6588
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडलं.
हेच म्हणतो...
In reply to आवडलं. by यशोधरा
मस्त लिहिलेय ..वेल्लभट तुमचे
+१११
In reply to मस्त लिहिलेय ..वेल्लभट तुमचे by आरोही
धन्यवाद :)
In reply to मस्त लिहिलेय ..वेल्लभट तुमचे by आरोही
आवडले..
@आपले आयुष्य श्रीमंत करून
In reply to आवडले.. by इन्दुसुता
+१
+१
In reply to +१ by सानिकास्वप्निल
मस्त लेख...
मस्त !!!
आवडले!
मस्त !!!
धन्यवाद !
मिपा पुनरु:जिवित.
पेठकर काकांशी शब्दशः सहमत.
In reply to मिपा पुनरु:जिवित. by प्रभाकर पेठकर
चांगली माणसं बरीच आहेत या
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
असेच कुठेतरी वाचले होते कि
विद्यार्थीदशेत असताना एका धाय
In reply to असेच कुठेतरी वाचले होते कि by कानडाऊ योगेशु
काही महिन्यांपुर्वी ठाणे
In reply to विद्यार्थीदशेत असताना एका धाय by कानडाऊ योगेशु
मलाही दादर स्थानकावर एक सभ्य
In reply to काही महिन्यांपुर्वी ठाणे by किसन शिंदे
बरोबर आहे...
In reply to असेच कुठेतरी वाचले होते कि by कानडाऊ योगेशु
आवडला
तुम्ही फसवत नव्हतात म्हणुम हा
फार सुंदर अनुभव
आवडले
लगे रहो मुन्नाभाई च्या
खूपच छान..........आवडलं.
मस्त.
छान अनुभव.
खूप छान अनुभव आणि चर्चा!
तीच दहा रुपयांची नोट देवासमोर
तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा"इथे देवाच्या जागी थेट कोण्या गरजूला दान केले असते तर चांगले झाले असते असे उगाच माझ्या नास्तिक मनाला वाटून गेले. असो, उगाच यावर आता वाद नको.. :) पण स्वताचा एक अनुभव आठवला, असेच मी एकाला तीन रुपयांचे कूपन कमी पडत असताना माझ्याकडेच दिले होते. बरोबर त्याची आई आणि बायको अशी फॅमिली होती. तो साहजिकच मला ते तीन रुपये परतवायला गेला तर मी सहजच नाकारले, जणू काही तो माझा मित्र वा ओळखीचा होता आणि दोनचार रुपयांची काय देवाणघेवाण करायची असे वाटले. अर्थात हे सहजच घडले, मी काही फारसा दानशूर गटात मोडणारा नाहीये, पण असेही होते. असो, शेवटी त्या व्यक्तीने जबरीच माझ्या हातात तीन रुपयांची चिल्लर कोंबली आणि मग थोड्यावेळाने मला जाणवले की बरोबर यार, त्याच्या दृष्टीने विचार करता तो का आपली तीन रुपयांची मेहेरबानी स्विकारेल, ते देखील पैसे नसणे हा त्याचा मूळ प्रश्न नसताना, म्हणून मी आढेवेढे न घेता अगोदरच पैसे स्विकारायला हवे होते. लेख छान आहे, असे छोटे छोटे चांगले अनुभव कागदावर उतरवणे आणि प्रकाशित करणे हे त्यापेक्षा छान आहे.अच्छा बाळाचे नाव "परी" ठेवल?
In reply to तीच दहा रुपयांची नोट देवासमोर by तुमचा अभिषेक
आवडलं
धन्यवाद :)
छान लिहिलय.