दादा वोंट बी बॅक अगेन
मित्राने आत्ताच सांगितलं .. आपला दादा निवृत्त होणार .. त्यानेच अधिकृत घोषणाही केली .. आणि एकदम कसंसंच झालं.. आपण मरणार हे प्रत्येकाला माहीत आहे.. पण एकदा कळलं .. की अमुक अमुक दिवशी मरणार .. त्यावेळी जशी अस्वस्थता व्हावी . तसंच .. दादा च्या कारकिर्दीचा अंत झाला आहे हे तर कळूनच चुकलं होतं .. पण त्याने घोषणा केल्यावरच अशी उदासिनता का यावी ? आपल्या कारकिर्दीत अत्यंत खालच्या आणि अत्यंत वरच्या परिस्थितीतुन गेलेला , जगभर आपल्या 'फुटवर्क' आणि 'शैली' साठी एक फॅन्स क्लब असलेला, मैदानावर आणि मैदाना बाहेरही तेवढाच चर्चेत राइलेला, कधी चॅपेल वाद, कधी लॉर्डस वर शर्ट काढून सर्व भारतियांच्या वतीने 'अभिमानी फ्लिंटॉफ'च्या उद्दामपणाचा बदला घेणारा,कधी टॉस साठी उशीरा मैदानात जाणारा आपला सौरव गांगूली.
सचिन तेंडूलकर पेक्षा करियर मधे कमी यशस्वी असला तरी दादाने लोकप्रियतेच्या बाबतीत सचिनची बरोबरी केलीच आहे. फार वाईट वाटलं तो '******' ग्रेग चप्पल आला आणि दादाच्या कारकिर्दीला जणू क्षयच झाला... त्याच्या बरोबर जी दुटप्पीपणाची वर्तणूक केली गेली.. त्यामुळे निश्चीत मनात कुठे तरी चिड येते ...
आता क्रिकेटचा एवढा फिव्हर राहिलेला नाही.. पण जवळजवळ दिडेक वर्षांपुर्वी , व्यावसायिक जिवनाला सुरूवात होण्या आधी इंग्लंड टाइमझोन असो वा ऑस्ट्रेलियन .. मध्यरात्री उठून मॅचेस पाहिल्याचं आठवतं ....भारत-पाकिस्तान डे-नाइट मॅच आहे... भारताला २९३ धावांचं लक्ष आहे .. सेकंड इनिंगला सुरूवात झाली आहे.. अशा वेळी सचिन-सौरव ही दिग्गज जोडी जेंव्हा मैदानात उतरचे तेंव्हा एका उंच डोंगतावरून एका दोरीवरून चाललो आहोत की काय असा रोमांच मिळत असे... किंवा विप्र म्हणतात तसं अँड्रिनलीन ची मात्रा अचानक वाढून श्वास रोखला जात असे... वकार किंवा वसिम अक्रम ज्यावेळी धाव सूरू करे .. तस तसे हृदयाचे ठोके वाढत.. आणि बॉल टाकायच्या नेमके पहिले सौरवच्या डोळ्यासमोर काही तरी येते आणि तो स्टंपच्या बाजूला होउन बॉलरला थांब म्हणे त्यावेळी एक व्यक्त न करता येणारं फिलींग येत असे... मग पुढच्याच चेंडूवर .. अगदी बॅटच्या एक मुंगळा (मुंगळा हे गोट्यांच्या खेळातलं एकक आहे, इत्ताड्,मुंगळा,इं.इ.) बाजुनं किपर कडे बॉल गेला की अगदी जीव भांड्यात पडे .. कधी हाच दादा तेंडल्याला धावबाद करी किंवा स्वतः बाद होइ तेंव्हा त्याचा फार राग येत असे...
पण एकदा ३-४ षटकं झाली .. की दादाला सुर सापडे .. मग स्टिव्ह वॉ म्हणतो त्या प्रमाणे .. सर्व ९ खेळाडू जरी ऑफ साइड ला ठेवले तरी सौरव तिथुन गॅप काढून चौकार वसूल करू शकतो ..
जो दिवस दादाचा असे .. त्या दिवशी प्रतिस्पर्धी बॉलर्सची दाणदाण् ऊडे .. तो जेंव्हा डाउन द विकेट येउन लॉग ऑनला लेग स्पिनरला षटकार खेचायचा तेंव्हा आम्ही जर शेजारून पामेला आंड्रेसन जरी पास झाली तरी दुर्लक्ष करू... सुपर स्क्वेअर कट , स्क्वेअर ड्राइव्ह आणि कव्हर शॉट्स मधे गांगुलीची बरोबरी करणारे कमीच ... नॅटवेस्ट सेरिजची फायनल ज्यात गांगुलीने तुफानी ६० धावांची खेळी केली त्यात एक ऑफ साइडला जो षटकार मारला त्याने 'जेफ बॉयकॉट ला ही बॉयकॉट केले .. हर्षा तर आनंदाने उसळला ... १९९९ च्या विषकरंडकात श्रीलंकेविरूद्ध १८३ धावांची दिवाळी केलेला गांगूली कालांतराने विस्मरणात गेला .. लाजिरवाण्या वागणूकीला बळी पडला ..
आज दादाने निवृत्तीची घोषणा केली .. त्यामुळे आम्ही एक दिवसाचं लंघन करून त्याला त्याने दिलेल्या रोमांचा बद्दल ऋण व्यक्त करणार आहोत. दादा .. वी विल नेव्हर एव्हर फर्गेट यू... चियर्स
------------------------------------------------------------------------एक सौरवचा निस्सिम चाहता----------
वाचने
13845
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
अरेच्या..
जोपर्यंत
In reply to अरेच्या.. by भाग्यश्री
समयोचित
सहमत
In reply to समयोचित by मृदुला
.
In reply to समयोचित by मृदुला
चढता सूरज ...
थोडी गम्मत ..
अगदी सहमत :)
In reply to थोडी गम्मत .. by मुक्तसुनीत
अगदी खरंय (बरंय?)
In reply to अगदी सहमत :) by टारझन
हो ना
In reply to अगदी खरंय (बरंय?) by बेसनलाडू
हाहा
In reply to अगदी सहमत :) by टारझन
नाय हो ... एवढांही छोटा नाही
In reply to हाहा by मुक्तसुनीत
गावसकर !
In reply to अगदी सहमत :) by टारझन
संपूर्ण तोंड
In reply to गावसकर ! by संदीप चित्रे
भावना पोहोचवन्यात अपयश
In reply to संपूर्ण तोंड by चतुरंग
आमार शोनार दादा!
एकदम योग्य वर्णन !!
भा पो
फार वाईट
मस्त लिहिलंय रे !!!
बारामतीच्
मी एकदा ऐकल होतं
In reply to बारामतीच् by विजुभाऊ
:(
ऑफसाईडचा दादा
पुढचा नंबर कुंबळेचा?
आजच्या
In reply to पुढचा नंबर कुंबळेचा? by मिसंदीप
सहमत
तो गावस्कर
टारु चांगल
हो-हो :)
In reply to टारु चांगल by झकासराव
मी पण!
In reply to हो-हो :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय ...
In reply to मी पण! by ब्रिटिश टिंग्या
बाकीचे अतितुरळक क्रिटेटर्स
In reply to खरंय ... by टारझन
योग्य भावना ..
उशीर केला.
राहुल तू सुद्धा !
In reply to उशीर केला. by देवदत्त
फक्त गांगुली नाही..
In reply to राहुल तू सुद्धा ! by संदीप चित्रे
उशीरा
गावसकर -- अजून एक आठवण
श्रीकांतची स्फोटक आणि बेभरवशाची बॅटिंग
In reply to गावसकर -- अजून एक आठवण by संदीप चित्रे
आणि संदीप पाटील !
In reply to श्रीकांतची स्फोटक आणि बेभरवशाची बॅटिंग by चतुरंग
फारच
In reply to गावसकर -- अजून एक आठवण by संदीप चित्रे
जीगरबाझ असेल.
In reply to फारच by मराठी_माणूस
हो ती
In reply to जीगरबाझ असेल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे.
In reply to हो ती by मराठी_माणूस