मागच्या आठवड्यात भावाकडे गेले होते तेथे गावावरून आई आली होती मग काय पूर्ण ७-८ महिन्यांनतर आईचे हातचे जेवण मिळणार होते मग सोडणार कोण .मस्त पैकी तिच्या हातची शेवभाजी (खान्देशी शेवभाजी)बनवायला सांगितले .अहाहा काय चव होती ..काहीही केले तरी ती चव कुठेच पुन्हा मिळत नाही ..अगदी मी त्याच पद्धतीने करून बघते पण ती चव खरच येत नाही हे खरेच आहे..
नवऱ्याला हि माझ्या आईच्या हातची त्याच मसाल्यातील कुठलीही भाजी खूप आवडते ..या वेळेस तो सोबत आला नसल्याने त्याला ती खायला मिळाली नाही ...मग काय त्याने फोन करून आईच्या हात चा मसाला बनवून आणायला सांगितले ..मग काय जावयाची इच्छा म्हटल्यावर आईने अगदी अर्ध्या तासात आम्हा तीन माणसांसाठी ७-८ माणसांचा मसाला बनवून दिला ..
अगदी ५ तासांच्या प्रवासानंतर मी घरी आल्यावर तो वाटलेला मसाला शीत कपाटात ठेवून दिला ..
त्याच मसाल्यात मी तीन प्रकारांच्या भाज्या बनविल्या मी शाकाहारी असल्याने माझ्यासाठी शेवभाजी,नवऱ्यासाठी अंडाकरी आणि दुसर्या दिवशी भरली वांगी ..तसेच या मसाल्यात चिकन सुद्धा खूप चविष्ट होते ...
मी विचार केला हि पाककृती मिपा वर देऊयात म्हणून मी आईला फोन करून प्रत्येक पदार्थाचे प्रमाण विचारले तर ती म्हणाली मी असे ठरवून एवढे कधीच काही टाकत नाही नेहमी आपल अंदाजाने घेते ..तरी पण मी प्रमाणाबद्दल सांग असे म्हटल्यावर तिने मला अंदाजे च काही गोष्टी सांगितल्या कि हे एवढे घे ते एवढे घे ...
तेच मी खाली दिलेले आहे
साहित्य: ४ कांदे,अर्धी वाटी सुके खोबरे ,१५ ते १७ लसुन पाकळ्या (हो ती तर यापेक्षा हि जास्त घेते )२ इंच आले ,जिरे २ चमचे ,लाल तिखट ३ चमचे,हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,मीठ चवी प्रमाणे ,कोथिम्बिर ,तेल ४ चमचे ,पाणी
कृती: सर्व प्रथम कांदे ,सुके खोबरे खरपूस भाजून घ्या ,mixar मध्ये कांदे -खोबरे ,आले लसुन जिरे ,मीठ ,कोथिम्बिर ,हळद ,लाल तिखट,गरम मसाला घालून पाणी घालून बारीक वाटून घ्या ..त्यापैकी ३/4
तयार मसाला कढाई मध्ये तेल घालून त्यात टाका ..
आणि पाणी न टाकता तेलात शिजू द्या ..
खालील फोटोत दिसत असल्याप्रमाणे तेल सुटू लागल्यावर त्यात थोडे पाणी घाला .
पाणी टाकल्यावर त्याला ७ ते १० मी.उकळू द्या ....
चांगली उकळी आल्यावर आच बंद करून त्यात कोथिम्बिर कापून टाका.
वरील फोटो तयार भाजी चा आहे .मी माझ्यापुरता भाजी काढून घेऊन त्यात उकलेले अंडे घालून पुन्हा
१-२ उकळ्या येऊ दिल्या ..अंडाकरी तय्यार ...
आणि माझ्यासाठी साधी पिवळी शेव ताटात घालून त्यावर तयार रस्सा टाकला ..या भाजीत शेव उकळायचे नसतात ते वरतून टाकावेत ...
दुसऱ्या दिवशी त्याचेच मस्त भरली वांगी करायचे ठरवले ..
त्यासाठी ३ वांगी घेतली ,उरलेला अर्धी वाटी मसाला ,त्यात ३ चमचे शेंगदाण्याचे कुट घातले ,मीठ थोडेसे कारण वाटणात घातलेले होते .टोमाटो चिरून ठेवला
वांग्यांना चीर देऊन त्यात मसाला भरला आणि कुकर मध्ये ३ चमचे तेल घातले ,ते गरम झाल्यावर त्यात वांगी आणि उरलेला मसाला टाकला त्यात १ टोमाटो कापून टाकला .१ कप पाणी घालून १ शिटी होऊ दिली .आणि मस्त भरली वांगी तयार ...

वाचने
57417
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो
In reply to @ अनन्त अवधुत by त्रिवेणी
माफ करा पण मला अजून तुम्ही
In reply to हो by अनन्त अवधुत
माफ करा तुमचा प्रतिसाद उशिरा पाहीला
In reply to माफ करा पण मला अजून तुम्ही by आरोही
आमच्याकडे म्हणजे जळगाव,
In reply to माफ करा तुमचा प्रतिसाद उशिरा पाहीला by अनन्त अवधुत
अय्या
उत्तम पाककृती!
मन वढाय वढाय, उभ्या पिकातले ढोर
मस्त पा.कृ.
मूळ धाग्यातले आणि गंपाचे
छळ मांडीयेला मिपाच्या या
खल्लास !! आवडेश ..
हात तुम्हनी तं तुम्हले मरीमाय
'व तुले मरीमाय खायजो 'हे
In reply to हात तुम्हनी तं तुम्हले मरीमाय by आनंदी गोपाळ
बठासले आखाजिन आवतण आतेच दी
धुळे, मालेगाव ना?
हो आणि जळगाव सुध्दा.
ज'ड'गाव म्हणायचं ज'ड'गाव!
In reply to हो आणि जळगाव सुध्दा. by त्रिवेणी
ड हा उच्चार जास्त करुन रावेर,
बाकी सर्वांनी एवढ्या मस्त
अरे देवा!
काल मसाला केला हा. मस्त झाला.
खरेच अपर्णा ताई ..या
In reply to काल मसाला केला हा. मस्त झाला. by स्पंदना
नक्कीच करून पाहणार.
(No subject)
In reply to नक्कीच करून पाहणार. by प्रभाकर पेठकर
आय हेट शेवभाजी.
शेवभाजी आवडत नाही असे कधी मधी ऐकतो
In reply to आय हेट शेवभाजी. by बॅटमॅन
अय बॅट्या
In reply to आय हेट शेवभाजी. by बॅटमॅन
सौ. सोबत हा लेख वाचला. आज
फोटो आणी मसाला दोन्ही सुरेखच.
रविवारी केली
मस्त दिसतेय अंडाकरी ..रंग
In reply to रविवारी केली by जेपी
आह! जेपी!!
In reply to रविवारी केली by जेपी
कोन वर काडला ह्यो धागा ?????
शंभर
फोटो दिसत नाहीत
वा वा! खान्देश माहेर जरी नसले
मस्त !!!!
खान्देशी शेवभाजी
कधीपर्यंत आहात भारतात.सध्या
In reply to खान्देशी शेवभाजी by जयन्त बा शिम्पि
धागा वाचुन आज सांच्याला दोन