✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ट-२० विश्वचषक स्पर्धा

श
श्रीगुरुजी यांनी
Fri, 03/21/2014 - 22:28  ·  लेख
लेख
ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात सुरू झाली आहे. स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. गट १ - श्रीलंका, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझीलँड, नेदरलँड्स गट २ - भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश पहिला सामना भारत व पाक यांच्यात २१ मार्च रोजी आहे. ३ व ४ एप्रिलला उपांत्य फेरीचे सामने असून एप्रिलला अंतिम सामना आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
101194 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

आताच भारत- पाक सामना पाहिला ,

देव मासा
Fri, 03/21/2014 - 22:36 नवीन
आताच भारत- पाक सामना पाहिला , स्टंप मध्ये लाइट ( दिवे) भरले आहेत, या आधी असे मी पहिले न्हव्ते , याला काय म्हणतात ?
  • Log in or register to post comments

आजचा उद्घाटनाचा सामना भारताने

श्रीगुरुजी
Fri, 03/21/2014 - 22:43 नवीन
आजचा उद्घाटनाचा सामना भारताने जिंकून शुभारंभ केलेला आहे.
  • Log in or register to post comments

अपडेट्स द्या!

पैसा
Sun, 03/23/2014 - 15:24 नवीन
श्रीगुरुजी, सामना झाला की इथे त्याचे अपडेट्स द्या! सामना कसा झाला इ. इ. म्हणजे लोकांना एकाच जागी त्यावर चर्चा करता येईल!
  • Log in or register to post comments

आजचा पाकडे वि ऑस्ट्रेलिया हा

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2014 - 21:05 नवीन
आजचा पाकडे वि ऑस्ट्रेलिया हा सामना जबरदस्त झाला. पाकड्यांनी १९१ धावांचा डोंगर रचल्यावर ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकात वॉर्नर व वॉट्सनला गमावले. २ षटके संपली तेव्हा ऑस्ट्रेलिया २ बाद १० होते व १० षटके संपल्यावर धावसंख्या २ बाद ११७ इतकी प्रचंड होती. मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी करून ३३ चेंडूत ७४ धावा केल्या. शेवटच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाचे ८ गडी शिल्लक होते व फक्त ७५ धावा हव्या होत्या. त्याचवेळी अचानक ऑस्ट्रेलियाने नांगर टाकला. १२ व्या षटकात मॅक्सवेल बाद झाल्यावर पारडे फिरले व शेवटी ऑस्ट्रेलियाला सामना मोठ्या फरकाने हरावा लागला. अत्यंत मजबूत स्थितीतून सामना हरल्यामुळे ऑस्ट्रेलियाची चीड आली.
  • Log in or register to post comments

फिक्सिंग?

पैसा
Wed, 03/26/2014 - 16:42 नवीन
मॅच फिक्स केलेली होती की काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारताने विंडीजला १२९ धावात

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2014 - 21:07 नवीन
भारताने विंडीजला १२९ धावात रोखले आहे. भारताला अगदी सहज विजय मिळविता येईल. जर १६ षटकांत सामना जिंकला तर बोनस गुणसुद्धा मिळेल.
  • Log in or register to post comments

पहात होतो, अगदी सहज शक्य

खेडूत
Sun, 03/23/2014 - 21:15 नवीन
पहात होतो, अगदी सहज शक्य असलेली संधी घालवली. दुसऱ्या सामन्यात भारत विंडीज विरुद्ध खूप चांगल्या स्थितीत आहे. धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर ला का दिले नाही हे कळले नाही ३-०-३-० असे विश्लेषण असून! जडेजा ने २१ धावा दिल्या. १२९/७ भारत १८/ १९ षटकात सहज जिंकेल असे वाटतेय! नेट रन रेट चांगला ठेवावाच लागेल. ३८/१ (५)
  • Log in or register to post comments

अगदी हेच्च!

उपास
Sun, 03/23/2014 - 21:27 नवीन
भुवनेश्वर कुमारला का दिली नाही शेवटची ओव्हर अनाकलनीय आहे.. त्याला सराव हवाच शेवटच्ञा ओव्हरच्या प्रेशरचा.. जडेजाला कुठे बॉल पिच करावा हेच कळत नव्हतं शेवटी! पाकिस्तानच्या सईद अजमल ने मस्त टाकली बॉलिंग ऐन प्रेशरच्या वेळी.. मजा आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर

तुमचा अभिषेक
Mon, 03/24/2014 - 09:16 नवीन
धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर ला का दिले नाही हे कळले नाही ३-०-३-० असे विश्लेषण असून! >>>>>>>>>>>> त्याला शेवटचे षटक असेही द्यायचे नसल्यास तिथेच त्याची ४ षटके नवीन चेंडूवर संपवायला हवीत, खास करून जेव्हा त्याला खेळपट्टीकडून कालच्यासारखी मदत मिळत असताना.. अर्थात धोनीही चुकला असे म्हणू शकत नाही, २०-२० चे डावपेच म्हटले की काही पत्ते हातात ठेवावे लागतात, पुढेमागे गरज पडेल म्हणून.. पण आजवर भुवनेश्वर कुमारच्या ओवर शिल्लक ठेऊन त्याने शेवटच्या ओवरमध्ये काही भरीव केलेय असे घडले नाहीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

जिंकले एकदाचे.

खेडूत
Sun, 03/23/2014 - 22:15 नवीन
जिंकले एकदाचे. पण ज्या प्रकारे खेळायला पाहिजे तसे नाही खेळले . विसाव्या ओव्हर पर्यंत खेळत बसले!
  • Log in or register to post comments

नॉट हॅप्पी..

उपास
Sun, 03/23/2014 - 22:18 नवीन
कधी शिकणार आपण समोरच्याला चिरडायला.. युवीला बॅटींग प्रॅक्टीस द्यायला खेळत होतो असं वाटलं.. ते ही जमलं नाही त्याला शेवटी! आज पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या शेपटीवर पाय दिलाय.. जबरदस्त बॅटींग लायन अप आहे ऑस्ट्रेलियाची.. त्यांच्याबरोबरची मॅच मोठ्या फरकाने हरलो तर जड जाऊ शकेल आपल्याला.. धोनीची तरी तिच इच्छा दिसतेय!
  • Log in or register to post comments

कालची आपली म्याच ठिकठाक झाली.

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/24/2014 - 08:46 नवीन
कालची आपली म्याच ठिकठाक झाली... पण आमच्या खाणकामगार-ह तोडी MAN ख्रिस गेल नी निराशा केली. :-/ ३३ चेंडुत ३४ धावा,मंजे नुस्त आचमन करुनच पळाला. :-/ निदान सूर्याला ३/४ अर्घ्य तरी द्यायला हवी होती! :D दु...दु... खवट! :-/
  • Log in or register to post comments

भारत विरुद्ध वेस्ट इन्डीज हा

kurlekaar
Mon, 03/24/2014 - 09:38 नवीन
भारत विरुद्ध वेस्ट इन्डीज हा कालचा सामना. युवराजचा आत्मविश्वास हा त्याचा सगळ्यात मोठा प्लस point, पण काल तो कुठेच दिसला नाही.किती चान्चपडत खेळत होता. मला वाटत युवराज सम्पलाय आत्ता.
  • Log in or register to post comments

कालचा भारत वि विंडीज सामना

श्रीगुरुजी
Mon, 03/24/2014 - 13:00 नवीन
कालचा भारत वि विंडीज सामना अत्यंत कंटाळवाणा झाला. त्यातुलनेत पाकडे वि ऑस्ट्रेलिया सामना अत्यंत चुरशीचा झाला. विंडीजच्या सामान्य गोलंदाजीसमोर १६ षटकात १३० धावा करून सामना जिंकला असता तर बोनस गुण मिळाला असता. पहिल्या ८ षटकात भारताने ६४ धावा केलेल्या होत्या. पण नंतर कुठेतरी माशी शिंकली (युवराज १९ चेंडूत फक्त १० धावा) आणि भारताला १३० धावा करायला तब्बल १९.४ षटके लागली. निव्वळ धावगतीतही भारत फार पुढे गेला नाही आणि बोनस गुणसुद्धा नाही. आज द आफ्रिका वि न्युझीलँड आणि श्रीलंका वि नेदरलँड्स हे सामने आहेत. श्रीलंका आवडत नसल्याने नेदरलँड्स जिंकावे व श्रीलंका हरावे अशी इच्छा आहे. द आफ्रिका व न्यूझीलँड हे दोन्ही संघ आवडत असल्याने दोघांपैकी कोणीच हरू नये असे वाटते.
  • Log in or register to post comments

काल न्यूझीलँड वि द. आफ्रिका

श्रीगुरुजी
Tue, 03/25/2014 - 17:12 नवीन
काल न्यूझीलँड वि द. आफ्रिका सामना कमालीचा चुरशीचा झाला. जवळपास पूर्णपणे गमावलेला सामना डेल स्टेनने शेवटच्या षटकात अत्यंत प्रभावी गोलंदाजी करून खेचून आणला. न्यूझीलँडला शेवटच्या षटकात फक्त ७ धावा हव्या असताना स्टेनने ६ पैकी ५ चेंडूवर एकही धाव न देता २ फलंदाज बाद करून सामना जिंकून दिला. आतापर्यंत द. आफ्रिकेचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. पाकडे वि ऑसीज हा सामना देखील भन्नाट होता. त्यातुलनेत भारताचे दोन्ही सामने कंटाळवाणे झाले. आज विंडीज वि बांगलादेश अशी लढत आहे. विंडीजच्या खेळाडूत पहिल्या सामन्यात अजिबात उत्साह दिसला नाही. सर्व खेळाडू कमालीचे मरगळलेले दिसत होते. निदान यापुढील सामन्यात तरी विंडीजची स्फोटक फलंदाजी बघायला मिळावी.
  • Log in or register to post comments

भारताची मॅच जर शेवटच्या

आनन्दा
Tue, 04/01/2014 - 12:25 नवीन
भारताची मॅच जर शेवटच्या शटकापर्यंत लांबली तर मॅच चांगली झाली नाही, आणि बाकीच्यांची मॅच जर शेवटच्या षटकापर्यंत ताणली गेली तं मात्र "चुरशीची" :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काय बोर

आत्मशून्य
Wed, 03/26/2014 - 01:28 नवीन
स्पर्धा आहे राव...
  • Log in or register to post comments

सध्या भारतात राजकीय क्रीडा

निनाद मुक्काम …
Wed, 03/26/2014 - 16:15 नवीन
सध्या भारतात राजकीय क्रीडा प्रकार तुफान लोकप्रिय झाला आहे. सगळीकडे त्याबद्दल चर्चा आहे. केजू , नमो पुढे धोनी व विराट चा पाडाव लागत नाही आहे. भारतीय राजकारणाचा हा परिवर्तनाचा, उत्कर्षाचा ,काळ की भारतीय क्रिकेट चा अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था झाली आहे हेच कळत नाही.
  • Log in or register to post comments

गेल काल गुडघेदुखीमुळे अत्यंत

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2014 - 17:25 नवीन
गेल काल गुडघेदुखीमुळे अत्यंत हळू खेळला (४८ चेंडूत ४८ धावा). बर्‍याच वेळा २ धावा मिळत असताना एकच धाव पळून काढली. त्याला अशा अवस्थेत संघात घ्यायलाच नको होते. इतरवेळी गेलची फलंदाजी म्हणजे फटाक्यांची १० हजारांची माळ. पण काल गेल लवंगीच्या सरातले एक एक लवंगी वेगळे काढून उडवत होता.
  • Log in or register to post comments

कालचे दोन्ही सामने अत्यंत

श्रीगुरुजी
Fri, 03/28/2014 - 12:39 नवीन
कालचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले. लिंबूटिंबू नेदरलॅण्ड्सने बलाढ्य द आफ्रिकेच्या तोंडचे पाणी पळविले होते. आफ्रिकेची अवस्था ८.५ षटकांत ८३ धावा इतकी मजबूत होती. पण शेवटी २० षटकांत त्यांना केवळ १४५ ची मजल मारता आली. नेदरलॅण्ड्सने जबरदस्त फलंदाजी करत सामना आवाक्यात आणला होता. त्यांना शेवटच्या ८ षटकात फक्त ३४ धावा हव्या होत्या व फक्त ४ खेळाडूच बाद झाले होते. तिथूनच नेदरलॅण्ड्सने कच खाल्ली आणि सामना ६ धावांनी गमावला. दुसरीकडे श्रीलंकेच्या १८९ या बलाढ्य धावसंख्येचा इंग्लंडने यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. २ बाद ० अशा वाईट अवस्थेतून सामना जिंकला. 'अ' गटात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. नेदरलॅण्ड्स बाहेर गेल्यातच जमा आहे (लागोपाठ २ पराभव). पण इंग्लंड व न्यूझीलँडने प्रत्येकी १ विजय व १ पराभव मिळविलेला आहे. श्रीलंका व आफ्रिकेने २ विजय व १ पराभव अशी आघाडी घेतलेली आहे. प्रत्येक संघाचा अजून किमान १ सामना शिल्लक असल्याने चांगलीच चुरस आहे. आज ऑसीज वि विंडीज आणि भारत वि बांगला अशी लढत आहे. बांगला किंवा ऑसीज किंवा विंडीज आजचा सामना हरले तर बहुतेक त्यांच्या आशा संपुष्टात येतील.
  • Log in or register to post comments

भारत आणि द. आफ्रिकेचा उपांत्य

श्रीगुरुजी
Sun, 03/30/2014 - 15:10 नवीन
भारत आणि द. आफ्रिकेचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. त्याचवेळी बांगलादेश, नेदरलँड्स् व इंग्लंडचे पॅकअप नक्की झाले. 'अ' गटातील श्रीलंका वि न्यूझीलँड या सामन्यातील विजेता हा 'ब' गटातील उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ असेल. 'ब' गटात अजून खूपच चुरस आहे. विंडीजने ३ पैकी २ सामने जिंकले असून त्यांची निव्वळ धावगती खूपच जास्त आहे. पाकडे व ऑसीजचे अजून २ सामने शिल्लक आहेत. पाकने आतापर्यंत १ सामना जिंकला असून १ हरला आहे. ऑसीज दोन्ही सामने हरले आहेत. विंडीज वि पाकिस्तान सामन्यात जर विंडीज जिंकले तर त्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश नक्की आहे. जर पाकडे जिंकले आणि पाकडे आज बांगलाविरूद्ध पण जिंकले तर पाकडे पुढे जातील. आज पाकडे बांगलाविरूद्ध हरले तर मात्र विंडीज वि पाकिस्तान सामन्याचा काहीही निकाल लागला तरी बहुतेक विंडीजच पुढे जातील. अर्थात पाकड्यांनी विंडीजला खूप मोठ्या फरकाने हरविले तर पाकिस्तानला संधी असेल. दुसरीकडे ऑसीजला उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील (भारत आणि बांगलाविरूद्ध). त्याचवेळी पाकडे बांगलाविरूद्ध हरतील व विंडीजला हरवतील अशा आशेवर बसावे लागेल. एकंदरीत ऑसीजला फारच कमी संधी आहे. त्यामुळे बहुतेक पाकडे किंवा विंडीज यापैकी कोणतरी उपांत्य फेरीत येईल. उपांत्य फेरीत भारत व द. आफ्रिकेच्या बरोबरीने विंडीज व न्यूझीलँड हे संघ उपांत्य फेरीत बघायला आवडतील. पाकडे, ऑसीज व श्रीलंका अजिबात उपांत्य फेरीत येऊ नयेत अशी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

चला भारत आणि ऑष्ट्रोलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/30/2014 - 18:53 नवीन
सामना सुरु होतोय. जिंकलो पाहिजे. युवीचा फॉर्म गेलाय. रन बनने चाहिये उसके. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

गचाळ सुरुवात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/30/2014 - 19:31 नवीन
49/2 इन 6.4 ओव्हर्स. विराट पोहोचला. युवराज बहरावा अशी माझी इच्छा दोन धावांवर खेळतोय. या नवज्योत सिद्धूचे समालोचन स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.
  • Log in or register to post comments

ठीकठाक

पैसा
Sun, 03/30/2014 - 20:51 नवीन
१५९/७ फायनल स्कोअर. युवराज बराच चांगला खेळला. पण ऑस्ट्रेलियाला हरवायला एवढ्या रन्स पुरेशा आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युवीच्या करियर साठी आजची खेळी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/30/2014 - 21:03 नवीन
युवीच्या करियर साठी आजची खेळी आवश्यक होती आणि तो चांगला खेळला. सुरुवातीला चाचपडत होता मात्र शेवटच्या सहा चेंडूत त्याला फटकेबाजीची संधी होती मला तो फटका बेजबादारीचा वाटला. तोटल 180 व्हायला हवे होते. 160 तसा मोठा स्कोर नाही. AUS 19/1 in 3 overs बघू या कोण जिंकतय रोमांचकारी सामना व्हावा आणि खेळाबरोबर भारत जिंकावा. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

१०.३ षटकांत ६३/६. आज बहुतेक

श्रीगुरुजी
Sun, 03/30/2014 - 21:31 नवीन
१०.३ षटकांत ६३/६. आज बहुतेक जिंकू. ऑसीज बाहेर पडतील. विंडीज वि पाकडे या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऑस्ट्रेलिया ६३/६, रथी, महारथी

सौंदाळा
Sun, 03/30/2014 - 21:32 नवीन
ऑस्ट्रेलिया ६३/६, रथी, महारथी तंबुत गेलेले आहेत. सामना भारत जिंकेलच असे वाटतयं
  • Log in or register to post comments

७५/७, नामुष्कीजनक पराभव होतो

सौंदाळा
Sun, 03/30/2014 - 21:39 नवीन
७५/७, नामुष्कीजनक पराभव होतो की काय कांगारुंचा!!
  • Log in or register to post comments

युवराज स्पेशल !

तुमचा अभिषेक
Sun, 03/30/2014 - 22:27 नवीन
ऑट ऑफ फॉर्म युवराजचा फायनल स्कोअर ४३ चेंडूत ६० ४ षटकार आणि स्ट्राईक रेट १४० .. आजच्या आपल्या डावाचा शिल्पकार तो जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यासारखा स्ट्रोकप्लेअर नाही जगात, तरी आज १०० टक्के फुल फ्लो मध्ये वाटला नाही तो, अन्यथा बाद झाला तो चेंडू पण षटकार असता. तरीही ऑफला मारलेला षटकार भारीच ..
  • Log in or register to post comments

हक्क आहे आपला या विश्वचषकावर !!

तुमचा अभिषेक
Sun, 03/30/2014 - 22:28 नवीन
भारत चारही सामने जिंकला, नुसते जिंकला नाही तर क्या बात थाटात जिंकला. हक्क आहे आपला या विश्वचषकावर !!
  • Log in or register to post comments

ऑस्ट्रेलिया?

पैसा
Sun, 03/30/2014 - 22:53 नवीन
ऑस्ट्रेलिया आऊट ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

अहो ताई हा सामना खेळायच्या

तुमचा अभिषेक
Sun, 03/30/2014 - 22:57 नवीन
अहो ताई हा सामना खेळायच्या आधीच ते आउट आणि भारत ईन होता. हा सामना केवळ औपचारीकता म्हणून होता. आता आपल्या गटातून वेस्टईंडिज आणि पाक यांच्यातून जो जि़ंकेल तो सेमीफायनलला जाईल. आणि इन्शाल्लाह पाकिस्तानच जिंकावी अशी ईच्छा, जेणेकरून भारत-पाक अंतिम सामन्याचा थरार अनुभवता येईल. हा विश्वचषक तर आपण असेही जिंकणार आहोतच, पण तेच अंतिम सामन्यात पाकिस्तानला मात देऊन पटकावला तर क्या बात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आधी नै!

पैसा
Sun, 03/30/2014 - 23:30 नवीन
दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले असते तर एक आऊटसाईड चान्स होता त्यांना! पण या ऑस्ट्रेलियात ती जुनी स्पिरीट दिसत नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

नाही हो.. काहीच चान्स नव्हता...

तुमचा अभिषेक
Sun, 03/30/2014 - 23:37 नवीन
थांबा गुणतालिका समजावतो. भारताचे ६ गुण असल्याने भारत सेमीमध्ये पोहोचला होता. पाकिस्तानने दुपारी बांग्लादेशला हरवल्यावर त्यांचे ४ गुण झाले. वेस्ट-ईंडिजचे देखील अगोदरच ४ गुण झाले आहेतच. पाकिस्तान-वेस्टईंडिज यांचा आपापसातील सामना बाकी आहे ज्यात जो संघ जिंकणार त्याचे ६ गुण होणार आणि तो संघ भारताबरोबर सेमीमध्ये जाणार. जरी तो सामना अनिर्णित राहिला तरी त्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ५ गुण होऊन धावगती सरस असलेला संघ अंतिम फेरीत गेला असता. आता ऑस्ट्रेलिया - दोन सामने दोन पराभव शून्य गुण., उरेलेले सामने कितीही मोठ्या फरकाने जि़ंकले असते तरी यात बोनस गुण नसल्याने टोटल गुण ४ च्या वर गेलेच नसते.. तर ते बादच होते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओके!

पैसा
Mon, 03/31/2014 - 00:36 नवीन
मी http://www.misalpav.com/comment/567634#comment-567634 या श्रीगुरुजींच्या प्रतिसादावरून लिहिलं होतं. त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामने जिंकून फक्त भागत नाहीय तर आणखीही काही जर-तर अटी पुर्‍या व्हायला हव्या होत्या. म्हणून आऊटसाईड चान्स म्हटलेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

ओके ताई, पण त्या पोस्टमध्ये

तुमचा अभिषेक
Mon, 03/31/2014 - 14:17 नवीन
ओके ताई, पण त्या पोस्टमध्ये देखील त्यांनी असे म्हटले होते. <<<<<त्याचवेळी पाकडे बांगलाविरूद्ध हरतील व विंडीजला हरवतील अशा आशेवर बसावे लागेल.>>>> आणि भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू व्हायच्या आधी दुपारच्या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशला मात देऊन ऑस्ट्रेलियाचे सारे दरवाजे बंद केले होते. :) चला जाऊद्या आता आपण पुढच्या सामन्यांवर लक्ष केंड्रित करूया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

>>> जरी तो सामना अनिर्णित

श्रीगुरुजी
Mon, 03/31/2014 - 11:24 नवीन
>>> जरी तो सामना अनिर्णित राहिला तरी त्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ५ गुण होऊन धावगती सरस असलेला संघ अंतिम फेरीत गेला असता. सामना अनिर्णित राहू शकत नाही. दोन्ही संघांनी समान धावा केल्या तर सुपरओव्हर खेळून सामन्याचा निकाल लावलाच जातो. अर्थात सुपरओव्हर सुद्धा टाय झाली तर काय करणार हे मला माहिती नाही. परंतु दोन्ही संघांनी समान धावा करण्याची शक्यता ५ टक्क्यांहून कमी आहे. त्यानंतर सुपरओव्हर मध्ये सुद्धा समान धावा करण्याची शक्यता अजून तरी ० टक्के आहे (असा अजून एकही सामना झालेला नाही). त्यामुळे एखादा सामना सुपरओव्हरनंतर सुद्धा बरोबरीत सुटण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

पावसामुळे सामना अनिर्णित /

गणपा
Mon, 03/31/2014 - 13:00 नवीन
पावसामुळे सामना अनिर्णित / निकालात निघाला तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एक्झॅक्टली!

तुमचा अभिषेक
Mon, 03/31/2014 - 14:10 नवीन
सुपरओवर मला माहीत होतीच, मी देखील पावसावरच पोस्ट टाकली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ही शक्यता आहेच. ट-२०

श्रीगुरुजी
Mon, 03/31/2014 - 17:34 नवीन
ही शक्यता आहेच. ट-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तरी कमीतकमी ६ षटकांचा सामना खेळविता येतो, ज्यासाठी जास्तीत जास्त १ तास लागेल. याच स्पर्धेत इंग्लंड वि न्यूझीलँड सामन्यात इंग्लंडची पूर्ण फलंदाजी संपल्यावर न्यूझीलँडच्या फलंदाजीची ६ षटके संपल्यावर पावसामुळे पुढे खेळ झाला नाही. त्यावेळी डकवर्थ-लुईस प्रणालीनुसार किवींना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पावसामुळे कितीही वेळ गेला तरी मध्येच एखादा तास मिळू शकतो व त्यात ६ षटकांचा सामना होऊ शकतो. पण पावसामुळे एकही चेंडू न पडता सामना झालाच नाही तर नक्की काय नियम आहेत याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पाऊस जोरदार झाला आणि मैदानाची

तुमचा अभिषेक
Tue, 04/01/2014 - 09:26 नवीन
पाऊस जोरदार झाला आणि मैदानाची लागली तर एक चेंडू होत नाही तिथे तास हि अपेक्षा खूप झाली, खास करून जो खेळ मुळातच ३-४ तासांचा असतो तो पुर्ण धुतला जाणे सहज शक्य असते. असो, """पण पावसामुळे एकही चेंडू न पडता सामना झालाच नाही तर नक्की काय नियम आहेत याची कल्पना नाही.""" काही खास क्लिष्ट नियम नाहीत, बस दोन्ही संघांना एकेक गुण देतात. जर सामना सेमीचा असेल तर त्यात त्या दोन संघातील जो संघ साखळी सामन्यात आपसात जिंकलाय किंवा ज्याचे तेव्हा जास्त पॉईंट होते, जो आपल्या गटात पहिला होता तो जिंकला असे काहीसे नियम असतात. फायनलला शक्यतो राखीव दिवस असतो, पण त्यातही सामना न झाल्यास दोघांना सामाईक विजेते घोषित करण्यात येते. आपण असे श्रीलंकेसह सामाईक विजेतेपद पटकावले आहे मागे एकदा एका आयसीसी स्पर्धेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मला स्वतःला तरी

श्रीगुरुजी
Mon, 03/31/2014 - 11:25 नवीन
मला स्वतःला तरी भारताव्यतिरिक्त विंडीज, न्यूझीलँड व द. आफ्रिका हेच संघ उपांत्य फेरीत आलेले आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

किवीज काल मूर्खासारखे खेळून

श्रीगुरुजी
Tue, 04/01/2014 - 14:05 नवीन
किवीज काल मूर्खासारखे खेळून बाहेर पडले. गोलंदाजांनी कमावून आणले होते तेच फलंदाजांनी गमावले. नको असलेले लंकन्स उपांत्य फेरीत आले. आज पाकडे हरावेत हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!
  • Log in or register to post comments

विंडीज वि पाकडे सामन्यात

श्रीगुरुजी
Tue, 04/01/2014 - 20:57 नवीन
विंडीज वि पाकडे सामन्यात विंडीजने पहिल्या १५ षटकांत फक्त ८४ धावा केल्या होत्या. पण शेवटच्या ५ षटकांत ८२ धावा चोपून १६६ अशी बर्‍यापैकी धावसंख्या रचली. आता पाकडे ३ षटकांत २ बाद ९ आहेत. विंडीज जिंकायलाच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

पाकडे ६ षटकांत ४ बाद १३.

श्रीगुरुजी
Tue, 04/01/2014 - 21:10 नवीन
पाकडे ६ षटकांत ४ बाद १३. उर्वरीत १४ षटकांत ११ च्या धावगतीने १५४ धावा हव्या आहेत.
  • Log in or register to post comments

पापस्तान खलाsssस!!! सर्व

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/01/2014 - 22:24 नवीन
पापस्तान खलाsssस!!! =)) सर्व ठार! ८२!!! =)) ए धतड तत्तज तत्तड तत्तड!!! :D
  • Log in or register to post comments

विंडीज तुफान फॉर्मात आले आहेत

श्रीगुरुजी
Wed, 04/02/2014 - 13:07 नवीन
विंडीज तुफान फॉर्मात आले आहेत. सॅमी प्रत्येक सामन्यात खालच्या क्रमांकावर येऊन जबरदस्त फटकेबाजी करतो. ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो, गेल जोरदार फटकेबाजी करत आहेत. लेंडल सिमन्स आणि सॅम्युअल्स उपयुक्त फलंदाजी करतात. गोलंदाजीत बद्रीची गोलंदाजी खेळणे इतरांना अवघड जात आहे. काल रामदीनने ४ जणांना यष्टिचित करून आपली कमाल दाखवून दिली. एकंदरीत यावेळीसुद्धा विंडीज जिंकण्याची चांगलीच शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

जिंकलो पाहिजे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/04/2014 - 21:22 नवीन
भारताला जिंकण्यासाठी 18 मधे 23 पाहिजेत रैना आणि विराट जिंकुन देतील ? दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जबराट झाली म्याच!

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/04/2014 - 23:21 नवीन
जबराट झाली म्याच! Image removed. अश्विनने बॉलिंग मधे धमाल केली ,काय वळत होता बॉल मेल्याचा! आफ्रिकन हुतुतू खेळतायत असं वाटत होतं! =)) आणि कोहोल्याने ४४ बॉलमधे ७२ असं धू धू धुतलं अफ्रिकेला! रहाणे आणि विशेष करून रैनाचा सपोर्टही चांगला होता.शेवटच्या २ ओव्हर मधे धोनीबाबा आणि कोहोल्यामधले कॉमेडी शीन बगायला लै मज्जा आली! Image removed. अब आगे.... फायनल मे लंका के साथ टाका भिडनेवाला है। Image removed.
  • Log in or register to post comments

आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून

श्रीगुरुजी
Sat, 04/05/2014 - 12:35 नवीन
आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारत आलाच शेवटी अंतिम फेरीत! अंतिम फेरीत समोर विंडीज/द.आफ्रिका/न्यूझीलँड यापैकी कोणीतरी हवा होता. श्रीलंकेचा संघ मला अजिबात आवडत नाही. नेमके तेच कायम अंतिम फेरीत असतात. असो. उद्या सहज जिंकू असं वाटतंय. श्रीलंकेची फिरकी आपल्यासमोर चालत नाही. मलिंगा आपल्यासमोर निष्प्रभ ठरतो. २ वर्षांपूर्वी भारताने ३२० धावांचा पाठलाग ४० षटकांच्या आतच करून सामना जिंकला होता. त्यावेळी मलिंगाची ७.२-०-९६-० अशी जबरदस्त धुलाई झाली होती. त्यानंतर तो भारताविरूद्ध कधीच प्रभावी ठरला नाही. आपल्याविरूद्ध फक्त जयवर्धने चांगला खेळतो. बाकी सगळे साधारण आहेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा