गुळांबा
साहित्यः कैरीचा कीस दोन वाट्या, गूळ चार वाट्या, वेलची पावडर, लवंगा दोन तीन.
कृती: कैय्रा धुऊन साले काढून घ्यावीत. साले काढलेल्या कैय्रा किसाव्यात. किसाच्या दुप्पट गूळ घेऊन तो किसलेल्या कैरीत मिसळावा. दोन तास मिश्रण झाकून ठेवावे. दोन तासानंतर गूळ विरघळला की लवंगा घालून मिश्रण गॅसवर कढवायला ठेवावे. मिश्रणाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. थेंब पसरत नसेल तर गुळांबा तयार झाला असे समजावे. तयार गुळांब्यात वेलची पावडर मिसळावी.
या गुळांब्याला वेळ कमी लागतो. गूळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करावे. त्यासाठी गूळ एकत्र करून ठेवलेल्या मिश्रणाची गॅसवर ठेवण्यापूर्वी चव पहावी. गुळांब्याची चव छान खमंग लागते. एकदा करून ठेवला की वर्षभरात कधीही मुलांना जॅमऐवजी देता येतो.


वाचने
12505
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
प्रतिक्रिया
कृती आणि फोटो आवडले.
वाह! छान.
कृती आवडली. ब्रेड वर
लवकरच मिळो खायला..
यम्मी!
In reply to यम्मी! by यशोधरा
यम्म यम्म !!
तायडे आता दोन्ही बरण्या ईकडे
मस्तच गं!
मस्तं !
अरे वाह..
अहाहा
मस्त ! मला यातली रसात मुरलेली
In reply to मस्त ! मला यातली रसात मुरलेली by मदनबाण
+७८६
मला यातली रसात मुरलेली लवंग फार आवडते... गोड पाक आणि लवंगेचा स्वता:चा स्वाद यांची वेगळीच चव जिभेला मिळते.माझा जाम फेवरेट आहे ग हा !
झक्कास!
In reply to झक्कास! by पैसा
>> दुसरा राजेशाही प्रकार
In reply to >> दुसरा राजेशाही प्रकार by सूड
+११११
गावी मे महिन्याच्या
सर्वांना धन्यवाद!
मत्तच!
पाककृती छान आहे यात वाद नाहीच
In reply to पाककृती छान आहे यात वाद नाहीच by गणपा
=))
In reply to =)) by पैसा
>>>मॅसॅकर
मस्त प्रकार ....मला वाटते
मस्त दिसतोय गुळांबा.