http://www.misalpav.com/node/3884
http://www.misalpav.com/node/3525
सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट नक्की कळली आहे की माझी लेखनाची शैली क्लिष्ट आणि काही जणांना अगम्य वाटली आहे.मनोरंजक नक्कीच वाटली असावी.माझीसुद्धा करमणूक झाली. असो. आता मूळ मुद्द्याकडे वळू या.शक्य तितकं सोपं करून सांगतो आहे.
यशस्वी लैंगीक जीवन म्हणजे सहजीवनाचा पाया आहे.
यशस्वी पालकत्व त्यावर अवलंबून आहे.
जर पती-पत्नी यांना बांधणारा मूळ धागा कमकुवत असेल तर फॅमीली लाईफ वर त्याचा फार दुरगामी परीणाम होतो.पण या मुद्द्याकडे फारसं गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं जात नाही कारण पुरुष :ज्याच्यावर पुढाकार घेण्याची जबाबदारी निसर्गाने दिली आहे तो स्वताच बर्याच वेळा उदासीन असतो आणि आपल्या पत्नीस लैंगीक जीवनात पूर्णपणे फुलण्याची संधी मिळवून देत नाही.
अशा वेळी पत्नीने जर पुढाकार घेतला तर त्याला मानसीक धक्का बसतो आणि मुळात कमकुवत असलेले संबंध आणखी दुर्बल होण्याची शक्यता असते.
पूर्णपणे विकसीत कामजीवन हा सुखी पालकत्वाचा मूळ मुद्दा हे ठासून सांगण्यात माझा लेख कमी पडला आहे असे कदाचीत वाटण्याची शक्यता आहे , म्हणूनच लेखातली पहीली ओळ वाचा. मधला चार ओळी दूर करा.
रामदास यांच्या पहिल्या कवितेत मला समान सहगमाचे व सुखी काम जीवनाचे चित्रण दिसले आणि दुसर्याकवितेत (समस्यापूर्तीत) त्यांनी जाचणारी जर ,निर्या, पायताण अशा प्रतिमा वापरून लैंगीक सुखाची मागणी आणि त्याची पूर्तता याचं चित्रण केलं आहे असं वाटलं म्हणून त्याचा उल्लेख केला आहे.
बाकी या विषयात प्रत्येक जण आपापल्या परीनी समृद्ध असण्याचा दावा करू शकतो पण पुरुषांच्या अपुरेपणाचे चित्र मला दाखवायचे होते म्हणून उपयोग केला नाही तर शेपटीसारखे लिंग पण गळून पडेल अशी थोडीशी चमत्कारीक कल्पना माझ्या डोक्यात आली ती पण या लेखात लिहीली आहे .
आता थोडं सोपं करून लिहीलं आहे .या प्रकाशात आधीचा लेख परत वाचावा.
---------------------------------------------------------------- १९७५ साली एका सर्वेक्षणा मध्ये ५०० पुरुष व तेवढ्याच स्त्रिया निवडून त्यांना आधीच्या लेखात मी तुमच्यासमोर जो प्रश्न ठेवला तसाच प्रश्न ठेवण्यात आला होता.
इन्कम गृप नोकरीदार,मध्यमवर्गीय : साधारण एकाच रेंज मधील.
वय २५ ते ३५ .
मल्टीपल चॉइस प्रश्नहोता. आताच्या सि.इ.टी प्रमाणे.
१) ७०% पुरुषानी बायकोच्या चरित्र्याबद्दल आयुष्यभर संशय राहिला असता असे म्हटले .
२) २५% पुरुषांनी घटस्फोटाचा मार्ग निवडला.
३) ९२% स्त्रियांनी आपण असे करणार नाहीचा चॉइस निवडला. कारण चारीत्र्याबद्दल संशय निर्माण होण्याची भिती.
२००८ सालात सुद्धा सुमारे ५% मुले न होणार्या दांपत्यात आग रामेश्वरी, तर बंब सोमेश्वरी चा त्रास असतो.अशात
पुरुषाला जर स्त्रीने मार्ग दाखवला तर परत " बराच अनुभव दिसतो तुला" ची भीती .
सो कॉल्ड नविन शतकातमध्ये सुद्धा परत तेच जवळजवळ लागू. असे माझ्या डॉक्टर मित्राचे (जो या विषयाचा तज्ञ आहे.)म्हणणं आहे.
आता मी काय केले असते ह्याचं उत्तर देतो.
"हे फक्त आजच्या दिवसापुरता का?का कायम ? हा प्रश्न विचारला असता. ( नाही तर एक मुलानंतर सिलींग न्याहाळण्याचाच प्रोग्राम असतो.)
जेवणामध्ये अफ्रोडेसीकची(कामोत्तेजना वाढण्यासाठी)मात्रा वाढवली असती.
सिगारेट सोडली असती.(चैतन्य नलीका वापरणार्यांनी सावध असावे.)
हातकड्या, व्हायब्रेटरची वगैरे ची गरज आहे का? ची विचारणा केली असती.
बेडरुम मध्ये रेफ्रिजरेटर बसविला असता .(आइस क्युब करिता. )
गावावरुन दोन चार मधाच्या बाटल्या आणल्या असत्या.
कोन आइस्क्रीम चा आवडता फ्लेवर विचारला असता.
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असे म्हणुन कामाला लागला असतो.
हे आज २००८ साली आणि तेव्हा सुद्धा.
शयनेशु रंभा सगळ्यांनाच हवी असते पण सांभाळणे सोपे नसते.पुरुष प्रधान संस्कृतीत बाई कशी हवी ते सांगण फार सोपं .
असाच श्लोक पुरुष मंडळीं करीता आहे काय ?
माझ्या कानावर कधी आला नाही.
-----------------------------------------------------------------
विस्कळीत (डीसफंक्शनल) कामजीवन हे कौंटुंबीक जीवनावर दूरगामी परीणाम करते.
त्यातून विसंवाद .हे विसंवाद मुलांसमोर वेगळे रुप धारण करून येतात आणि पुढचे परीणाम
ते भोगत असतात कारण.......
वाचा माझ्या अगोदरच्या लेखाचे पहीले वाक्य.
A Happy Child-> A Happy Adult-> A Happy Couple-> A Happy child is the essence of all my narrations to date.
(सध्या पल्स पोलीओचे चार थेंब स्टेशनवर देताना बघतो तेव्हा वारंवार असं वाटतं की कामावरून परत जाणार्या पुरुषांसाठी अशीच काही व्यवस्था करायला काय हरकत आहे बॉ? )
पण माझा डॉक्टर मित्र सांगतो ते खरंच आहे.
औषधात कामजीवन नाही .मेंदूत आहे.म्हणजे मेंदू ठिक तर सगळंच ठिक.
----------------------------------------------------------------
वाचने
38076
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेवटचे वाक्य मोलाचे...
७०%
जातो कुठे?
In reply to ७०% by मदनबाण
पण रोजच्या
In reply to जातो कुठे? by विनायक प्रभू
काहीतरी गैरसमज होत आहे..
In reply to पण रोजच्या by मदनबाण
गैरसमज कसला ?
In reply to काहीतरी गैरसमज होत आहे.. by टुकुल
धन्यवाद
धन्यवाद
सहमत!
धन्यवाद प्रभूसाहेब..
नाय राहिले
विषय कळला
२ ऩक्की
समजण्यासाठी ....
हम्म!
हे माहित नव्हते
In reply to हम्म! by विसोबा खेचर
आपण भिष्म
In reply to हे माहित नव्हते by विनायक प्रभू
रडवलत ......
In reply to आपण भिष्म by विसोबा खेचर
ह्म्म्म रड
In reply to रडवलत ...... by प्रभाकर पेठकर
Rule and exception
चांगली
संन्यासी
आम्च म्हन्न
>>जर
श्री.
In reply to >>जर by सखाराम_गटणे™
आज गटणेसे असहमत है
In reply to >>जर by सखाराम_गटणे™
>>निर्मळ?
In reply to आज गटणेसे असहमत है by टारझन
अर्रे राज्जा
In reply to >>निर्मळ? by सखाराम_गटणे™
ह्म्म
In reply to अर्रे राज्जा by टारझन
इकरार्-ई-जुर्म.
In reply to आज गटणेसे असहमत है by टारझन
सी ई टी
सॉरी