१) राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी.
एक व्यक्ती नगरसेवक म्हणून अथवा सहकारी संस्थेतीतल पदावर १० वर्षे, विधानसेभेत १० वर्षे लोकसभेत १० वर्षे राज्यसभेत १२ वर्षे राहीली तर जवळ पास ४२ वर्षांचे किमान करिअर करता येऊ शकते. खूपच लोकप्रीय असेल तर जवळपास ५७ वर्षाचे करीअर करता येऊ शकेल.
सांगण्याचा उद्देश एवढाच कि ज्यांना करिअर करायचे आहे त्यांना पुरेशी संधी राहते आणि इतरांनाही पुरेशी संधी मिळते. पदाचा गैरवापर करून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार प्रकरणे दडपणार्या लोकांचा प्रभाव कमी होण्यास अंशतःतरी साहाय्य होईल.
२) ज्या व्यक्तींना २/३ मते पडली आहेत त्यांच्या पत्नी/पती आणि अपत्ये २/३ मते घेणारी व्यक्ती कालानुक्रमाने बाद झाल्या नंतर पुढे ५ वर्षे पर्यंत त्याच पदावर निवड्ण्क लढवू शकली नाही पाहीजेत. अशी काही प्रोवीजन केल्यास घराणेशाहीस अंशतः तरी लगाम राहून निष्पक्ष चौकशांना किमान ५ वर्षेतरी संधी मिळू शकेल.
३) राजकीय पक्षाच्या प्रमुख अथवा उपप्रमुख पदावर अधिकतम २० वर्षांची मर्यादा आणि व्यक्ती प्रमुख पदावर आहे तो पर्यंत पती/पत्नी आणि अपत्यांना पक्ष संघटनेतील कोणतेही काम देऊ नये.
३ ब) घराणेशाहीतून राजकारणात पुढे आलेल्या व्यक्तींना वृत्तपत्रांनी सेल्फ सेंसॉरशीपचा भाग म्हणून वृत्त पत्रातील पहिल्या पानावर, दुरचित्रवाणी आणि आंतरजालीय वृत्त संकेतस्थळांनी पहील्या पाच वृत्तात स्थान देऊ नये.
अर्थात हि माझी व्यक्तीगत मत आहेत. घटनात्मक पातळीवर असे बदल स्वतःहून सहज करून मिळणार नाहीत. पण एक सुजाण मतदार म्हणून नव्यांना संधी देणार मतदान आणि मतप्रदर्शन मी करू शकतोच, नव्यांना संधी न देणार्यांना पास देऊ शकतोच.
यातील नेमक्या स्टेप्स फाइन ट्यून करता येतील पण मुख्य म्हणजे आशया बद्दल तुम्हाला काय वाटत तो तुम्हाला पटतो का ? ,पटत असेलतर या स्टेप्स फाईन ट्यून कशा करता येतील ? , पटत नसेल तर तुम्हाला काही अल्टरनेटीव्हज सुचवावेसे वाटतात का ?
वाचने
10050
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकाही अपेक्षेशी सहमती नाही.
क्रमांक २-३ चांगल्याच सूचना
In reply to एकाही अपेक्षेशी सहमती नाही. by ऋषिकेश
होय!
In reply to क्रमांक २-३ चांगल्याच सूचना by माहितगार
होय. मला प्रस्थापितांना धक्का
In reply to होय! by ऋषिकेश
होय. मला प्रस्थापितांना धक्का
In reply to होय! by ऋषिकेश
या क्षणाला भारतातील किमान तीन
In reply to होय. मला प्रस्थापितांना धक्का by माहितगार
माझी मते
In reply to एकाही अपेक्षेशी सहमती नाही. by ऋषिकेश
ऋषिकेश यांच्या क्रमांक २ च्या
In reply to माझी मते by सुनील
फेरमोजणी नी फेरनिवडणुक यात
In reply to माझी मते by सुनील
१०० टक्के आरक्षण
In reply to फेरमोजणी नी फेरनिवडणुक यात by ऋषिकेश
पहिली सुचना कळली नाही.
In reply to १०० टक्के आरक्षण by प्रसाद गोडबोले
@प्र.गो.
In reply to १०० टक्के आरक्षण by प्रसाद गोडबोले
एक जरा अवांतर शंका
In reply to @प्र.गो. by माहितगार
म्हणजे समजा उउद्या संसदेत ५५२
In reply to एक जरा अवांतर शंका by प्रसाद गोडबोले
भारतीय राज्यघटनेचा (आणि
In reply to एक जरा अवांतर शंका by प्रसाद गोडबोले
न्यायव्यवस्था श्रेष्ठ की संसद
In reply to एक जरा अवांतर शंका by प्रसाद गोडबोले
सहमत
In reply to फेरमोजणी नी फेरनिवडणुक यात by ऋषिकेश
वय ??
एक डोके एक मत असे का?