निमंत्रण --- आई आणि मी.. मस्त टीम!
उन्हाळी सुट्टी म्हणजे कैर्या, आंबे, कॅरम, पत्ते, भटकंती आणि अर्थातच उन्हाळी शिबीरही!
त्यातून हे शिबीर जर आई आणि मूल या दोघांसाठीही असेल तर? ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना आपल्या आईची वेगळी ओळखही यातून घडेल आणि एरवी आईचा पुरेसा न मिळणारा वेळही मनसोक्त मिळेल. याच विचाराने एका तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करीत आहोत.
शिबिराचे तपशील असे -
कुठून - पुणे, मुंबई
कुठे - कोकण (देवरुखपासून पुढे)
कधी - ९ मे २०१४ ते ११ मे २०१४ (शुक्र, शनि, रवि)
खर्च किती - एकूण ६०००/- (यात दोघांचे प्रवासखर्च, राहणे व जेवण समाविष्ट आहे.)
शिबिराचा कार्यक्रम कसा असेल?
- ३५ आसनी प्रवासी बसमधून प्रवास
- उत्तम, स्वच्छ, सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी मुक्काम
- देवरुख, जयगड, कर्हाटेश्वर, गणपतीपुळे, मार्लेश्वर अशा ठिकाणांना भेट
- खास कोकणातल्या पदार्थांचा आस्वाद
- वेगवेगळे बौद्धिक, शारीरिक खेळ
- आमराई, शेत, नर्सरी अशा ठिकाणांचा फेरफटका
मे महिन्याची सुरूवात, हापूस आंब्याचा दरवळ, आणि कोकणची लाल माती.. एका अविस्मरणीय अशा अनुभवासाठी अजून काय हवं?
आम्ही फक्त १५ मुलांनाच आईसोबत शिबिराला नेणार आहोत, त्यामुळे सहभाग नक्की करण्यासाठी लवकरात लवकर या दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क करा -
पुणे - वर्षा बेटावदकर - ९८८१ २३० ९७७
पुणे - श्रीकला कानडे - ९५०३ ८३९ ०३१
मुंबई - इनिगोय - ८९७६ ०९० ५६०
आईखेरीज फक्त मुलाला/मुलीला नेणे शक्य होणार नाही, कारण शिबिराची मूळ संकल्पनाच आई आणि मुलाला एकमेकांसोबत मजा करता यावी, अशी आहे.
सहभाग निश्चित केल्यानंतर पुढील माहिती देणे आवश्यक आहे -
पाल्याचे संपूर्ण नाव
जन्मतारीख
पत्ता व दूरध्वनी
शाळेचे नाव व इयत्ता
विशेष आवडीचे छंद
गुणविशेष
आईचे संपूर्ण नाव
जन्मतारीख
भ्रमणध्वनी
शिक्षण व व्यवसाय
कामाचे स्वरूप
आवडीचे कार्यक्षेत्र
छंद
*** धाग्यावर अवांतर टाळावे हेवेसांनल. ***
विशेष विनंती - आर्थिक व्यवहार केवळ वर्षा बेटावदकर यांच्याशी होतील. हे आर्थिक व्यवहार संपूर्णतः स्वतःच्या जबाबदारीवर करावेत. त्याच्याशी मिपा व्यवस्थापनाचा कोणताही संबंध असणार नाही. तसंच ही सहल नसून शिबीर आहे, याची स्पष्ट कल्पना असू द्यावी.
शुभेच्छा .
In reply to शुभेच्छा . by दिव्यश्री
+१
सुंदर कल्पना!!
कोकण. मस्त जागा निवडलीत. बजेट
In reply to कोकण. मस्त जागा निवडलीत. बजेट by तुमचा अभिषेक
आई आणि दोन मुलं असं असेल तर
फारच सुंदर कल्पना !
उत्तम कल्पना... डिटेल्स
कसली भारी कल्पना आहे!
इथेही डिस्क्लेमर येऊ द्या.
नॉट एण्टायरली बेड क्न्स्नेप्ट
In reply to नॉट एण्टायरली बेड क्न्स्नेप्ट by आत्मशून्य
कुल अपडेट केलाय धाग्याच्या शेवटी.
माझ्या मते गुढघ्यावर रांगतच
In reply to माझ्या मते गुढघ्यावर रांगतच by michmadhura
माझ्या मते गुढघ्यावर रांगतच
काल आणि आज दिवसभरात या
खूपच छान आहे उपक्रम. विशेषतः
खूप चांगली कल्पना आहे.
इने
इने
In reply to इने by लीलाधर
>>तेथे असेन तर मीही सहपरिवार
बापाने काय घोडे मारले आहे?
In reply to बापाने काय घोडे मारले आहे? by मनिष
हा मुद्दा उपस्थित करणार होतो
In reply to हा मुद्दा उपस्थित करणार होतो by बॅटमॅन
अहो आयोजन करणार्या बहुदा
In reply to अहो आयोजन करणार्या बहुदा by पिलीयन रायडर
अगदी हेच हेच
In reply to अहो आयोजन करणार्या बहुदा by पिलीयन रायडर
मुद्दाम काही घडत नाहीये ना,
In reply to मुद्दाम काही घडत नाहीये ना, by बॅटमॅन
शिवाय धागा कुणाचा आणि
हेतू स्तुत्य
सहलशिबिर संपल्यावर जर कुणी प्रांजळपणे वृत्तांत लिहिलाच तर याचा प्रत्यय येईलच!!!! टीप - असे दोन गट पडण्यात चूक काहीच नाही किंबहुना असे होणे हेच नैसर्गिक आहे. असो, शुभेच्छा!उपक्रम छान आहे. शुभेच्छा !
कल्पना झक्कास आहे.
आता वृत्तांत येउदे