पवारांची विचार"पूस"
जाणता राजा ह्या पदवीवर शिवरायांच्या नंतर आपला हक्क सांगणारे, भारतीय लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असे म्हणाले की १७ तारखेला सातार्यात राष्ट्रवादीला मतदान करा आणि ती शाई पुसून २४ तारखेला मुंबईत येऊन पुन्हा एकदा मतदान करा! एक व्यक्ती एक मत अशी लोकशाहीची मांडणी होती ती राष्ट्रवादीच्या मतदारांकरता बदलली असावी. जाणत्या साहेबांना काहीही करणे शक्य आहे!
अशा प्रकारे एका तथाकथित जबाबदार व अनुभवी नेत्याने असे बिनडोक आणि बेजबाबदार विधान करणे योग्य आहे का? अगदी विनोद म्हटला तरी हा जरा अतीच वाटतो आहे. निवडणूक आयोगाने पवारांची कानउघडणी करणे आवश्यक आहे. पवार ह्या विधानाचे काय स्पष्टीकरण देतात ते बघणे ज्ञानवर्धक ठरेल! शाईचा डाग पुसण्याबद्दलचा हा कलंक पवारांच्या कारकीर्दीवरून पुसला जाणार नाही अशी आशा. (अगदी अजितदादांच्या आवडीचे द्रव्य वापरले तरीही!).
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Sharad-Pawar-asks-workers-to-vote-twice/articleshow/32553305.cms
http://www.loksatta.com/mumbai-news/clear-ink-on-hand-to-vote-twice-sharad-pawar-409213/
प्रतिक्रिया
...विनाश्काले विपरीत बुद्धी........!!!!
तारतम्य संपले...
कुठलं स्पष्टीकरण देतंय ते!!
लेखाचे नाव पवारांची विचार"फुस
(No subject)
अनुभवाच्या फायद्याला, मर्यादा हवी ! :)
यावरून एक मुद्दा समोर येतो .
छायाचित्रावरून छायाचित्र
आता नवीन आधार कार्डचा डाटाबेस
सकाळची "बातमी"
एकुण
साहेबांचं काहीएक चुकलेले नाहीये
सारकॅसम?
आधारचा संगणक इतकं करत असेल तर
निवडणुक आयोग काय म्हणतो बघुया
...
धरणात आपला कार्याक्रम करणार्
श्री पवार साहेबाना उद्देशुन लिहिलेला लेख जरुर वाचा...
पवार साहेब काय करताय हे