मी छंद म्हणून लघुकथा लिहितो. यातील काही वेगवेगळ्या मासिकांमधून वेळोवेळी प्रसिद्धही झाल्या आहेत. या कथांचे पुस्तक प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे. परंतू वेगवेगळ्या लोकांचे मराठी प्रकाशकांबद्दलचे अनुभव ऐकून प्रकाशकांचे दरवाजे ठोठावण्याची माझी इच्छाही नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. दुसरं म्हणजे मी कुणी प्रस्थापित लेखक नाही किंवा माझं पुस्तक कितपत खपेल याची आज काहीच खात्री नाही. त्यामुळे प्रकाशकाच्या दॄष्टिनं ही व्यावसायिक जोखीम आहे. त्यामुळे प्रकाशक यात रस घेणार नाहीत हे सहाजिक आहे. म्हणूनच पुस्तकाचा येणारा उत्पादन खर्च (छपाई वगैरे) उचलण्याची माझी तयारी आहे, म्हणजेच ही जोखीम मी घेण्यास तयार आहे. परंतू याबरोबरच पुस्तकाचं marketing आणि distribution, व्यावसायिक प्रकाशकाच्या मदती शिवाय जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे पुस्तकाचं उत्पादन तुम्ही तुमचं तुम्ही केलंत तरीही पुस्तक दुकानांमधून उपलब्ध करुन देण्यासाठी किंवा वर्तमानपत्रांमधून त्याचं परिक्षण आणवण्यासाठी वगैरे, प्रकाशकांचे पाय पकडण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते. माझ्या मित्रमंडळींनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रकाशक मंडळी हा वर्ग काही फार विश्वास ठेवण्याच्या लायकीचा असतोच असं नाही.
अर्थात सर्वच प्रकाशक असे असतील असं मी म्हणत नाही पण कोण चांगला आणि कोण वाईट हे कसं ठरवणार? हात पोळल्यावरच (किंवा न पोळल्यावर) कळेल. त्यामुळे कुणाला याबाबतीत काही अनुभव असल्यास किंवा कुणी काही सल्ला देऊ शकल्यास मी आभारी होईन.
वाचने
2940
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
उदय सप्रे
+१
In reply to उदय सप्रे by आनंदयात्री
हे बघ
धन्यवाद
In reply to हे बघ by गणा मास्तर
मी छंद
बरोबर
In reply to मी छंद by विसोबा खेचर