साहित्यः
१ जूडी मेथी, पाने खुडून, स्वच्छ धुवून घ्यावी.
१ छोटा कांदा बारीक चिरून
१/२ टोमॅटो बारीक चिरून
१ वाटी मटार
(मी फ्रोझन मटार वापरले आहेत, तुम्ही जर कच्चे मटार घेत असाल तर अर्धवट उकडून घ्यावे)
३/४ वाटी फ्रेश क्रीम
(ग्रेव्ही कितपत दाट-पातळ हवे त्याप्रमाणे)
२-३ लसूण पाकळ्या चिरून
पेरभर आले बारीक चिरलेले
२-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ टेस्पून भिजवलेले काजू
१ टेस्पून कसूरीमेथी
२ मसाला वेलदोडे
१/२ टीस्पून जीरे
३/४ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीप्रमाणे
पाकृ:
स्वच्छ धुवून घेतलेली मेथी बारीक चिरून घ्यावी.
मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, आले. लसूण, काजू व हिरव्या मिरच्या एकत्र करुन, किंचित पाणी घालून मुलायम वाटून घेणे.

कढईत तेल गरम करुन जीरे व मसाला वेलदोडे घालून परतणे.
त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
आता त्यात बारीक चिरलेली मेथी, मीठ, गरम-मसाला घालून खमंग परतणे.

कसूरीमेथीमधील थोडी मेथी चुरडून घालावी व मटार घालून एकत्र करावे.
अगदी थोडेच पाणी घालून, झाकून वाफ काढावी.
त्यात आता क्रीम घालावे व उरलेली कसूरीमेथी घालून मिक्स करुन, झाकून ३-४ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.

मेथी मटर मलाई चपाती, फुलके, पराठे, रोटी किंवा नानबरोबर सर्व्ह करावी.
नोटः
मेथीचा कडवटपणा आवडत नसल्यास, मेथी थोडी ब्लांच करुन मग बारीक चिरून घेणे.
ह्या पाककृतीमध्ये खवा ही वापरु शकता, खवा थोडा परतून घ्यावा व त्यात वाटलेला मसाला घालावा.
खवा वापरणार असाल तर क्रिमचे प्रमाण कमी करावे किंवा ग्रेव्ही पातळ हवी असल्यास ३/४ वाटी क्रिमला २ टेस्पून खवा परतून घ्यावा.
अशाच पद्धतीने मटारऐवजी पनीर, उकडून तुकडे केलेले मश्रूम घालून पाककृती बनवता येईल.
काहीजणं ह्यात हळद, तिखट ही घालतात पण त्याने पदार्थाचा रंग बदलतो. आवडत असल्यास घाला :)
व्वा वा ...नेहमी प्रमाणेच ..
सुंदर आणि चविष्ट पाककृती.
शुरेख्ख्ख्ह!!
नेहमीचा प्रतिसाद + एक कौतुक
चला
अगं आई गं. छळवादी कार्टी!
झकास!
सुरेख.
झक्काआअस !!!!
नेहमीप्रमाणे झक्कास...
मेथी मटर मलईत तिखट आणि हळद
सानिका
अत्यंत उपयोगी पाकृ
एकदम मस्त !!
बोर्डावर नाव पाहिलं, धागा
In reply to बोर्डावर नाव पाहिलं, धागा by गणपा
असंच म्हणतो.
वाहव्वा......................
मस्त ...
झक्कास्स पाकृ व सादरीकरण.
व्वा ...
फटू लयीच भारी..
लय भारी!
लै भारी
अॅज युज्वल.
In reply to अॅज युज्वल. by प्यारे१
फूल
In reply to फूल by सानिकास्वप्निल
ओके.
व्वॉव मस्तच
वाह! पाककृती आणि सादरीकरण
कातिल फोटोज !!!!!!
वा...........................
जीव गेला
सही!!! शेवटच्या फोटोतलं
सानिकादी नेहमीप्रमाणे अतिशय
कहर आहे कहर!!! जबरा फ़ोटो आहे.