मुक्काम व पोष्ट वाडे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मु. पो. वाडे
गेल्या शतकाच्या सुरुवातीसच आमच्या तीर्थरुपांचे आई-वडिल कोंकणातून मुंबईत आले व माझ्या जन्मापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं. तेंव्हा कोंकणातून मुंबई कडे पसरणाऱ्या अनुबंधाची एक तार आधीच तुटलेली; आता उरलं ते फक्त आजोळ—वाडे. (जिल्हा सिंधुदुर्ग). मला वाटतं माझी आजी (आईची आई) जिवंत असेपर्यंत आमच्या आईची माहेरची ओढ तसूभर कमी झाली नाहीं; पर्यायाने बऱ्याच उन्हाळाच्या सुट्ट्या आम्ही भावंडानी वाड्याला घालविल्या होत्या, त्यात कांहीशा माझ्या वाट्याला आल्या पण ज्या आल्या त्या मात्र नंतरच्या अनेक वर्षांसाठी आठवणींच मोहोळ निर्माण करून गेल्या.
माझी आजी म्हणजे एक विलक्षणीय व्यक्तिमत्व होतं. तिला ‘मानापमान’ व ‘सौभद्र’ मधली गाजलेली पदं गातांना किंवा तितक्याच खड्या आवाजात माकडं व क्वचीत माणसांना इरसाल मालवणी शिव्या देताना ऐकलं की talent ची राहूद्याच पण तिच्यातल्या संस्कृती ची इतकी wide range बघून मी स्तिमित व्हायचो. मला वाटतं त्यांच्या घराचीच नाहीं तर त्या पूर्ण ‘वाडी’ची ती केंद्रबिंदू होती. जेंव्हा माझे कांही मामा (सख्खे-चुलत हा फरक पूर्णपणे लोप पावलेला मी माझ्या आयुष्यात प्रथमच या गांवात पाहिला) मला सांगतात की “आमच्यावर जे संस्कार झाले ते सर्व आक्काने (आजी) केले” या एकाच वाक्यात सारं कांही येतं.
मु पो वाडे २-- अंधार
शहरांत राहणाऱ्यांना रात्रीच्या अंधाराचे फार तर क्षेत्रफळ कळू शकते पण घनफळ नाहीं. अंधाराची खोली किंवा उंची चा अंदाज घ्यायचा असेल व त्या वरच्या नीरव शांततेच्या अदृश्य इथर च्या आवरणाला स्पर्श करायचा असेल तर ते गावाकडेच शक्य आहे, निदान तेंव्हा तरी ते शक्य होतं. हा मखमली काळाकुट्ट अंधार अंगावर घेताना रोमांच उठायचे, अज्ञाताची भीती जरूर वाटायची पण हा संमिश्र अनुभव आम्हा मुंबयकराना पूर्णपणे अनोळखी.
या अंधाराला असंख्य काजव्यांचं नक्षीकाम—वेलबुट्टी सारखं—पण या अंधाराला एकही छिद्र हे काजवे पाडू शकत नव्हते. असा हा अभेद्य –घनदाट –dense- अंधार.
-3-
मु. पो. वाडे ३- विमलेश्वराचं देऊळ
वाड्याला एका गोष्टीचं मला खूप अप्रूप वाटायचं –ती म्हणजे विमलेश्वराच्या देवळाच्या पायथ्याशी असलेला झोत. भर उन्हाळ्यात एका लहानशा अजगराच्या रुंदी एवढा तो पाण्याचा स्त्रोत अंगावर घ्यायला खूप बरं वाटायचं. मन आणि शरीर –दोन्ही स्वच्छ व्हायचं. तेंव्हा मला सारखं मनात यायचं की याच्या उगमाचा शोध घेतला पाहिजे, हा नेमका मंदिराच्या समोर येऊन कसा ‘प्रगट’ होतो? पण लहानपणीचे बरेचसे प्रश्न मोठे होईपर्यंत व कांहीतर त्यानंतरही अनुत्तरीतच राहतात.
गेल्या वर्षी वाड्याला धावती भेट दिली—सहकुटुंब. हीला घेऊन तेंव्हा आवर्जून झोत पाह्यला गेलो. आम्ही आत्ता आयुष्याच्या या stageला आलो आहोत की सर्वात जास्त काळ सहचारिणी बरोबर गेलाय, फक्त आपलं असं राह्यलय ते आपलं बालपण. तरीदेखील आंतून कुठंतरी वाटतं की आपल्या आयुष्याच्या या दालनात देखिल तिने झाकून पहावं. का असं वाटावं? बहुधा “मी असा घडलो” असं subconsciously मला तिला सांगायचं असेल? कुणास ठाऊक.
--पण गेल्या वर्षी पाह्यलं तेंव्हा झोत थोडासा रोडावल्यासारखा वाटला. असेलही. नाहीतरी तेंव्हा डोळे भर भरून पाह्यलेल्या लहानपणच्या सर्व गोष्टी आता मंद, क्षीण, निस्तेज व कधी कधी अपरिचित देखिल वाटतात. लहानपणी नेहमीच हवा हवा असणारा पाऊस सुद्धा आता बऱ्याचदा नकोसा वाटतोच की.
माझ्या लहानपणीचं विमलेश्वराचं देऊळ अंधारात बुडलेलं असायचं. आंत अदृश्य वटवाघुळ व त्यांचा उग्र दर्प—आपण लेणी पाहताना येतो ना, नेमका तो. आता सर्व कांही बदललंय. आता गाभारा देखिल प्रकाशात आलाय. आम्ही गेलो तेंव्हा कुठल्या तरी उत्सवाची तयारी चालेली होती. रंगीबेरंगी त्रिकोणी पताका, मध्येच डोळे मिचकवणारया दिव्यांच्या माळा.
विमलेश्वराच्या देवळातून अंधार गेलाय खरा पण त्या बरोबर माझ्या आठवणीतली त्याची गुढता देखिल.
(To be continued..)
प्रतिक्रिया
सुरुवात
गुढ पण रम्य.
नशीबवान आहात आपण!
उत्तम!
व्वा............
Thanks Jayant.
अंधार
लेख छानच !! पण अंधाराबाबतच्या
सूड, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
राही. खूप छान. माझ्यापेक्षा
कोकणातल्या अजून काही आठवणी असतील तर जरूर लिहा.
खूपच छान!
अजून जरा मोठा भाग टाकत चला हो
मुक्त विहारी, पैसा, ज्योती
छान लेख. आवडला. पुभाप्र
सर फार चांगला लेख. असे लेख अजुन येउद्यात.