क्रंचीझी मॅगी
‘मला स्वयंपाक येत नाही, पण हां! मॅगी येतं !’ असं एखाद्याला म्हणताना तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. मॅगी या अशा सहजसुंदर व्यंजनात आपल्या वाईट सवयीप्रमाणे काहीतरी किडे करून नवीन रेसिपी तयार करण्याचा हा माझा एक सफल (हो म्हणजे... आवडलेला!) प्रयत्न.
साहित्य:
२ मो. चमचे साजुक तूप
१ चमचा जिरं
१ चिरलेला बटाटा
२ चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा बदाम
२ मो. चमचे किसलेलं चीज (मी गाउडा चीज वापरलं, पण आवडीच्या फ्लेवरनुसार कुठलंही वापरता येईल)
१ कप पाणी
आणि अर्थातच, मॅगी.
कृती:
कढईत तूप गरम करून त्यात जिरं घालावं
त्यात दाणे/बदाम व चिरलेला बटाटा घालावा
त्यात मॅगी मसाल्याच्या पाकिटातील १/४ मसाला घालावा
मग एक कप पाणी घालून हलकी उकळी येऊ द्यावी.
त्यात मॅगी घालून २ मिनिटं शिजवावं
मग किसलेलं चीज घालून गॅस बंद करावा
सुसाट चव लागते... जबरदस्त! करून बघा आवडतं का.
क्रंचीझी मॅगी
वाचने
8629
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मी पैला
मी पयला...
In reply to मी पयला... by वामन देशमुख
व्वा ! मग आवडलं?
छन च दिसतंय की . पास्ता चा
In reply to छन च दिसतंय की . पास्ता चा by स्रुजा
राहिलंच लिहायचं....मॅगीबरोबर.
भन्नाटच प्रकार दिसतोय .
नाही होत मऊ
थोडा हटके प्रकार
मॅगी कुठल्याही फॉर्ममध्ये
मॅगी बद्दल मागे वाचलेले - आरोग्याच्या दृष्टीने
In reply to मॅगी बद्दल मागे वाचलेले - आरोग्याच्या दृष्टीने by तुमचा अभिषेक
थँक्स
@मॅगी या अशा सहजसुंदर
In reply to @मॅगी या अशा सहजसुंदर by अत्रुप्त आत्मा
_/\_
ओ भाऊ, ते फोडणीत जीरे नाही हो
In reply to ओ भाऊ, ते फोडणीत जीरे नाही हो by इन्दुसुता
पकडलंत....
मस्त !
मस्त..
मॅगीचा नविन प्रकार.....मला