मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कैरीची कढी (raw mango curry )

आरोही · · पाककृती
काल मला बाजारात मस्त कैऱ्या मिळाल्या अजिबात विचार न करता घेतल्या ..कारण हि तसेच आहे मला कैरीपासून बनविलेली एक केरला पद्धतीची कढी खूप आवडते ,अर्थात बनविण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक आहेच ,पण माझ्या पद्धतीने बनविली आहे ...तीच रेसिपी येथे देत आहे ... साहित्य :कैरी १ साधारण तिचे अर्धी वाटी काप व्हायला हवेत अशी ,दही अर्धी वाटी ,ओलं खोबर अर्धी वाटी,हिरव्या मिरच्या ४,कढीपत्ता ६-७ पाने,लाल सुक्या मिरच्या २,पाव चमचा हळद ,पाव चमचा मेथी पावडर ,अर्धा चमचा मोहरी,मीठ चवीनुसार,तेल ३ चमचे,पाणी आवश्यते नुसार कृती : सर्व प्रथम कैरीला सोलून तिचे काप करून घ्या . 1 एका कढाई मध्ये २ चमचे तेल घालून त्यात चिरलेली कैरी घालून शिजू द्या . 2 एका बाजूला मिक्सर च्या भांड्यामध्ये मध्ये ओलं खोबर्याचे काप टाका (माझ्याकडे खोबऱ्याचे तुकडे केलेले असल्याने मी त्याचा काळा भाग काढून टाकला पण तुम्ही खवुन घेऊ शकता) 3 आता त्यात ४ मिरच्या आणि दही टाकून ते बारीक वाटून घ्या. 4 आता कैरी थोडी मऊ झाली असल्यास ती काढून त्याच कढाई मध्ये उरलेल्या तेलात कढीपत्ता .आणि मोहरी ची फोडणी करून त्यात बारीक केलेले मिश्रण टाका 5 आणि कैरी टाकून त्यात मीठ ,मेथी पावडर ,हळद ,आणि अर्धी वाटी पाणी घालून एक २ -३ उकळ्या येऊ द्या ..(येथे उकळी मंद आचे वर येऊ द्याव्यात नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते.) . 6 आता एका छोट्या भांड्यात १ चमचा तेल घेऊन लाल मिरच्या यांची फोडणी करून ते तयार कढीत टाका .. हि कढी चवीला थोडी आंबट आणि थोडी घट्टसर असते ..पण गरम भाता बरोबर खूप चविष्ट लागते .. 7

वाचने 9365 वाचनखूण प्रतिक्रिया 21

साळसकर 08/03/2014 - 23:28
योंव, मस्त दिस्तेय. काय योगायोग, आताच मी दह्याची कढी हादडून आलोय. सोलकढी म्हणाल तर बीअरसारखी पितो. थोडक्यात कढी हा आपला वीक पॉईंट. आईला दाखवायला पाहिजे हा प्रकार, तिला काही माहितेय का वा जमेल का म्हणून.. रेसिपीबद्दल धन्यवाद, कैर्‍या भरल्या पोटीही तोंडाला पाणी सुटावे अश्या दिसताहेत :)

पैसा 08/03/2014 - 23:30
आत्ता ११.३० वाजता मला कैर्‍या कुठे मिळणार? बंदी घालायच्या लोकांत आणखी एकीची भर!

In reply to by पैसा

भावना कल्लोळ 11/03/2014 - 16:40
काय उच्छाद मांडला आहे या मुलींनी, पहिली ती सानु आणि आता हि स्वार्थी आपले अर्चु, स्वतः बनवते आणि स्वतः खाते आणि फोटो दाखवुन आमचा छळ करते. भ्या …

आयुर्हित 08/03/2014 - 23:32
आजपासून दह्याचे सारे पदार्थ आवडून खाईल. एक नवीन चांगली पाकृ कळवल्याबद्दल धन्यवाद!
हि केरळी पद्धतीची कढी आहे ,मी त्यात थोडाफार बदल करून बनविली आहे ,,आणि हो यामध्ये कोलंबी घालून सुद्धा बनविता येते ,, एका ठिकाणी बघितले आहे ...+)

In reply to by आरोही

सखी 12/03/2014 - 00:32
माझ्या सासुबाई करतात अशी कढी, फार अप्रतिम लागते - गार किंवा गरम. आणि खूप दिवस टिकतेसुद्दा फक्त वर म्हटल्याप्रमाणे जास्त गरम करायची नाही.

भाते 09/03/2014 - 22:53
पाकृ वाचुन तरी बनवायला जमेल असे वाटते आहे. फोटो तर अप्रतिम. जाताजाता, पाकृ विभागातले सर्वच धागे मी फक्त विकांताला घरी असतानाच ऊघडतो. आठवडाभर हापिसात बसुन हे असे काही पाहिले कि जळजळ होते आणि कामाचा बट्टयाबोळ होतो. :)

डँबिस००७ 10/03/2014 - 00:36
ह्या करीला केरळ मध्ये पच्चा मांगा पुळ्ळीशेरी म्हणतात. पच्चा :(कच्चा/हीरवा) मांगा : आंबा पुळ्ळीशेरी : आंबट कढी

स्पंदना 11/03/2014 - 03:01
नविनच! मी पिकल्या आंब्याची कढी करते. पण कच्ची कैरी पहिल्यांदाच ऐकली.