केवलादेव अभयारण्य, भरतपूर म्हणजे पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्ग. यावर्षी आम्हाला ऐन जानेवारीमध्ये भरतपूर सहल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. एक सेशन सायंकाळी आणि एक सकाळी करता आले. सीझनदेखील या वर्षी उत्तम होता. पत्नीची भरतपूरला जाण्याची ही पहिलीच खेप होती. शिवाय नवा महागडा कॅमेरा होता (हे वाक्य आवर्जून लिहिण्याची प्रेरणा 'मुक्तपीठ'पासून घेतलेली आहे!). त्यामुळे तिने दे धमाल फोटो घेतले. त्यातल्या काहींचा कोलाज इथे टाकत आहे.
पूर्वी हे अभयारण्य नव्हते. राजेमहाराजे आणि इतर उच्चपदस्थ इथे येऊन शिकार करीत. त्यांपैकी काही "विक्रमवीर":
इतर काही इकडम तिकडम फोटो:
कसे जावे, काय करावे:
१. जयपूर - भरतपूर सुमारे २०० किमी.
२. आग्रा - भरतपूर सुमारे ७० किमी.
३. रस्त्याने तसेच रेल्वेने सुलभरीत्या पोचता येते. चारमार्गी टोल रस्ता.
४. राहण्यासाठी सर्व अर्थगटांतील पर्याय उपलब्ध.
५. अभयारण्यात जाण्यासाठी सायकल (बाहेर भाड्याने मिळतात) आणि सायकल रिक्षा यांचा वापर करता येतो. किंवा मग पायीपायी. यांत्रिक वाहने नेता येत नाहीत. बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीने प्रशिक्षित केलेले गाइड उपलब्ध आहेत.
६. भेट देण्यासाठी योग्य काळ - नोव्हेंबर ते मार्च. या काळात बेसुमार थंडी असते हे ध्यानात ठेवणे. फार धुके असल्यास मात्र पक्षी दिसत नाहीत आणि अभयारण्यात जाणे विफल ठरते. काही दिवस असेही येतात की धुके चांगले मध्यान्हपर्यंत उठत नाही.
७. जवळ इतर पाहण्याजोगे: आग्रा, फतेहपूर सिक्री, अलवर, सरिस्का व्याघ्र प्रकल्प, भानगड आणि अजबगड किल्ले, आभानेरी विहीर इ.
८. सीरियस पक्षीनिरीक्षण करायचे असेल, तर किमान दोन दिवस राहणे आवश्यक. चांगल्या प्रतीचे दुर्बीण, कॅमेरा इ. असल्यास उत्तम. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणथळ जागा आणि घरटी असल्यामुळे पक्षी सहजपणे दिसतात.
९. जाताना पाणी आणि च्याऊम्याऊ बरोबर नेणे योग्य. प्लास्टिकच्या पिशव्या नेऊ नयेत. नेल्यास इतरत्र टाकू नयेत, आपल्याबरोबर परत घेऊन याव्यात.

वाचने
8276
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजुन फोटो असतील तर द्या. ते २
छायाकलेचा चमत्कार नाही.
In reply to अजुन फोटो असतील तर द्या. ते २ by त्रिवेणी
माफ करा
In reply to छायाकलेचा चमत्कार नाही. by चलत मुसाफिर
काळे बगळे असे वाचावे.
फारच छान !कैमरा खरोखरच भारी
लोहगड?
In reply to फारच छान !कैमरा खरोखरच भारी by कंजूस
वाह वाह...
हो.
In reply to वाह वाह... by एस
धन्यवाद
In reply to वाह वाह... by एस
इथल्या
लोहागड
In reply to इथल्या by कंजूस
फोटो दिसत का नाहीयेत?
??
In reply to फोटो दिसत का नाहीयेत? by कवितानागेश
हो खरेच की..!
In reply to फोटो दिसत का नाहीयेत? by कवितानागेश
धागा आणि भलेमोट्ठे वॉटरमार्क
सुधार केला जाईल.
In reply to धागा आणि भलेमोट्ठे वॉटरमार्क by प्रचेतस
-१

+१
In reply to -१ by स्पा
हे का ते?
In reply to +१ by अनुप ढेरे
भलेमोट्ठे वॉटरमार्क
In reply to धागा आणि भलेमोट्ठे वॉटरमार्क by प्रचेतस
मस्त खुप आवडले.
आवडते
In reply to मस्त खुप आवडले. by आंबट चिंच
वडप्रेसवरची टिपणे एक एक
आनंद
In reply to वडप्रेसवरची टिपणे एक एक by कंजूस
छान!
ब्लॉग आवडला , हे माहिती