Skip to main content

श्यामची आई..

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 09/03/2014 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले... ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत... माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते. अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण कदाचित तात्कालिक कोकणातील वातावरण तसे असेलही..पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल. कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे इत्यलम

वाचने 42300
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

आपल्या भावनांशी बराच सहमत आहे. लै पिडू पुस्तक.. आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.. ;-) =))

In reply to by चिगो

आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.
>>>>> =)) महान आयडीया =))

अवांतर : तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार

In reply to by नावातकायआहे

कोल्ह्याला द्राक्षांची जी चव असते त्या प्रकारच्या व वित्र्णास पूर्ण बेकायदेशीर असल्याने त्याकाळी सरवसामान्य पांढरपेशा व्यक्तिला सहजी अनुपलब्ध असलेल्या दृक्श्राव्य फितिला सुधा हेच टोपन नाव होते नाही का ?

In reply to by आदूबाळ

परंतु भक्त प्रल्हाद, बिस्किट पुडा हे शाळ्करि वयोगटाचे शब्द होते. 21 वय पूर्ण आहे म्हणून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला वयोगट हा आशा नामोल्लेखाबाब्त विशेष सात्विक असे.

In reply to by आत्मशून्य

अरारा! या गंमती तुम्हाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उमगल्या? काय हे मागासलेपण! (ह. घेणे ही विनंती) बादवे - बिस्किट पुडा हा जब्री शब्द आहे! :))

In reply to by आदूबाळ

बिस्किटपुडा हा बाकी अतिशयच मऊ-अ‍ॅज-कुकुंबर शब्द हां. टोट्टल के एल पी डी (खास लम्हें पे धोका) होईल हा शब्द ऐकून =))

In reply to by आदूबाळ

नाही हो तसं म्हणायचं नसेल त्यांना. शाळकरीवयात जिथे फारच जोश असतो तिथे काहीही वाचायाला बघायला चालते. जेव्हा टेस्ट डेव्हलप होते तेव्हा (म्हणजे २१+) सात्विकता विषेश सांभाळली जाते.

पूर्णपणे असहमत साने गुरुजींच्या अतिप्रचंड सामाजिक कार्याचा विचार करता आपणास त्यांच्याविषयी असे लिहिण्याच काडीमात्र अधिकार नाही पाश्चात्य संस्कारानी बिघडलेल्या नवीन मराठी(?) पिढीची थेर आहेत ही सगळी ! अत्रंगी पावुस जी पर्सनली घेवू नका , पण असे अकलेचे तारे तोडणार्या नवीन पिढीच्या एक सणसणीत कानाखाली द्यावीशी वाटते . मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे . आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,, बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!

In reply to by मंदार कात्रे

मंदारपंत... आपण असहमत आहात ... ठीक आहे ..पण मला माझे अधिकार आपण सांगायची अजिबात गरज नही...आपण आपले मुद्दे मांडा ... साने गुरुजींचे सामाजिक कार्य ह्याविषयी एक कणभर लिहिलेले नही..माझे मुद्दे पुन्हा नीट वाचा. बाकी त्या दुसर्या संकेतस्थळावर कुणी काय म्हटलंय त्याचा राग इथे काढण्याचे प्रयोजन समजले नाही ... पुन्हा एकदा ... 'श्यामची आई'ह्या पुस्तकावर आपली मते मांडा'..

In reply to by अत्रन्गि पाउस

आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,, बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!

In reply to by मंदार कात्रे

इतके नका रागावू. तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. काळाप्रमाणे विचारही बदलतात. आपण जुनी खोडे! म्हणून गदिमांचे हे काव्य कवटाळून बसतो. वाईट तितुके इथे चांगले भलेपणाचे भाग्य नासले पतिव्रतेच्या गळ्यांत धोंडा वेश्येला मणिहार उद्धवा, अजब तुझे सरकार!

In reply to by तिमा

तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. मला वाटत तरुण आणि म्हातारं असण्याचा याच्याशी फार संबंध नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणातल्या खेड्यातले वातावरण आणि एका ममताळू, अशिक्षित आणि पारंपारिक संस्कार झालेल्या स्त्रीचे व्यक्तीचित्र आणखीन काय वेगळे असणार ? विचार करण्याची थोडीशी शक्ती असेल तर अगदी लहान मुलालादेखील हे कळू शकेल. पण किमान विचारीपणाचीच वानवा असेल तर सगळंच मुसळ केरात जाणार.

In reply to by अप्पा जोगळेकर

वातावरण ते असेल मान्य दुसरी अपेक्षा नही हे हि मान्य माझे म्हणणे हे कि त्या संपूर्ण पुस्तकातले वातावरण त्यातील प्रसंग ह्यात काहीही विशेष वेगळे नही...तत्सम वातावरण, प्रसंग, संस्कार हे घरोघरी होत असत पण बहुतांश प्रसंगांमधून हे 'काहीतरी' विशेष आहे असे मांडले जाते आहे..वर कारुण्य रसाचा अतिरेकी अविष्कार झाल्याने लहान मुले अजूनच हळवी झाली/होतील ज्यांना हे आवडते आवडो बापडे ज्यांना ती मुल्ये, संस्कार, धडे बाणवण्यासासाठी 'हे पुस्तक' जरुरी वाटले/वाटते ...वाटो .. सध्याच्या काळात मुलांना वाढवतांना किती जण हे पुस्तक अनिवार्य मानतात /आवश्यक मानतात/ खरोखर वापरतात ?

लेखकाशी पूर्ण सहमत. अत्यंत कालबाह्य पुस्तक. रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?

कोणत्या सुज्ञ माणसाने आपल्या सारख्या बालकाला दिले बरे हे पुस्तक? मला माझ्या लहानपणी पाण्यात पोहायला जायची खूप भीती वाटत असे, परंतु "श्यामची आई" हे पुस्तक माझ्या आईनेच खुद्द वाचले होते त्यामुळे त्यातील श्यामची कहाणी सांगत आमच्या बाल मनावर जबरदस्तीने चांगले संस्कार केले आहेत, त्यामुळे ह्या पुस्तकाचा मी सदैव ऋणी राहील.

पोहायला शिकायला श्यामची आई शिवाय अनेक चांगले उपाय आहेत.

In reply to by सचिन

सचिनशेट........ चांगले उपाय आहेत ना तुमच्या जवळ ठेवा! आपल्या मुलांना त्याचा वापर होईलच की कधीतरी. मी माझ्या लहानपणची आठवण ती सांगितली हो!

आयुर्हित साहेब, फारच पर्सनल घेता राव ! मिपा वर असं नाही चालत !!

कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे
रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?
मग आता नवीन धागे उसवतील.. पुल कालबाह्य .. कुसुमाग्रज कालबाह्य ... अजून पुढे जाऊन कालांतराने पाडगावकर, जी ए, सगळ्यांना निकालात काढा.. आणि आपल्या येणाऱ्या पिढीला "हैदोस" ( ते देखील मराठी आहे म्हणून कालबाह्य ).. "पेंटहौस स्टोरीज" असली पुस्तके देऊ वाचायला.. रद्दीवाला जास्त भावात घेतो असली पुस्तके.. त्यांची रिसेल value पण मिळेल हा अतिरिक्त फायदा.. अवांतर : आमच्या घरी हे वाचून " लेखक बरेच विद्वान आहेत, त्यांना आवर्जून हे सांगा" असा सल्ला मिळाला.. :-)

In reply to by बन्या बापु

भावी पिढी साठी आपण श्यामची आई आणि हैदोस/पेंटहौस हे दोनच पर्याय आठवू शकता, हे आपल्या घरी सांगितल्यावर (सांगितले असल्यास)आपल्याला काय सल्ला मिळाला ? आणि कालातीत, अजरामर वगैरे साहित्य जे निर्माण व्हायचे ते होईलच(रामायण/महाभारत झाले होते तसे)... 'पु ल',कुसुमाग्रज, पाडगावकर वगैरे प्रभृतिचे साहित्य निकालात निघेल कि नही हे 'काल' ठरवेल... परंतु समजा उद्या नारायण किंवा रावसाहेब ह्यांच्या तुलनेत 'दोन वस्ताद'/'जनार्दन नारो शिन्ग्नापुरकर' हे किंचित कालसापेक्ष संदर्भहीन झालेतर त्यात रागाव्ण्यासारखे काय आहे ??

In reply to by अत्रन्गि पाउस

परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
तुम्हाला आवडले नसेल, पण तुम्ही त्या पुस्तकाकडे त्रयस्थपणे पाहु शकत नाही/ किंबहुना अश्या टिप्पण्णीवरून तुमचा वाद पेटवण्यचा विचार स्पष्ट दिसतो.

In reply to by आनन्दा

पुस्तक वाचतांना त्रयस्थ होऊन वाचावे कि समरसून हा एक व्यक्तिगत आवडीचा भाग आहे.. श्यामच्या आई मध्ये असा कोणता अविस्मरणीय (प्रसंग + निष्कर्ष) वाटतो कि जो त्याच्या भावनिक ताणाची किंमत देऊन वाचलाच पाहिजे ? बाकी वाद पेटवण्याचा उद्देश ? छे हो ...चर्चा/मंथन हाच उद्देश आहे...

In reply to by बन्या बापु

इतिहासाचे अवजड ओझे, डोक्यावर घेउन ना नाचा करा पदस्थल त्याचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा .... त्यामुळे, श्यामची आई कितीही आदरणीय वगैरे असले तरीही कालबाह्य झाले आहे, हे निश्चित !!

दारिद्रय, दैना, मुळु-मुळु रडणं ह्या गोष्टीच फक्त तुम्ही पाहील्या असतील पुस्तकात. त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार पण पहा ना. वो गरीब हुए तो क्या हुआ संस्कार से तो आमीर है!! हल्ली पोरांना त्या संस्कारांबरोबरच मानसिक आणि शारीरिक पातळीवर कणखर बनवलं पाहीजे एवढाच काय तो काळानुसार असलेला बदल.
मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे .
त्या **च्या आईचे संस्कार कमी पडले असतील :).

अत्रन्गि पाउस यांनी आपले म्हणणे थोडे भडकपणे मांडले आहे... माझ्या आईने हे पुस्तक माझ्याकडून निदान चारदा वाचून घेतले होते. मलाही लहानपणी हे पुस्तक तितकेसे आवडले नाही पण मी "मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक" असे म्हणणार नाही. कदाचित त्यावेळच्या काळानुसार ते पुस्तक बरोबरच होते. आजच्या पिढीला किंवा आज मी जरी हे पुस्तक परत वाचायला बसलो तर कंटाळवाणेच वाटेल पण त्यातले साहीत्यमुल्य किंवा उच्च संस्कार हे घेण्यासारखेच.. कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय... मी माझे आईवडील जो पर्यंत होते तो पर्यंत त्यांना उलटे कधीच बोललो नाही. तसेच कुठल्याही वडीलधार्‍या माणसाशी (ओळखीचा किंवा अनोळखी) most of the time नम्रच असतो आणि शक्यतो उलटे बोलायचे टाळतो. पण हे मी नंतरच्या पिढीत पाहीले नाही. इतर माझ्यापेक्षा बर्‍याच वयाने लहान असलेले फाडफाड बोलताना पाहून संताप होतो.

In reply to by योगी९००

मांडतांना त्यातील घटना किंवा आठवणी ह्या त्याकाळातील बहुतेक समाजात अतिशय कॉमन होत्या(किंवा असाव्यात असे वाटते)... माझा रोख आहे तो त्या घटनांना काहीतरी विशेष म्हणून अधोरेक्खीत करणे आणि त्याच्यावर भारंभार दैन्य कारुण्यरसाची वारंवार पेरणी करणे ह्यावर.. वडीलधार्यांना उलट नं बोलणे हा ह्या पुस्तकाचा effect ?? कदाचित ते पुस्तकाविनही आलेच असते..पहा विचार करून.:)

In reply to by अत्रन्गि पाउस

मला नाही वाटत... मी हे पुस्तक एकदाच, दहावी नंतर वाचले. तेव्हा ते जाम पकावू वगैरे वाटले होते. पण याचा अर्थ असा नाही, की मी त्याआधी वयाने/मानाने इ. मोठ्या व्यक्तिंशी अतिशय उर्मटपणे वागायचो आणि पुस्तक वाचून मी आमुलाग्र बदललो. शिवाय, लेखक आणि लेखकाशी सहमत असलेले इतर प्रतिसादकसुद्धा त्यांच्या वडीलधार्‍यांशी, गुरुजनांशी, कामाच्या ठिकाणावरील ज्येष्ठांशी नम्रपणे वागत नसतील, असे नाही. या पुस्तकातील सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक वर्णने खरी असतीलही. पण विनाकारण ते काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी दु:ख आहे असा जो स्वर लावला आहे(पुस्तकात), तो चुकीचा आहे. नम्रतेने वागणे, चोरी न करणे अशा संस्कारांसाठी अशा पुस्तकांची काय गरज? गरीबी असेल, तर कष्ट करून, शिक्षण घेऊन मोठे होता येते, हे १९७०-८० नंतरच्या पिढीने स्वतः अनुभवले आहे. गरीबीला गोंजारत तिला अति-करूण भावनेचे आवरण घालायाची (सध्याच्या काळातनाही) आवश्यकता नाही

In reply to by अत्रन्गि पाउस

कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय अरे बाबांनो कदाचित असे म्हटले आहे रे... याचा अर्थ असा नाही की मी आधी जनावर होतो आणि या पुस्तकामुळे नंतर माणसाळलो.. पण कोठेतरी शाम मनात बसलाच आहे. बाकी तुम्हा लोकांवर या पुस्तकाचा काहीच परिणाम नाही झाला हे दिसतेच आहे..

In reply to by योगी९००

मी रोज सकाळी उठल्यावर आई-वडिलांना प्रणाम करीत नाही. रोज झोपायच्या आधी त्यांनी (खरोखर कष्ट घेऊनही)मला वाढवताना घेतलेल्या कष्टाने व्याकूळ वगैरे होत नाही. रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही. पण माझ्या मनात त्यांच्या विषयी प्रेम आहे, त्यांनी घेतलेल्या कष्टाविषयी आदर आहे. आणि तो टिकवण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी श्यामची आई अथवा इतर कुठल्याही पुस्तकाची वा कोणत्याही माध्यमाची गरज नाही. माझ्या आईवडीलांनी मला वाढवण्यासाठी, मला शिक्षण देण्यासाठी, माझ्यावर संस्कार करण्यासाठी कोणत्याही आऊट ऑफ द वर्ल्ड पद्धतीचा अवलंब केला नाही याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळेच मी सामान्य आईवडीलांचा सामान्य मुलगा आहे.

In reply to by तुषार काळभोर

रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही. भावना माझ्याही थोड्याफार तुमच्यासारख्याच आहेत. पण श्याम आणि तुम्ही यांच्या सांपत्तिक स्थितीतला फरक लक्षात घेता तुमच्या मनात असा विचार न येणे यात फार काही अनपेक्षित नाही

'श्यामची आई' मला आवडतं - आजही आवडतं; ते माझ्यासाठी कालबाह्य झालेलं नाही. पण तुम्हाला ते कालबाह्य वाटतं - हे मी समजू शकते. तुम्हाला सध्या कोणतं पुस्तक अतिशय आवडतंय, कालातीत वाटतंय तेही सांगा* - तेही वाचेन मी. कदाचित त्या पुस्तकाबाबत आपलं मतैक्य होईलही :-) * उपरोध नाही, तसं वाटल्यास, क्षमस्व.

तुम्हाला ते अतिशय टाकाऊ, कालबाह्य वाटत असेल. मला त्यातील सगळ्याच गोष्टी पटल्या होत्या असे नाही. पण काही गोष्टी नकळत श्यामची आईची आठवण करुन देतात. उदा. जेवणात गुंतवळ वगैरे आला तर सगळ्यांना दाखवू नये, किळस येते इ., मला सो कॉल्ड कल्चर्ड लोक जेव्हा अशा गोष्टी करतात तेव्हा हमखास आठवतं. इतका बाळबोधपणा वाचायला आता बोर होतं, पण त्या पुस्तकाने लहानपणीच्या काळात अगदी काहीच म्हणजे काहीच दिलं नाही, असं मलातरी वाटत नाही.

In reply to by पिशी अबोली

हजारटक्के सहमत. त्यामुळे एखादा पदार्थ मनासारखा लागला नाही चवीला तरी करणार्‍या माणसावर उखडायला कमी होते मग ती व्यक्ती घरची असो अथवा बाहेरची. करणारा परिश्रम घेऊन आपल्यासाठी करतो त्याची चाड ठेवायला शामच्या आईने शिकवले (म्हणजे पुस्तकात बाबांनी).

अंमळ जास्तच भावनाबंबाळ वैग्रे आहे. एकदा वाचलं अन नंतर तेवढा ओव्हरडोस कै झेपला नै. सानेगुर्जींबद्दल आदर असला म्हणून त्यांचं सगळंच्या सगळं पटलं पाहिजे असं वाटत नाही.

पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.
हे सानेगुरुजींनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मग या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम" आणि सानेगुरुजींचं चरित्र अवश्य वाचून काढा. या पुस्तकाकडे त्या काळच्या कोकणातील एका ब्राह्मण घराण्याचं चित्र असं म्हणून तुम्ही बघू शकत नाही का? दलित साहित्य तुम्हाला आवडतं ना? मग हेही तशाच एका माणसाचे अनुभव आहेत. त्या काळाचं वास्तववादी चित्रण आहे. या पुस्तकाकडे एका काळाचं चित्र म्हणून तटस्थपणे पाहता येतंच की! १९३३ सालचं हे पुस्तक आहे. या पुस्तकानंतर आतापर्यंत ३ पिढ्या उलटून गेल्या आहेत. आताचे निकष त्या काळच्या लोकांच्या वागण्याला लावणं बरोबर नाही. तेव्हाची एक पिढी अशा आदर्शवादी विचारांनी भारलेली होती. तसे तर भगतसिंग इ. क्रांतिकारकांचे मार्ग कोणाला चुकीचे वाटत असतील, पण म्हणून त्यांच्या हेतूबद्दल, देशभक्तीबद्दल संशय घेता येणार नाही. त्यातूनही एखाद्या लिखाणाबद्दल प्रत्येकाला काय वाटेल हे सांगणं अवघड आहे. आवड ज्याची त्याची. व.पु.काळे आवडणारा एक वर्ग आहेच. तसा चेतन भगत आवडणारा पण आहे. आणि टिळक-आगरकर लेखक म्हणून आवडणारा पण आहे. दुसर्‍याच्या आवडीच्या विषयाला सरसकट लेबलं लावून कचर्‍यात टाकणं योग्य नव्हे. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते.

In reply to by पैसा

या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम"
हा भाग जास्त वास्तवपूर्ण (आणि कमी आदर्शवादी) आहे. यातला श्याम घरातून पळून जातो, पारव्यांवर दगड मारतो वगैरे प्रसंग आहेत. कापदापोलीच्या शाळेचं वगैरे तर वर्णन खासच.

In reply to by पैसा

ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते. +१ सहमत.. असेच म्हणतो.. मला ही हे पुस्तक तितके आवडले नाही पण मी यावर असे भडक कधीच लिहीणार नाही.. पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....

In reply to by योगी९००

पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....
काय तो कडवा पाठिंबा, वाह! जप हो शाम =))

In reply to by योगी९००

यावर असे भडक कधीच लिहीणार नाही.. +१ अवांतर- हा लेख वाचताना कुणाला माननिय अनिता पाटील आठवल्या का हो?

In reply to by पैसा

प्लीज नोटः पैसा ताई, मला तुमच्याबद्दल एक अनुभवी, अभ्यासू आणि अतिशय संयत सभासद आणि संपादक म्हणून अतीव आदर आहे. कृपया हा प्रतिसाद पर्सनली घेऊ नये. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत ......... त्यातील किती जणांना ते पुस्तक खरेच आवडते? किती जणांना त्यातील अती-बाळबोधपणा पटतो? किती जण स्वतः त्यातील साधी तत्वे (उदा. स्वयंपाकाबद्दल कौतुक करणे/टीका न करणे) अंगिकारतात?

In reply to by तुषार काळभोर

खरोखर आवडते. पैसाताई, तुझा प्रतिसाद +१ त्यातला भाबडेपणा अनमोल आहे. आजच्या जगात असा भाबडेपणा जिच्यापाशी आहे, ती व्यक्ती भाग्यवान. :) अतिशय वेगळ्या, साध्या सुध्या जगात घेऊन जाणारे असे हे पुस्तक आहे.. माझ्या संग्रही आहे.

In reply to by यशोधरा

छान प्रतिसाद पैसाताई. यानिमित्ताने हे क़ळले की मी 'श्याम' हे पुस्तक वाचलेले आठवत नाही आता शोधते कोणाकडे मिळतयं का. यशो - त्यातला भाबडेपणा अनमोल आहे.+१११

In reply to by तुषार काळभोर

पर्सनली अजिबात घेत नाही. पण इथे वर आलेले सगळे प्रतिसाद वाचा भौ! किमान २ जणांनी तरी जेवताना जेवणावर टीका करत नाही असं लिहिलं आहेच. पुस्तक एक कलाकृती म्हणून मला निश्चितच आवडतं. त्यात त्या काळाचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं. आणि माझं मत विचाराल तर कोणत्याही कलाकृतीचा आयुष्यावर परिणाम वगैरे फार कमी वेळा आणि कमी प्रमाणात होतो. म्हणजे त्यातली एखादी गोष्ट आपल्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे, पण संपूर्ण आयुष्य बदलणे वगैरे आजच्या काळात शक्य नाही. भगवद्गीता आणि इतर तत्त्वज्ञानावरील पुस्तकं सोडून इतर सर्व पुस्तकं/कलाकृतीचा आस्वाद कलाकृती म्हणूनच घ्यावा. (ती पुस्तकंसुद्धा एखाद्याला मनोरंजक वाटू शकतील. पण मी सर्वसामान्य वाचकांबद्दल बोलत आहे.)

@ यसवाजी मला आटवल्या , मनुन आतापतुर गप होतो . तुमाला नाय ना आवडल तर तुमच्या पाशी ठेवा . कशाला बोंबलत फिरताव .

माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
हे फारसं खरं नाही असं वाटतं. आणि गरीबीचं उदात्तीकरण वगैरे काही नाही... तर आहे त्या परिस्थितीत, माना-सन्मानाने जगावे आणि जास्तं काही मिळविण्यासाठी वाम मार्गाने जाऊ नये, हाच संदेश यात आहे. ही कथा काल्पनिक असल्याने, त्यातील उच्च मूल्ये आणि आदर्शवाद आजच्या काळाच्या कसोटीवर खरे ठरणार नाहीत कदाचित, पण म्ह्णून ती टाकाऊ नाहीत. आणि "माझी आई विशेष होती" असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला तुम्ही बेगडी ठरवू शकत नाही. श्रीराम कथा आपण वाचतो ... त्यातील उच्च्कोटीचे गुण असणार्‍या व्यक्तींसारखी कुणी आपल्या आजूबाजूला कधीच नसते. पण तरीही ती कथा आपण आदर्श मानतो. आणि त्यातील काही गुण तरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. शामची आई हे पुस्तक याच दृष्टीकोनातून वाचावे.. मग तो इमोशनल अत्याचार वाटणार नाही. परंतु शाळकरी वयातील मुलाला.. ,ज्याचा पुस्तक वाचण्याचा हेतु 'शुद्धं मनोरंजन' हाच आहे, हे पुस्तक रटाळ वाटण्याची शक्यता नक्कीच आहे.

बाळ जातो दूर देशा - गोपीनाथ बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून आज सकाळपासून हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे ना खळे पाणी आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला माझ्या लाडक्या लेकाला याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान काही राहिले मागून नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भॆटाया किती शिणवीसी काया वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी! गाडी थांबेल दाराशी पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास नाही मायेचे माणूस ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी बाळा, तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल स्वप्नी तुलाच पाहील बाळ जातो दूर देशा; देवा, येऊन ऊमाळा लावी पदर डोळ्याला