ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते. म्हणजे ते स्वप्नातले दुरून आल्यासारखे वाटणारे सारे कर्णकर्कश्श स्वर अगदी सामोरूनच येत होते तर. अचानक मला बाईकवर फिरताना वा रस्त्याने चालतानाही कानात हेडफोन लावणारी आजची युवा पिढी गुणी बाळ वाटू लागली. आधीच या अंड्याला ईंग्रजी संगीतातला ओ कि ठो कळत नाही, आणि इथे तर ठो ठो करत वाजवली जाणारी वाद्ये कानठळ्या बसवत होती. रेहमानसाहेबांच्या अपवादात्मकच अश्या न आवडलेल्या ‘रॉकस्टार’ या रणबीरपटाची आठवण झाली. त्या संगीतातले शब्द तरी किमान ओळखीचे असल्याने त्यातच काही तरल भावना शोधायचा प्रयत्न केला होता पण इथे मात्र ते ही शक्य नव्हते.
काय करावे, काय करावे, या फर्स्टक्लासमधल्या माणसांना पटकन हटकताही येत नाही. सेकंडक्लासच्या डब्यात परप्रांतीयांचे ‘तुम तो ठहरे परदेशी’ ऐकण्यापासून वाचावे म्हणून फर्स्टक्लासच्या तिकिटावर खर्चा करावा तर इथेही परदेशी संगीत पिच्छा सोडत नाही. संगीत असावे तर आपल्या भाषेतले, आपल्या मातीतले.. ओढ लावतीss अशी जीवाला, गावाकडची माती.. साद घालतीss पुन्हा नव्याने, ती रक्तांची नाती.. मल्हारवारी आठवले तसे मी देखील स्वताचा मोबाईल काढून ते गाणे शोधायला घेतले. पण चाळताना लक्षात आले की ते घरच्या कॉम्प्युटरवरच पडून आहे. मोबाईलमध्ये कधी असे ऐकायला घेतलेच नाही. पण चाळता चाळता आणखी एका मराठी गाण्यावर नजर पडली आणि कामावर जाईलाss, उशीर व्हाईलाss, बघतोय रिक्षावाला ग्ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला.. स्सॉल्लिड, हे पण आपले एक फेवरीट ! कानावर पडले की बस उठून नाचावेसे वाटावं. पण आता सकाळच्या टाईमाला हे ऐकावे की न ऐकावे याचा विचार करता करताच एक क्लृप्ती सुचली अन चेहराच खुलला. आता काट्याने काटा निघणार होता. लावलेच ते गाणे फुल्ल वोल्युम करून. पाठोपाठ कोंबडी पळाली तयार होतेच, पण त्याची वेळ आलीच नाही. तिथवर पोहोचायच्या आधीच समोरून येणारे आवाज लोप पावले. तसे मी बॅगेतला हेडफोन काढून कानाला लावला आणि आतल्या आत गपचूप गाणे बंद करून शांत झोपी गेलो.
- अंड्या
वाचने
6953
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
लवकर रिक्षा पकडा , बैला आहे
"लवकर पकडा रिक्षेला, बैला आहे
In reply to लवकर रिक्षा पकडा , बैला आहे by जेपी
हम्म.
आयला.....
कायदा ?
In reply to आयला..... by मुक्त विहारि
स्पीकर फोन लावून कार्यक्रम ऐकण्याला बंदी आहे.
ओके, हे नव्हते माहीत.
In reply to स्पीकर फोन लावून कार्यक्रम ऐकण्याला बंदी आहे. by मुक्त विहारि
@ साळसकर....
In reply to ओके, हे नव्हते माहीत. by साळसकर
@ साळसकर....
In reply to @ साळसकर.... by मुक्त विहारि
अंड्या लय हुशार हाय बगा.
कोई शक
In reply to अंड्या लय हुशार हाय बगा. by धन्या
चान चान निबंध
चान चान बोले तो ?
In reply to चान चान निबंध by स्पा
बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट
हुच्चभ्रू बोले तो ?
In reply to बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट by सुहास झेले
मजेशीर!
परवा जय शंकर बघायला गेलो अलकाला
मस्तच !
आजचा किस्सा....
तरीही...
In reply to आजचा किस्सा.... by मुक्त विहारि
जावू द्या हो....
In reply to तरीही... by आत्मशून्य
तरीही...
In reply to जावू द्या हो.... by मुक्त विहारि
धन्यवाद.....
In reply to तरीही... by आत्मशून्य
जसं की आपणास माहित आहे
In reply to धन्यवाद..... by मुक्त विहारि
धन्यवाद...
In reply to जसं की आपणास माहित आहे by आत्मशून्य
१० रु.चा हेड्फोन
मस्त
In reply to १० रु.चा हेड्फोन by आसिफ
राव तो चायना मोबायील म्हणजे
In reply to १० रु.चा हेड्फोन by आसिफ