पेशंट
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज गजर दोनदोनदा रिसेट केला, अंथरुणातनं उठायचा अगदी कंटाळा आला होता. सवापाच झाले तसं डोळे उघडले आता उठलो नाही तर पुढच्या प्रवासाचे तीन तेरा वाजणार एवढं नक्की होतं. होय नाही करता पटापट आवरुन निघालो, कधी नव्हे ती रिक्षासुद्धा घराबाहेर पडल्या पडल्या मिळाली.
लोकलने कर्जत गाठलं. इंद्रायणीच्या डब्यांच्या स्थितीबद्दल स्पीकर कलकलत होता. बरेचसे हुंबैकर पेंगुळलेल्या डोळ्यांनी इंद्रायणीची वाट बघत होते. गाडी आली, माझ्या जागेवर आधीच एकजण बसला होता. रिझर्वेशन आहे म्हणताना तो उठला आणि मला जागा मिळाली. अर्थात ती मिळणारच होती. सगळं नेहमीप्रमाणेच किंबहुना नेहमीच्या प्रवासापेक्षा मस्त चाललं होतं तोच लोणावळा गेल्यानंतर 'डॉक्टर आहे का कोणी इथे' म्हणून एक इसम मोठ्याने विचारु लागला. काही कळत नव्हतं नक्की काय चाल्लंय. उठून बघेपर्यंत तो माणूस तोच प्रश्न विचारत दुसर्या बोगीत पोचला पण !!
मी बसलो होतो त्याच्या अगदी एक सीट सोडून समोरच्या सीटवर एक मुलगी पोट गच्च धरुन बसली होती. पोटात दुखत असावं बहुधा !! सोबत तिघी मैत्रिणी होत्या, त्यातल्या एकीने आपली शाल काढून तिला पांघरायला दिली. बर्याच जणांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह होतं. पण ते पोट धरुन बसणं बसणं परिचित होतं. भारती...कर्रेक्ट भारतीच !! नववी दहावीला असताना दोन तीन महिन्यात एकदा तरी ती असंच पोट धरुन बसायची. वर्गावर कोणी सर असतील तर वर्गशिक्षिका यायच्या आमच्या आणि तिला बाहेर घेऊन जायच्या, घेऊन जायच्या म्हणजे अगदी हाताला धरुन!! आता लक्षात आलं!! आणखी ज्यांना हे लक्षात आलं ते मधल्या पॅसेज मध्ये उभे असलेले लोक आधीच बाजूला झाले होते जेणेकरुन त्या मुलीला कम्फर्टेबल वाटेल. डॉक्टर शोधायला गेलेला माणूस रित्या हाती परत आला. फोन करुन स्टेशनवर उतरल्या उतरल्या डॉक्टर मिळतील का वैगरे चौकशी सुरु होतीच. त्या मुलीचा पोटावरचा हात काही हलत नव्हता प्रचंड कळवळत होती. खडकी ओलांडलं आणि शिवाजीनगरला उतरायला बहुतेक जण तयारी करु लागले. मघाशी डॉक्टर शोधायला गेलेल्या माणसाने तिची बॅग घेतली. पेशंट आहे, पेशंट आहे ओरडत पुढे जाऊन त्या चौघींना जागा करुन देत होता. सोबतच्या तिघींपैकी एकीने उरलेल्या दोन बॅगा घेतल्या आणि पुढे निघाली. उरलेल्या दोघी तिला हाताला धरुन उभं राह्यला मदत करत होत्या. तिचा पोटावर ठेवलेला डावा हात अजूनही तसाच होता. जागा सोडायला काही ती तयार नव्हती.
कशीबशी उभी राह्यली आणि दोन पावलं चालून अगदी समोरच्याच रिकाम्या सीटवर मटकन बसली. सोबतच्या एकीने तिचे डोळे पुसल्याचं आजूबाजूच्यांच्या लक्षात आल्यावाचून राह्यलं नाही. मग काहीजण आपण होऊन बाजूला होत जागा देत होते तिला बसावंसं वाटलं की!! ही स्टेशनला उतरायची कशी हा प्रश्न बर्याच जणांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. पाचेक मिनीटं झाली हा प्रकार चालला होता शिवाजीनगरला गाडी पोचायच्या सेकंदभर आधी अगदी एकेक पाऊल पुढे टाकत ती गेटपर्यंत पोचली असेल तोच तिघेचौघेजण आम्हाला उतरु उतरु द्या म्हणून तिला आणि तिच्या मैत्रिणीला अक्षरश: ढकलून पुढे गेले. तो निव्वळ खोटेपणा होता हे लक्षात येऊन सुद्धा कोणी बोललं नाही. कारण झालेला प्रकारच प्रचंड तणाव निर्माण करुन गेला होता, तो तणाव बहुतेकांच्या आणि बहुतेकींच्या चेहर्यावर दिसत होता. बोलायच्या मनःस्थितीत कोणीच नव्हतं.
राहून राहून प्रश्न पडत होता की तिला होत असलेल्या त्रासाबद्दल सिरीयसनेस 'त्या' तिघाचौघांमध्ये कधी येणार? ती गाडीतनं कशीबशी उतरली खरी, पण ती आणि तिची ती अवस्था डोक्यातून जायला तयार नव्हती.
प्रतिक्रिया
सुन्न.......
खरोखर संतापदायक प्रकार आहे...
येस
मान्य....
कथा वेगळ्या प्रत्यक्ष आयुष्य वेगळं.
साहेब....
हे तुमच्या बद्दल नाही..!
५% की ९४% की १%.........
०%
मी गेली १०/१२ वर्षे
ठिक आहे. चर्चा ट्रॅकवर आणतो. कायदा जमावाच्या बाजुने असतो.
मस्त हो छान छान....
सूड संयत लेखन.
संयत लिहिलं आहेस. वाचून त्रास
+१ ... हेच म्हणते...
मनातली तळमळ संयत शब्दात
मान्य...
+१
थोडी भर...
अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्या इतकाच दोषी असतोनाय, नाय ! अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्या इतकाच दोषी असतो... आणि तो अन्याय मूकपणे बघत राहून दुर्लक्ष करणारा किंवा केवळ हळहळ करणारा त्यापेक्षा जास्त दोषी असतो.+ १
छान लिहिलंस
छान लिहीलय!
अन्यायाविरुध्द
तसं वाचलं तरी ते योग्यच असावं
सूड यांचा फोटो नुकताच बघितला
सूड, नेहमीच मदतीला तयार असतात...
तसेही नाही
या धाग्यावर माझ्याकडुन
जाने दो.....
मेलो
जेपीजी तुमच्या व्यनिला उत्तर
@जेपी
जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा
जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा तोंडाला रंग लावून बोर्डावर आलं की मग लोक शिट्ट्या मारतात अशी तक्रार करु नये'.हांगं आश्शी !मान्या आहे मुवी , कथा आहे असे
दुर्दैवी आहे खरेच, पण चौदात
ओक्के !!
भावना पोहोचल्या.....
तर आता हातात सापडले असते आणि
प्रामाणिक उत्तर.पटले.
परदुखः अस्तित्वातच नसतं...!>>
माफ करा
संवेदनाशून्यता नि संवेदनशीलता