सही रे सही....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
खालील लेख तद्दन फालतू आणि विनोदी आहे.जास्त विचार न करता लिहीलेला आहे.तस्मात ज्यांना खूप विचार करून लेख लिहायला आणि अति विचार असलेलेच लेख आवडतात, त्यांनी हा लेख वाचू नये.
===============================================================
गेली ३/४ वर्षे मिपावर वाचनमात्र होतो आणि मग एक दिवस मिपाचे सदस्यत्व घ्यावे असे वाटले.अर्ज केला आणि तो पास पण झाला.बाकी सगळी माहिती भरली पण ही "सही"ची भानगड काही सुटत न्हवती.इतरांच्या सह्या बघून झाल्या.पण सहीचे कोडे काही सुटत न्हवते.३/४ दिवस असेच गेले.आमची ही अवस्था, आमच्या बायकोच्या लक्षांत आली, आणि तिने सरळ आम्हाला घेवून बाबांचा आश्रम गाठला.
तसा मी बुवा-बाजीच्या जास्त फंदात न पडणारा मनुष्य.पण ह्या बाबांचा मात्र खूपच भक्त.एक तर ते पैसे घेत नाहीत आणि साधे सरळ उपाय देतात.कौटूंबिक समस्या तर एकदम चुटकीसरशी सोडवतात.आम्ही पोहोचलो, त्यावेळी पण एक २२/२५ चीचे जोडपे त्यांना भेटून परत जात होते.त्या दोघांचेही चेहरे आनंदीत झाले होते.बहुदा बाबांचा सल्ला त्यांना मानवला असावा.
बाबांच्या खोलीत गेलो तर ह्यावेळी जिकडे-तिकडे पाट्याच पाट्या लावल्या होत्या.
"पेंडसे वर राहतात."
"ऐक टोले पडत आहेत."
"पदराचा आणि वार्याचा संबंध, असतोच असेही नाही आणि नसतोच असेही नाही."
अशा वाक्यांच्या पाट्या तर होत्याच पण शिवाय काही कवितेच्या पण पाट्या होत्या.
"नांव गांव कशाला पुसता?"
"घटा घटाचे रूप आगळे."
मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी , सगळ्या मालिकेंच्या पाट्या होत्या.तर ह्यावेळी ह्या पाट्या.असो.
एक २/४ मिनीटांतच बाबा आले.नेहमीप्रमाणे चेहरा एकदम हसतमूख.आम्ही दोघेही पाया पडलो.आमच्या हिने त्यांना "खीमा कटलेट आणि खजूराच्या वड्या" दिल्या.त्यांनी लगेच दोन्ही पदार्थांची चव घेतली आणि संभाषणाला सुरुवात केली.
बाबा : बोला काय काम काढलेत.
आमची बायको : बाबा, ह्यांचे ना गेल्या १०/१२ दिवसांपासून कुठे लक्षच लागत नाही आहे.मध्येच कधी तरी हसतात, तर कधी गंभीर होतात.सारखे संगणकावर चिकटून असतात.मी कुठला पदार्थ करायला घेतला की, लगेच कॅमेरा घेवून स्वैपाकघरांत शिरतात.आता मी पदार्थ करू की, ह्यांचा फोटो काढून होइस्तो वाट बघू?
बाबा : अगं मुली ते सध्या कुठल्या तरी संकेतस्थळाचे सभासद झाले असतील.काय हो, मुवि, बरोबर ना?
मी : एकदम बरोबर.सध्या मी "मिपाकर" आहे.
बाबा : (आमच्या बायकोकडे बघून) बघीतलेस.बरे मग आता तुम्हीच सांगा.काय अडचण आहे?
मी : बाबा एखादी छानशी सही सुचवा ना.लोकांच्या किती सुंदर सुंदर सह्या असतात्,मला पण एखादी सही सुचवा.
बाबा : अरे, मी तुला काय सही सुचवणार? आपल्या महाराष्ट्रात इतकी थोर थोर मंडळी बरेच काही लिहून गेली आहेत.त्यांत पण पु.ल. तर खूपच.तरी पण तुम्हाला सही सुचत नाही, म्हणजे कमाल आहे.गेले ७/८ दिवस हाच प्रॉब्लेम घेवून बरीच जण येऊन गेली.शेवटी मग मीच पाट्या तयार करून ठेवल्या.तुला हवी असेल तर कुठलीही पाटी निवड.
मी : आधी मला ह्या पाट्यांची थोडी माहिती तर द्या. उदा."पेंडसे वर राहतात." ह्या पाटीला काय महत्व? साधीच पाटी आहे. किंवा "ऐक टोले पडत आहेत." हिचा काय अर्थ?
बाबा : बघीतलेस.तुम्ही नुसतेच वाचता.पण त्यामागचा अर्थ समजून घेत नाही.अहो... "पेंडसे वर राहतात."...ही पाटी त्याच लोकांसाठी आहे, की जे फक्त लेखमात्र असतात.म्हनजे जे फक्त लेख लिहीतात किंवा प्रतिसाद देतात...पण त्यांच्या लिखाणावर चर्चा करायला त्यांना आवडत नाही.तुम्ही लेख पण लिहीणार आणि जमल्यास त्यावर चर्चा पण करणार.मग तुम्हाला ही पाटी काही उपयोगाची नाही.
तसेच ती दुसरी पाटी..."ऐक टोले पडत आहेत." .... तु ही कथा वाचली असशील.ह्या कथेचा थोडक्यांत सारांश पण तुला माहीत असेलच.पण दुसर्या व्यक्तीने ती कथा न वाचल्याने, त्याला ह्या वाक्याचा अर्थ समजणार नाही. थोडक्यात "ऐक टोले पडत आहेत." म्हणजे....बाबारे वाचन वाढव.जास्त काही लिहीलेस तर तुझी शंभरी भरलीच म्हणून समज, असे तुम्ही दुसर्या मिपाकराला सांगत आहात.
आता ही तिसरी पाटी घे..."पदराचा आणि वार्याचा संबंध, असतोच असेही नाही आणि नसतोच असेही नाही."
आता तुच सांग ह्याचा अर्थ आणि जमल्यास त्या कवितांच्या ओळीचा पण अर्थ सांग.
मी : "पदराचा आणि वार्याचा संबंध, असतोच असेही नाही आणि नसतोच असेही नाही." म्हणजे काही काही लेखांतील विचारधारांना, तुम्ही सहजासहजी स्वाकारु पण शकत नाही आणि नाकारू पण शकत नाही,
बरोबर ना?
बाबा : एकदम योग्य.जे लोक असे योग्य विचार करून लेख लिहीतात, त्यांच्या साठी ही सही आहे.तू काही ही सही घेवू नकोस.
मी : "नांव गांव कशाला पुसता?" ही कोल्हापुरकरांसाठी एकदम योग्य. बरोबर ना?
बाबा : अरे वा!!! तु तर एकदम योग्य विचार करायला लागलास.मग आता ती शेवटची कविता म्हण बरे.
मी : "घटा घटाचे रूप आगळे. प्रत्येकाचे दैव वेगळे.मुखी कुणाच्या पडते लोणी.कुणा मुखी अंगार.विठ्ठला तू वेडा कुंभार." थोडक्यात हे कंपूबाजी करणार्यांसाठी आहे.बरोबर ना? मग ह्या पाटीचा "मिपाकरांना" उपयोग नाही.
बाबा : एकदम बरोबर.मिपाकर सुज्ञ असल्याने,कंपूबाजीला जास्त महत्व देत नाहीत.मग आता तुच ठरव की कुठली पाटी पाहीजे.
मी : अजून पण काही सुचत नाही आहे.तुम्ही काही तरी सुचवा.
बाबा : तू ते "असामी असा मी" वाचले आहेस ना?मग त्यातील एक वाक्य निवड.
मी : मला ना त्यातले नानू सरंजाम्याच्या तोंडचे "मी झोपतो करून हिमालयाची उशी." हे वाक्य खूप आवडते. तेच टाकतो.
कारण
नानू = न + अ+ अनू (म्हणजे अनेक रेणूंचा बनलेला , थोडक्यात अनेक पैलू असलेला माणुस.)
सरंजामे = ज्याच्याकडे विचारांचा आणि अनुभवांचा साठा आहे.
झोपतो करुन हिमालयाची उशी = ह्या भारतवर्षातील सगळ्या माणसांमधून समविचारी माणसे शोधणे आणि त्यांच्या बरोबर "काव्य्,शास्त्र आणि विनोदाच्या" गप्पा मारत मारत रात्र रात्र जागवणे.
बाबा : बरोबर...आता तुला थोडे थोडे पुल समजायला लागले.
उद्या तुला " गाढवाला शिंग का नसते?" ह्या वाक्याचा पण अर्थ समजेल.
असो, पण तुझ्या ह्या सहीत अजून एक वाक्य पण टाक "मुद्दाम गहन विचार करणार्यांची आम्हाला गरज नाही."
मी : कशाला?
बाबा : त्याचे काय आहे, सध्या उगाच नको ते विषय काढून आणि विचारलेल्या शंकांची उत्तरे न देता पळून जाणारी माणसे जरा जास्तच झाली आहेत.समझनेवाले को इशारा काफी होता है.
मी : धन्यवाद बाबा.तुम्ही माझे मोठे काम केलेत.
बाबा : अरे नुसते कोरडे धन्यवाद देवू नकोस.मागच्या वेळीस दिल्या होत्यास, तशा मस्त आरोग्यवर्धक ओल्या नारळाच्या वड्या घेवून ये.अन सुन बाई, जमल्यास तू पण मिपाकर हो.
====================================================
तर अशा प्रकारे, आमचा सहीचा प्रश्र्न सुटला.चला आता बाबांसाठी वड्या करायला घेवू या.
प्रतिक्रिया
मस्त. एकदम खुसखुशित.
मस्तच
मस्तं लिहिले आहे
चांगलंय !!!
हाहाहा!
@उद्या तुला " गाढवाला शिंग का
बघा आम्हाला हसवता हसवता ती
खिक्क !
खालील लेख तद्दन फालतू आणि
खरं तर
@ "असेन जरी मी मुक्त विहारी,
आता कसं बरं वाटतय जरा
मुवि रॉक्स!!
सहि रे सहि .
(No subject)
सही रे सही !
सह्यांचा विचार
आय्ला
त्रिवार निषेध !!!
आहे आहे
भारीच लेख ... लई म्हणजे लईच
माझी सही
या लेखात बरेच मुद्दे दडलेले
आ हा हा काय सोलवटलंय....
मुवि लेख एकदम आवडला. एकदम
छान लिहिलंय .... आवडला लेख ..
जियो.
कट्टयांसंदर्भातले धागे उसवण्यावर बंदी…
सही रे सही....
लेख आवडला.
जबराट !सही रे सही...