चिंचेचा भात (tamarind rice )
कालच्या कारल्याच्या काचऱ्या खाऊन आणि काही लोक पाहून तृप्त झाले आहेत ,काहींची तोंडे कडू झाली असतील तर आज मुद्दाम काहीतरी आंबट चिंबट खाऊया ...चालेल न .
चला चला चिंचेचा भात आणि कलिंगडाचा रायता बनवूया ...
त्यासाठी साहित्य लागेल : बासमती तांदूळ २ वाट्या ,चिंचेची पेस्ट २ चमचे ,प्रत्येकी अर्धा चमचा मुगदाळ आणि चणाडाळ २० मी. भिजवून ठेवलेली ,अर्धा चमचा हळद ,अर्धा चमचा तिखट ,मीठ चवी प्रमाणे ,कढीपत्ता ४ -५ पाने, मोहरी अर्धा चमचा ,२ हिरव्या मिरच्या ,३ लाल सुख्या मिरच्या ,संभार मसाला अर्धा चमचा तेल ३ चमचे , शेंगदाणे आवडीप्रमाणे कमी जास्त ,काजू हि तसेच आवडत असतील तर बिनधास्त घ्या ...१ मुठ .. थोडा गुळ (अर्धा चमचा चालेल)
कृती: सर्व प्रथम तांदूळ धुऊन त्याचा मीठ टाकून मोकळा भात शिजवून घ्या आणि गार करायला ठेवा .
आता एका कढाई मध्ये तेल तापवून त्यात सर्व प्रथम शेंगदाणे ,काजू घाला ,ते परता मग मोहरी ,कढीपत्ता ,हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आणि लाल मिरच्या तोडून टाका ..
ते थोडे परतून झाले कि भिजवलेली मुग आणि चणाडाळ टाका ..आता हे २ मी. परतून घ्या
मग त्यात चिंचेचा कोल ( हा मी रेडीमेड वापरला आहे ) टाका .त्यावर थोडे पाणी शिपडून घ्या महणजे फक्त सर्व एकजीव होण्याकरिता हा.
आता वर दिलेल्या प्रमाणात हळद ,लाल तिखट ,संभार मसाला ( हा हि हवा असल्यास नसला तरी चालतो ) मीठ ,आणि थोडा गुळ टाका .आणि नीट mix करा ..
आता त्यात शिजवलेला भात टाकून नीट एकजीव करा .१ -२ वाफ येऊ द्या ...
मग चिंचेचा भात तयार ...
आता या सोबत गरम गरम रस्सम असेल तर क्या बात .. पण असो मी नाही बनविले .
माझ्याकडे कलिंगड होता घरात म्हणून मग त्याचा रायता केला .
त्यासाठी मी कुठलेही प्रमाण असे ठेवीत नाही हा ..जे जसे असेल तसे आवडीप्रमाणे टाकते ..
कलिंगड रायता : दही १ वाटी घेऊन ते नीट फेटून घेतले त्यात मीठ ,साखर ,आणि ला तिखट टाकले
आता कलिंगडाचे scoops करायला घेतले पण scooper नसल्यामुळे ते नीट झाले नाहीत मग सरळ कापले आणि दही मध्ये टाकले .. नीट एकजीव केले आणि थोडा टेस्ट केला आहा मस्त चव लागली ..
वाचने
7431
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
है शाब्बास...
हो हो मु वि काका नक्की देणार
In reply to है शाब्बास... by मुक्त विहारि
गुळ!!
अरे सानिका मला माहित नव्हते
In reply to गुळ!! by सानिकास्वप्निल
अगं पाकृ आधी
In reply to अरे सानिका मला माहित नव्हते by आरोही
प्रत्येकाची पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी असते
In reply to अगं पाकृ आधी by सानिकास्वप्निल
+१
In reply to प्रत्येकाची पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी असते by मुक्त विहारि
आजवर ऐकुन होते. मग बाजारातुन
कलिंगड रायता नविन
मस्त पाकृ.
हाच प्रश्न मला पडला. रायत्यात
In reply to मस्त पाकृ. by अजया
अजया ताई मी हि हा पहिल्यांदाच
In reply to मस्त पाकृ. by अजया
(No subject)
सहीच
मस्तचं
>>शेंगदाणे ,काजू घाला ,ते
मला वाटते की आधी शेन्गदाणे,
In reply to >>शेंगदाणे ,काजू घाला ,ते by सूड
माऊ ताई अगदी बरोबर आणि मोहरी
In reply to मला वाटते की आधी शेन्गदाणे, by कवितानागेश
वा!