Skip to main content

मटार पॅटिस

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 23/02/2014 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- ५-६ उकडलेले बटाटे,३-४ स्लाइस ब्रेड, साधारण २.५ ते ३ वाट्या मटारदाणे, साधारण पेरभर आलं ,२-३ लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या , मीठ, तेल, रवा किवा ब्रेडक्रम्स कृती- आलं मिरच्या लसणीची पेस्ट करुन घ्यावी. बटाटे उकडून सोलून घ्यावेत, नंतर ते कुस्करावेत.त्यात चवीनुसार मीठ,चमचाभर आलं मिरची लसणीची पेस्ट घालावी.ब्रेडचे स्लाइस पाण्यातून काढून नंतर दाबून पाणी काढून ते बटाट्यात मिसळावेत.मळून गोळा करुन घ्यावा. चमचाभर तेलावर मटार वाफवून घ्यावेत, त्यात १.५ ते २ चमचे आलं मिरची लसणीचे वाटण घालावे, चवीनुसार मीठ घालावे व चांगली वाफ काढावी. बटाट्याच्या गोळ्यातून लिंबाएवढा गोळा घेऊन खोलगट आकाराची पारी करावी.त्यात मटारचे सारण घालावे. पारी बंद करावी,चपटी करुन रवा किवा ब्रेडक्रम मध्ये घोळवावी. असे सर्व पॅटिस करावेत. (बटाट्याचा गोळा किवा मटारचे सारण यातले एक काहीतरी उरलंच तर ते भाजीत घालता येते.) तव्यावर तेल सोडावे व पॅटिस लावावेत. वरुनही तेल सोडावे.पॅटिस शॅलोफ्राय करावेत. टोमॅटो केचप, चिंचगुळाची चटणी ह्यापैकी हवे त्या बरोबर गरम गरम सर्व्ह करावे. ह्या साहित्यात १६/१७ पॅटिस होतील. .

वाचने 9687
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

:HAPPY:

झक्कास !!!

झक्कास

In reply to by नितिनभालेराव

रवा दोन्ही बाजूना लावायचा, रव्यात्/ब्रेड्क्रम मध्ये पॅटिस घोळवून घ्यायचे. कॉर्न +चीजचे सारणही छान लागते.कॉर्न उकडून त्याला आलं मिरची लसणीचे वाटण माइल्ड लावायचे आणि चीजकिसून त्यात घालायचे. खूप छान लागतात ते ही पॅटिस..

मधुमेहीना वर्ज्य बटाट्याशिवाय करता येतील का?

मटारचे पॅटिस आवडले. मस्तं

छानच लागतात हे पॅटिस. शिवाय मका-चीज चेही सारण अफाट मस्त लागते. तशा टिक्क्या/पॅटेस यांची पाकृ मागे दिपक-कुवेत ने दिली आहे. क्लासिक लागतात.