शेव
सर्वात सोपी आणि झटकन होणारी म्हणजे शेव्....तसेच पटकन खाऊन संपणारी..:)
साहित्यः
१ वाटी तेल
१ वाटी पाणी
अंदाजे ४ वाट्या बेसन (हरभरा डाळीचे पीठ) शक्यतो ताजे आणि बारीक
तिखट,मीठ, हळद
ओव्याची पूड
कृती:
१. तेल आणि पाणी एकत्र करून फेटावे, हँड ब्लेंडर चा उपयोग करावा. पांढरे होईपर्यंत फेटावे.
२.त्या तेलात १ च.ओवापूड, मीठ, ४ च.तिखट, पाव हळद घालावी व त्यात मावेल तेवढे बेसन घालावे व पिठ भिजवावे जास्त घट्ट नको.
३.पसरट कढईत तेल गरम करावे. शेवपात्रात वरील पीठ घालुन डायरेक्ट कढईतच शेवेचा चवंगा पाडावा. थोड्यावेळाने हलक्या हाताने उलटवून दोन्ही बाजुने तळावा.
४.अशा रीतीने सर्व पिठाची शेव करावी.
५.वरील पिठासाठी शेवपात्रातील चकती बारीक/मध्यम वापरावी फार जाड वापरू नये.
टीप: शेव कढईत टाकताना गॅस मोठा असावा, नंतर मध्यम आच करून मंद तळावी.
याद्या
5421
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
दिवाळी जवळ आली
खरच
मिपाच्या
फोटू हवा
मस्त!
भिजवताना
"मासा" चे स्त्रीलिन्ग आणि "माशी" शब्दाचे पुलिन्ग..
In reply to भिजवताना by विजुभाऊ
काही