रात्री ८ -९ च्या दरम्यानची वेळ असावी छान भूक असावी पंजाबी डिशेस खूप खाऊन कंटाळा आला आहे आणि मराठी जेवणही खूप दिवसात केल नाही (मीस केलयं) आणि त्यात पंजाबी कुटूंबा सोबत गरमा गरम भाता सोबत पंजाबी कढी मिळावी. ते कढी म्हणत असले तरी थोड्याशा फरकान असतं ते आपल्या कडच पिठलच पण त्याच वेगळेपण म्हणजे त्यातली कांदाभजी. पिठल भात एकत्र करतोय आणि त्यात कांदाभजींचा आस्वाद सहाजपणे मिसळतोय आहा !
जसा मी बाकी पंजाबी भाज्यांचा फारसा चाहता नाही; तसेच राजस्थानी दालबाटी रुचकर असली तरी माझ त्या डिशशी नातं बेताचच पण योगा योगाने दोनवर्षां पुर्वी शोध लागला तो एका वेगळ्या राजस्थानी पक्वान्नाचा ती म्हणजे ओल्या हळदीची भाजी. पंजाब आणि उत्तरेतल्या सर्व भाज्या एकी कडे आणि ही राजस्थानी ओल्या हळदीची भाजी एकीकडे.
आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात हिवाळा सुरू होतो आणि भाजी बाजारात ओली हळद मिळू लागते. कॅलरी कॉशस वगैरे असालतर हव तर नंतर दुसर्या दिवशी उपवास करावा पण हिवाळ्यात दोन संध्याकाळच्या जेवणात तरी होऊन जावीच अशी लज्जतदार !
दोन बाय दोनच्या कुटूंबाला साधारणतः २०० ग्रॅम ओली हळद पुरेल; खवा १०० ग्रॅम; ताज दही अर्धा लिटर; साजुक तुप सव्वा वाटी (मध्यम आकाराची)
**मसाला: आल्याचा छोटा तुकडा; दोन तमाल पत्र; चार लवंगा; चमचा भर शहाजीरे; सात आठ मिरे; कलमी दालचिनी; मीठ; आवडत असल्यास दोन चमचे लाल मिर्ची पावडर + आवडत असल्यास एक चमचा साखर
** भाज्या: मटार अर्धी वाटी बाकी इच्छा आवड आणि मूडनुसार ग्रेव्हीत तुम्हाला आवडणार्या कोणत्याही भाज्या जसे की फ्लॉवर; बीन्स; सिमला मिर्च; गाजर किंवा पनिरही चालेल.
तयारीत प्रथम भाज्यांचे इंचभर लांबीचे लांब काप करून ठेवा. आल्याचा तुकडा आणि सोबत कलमी दालचिनी; चार मिरे; दोन लवंगा; एक तमालपत्र आणि शहाजिरे एकत्र वाटून घ्या. ओली हळद खिसून घ्या. अर्धा लिटर दही घुसळून ठेवा.
खिसलेली ओली हळद दुरून अगदी खिसलेल्या गाजरां सारखी दिसते ती सव्वा वाटी तुपातल्या अर्ध्या तुपात खरपूस परतून घ्या (घमघमाट मस्त येतो). चमचा भर तुपात आधी वाटलेला मसाला मग उरलेला सबंध मसाला म्हणजे चार मिरे दोन लवंगा एक तमालपत्र टाकून भाज्या परतून ठेवा. आता उरलेल्या तुपात खवा परतून घ्या. प्रथम खाणार्यांना हळदीची भाजी उग्र वाटू शकते म्हणून पहिल्या वेळी खवा आणि दही वरील प्रमाणापेक्षा जरासे जास्त वापरणे चांगले. खवा परतून झाला की त्यात परतलेला मसाला भाज्या असतील तर भाज्यांसहीत टाका मग परतलेली हळद आणि शेवटी घुसळलेले दही.
भाजी पहिली पाच मिनीटे मोठ्या आचेवर उकळी आली की नंतर पंधरा ते वीस मिनीट लहान आचेवर शिजू द्या. घुसळूनही दही खूप घट्ट असेलतर दिडवाटी पाणी अॅड करण्यास हरकत नाही शिजण्याच्या प्रोसेस मध्ये साधारणतः दिडवाटी लिक्वीड आटले पाहिजे. शिजत आल्या नंतर ग्रेव्हीस हळदीचा छान हलका तांबूस रंग येतो आणि परतताना वापरलेल्या तुपाचा तवंग भाजीच्या वर दिसावयास लागतो. चुली(गॅस)वरून काढल्या नंतर पाच मिनीटे वाफ दबू द्या. मटार आणि पनीर वापरत असाल तर साधारणतः भाजी पहिले दहा मिनीटे शिजल्या नंतर टाका. आणि तुम्ही ओल्या हळदीची लज्जतदार भाजी सर्व्ह करण्यास तय्यार. भाजी सोबत पोळी रोटी अथवा भाकरी मस्त जमते सोबतीला सॅलड मध्ये इतर कच्च्या भाज्यांबरोबर मुळा आणि शक्य झाल्यास पातीचा कांदा मसाला किंवा भाजलेले पापड आणि जेवण झाल्या नंतर मसाला ताक असेल तर अती उत्तम.
चिक्कार ओली हळद आणि कॅलरीज असल्यामुळे आरोग्य विषयक प्लस बाजू कफाचा त्रास असलेल्यांना खासकरून हवामान बदलाच्या वेळी त्रास होत असल्यास हिवाळ्याच्या सुरवातीस आणि हिवाळा संपताना भाजीचा बेत अवश्य करून पहा फरक जाणवेल. या भाजीच्या रेसिपीच क्रेडीट राजस्थानातन आलेल्या माझ्या भाजी वाल्याचं. मी अद्याप करून पाहील नसल तरी नारळ प्रेमी अथवा नॉनव्हेज प्रेमी रेसिपीत स्वयंप्रेरणेने काही बदल करून पाहण्यास संधी आहे अस वाटतं.
वाचने
20013
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहिती
जरूर; अवश्य करून पहावीच अशी !
In reply to छान माहिती by आयुर्हित
आवडली पाककृती.
प्रतिसादा करता धन्यवाद
In reply to आवडली पाककृती. by प्रभाकर पेठकर
मला आंबेहळदीचे लोणचे खुप
वेगळच काही!
वेगळी पाकृ आवडली... नक्की
एक अनवट पा. क्रु.
मस्त पाककृती.
प्रतिसादांकरता धन्यवाद
ते पिंपरी चिंचवड
In reply to प्रतिसादांकरता धन्यवाद by माहितगार
तेवढ्याकरता उत्तरेची यात्रा करावि लागणार नाही तर :)
In reply to ते पिंपरी चिंचवड by प्रचेतस
वेगळे..
हटके आहे पाकृ!!
नवीन प्रकार!!
छायाचित्र, प्रयोगासाठी प्रोत्साहित कर॑णारं आहे.
मी अगदी अश्शीच बाबा रामदेव
प्रतिसादांकरीता धन्यवाद
मस्त!
सहीच... एकदम हटके पाककृती खूप
रामदेव धाब्यात ही भाजी,
ओली हळद दिसते कशी याचा फोटो
आल्या सम आल्याचेच कुळ
In reply to ओली हळद दिसते कशी याचा फोटो by मनीषा
धन्यवाद !
In reply to आल्या सम आल्याचेच कुळ by माहितगार
आज
मोस्ट वेलकम. एवढ्या आठवणीने
In reply to आज by चाणक्य
@ चाणक्य
In reply to आज by चाणक्य
केली एकदाची!
ओल्या हलदिच्या लोण्च्याची