Skip to main content

मोबाईल वाली ती/ शतशब्द कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 16/02/2014 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या काठावर एका झाडाखाली बेंच वर बसलो होतो. येणारी-जाणारी *हरियाली निहारीत डोळ्यांना तृप्त करत होतो. तेव्हड्यात तिच्याकडे लक्ष गेलं. कानात हेडफोन, हातवारे करीत कुणाशी गुलगुल बोलत होती. निरखून बघितले ती गुलाबाच्या कळी सारखी सुंदर दिसत होती. बोलताना सारखी हसत आणि खिदळत होती. प्रेमाचा रंग तिच्या गालावर खुलून दिसत होता. रस्त्याच्या पलीकडे तिचा प्रियकर असावा. कदाचित त्याचाच स्वप्नात दंग, ट्रफिकची चिंता न बाळगत बेपर्वा ती तिच्याच धुंदीत रस्ता पार करू लागली. अरररे... अचानक मी किंचाळलों. डोळे बंद केले. क्षणभर शांतता, मगच एकच गदारोळ. एक गुलाबाची कळी पायाखाली चुरगळली होती. हरियाली निहारना : एका जागेबर बसून एका तरुण मुलीना बघण्याचा छंद (टिपिकल दिल्लीची भाषा) किंबहुना इंडिया गेट वर हिवाळ्याच्या दिवसांत लंच मधला बाबूंचा टाईम पास
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1840
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

चांगला प्रयत्न केलाय! संदेशही छान दिला गेलाय! दिल्लीत तर खरी खुरी हरियाली सुद्धा भरपूर आहेच, मोठमोठाल्या पार्क्समध्ये! असेच लिहित रहा.