प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :)
तर मंडळी, आम्ही पुढे सरकलो आणि लगोलग स्टेट बँकेच्या इमारतीला अडकलो. बॅलार्ड पिअर, फोर्ट वगैरे ठिकाणी दिसणार्या दगडी इमारती मला अतिशय आवडतात. स्टेट बँक म्हणजे पूर्वीची ईंपिरियल बँक. ही बहुधा भारतातील सर्वात जुनी वाणीज्य बँक. स्टेट बॅंकेची स्थापना १९२१ सालची असली तरी तिचा उगम आहे तो १८०६ सालच्या बँक ऑफ कलकत्ता मध्ये. १९५५ साली राष्ट्रियीकरणात इंपिरियल बँक ऑफ ईंडिया चे नाव भारतिय स्टेट बँक - स्टेट बँक ऑफ ईंडिया असे झाले. जेव्हा सर्व दस्तऐवज, कागदपत्रे वगैरे समग्र हस्तांतरण झाले तेव्हा माझा मामा स्टेट बँकेत होता आणि इथे या इमारतीतच होता. ही इमारत १९२४ सालची, आपले जन्मवर्ष अभिमानाने मस्तकावर धारण केलेली
ताशीव चिर्यांच्या भिंती, प्रचंड असे भक्कम खांब, कमानदार प्रशस्त खिडक्या आणि दणकट जोतं असलेली ही इमारत देखणी आहे.
दगडी बांधकामातल्या कमानदार, प्रशस्त खिडक्या मला फार आवडतात. खिडकी पाहताना खाली आय आय बी (इंडियन इंपिरियल बँक) ही अक्षरे कोरलेली दिसतात.
प्रवेशद्वार रुबाबदार आहे. विशेषतः रोमन शैलीची बसकी त्रिकोणी कमान
आम्ही स्टेट बँकेचे चित्रण संपवुन पुढे निघालो, रस्ता ओलांडला आणि रामदासांनी माहिती दिली 'या इमारतीच्या तळघारात अस्सल सोनं साठवलं जातं'. नकळत सर्वांनी माना वळवल्या आणि मागे बघितले.
रस्ता ओलांडत असताना नजर गेली ती एका चौरस इमारतीवर.
इमारत मूळची रहिवासी आणि आता बव्हंशी व्यापारी स्वरुपाची असावी. खास भिंतीवर तोललेली इमारत, मजबूत उभ्या विटांच्या भिंती, त्यावर लोखंडी रुळ आणि छत व छ्ज्जाच्या आधारार्थ सागवानी वासे/ कोन. या इमारतीकडे पाहताना लक्षात आले की सर्व मजल्यांवरील कठड्याच्या लोखंडी आधारजाळीची नक्षी मजल्यागणीक वेगळी आहे. पहिल्या मजल्याच्या छज्जाखाली लाकडी कोनांवर काचेच्या हंड्या लटकत होत्या, अजुनही बर्याच शाबुत होत्या. अशी इमारत पाडायची म्हटली की विकत घेणारा पहिला हिशेब करतो तो निघणार्या सागवानाचा.
आम्ही होमी मोदी रस्त्याला लागलो.
सवयीने नजर डावीकडे गेली तर कॉफी हाऊस अजुनही होते, स्वरुप बदललेले होते पण मूळ हॉटेल शिल्लक होते. अनेक वर्षात इथे गेलो नाही. इथे दाक्षिणात्य कॉफी झकास मिळायची. भिंतीवर 'भारतिय कॉफीबोर्ड मान्यताप्राप्त' अशी पाटी असायची. जरा पुढे गेलो तर उजवीकडे दोन इमारतींमधल्या फटीतुन सेंट थॉमस चर्च दिसले आणि मुविंनीही तिथे थांबुन ते दाखविले.
डावीकडे पुन्हा एकदा दगडी भिंत आणि 'कमनिय' खिडक्या. मात्र या खिडक्या अगदी इंग्रजी पद्धतिच्या होत्या. लगतच्या पदपथावर छोटेखानी खांब आणि त्यांना जोडणार्या साखळ्या. ठराविक अंतरावर शोभेचे पथदिवे. मस्त वाटले.
उजवीकडे टाटा साम्राज्याचे मुख्यालय 'बॉम्बे हाऊस', इथे चित्रणाला मनाई होते. असो. जरा पुढे जातो तो काय!
मिपा कट्टेकर्यांच्या स्वागतला चक्क रोषणाई करण्यात आली होती
भाते आणि सौ मुवि अचंब्याने रोषणाई पाहत होते तर रामदास आणि मुवि प्रसन्न चेहेर्याने स्मित देत कॅमेर्याकडे पाहत होते.
तिथेला सेंट्रल बँकेचा भारदस्त लाकडी दरवाजा अर्थातच नजरेतुन सुटला नाही. दगडी भिंतीवर उन्हाची तिरीप खेळविणारा दरवाजा आवडला.
दरवाजा टिपत असताना त्या रस्त्याने जाणारे एक मध्यमवयीन सद्गृहस्थ कसलीही ओळख नसताना आवर्जुन थांबले आणि बॉम्बे हाऊस कडे बोट दाखवत संतापाने म्हणाले 'अहो या लोकांकडे एक अप्रतिम असा नक्षीदार लाकडी दरवाजा होता, तो कुठे नेला की काय केला कुणास ठाऊक. युसलेस साले!'.याला म्हणतात अस्सल मुंबईकर! दोन अनोळखी मुंबईकरांना क्रिकेट सामना आणि मुंबईतल्या जुन्या वास्तु हे जन्मोजन्मीची ओळख असल्यागत एकमेकांशी बोलायचे विषय आहेत.
होमी मोदी मार्ग संपवुन नगीनदास मास्टर पथ म्हणजे मूळची मेडोज गल्ली डावीकडे टाकत आम्ही समोर आलो आणि बरोबर समोर हाँगकाँग बँक आणि बँक ऑफ ईंडीयाच्या इमारती एकमेकीला खेटुन उभ्या होत्या.
बँक ऑफ इंडियाची वास्तु दगडी असली तरी स्थापत्य बरेच वेगळे होते. खांब वेगळे होते आणि कमानीही भौमितीक महिरपीच्या होत्या.
लगतची स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेची इमारत पुन्हा बसक्या त्रिकोणी कमानीची.
हे चित्रण ज्या इमारतीखाली उभे राहुन करत होतो, त्या न्यु इंडिया अश्युरनसची. दगडी इमारतीच्या दर्शनी भागावर दोन सशस्त्र पहारेकरी कोरलेले होते.
इमारतीच्या खांबांवर श्रमिक महीला कोरलेल्या होत्या.
पुढे काळ्या घोड्याच्या दिशेने चालु लागलो आणि कंदिल च्या पुढे डाव्या गल्लीत पलिकडची बीसई ची म्हणजे मुंबई समभाग विनिमयाची इमारत दिसली. या इमारतीच्या परिसरातुन तिचे चित्रण सुरक्षेच्या कारणास्तव प्रतिबंधीत आहे.
एव्हाना दिड दोन तास रवडणुक झाली होती. समोर अन्ना चहा ढवळताना दिसला आणि क्षणभर विश्रांती घ्यायचे ठरले.
समोरच मूंबई विद्यापिठाची इमारत होती.
आता घोडामैदान जवळ आले होते. तरीही दिसेल ती इमारत टिपण्याचा सोस संपत नव्हता. उजव्या कोपर्यात ए डिमेलो मार्ग आणि म. गां. रस्त्याच्या कोपर्यावरचे हे एस्प्लनेड हाउस - एकेकाळचे 'वॉटसन एस्प्लनेड' - होय जिथे टाटांचा अपमान झाल्याची आणि त्यातुन प्रेरणा घेत टाटांनी 'ताज' उभे केल्याची दंतकथा अस्तित्वात आली तीच ही इमारत. पुढे वॉट्सन चे एस्प्लनेड झाले, पहिले चलचित्रपट इथे दाखविले गेले.
पुढे रांगेने उभ्या असलेल्या आर्मी-नेव्ही, डेविड ससून आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या डौलदार इमारती - आलोच म्हणायचे आम्ही मुक्कामावरः)
लक्ष वेधुन घेणारी चौरंगी भिरभिरी दिसली आणि समजले - आम्ही महोत्सव स्थळी पोचलो!
क्रमशः

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
15626
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
बॅलार्ड पिअर, फोर्ट वगैरे
मस्त!
तुमच्या गोव्यातल्या आणि रत्नागिरीतल्या इमारती पण जबराच आहेत....
In reply to मस्त! by पैसा
खरं आहे
In reply to तुमच्या गोव्यातल्या आणि रत्नागिरीतल्या इमारती पण जबराच आहेत.... by मुक्त विहारि
येऊ द्या की त्या तांबडी
In reply to खरं आहे by पैसा
है शाबाश! अगदी तुम्हा
हा पण भाग मस्तच....
साक्षीजी
व्हीटी स्टेशन!
In reply to साक्षीजी by विजुभाऊ
मस्त. मुंबैचे सचित्र
कट्टा हुकल्याची जळजळ फोटोंनी
छान
सगळे फोटू व माहिती छान
मस्त!
सर्व फोटो आवडले,फ्रेमिंग आणि
चोक्कस!
मस्तय !!!
जुन्या इमारती बघताना एक गोष्ट
सहीच.. आता पुढे?
बळवंतराव
+१
In reply to बळवंतराव by संजय क्षीरसागर
सर्वसाक्षीजी एक विनंती...
सर्व फोटो मस्तच
खुप छान वृत्तांत आणि छायाचित्रण.
मागच्या वेळेस
उत्तम वर्णन
अपूर्व मेजवानी.
काय झालेय?
काहीतरी घोळ आहे.
In reply to काय झालेय? by इरसाल
गडबड आहे
In reply to काहीतरी घोळ आहे. by सर्वसाक्षी
आहेत की
In reply to गडबड आहे by सर्वसाक्षी
मला सगळी चित्रे दिसत आहेत!
In reply to आहेत की by पैसा
ऐला!
In reply to मला सगळी चित्रे दिसत आहेत! by मदनबाण
गुगलफोटो वापरा. ३२ जीबी चकटफू
In reply to काहीतरी घोळ आहे. by सर्वसाक्षी
हा भागही छान.. रंगीत
फोटो गायब !!!
काळा घोडा महोत्सव कट्टा - वृत्तांत (२)
साक्षीशेठ,फोटोअबकेट ची
फोटो दिसत नाहीत ..
परत फोटू बगाया आलू..पन काय
आत्मारामपंत