टोमॅटो भात
नमस्कार मंडळी
मी तसा आळशी या सदरात मोडणारा,त्यांमुळे एक सोपी पाकृ ईथे देत आहे.
भारतात वेगवेगळ्या प्रांतात भाताचे अनेक प्रकार प्रचलित आहेत त्यापैकी एक हा टोमॅटो भात.
साहीत्य---शिजवलेला भात ,४ टोमॅटो,१ मध्यम आकाराचा कांदा ,कडीपत्ता,कोथिंबीर, थोडे शेंगदाणे,उडीद डाळ, मुगडाळ
कृती--भात शिजवुन घ्यावा. (कालचा शिळा असल्यास उत्तम :) . दाणे व डाळ भिजत घालावी. कांदा व टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे. कढीपत्ता, कोथिंबीर व ईतर तयारी करुन घावी.
एका पातेल्यात (नॉन- स्टीक असल्यास बरे) तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर जिरे,मोहरी व हिंगाची फोडणी करावी. त्यावर कांदा कढीपत्ता परतावा.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यावर आधीच भिजवलेले डाळदाणे परतावे.काही वेळाने त्यावर चिरलेला टोमॅटो घालुन मंद गॅसवर एकत्र करत राहावे .
थोडेसे बुडबुडे येईपर्यंत (टॉमॅटो शिजेपर्यंत) आचेवर ठेवावे.
शेवटी गॅस बंद करुन आधी शिजवलेला भात मिक्स करावा.
याद्या
7108
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
पाक्रु आवडली .
छान पाकृ
छान पाकृ. करून बघतो.
भारीच!!!
In reply to छान पाकृ. करून बघतो. by बॅटमॅन
सर्वांचे आभार
छान मस्त....
मस्त!!!
योग्य सादरीकरणाने एकदम मस्त
In reply to मस्त!!! by राघवेंद्र
धन्यवाद !!!
In reply to योग्य सादरीकरणाने एकदम मस्त by रेवती
आवडता प्रकार!