काल गेले होते हॉटेल पर्णकुटीला. सोबत बहिणी अन भाचरांची ग्यांग. एकजात सगळे अट्टल मटनखाऊ. पण बहिण म्हणाली 'मी डाएटवर. !'
‘मग बटाट्याची भाजी सांगू ?’ मला जोडी मिळाली म्हणून मी खुश.
‘हुं ?’ बहिणाबाईने हे कुठलं वडगाव बुद्रुक पेश्शल अशा काहीशा नजरेनं माझ्याकडे कटाक्ष टाकला.
‘मी बाई फीssश खाणार ! त्यात कोलेस्टेरोल नसते ना ?’ बहिण.
मी गार. ‘अगं कोलेस्टेरॉल मासा किंवा बकऱ्यात थोडीच असते ? ते आपल्या रक्तात असते.’
‘होय, होय माहितेय बरं, विदुषीबै ! तुमी खा बटाट्याची भाजी !’
यावर मी उठून तरातरा पर्णकुटीच्या शेफकडे गेले, जो माझा मावसभाऊ आहे.
अन तिथली तयारी बघून जे डायरेक्ट फोटू घ्यायला लागले, ते फीssश फ्राय प्लेटीत विराजमान झाल्यावरच थांबले.
म्हणजे आधी शेफसाहेबांनी आलेलसूण पेस्ट, दोन चमचे तिखट, दोन चिमटी मीठ अन धणेजिरे पूड हे सगळं कोकमच्या आगळमध्ये कालवून त्या फीशच्या पाकळ्या मस्त मॅरीनेट करून ठेवलेल्या.
मग रवा अन ज्वारीचे पीठ एका ताटात घेऊन त्यात खालवर घोळून घेतले.
इकडे तेल पॅनमध्ये तापत ठेवले होते, त्यात फीश पाकळ्या सुमारे दहा मिनिटे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून काढल्या.
झाले फीश फ्राय तयार ! आहे ना झटपट डायेट पाकृ ?
चला , मटणखाऊ लोक्सहो, डायेट कार्याला सुरुवात करा पाहू ?
मग रवा अन ज्वारीचे पीठ एका ताटात घेऊन त्यात खालवर घोळून घेतले.
इकडे तेल पॅनमध्ये तापत ठेवले होते, त्यात फीश पाकळ्या सुमारे दहा मिनिटे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून काढल्या.
झाले फीश फ्राय तयार ! आहे ना झटपट डायेट पाकृ ?
चला , मटणखाऊ लोक्सहो, डायेट कार्याला सुरुवात करा पाहू ?
वाचने
11667
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरारा.. डोळे बंद करून घ्या
मस्त...
हे तेल जर कोकोनट असेल तर ते
प्रबुद्ध मानवा, हे तेल
In reply to हे तेल जर कोकोनट असेल तर ते by सुहास..
व्हाट/व्हेयर इज पर्णकुटी?
या की राव आमच्या गावाला !
In reply to व्हाट/व्हेयर इज पर्णकुटी? by आदूबाळ
व्हाट/व्हेयर इज युवर गाव?
In reply to या की राव आमच्या गावाला ! by सस्नेह
माश्यान खुळावल मन. आता
हायला!
चक्क तळलेले मासे खाऊन डाएट?
In reply to हायला! by पैसा
हो
In reply to चक्क तळलेले मासे खाऊन डाएट? by मुक्त विहारि
खरच भारी डायेट फूड!
डाएट मासा
पाकृ
देवा
In reply to पाकृ by पैसा
हाहाहा!
In reply to देवा by इरसाल
फसवणूक करणारा धागा
तो शेवटचा फोटो
असं डाएट फुड असेल तर मी आजन्म
=))
कित्ती कित्ती अपेक्षेनी धागा
?
In reply to कित्ती कित्ती अपेक्षेनी धागा by कवितानागेश
फोटो पाहुन भुक चाळवली...पण
सुरमई आहेत पण पापलेट
In reply to फोटो पाहुन भुक चाळवली...पण by शिद
मासे छान लागतात ते.....
In reply to सुरमई आहेत पण पापलेट by सस्नेह
सुरमई बेस्ट की पापलेट हे
In reply to सुरमई आहेत पण पापलेट by सस्नेह
आर्र, तळलेले माश्याचे तुकडे