Skip to main content

बेताल भाषणबाजी!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 09/02/2014 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
http://abpmajha.abplive.in/incoming/2014/02/09/article259627.ece/%E0%A4… पवार घराण्यात जन्माला येणे ही एकमेव पात्रता असणार्‍या सुप्रियाताईसाहेब सुळे यांनी असा सल्ला दिला की आंदोलन करताना सामान्य लोकांच्या एस टीची जाळपोळ न करता नेत्यांच्या गाड्या जाळा! वा! एस टी ची नासधूस करू नका हे म्हणणे ठीक आहे. पण हे नेत्यांच्या गाड्या जाळण्याबद्दलच्या काड्या कशाला सारताय? एक जबाबदार वारसदार आपलं खासदार असले टाळ्याखेचक डायलाग मारते हे कितपत उचित आहे? अर्थात पिताश्रींचे योग्य प्रशिक्षण असले तर उद्या बाईसाहेब सफाईदार कोलांटी उडी मारुन त्या जळणाच्या उपदेशाला वेगळेच वळण देतील हेही शक्य आहे. नेत्यांच्या गाड्यांभोवती मोठी सुरक्षा असते. ती कशी भेदायची ह्यावर काही टिपा द्यायला हव्या होत्या. स्वतःची वा आपल्या "जाणत्या" तीर्थरुपांची गाडी आपणहून आंदोलकांना उपलब्ध करुन द्यायला हवी होती. उद्या सत्ताभ्रष्ट झाल्यावर आपण काय प्रकारची आंदोलने करणार आहोत ह्याची चुणूक राष्ट्रवादींने दाखवली आहे की काय अशी शंका येते. आंदोलक असे करण्यात यशस्वी ठरले तर ताईसाहेबांचे बंधू योग्य तो फवारा मारून अग्निशमन करतील काय? असो. एकंदरीत असली भाषणबाजी करुन माकडाच्या हातात कोलित दिले असे व्हायला नको.

वाचने 3547
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

ओय्य ... राव्हल्या कोन ? राहुलजी गांधीजी म्हणायचे , आम्हा युवकांचे नेते आहेत ते ...आमचे प्रधानमंत्री !! राजनीती नही काजनीती ! | RTI © | Women Empowerment ® | Lokpal ™ | .

In reply to by प्रसाद गोडबोले

युथ पावर(र) आणि ढेमोक्रसी(र) टायपायला विसरल्या बद्दल णिषेध.

आणखी थोडी वाट पहा...आमच्या प्रियंका मॅडम उतरतीलच मैदानात. तिकडे त्या यु.पी. गाजवु लागल्या म्हणजे इथल्या मराठी मुलींचं कौतुक आपोआपच बंद होईल.

काल राजसाहेबांनी मात्र सरकारी माहिती वाचून दाखवून दिले की टोलमध्ये किती गोलमाल आह ती . इतकी लाख वाहने विआइपिंची आणि न देणाऱ्यांची कशी काय जाऊ शकतील ?

आंदोलक असे करण्यात यशस्वी ठरले तर ताईसाहेबांचे बंधू योग्य तो फवारा मारून अग्निशमन करतील काय?
;)