Skip to main content

जीरा आलू (सिंपल)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी बुधवार, 05/02/2014 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
साधी सोप्पी बॅचलर्स रेसीपी आहे, सटल टू टेस्ट अन झटपट तर जीरा आलु साहित्य :- १. ३ मध्यम बटाटे (उकडुन सालं न काढता केलेले मध्यम तुकडे) २. चिमुटभर हिंग अन दोन अडीच चिमटी (थोडे जास्त ) जिरे (जिरा आलु आहे ना!!!) ३. चवीपुरते मीठ ४. गरम मसाला अर्धा छोटा चमचा (ऑप्शनल) ५. अर्धा चमचा भाजलेलं जिरं ( वरतुन पेरायला) Ingredients सर्वप्रथम पॅन मधे तेल गरम करा (जे आवडते ते पण ऑथेंटीक पंजाबी चवीसाठी सरसों ऑइल मस्ट आता ह्यात जिरे हिंगाची फोडणी द्या तेल गरम झाल्यावर (जिरं जळायला नको फक्त तडतडायला हवं इतकंच गरम असावं तेल) Tadka hing आता ह्यात बटाटे टाका व मस्त परता काहीवेळ (५-७ मिनिट्स) aloo बटाटे थोडे फ्राय झाल्यासारखे वाटले की त्यत हळद टाका अन लगेच गॅस बंद करुन ३० सेकंद मिसळुन घ्या थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला (माझ्याकडे नव्हती) Haldi stir final

वाचने 8459
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आलु...माय ऑल टाईम फेव! पण वजन वाढेल या भितीमुळे हल्ली जपुनच खातेय. प्लीज फोटो द्या ना. नजरेनीच खाऊन घेइन म्हणतेय..

बहुतेक असंच कायतर झालेलं दिसतं आहे, मी चुकुन पिकासावरुन ते फोटो डिलिट केलेन आता परत पोस्ट मधे एंबेड करता येतील का आपण आपलं कॉमेंटेतच टाकावा फोटु ?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

फोटो कमेंटमध्ये दे.. किंवा संपादकांना दे. ते अपलोड करतील धाग्यात