Skip to main content

आय पील

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 01/10/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र सुरु झाली. जिकडे बघतो तिकडे गरबा. अगदी खांद्याला खांदा लावुन. निरनिराळी मंड्ळे कुरघोडी करण्याकरिता वेगवेगळ्या शकली काढतात. स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, आणखी काय काय . शिगेला पोचलेला आनंदोत्सव. गरब्यात भाग घेणार्यांचे चेहेरे बघितल्यावर एक्स्साइट्मेंट म्हणतात ती नेमके काय हे कळ्ते. प्रेक्षकांचा पण तुटवडा नाही. काका मंड्ळी बघोजी राव होताना " गेले ते दिवस" चे उसासे सोडतात. परत एखादी सुबक ठेंगणी हेरुन खयालोंकी दुनिया मधे फिरुन येतात. मला मात्र गरब्यात कधीही सहभागी होता आले नाही. तसे खास काही ही कारण नाही. संपर्क वाढतो अशी माहिती मिळाल्यावर गेलो होतो एकदा. पण काही जमले नाही. आणि आपल्याला जमत नाही त्या मेथड वर वेळ आणि पैसा का फुकट घालवा म्हणुन नाद सोडुन दिला. आणि अडकलो तर ची भीती. स्वकर्तुत्वावर भरोसा ठेवलेला बरा. ७० -८० ह्या दशकात मात्र नवरात्रोत्सव संपल्यावर डिसेंबर मध्ये आमच्या हॉस्पिटल मध्ये काम मरेस्तोवर वाढायचे. दिवसाला सुमारे १५० गर्भपात. (इतर वेळी सुमारे ८५ची सरासरी.) ह्यात सुमारे ६० कुमारिका. बहुधा आपण कुमारी का? हा प्रश्न त्याना त्रास देत असावा. गर्बा आणि गर्भा खेळ एकच वेळी खेळायची सोय नवरात्रेत असते..फक्त वेगवेगळ्या ठिकाणी. मग पालक यायचे डोळ्यात पाणी काढत. दुसरा कलाकार कॉलरला धरुन आणत. १.माझ्या मुलीचा पाय घसरला. २. माझ्या मुलीचे पाय वाकडा पडले. ३. चूकीची वाट धरली. ४. बसत नाही. ५. आंघोळ बंद झाली. आमच्या हॉस्पिटल मध्ये एक डॉक्टरला ( कर्नाटकी) मराठी चे जुजबी ज्ञान. त्याचे वांदे व्हायचे. सांकेतिक भाषा (क्रिप्टीक) कळायचीच नाही बिचार्याला. जरा सुद्धा अतिशयोक्ती न करता मी बाजुच्या टेबलवर बसुन श्रवण केलेला, एक पालक आणि त्याचा संवाद खालील प्रमाणे. १.......= कुठे लागले. २.......= आपण एक्स रे काढु. फ्रॅक्चर आहे का ते कळेल. ३.......= नीट पत्ता घ्यावा. ४.......= पाय दुखले की बसेल ५.......= पाण्याचे त्रास आहेत का तुमच्या कडे शेवटी मी मदतीला धावलो. आणि प्रकरण संपविले. डायरेक्ट प्रेग्नंट है ऐसा क्युं नय बोलताय असे मला ऐकावे लागले ते वेगळे. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. पालक मंड्ळी एकदम मुद्द्यावार येतात. हल्ली पालकांना मधे न घालता कारभार मोकळा करता येतो की. स्मार्ट रेस आहे ना? खंडाळ्याची ट्रिप काढायची युक्ती करतात. आय पिल नंतर तर सगळे एकदम सोपे झाले आहे. चेमिस्ट कडे जायचे. एक गोळी ७२ तासाच्या आंत घ्यायची. हाय काय नाय काय. सर्व जण सुखी. पालक पण आपली मुले त्यातली नाही म्हणायला मोकळे. " आम्हाला आमच्या मुलांनी तसल्या त्रासात टाकले नाही हॉ" आमचे संस्कार पाळले."" नविन नविन शोध- नविन सुविधा.विज्ञानाचे अनेक उपयोग. एका शाळेतुन खाली उतरत असताना ९ वी मध्यी असलेल्या मुलांमधला संवाद १ला: तेरेको मालुम पडा क्या? २रा: क्या रे? १ला: रोन्सेन लोहान के साथ शादी कर रहेला है. ( ढ लोकांसाठी- ह्या दोन हॉलिवूड अभिनेत्री आहेत.) २रा: क्या बात करता है १ला: हा रे टाईम्स मे आया था.(प्लेबॉय बघायची गरज नाही. बॉम्बे टाईम्स इमरजन्सी गरज भागवतो) २रा: आय पील का खर्चा बच गया. मि. पा. सदस्य बरोबर होते. त्यांचा चेहेरा पांढरा पडला. ता.क.: कंपन्यांनी आय पील चा स्टॉक भरपुर ठेवला आहे. गुजरातेत काही ट्रक जास्त पाठ्वलेले आहेत. चेमिस्ट कडे आय पील गिर्र्हाईकायिका मध्ये ४१% स्रिया असतात. वय २० -२५ . १७% मुली वय १५ ते २०. बाकी सगळे पुरुष. इथे पण मापात पाप. विश्वामित्र कुठले. आपल्या वेळी ही शिश्टीम नव्हती ह्याचे दु:ख होत नाही - जाम भिती वाटायची गर्भपाताची. स्त्री देहाचे नंतर कॉम्प्लिकेशन ने होणारे हाल बघवत नसत.

वाचने 49139
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

प्रभू साहेब, चांगला आहे लेख. ह्यात सुमारे ६० कुमारिका. बहुधा आपण कुमारी का? हा प्रश्न त्याना त्रास देत असावा. गर्बा आणि गर्भा खेळ एकच वेळी खेळायची सोय नवरात्रेत असते हे छान!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

म्हणुन तर आम्ही सध्या सिप्ला घ्या सांगतो आम्हाला आय पील चा काही उपयोग नाही पण पैसे कमवायला कुणी आमंत्रण देण्याची गरज नसते.

जबर्‍या... ४.......= पाय दुखले की बसेल मला वाटतं हा या शतकातील महानतम विनोदापैकी एक गणला जावा. ह. ह. मे. बिपिन.

In reply to by विनायक प्रभू

कोणी तरी कुठल्या तरी रेफरन्स मधे ह्या धाग्याची लिन्क दिली ...
दांडीयाला आजकाल दोन घूंगरू असतात. प्रतिकात्मक असावेत.
=)) =)) =))

नवरात्रोत्सव संपल्यावर .... खर तर आता परत एकदा हा विदा तपासुन पाहीला पाहीजे. ज्यांना ते करायचे आहे ते फक्त नवरात्रीची वाट कशाला पहातील. तसेच कित्येक वर्ष हे ऐकत आहे आता पालक पहिल्या एक, दोन वर्षात जागरुक झाले नसतील काय? बहुदा असेल बुवा काहीतरी अंधश्रद्धा की नवरात्री मधे केले तर मूल होत नाही :-) खर सांगु का? एकदा का मुलबाळं, कामकचेरी सुरु झाल्यावर "लायसेन्स" मिळालेल्या लोकांच्यात घटलेले "करायचे" प्रमाण पहाता वाटते की च्यायला जेव्हा करता येते तेव्हा करा बिन्धास्त. फक्त जबाबदारी ओळखुन. हा बराच मामला राजीखुशीचा असतो. निदान योग्य ते ज्ञान असलेले काय वाईट?

In reply to by सहज

खर तर आता परत एकदा हा विदा तपासुन पाहीला पाहीजे. ज्यांना ते करायचे आहे ते फक्त नवरात्रीची वाट कशाला पहातील. तसेच कित्येक वर्ष हे ऐकत आहे आता पालक पहिल्या एक, दोन वर्षात जागरुक झाले नसतील काय? बहुदा असेल बुवा काहीतरी अंधश्रद्धा की नवरात्री मधे केले तर मूल होत नाही मी पण हाच विचार करत होते! पण नंतर वाटलं, येवढी "मॅनेजमेंट"ची अक्कल नसेल तर मग पहात असतील नवरात्रीची वाट!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

http://vipravani.wordpress.com/ इतर वेळी आसाराम बापूंच्या सत्संगाला जातात असे मी कुठे म्हटले आहे. मी फक्त वाढ्लेल्या प्रमाणाबद्दल बोलतो आहे. वातावरण धुंदी वाढवणारे असते. बस.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण नंतर वाटलं, येवढी "मॅनेजमेंट"ची अक्कल नसेल तर मग पहात असतील नवरात्रीची वाट!! नाही संहिताजी ही "मॅनेजमेंट"चीच अक्कल आहे. कारण अशा वेळी बिनधास्त गरब्याला जाते असे सांगुन मुली रात्री १२ - १ - २ पर्यत बाहेर रहातात किंवा मैत्रीणीकडेच झोपते असे सांगुन घराबाहेर पडतात. इतर दिवशी असे कारण सांगणे, मिळणे अवघड असते. किमान इतके सोपे नसते. त्याचप्रमाणे या दिवसांत असे उद्योग चालतात हे माहित असल्याने हौटेलही स्पेशल अर्धातास, एकतास असे पैकेज देतात. चेक इन - चेक आउट - हवे ते पैकेज घ्या. बाकी सोयी पण उपलब्ध असतात त्यामुळे दुकान बंद झाले तरी अडचण येत नाही. असो. समाज बदलत आहे हे नक्की.

In reply to by सहज

खर सांगु का? एकदा का मुलबाळं, कामकचेरी सुरु झाल्यावर "लायसेन्स" मिळालेल्या लोकांच्यात घटलेले "करायचे" कोणतीही गोष्टीत तोचतोच पणा आला की कंटाळा येणे सहाजिक्च आहे. जरा शोध लावायचे, वेगळी पद्दत वापरायची, प्राचीन काळापासुन भरपुर लिखाण उपलब्ध आहे. नेट वर पण बर्‍याच साईटस आहे, भरपुर चांगले ज्ञान आहे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by विनायक प्रभू

सहमत (८९.१२%) ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

एखाद्या चांगल्या निर्मळ उत्सवाचा चंगळ वादा मुळे कसा विचका होतो. ते पाहुन वाईट वाटते. नवरात्राला सध्या धिंगाणा हे एकमेव स्वरूप आलेले आहे. नवरात्रानन्तर गर्भपाताचे प्रमाण वाढलेले असते हे जेंव्हा प्रथम ऐकले तेंव्हा मनाला खूप यातना झाल्या होत्या. अजून होतात. पैशानी हा उत्सव विकला गेला आहे. "बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे. स्वतःला सुसंस्कृत म्हणवुन घ्यायला लाज वाटते मला

In reply to by विजुभाऊ

>>"बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे. ही तर खरी अडचण आहे. भाउ, तुन्ही विसरला, सगळे होते ते दोघांच्या संमतीने. त्यामुळे, "बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली कसे म्हणता येयील>? ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.

In reply to by सखाराम_गटणे™

जियो गटणे जियो बोळा निघत आहे किंवा निघाला आहे.

In reply to by अवलिया

जियो सख्या जियो !!!!!!!!!!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

४. बसत नाही. ५. आंघोळ बंद झाली. सहमत ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.

नवरात्राचा उपयोग अशा 'कामा'साठी होतो..किंबहुना केला जातो याची खरंच कल्पना नव्हती. आणि हे जर खरं असेल तर समजासमोर एक प्रचंड मोठ आव्हान आहे नव्या पिढीला जागरूक करण्याचं ... प्रभूसाहेब आपला लेख नीट समजला यावेळी. कदाचित क्रिप्टीक कमी वापरले आहे किंवा आता मलाच क्रिप्टीक वाचायची सवय झाली आहे... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजु, प्रभूसाहेब आपला लेख नीट समजला यावेळी. कदाचित क्रिप्टीक कमी वापरले आहे किंवा आता मलाच क्रिप्टीक वाचायची सवय झाली आहे... मस्त रिप्लाय... मला सुद्धा (पहिल्यांदाच) प्रभू साहेबांचा लेख कळला आणि हायसं वाटलं. :-) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by प्राजु

http://vipravani.wordpress.com/ बहुतेक मंड्ळी झोपा काढ्ताहेत. आय पील चा सहज वापर आणि त्याची कोम्प्लिकेशन्स हा वेगळा विषय आहे. ह्या सहज चा मि.पा. सद्स्य सहज शी काही ही संबध नाही.

In reply to by विनायक प्रभू

प्रभूसाहेब, ह्या विषयातील तुमचं ज्ञान पाहून एक प्रश्न विचारतो - कामशास्त्र तज्ञ विठ्ठल प्रभूंशी तुमचं काही नातं आहे का? Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

http://vipravani.wordpress.com/ विठ्ठ्ल प्रभु शी काहीही नाते नाही. दोनदा भेट झाली आहे. मी डॉ. प्रकाश कोठारी बरोबर काम केले आहे ड्ब्ल्यु. एच. ओ. मध्ये असताना. अजुनही चांगला दोस्त आहे माझा तो.

मि. पा. सदस्य बरोबर होते. त्यांचा चेहेरा पांढरा पडला. कोण हो? त्यांचा माझा कधी काही संबंध आला असेल असे तुम्हाला वाटते का? :? किमान माझ्या कुठल्यातरी एका लेखाशी संबंध नक्कीच आला असेल. नाही का? 8}

http://vipravani.wordpress.com/ विविध संबध हा विषय गाजतोय मि.पा. वर. त्यानाच विचारतो प्रथम. त्याना तुमच्याबरोबरचे संबध गुप्त ठेवायाचे अस्ले तर. बा़की तुमच्या लेखाबरोबर संबध न आलेला प्राणी सापडणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. विविधता तर मी पण मान्य केली आहे की.

प्रभू साहेब, फारच भीषण वगैरे काय म्हणतात असा अनुभव... माझ्याही लहानपणी (असेच म्हणावे लागेल..तेव्हाही आणि आताही :) ) माझा असाच एक जिवलग मित्र आहे. ९१-९२ साली तो सुद्धा जायचा असाच. प्रचंड उत्साही गरबा खेळायला. मला कळायचं नाही हा इतका उत्साही का ते? घरी आमचे आई वडील आम्हाला दटावून जाऊ द्यायचे नाहीत. नंतर कधी कधी गरब्याच्या दुसर्‍या दिवशी भेटायचा (फ्रेश असेलतर) ...आणि अगम्य भाषेत सांगायचा..काल रात्री ३ दा जेवलो. सगळी हसायची. आपल्याला जाम कळायचे नाही. मग मला कडेला घेऊन सांगायचा खरी माहीती..आमच्या अंगावर काटा यायचा. आता त्याला बघतो तर बिचारा म्हणतो तू सुखी आहेस कारण तू असं काही केलं नाहीस. आता 'त्या' गोष्टीत रस राहीला नाही. लग्न होऊन फक्त ४ वर्ष झालीत. पण हे आजकालच्या पोरांना पटणार नाही. त्यांच्या दृष्टीने हा भंकसपणा आहे...कालाय तस्मै नमः ... बाकी हे कळलं नाही.... १.......= कुठे लागले. २.......= आपण एक्स रे काढु. फ्रॅक्चर आहे का ते कळेल. ३.......= नीट पत्ता घ्यावा. ४.......= पाय दुखले की बसेल ५.......= पाण्याचे त्रास आहेत का तुमच्या कडे जरा विस्ताराने सांगाल काय?? मुकुल

In reply to by वाटाड्या...

१.माझ्या मुलीचा पाय घसरला. २. माझ्या मुलीचे पाय वाकडा पडले. ३. चूकीची वाट धरली. ४. बसत नाही. ५. आंघोळ बंद झाली.

भाषा आली की त्या भाषेची संस्कृती आपोआपच मागे येत असते असे म्हणतात. अमेरिकन संस्कृतीत असे असते असे म्हणतात. या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे. कारण आजही मी बर्‍याच मराठी घरात पारंपारीक द्रुष्टीकोनच पाहतो. एकुण प्रकार अवघड आहे. असे लेख वाचल्यानंतर जागृत पालक योग्य ती काळजी घेतीलच.

In reply to by कलंत्री

>> या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे. कारण आजही मी बर्‍याच मराठी घरात पारंपारीक द्रुष्टीकोनच पाहतो. असहमत! हा 'सिलेक्शन इफेक्ट' असावा!

In reply to by कलंत्री

प्रभू वाणी अतिशय वास्तवातील आहे !! या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे. आम्ही १० वी वगरै असताना देखील मोठ्या मुलांच्या ग्रुप मधील मुलांचे प्रताप पाहुन हादरलेलो आहे !!सर्व मुली सारख्याच अगदी उच्च वर्णिय जातीतील आमच्याच वयातील मराठी मुलींचे प्रताप आम्ही पाहिले आहेत !! आपला समाज अजुन हे मानालाच तयार नाही की हे एव्हड मोठ्या प्रमाणात चालते !!सत्य हे सत्य असते हे आमच्या पोरांच्या भाषेत सांगाचे झाले तर टेमका लागला की पोरींच्या घरच्या ना कळत आपल्या लाडक्या मुलीचे दांडिया खेळण्याचे परिणाम !!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by विनायक प्रभू

टेमका :-- (गर्भार ) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

मदन्या लेका, टेमकर आडनावाची उत्पत्ति आज समजली बघ... ;) बिपिन.

In reply to by मदनबाण

पण आमच्या शाळेत आणि आसपास काही सभ्य वाटणार्‍या मुली पण होत्या.. मागाहून कळले कि त्याही 'मी नाही त्यातली...' वाल्या होत्या. बाकी टेमक्याला आमच्या कॉलेजात गेटर म्हणत.. :) म्हणजे दिसले नाही तरी पुण्याचे पेशवे

In reply to by कलंत्री

http://vipravani.wordpress.com/ मानवी देहाच्या रचनेत मराठी आणि अमराठी असा फरक नसतो. अर्ली एक्स्पोजर हा मुद्दा सर्व जणाना मान्य आहे. त्यात लेले आले,गोखले आले, प्रभु पण आले. एकदा का विशिस्ठ ग्रंथीचे ओवरटाईम सुरु झाला की कोणीही थांबत नाही.

In reply to by विनायक प्रभू

एकदा का विशिस्ठ ग्रंथीचे ओवरटाईम सुरु झाला की कोणीही थांबत नाही. हे काहींना समजले नसेल तर खास मिपा शब्द प्रणाली मधे ..." एकदा मोरी तुंबली की बोळा काढण्यासाठी कोणी थांबत नाही. " बाकी प्रभु साहेब तुम्ही म्हणताय ते वाचुन थोडा थबकलोच राव. आपला मित्र आहे बी.जे. मेडिकल कॉलेजात. त्याने हीच माहिती मला ४-५ वर्षांपुर्वी दिलेली .. पण त्याने तो एक विनोद केला असं समजून आम्ही त्याचीच खिल्ली उडवलेली .. जे आहे ते चांगलं की वाईट यावर चर्चा निष्फळ आहे.. कोणी कधी काय करावे हे सामाजिक नसून वैयक्तिक आहे... पण आपल्या इथे मात्र त्याला सामाजिक चर्चेचा टिकेचा आणिक कशाचा तरी मुद्दा बनवला जातो. बाकी वर विजाभौंनी जे वाक्य वापरले ""बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे." या सरसकट विधान केल्याबद्दल आणि पुरूषांच्या नितीवर बोट ठेवल्याबद्दल एक जाहिर निषेध. बाकी नवरात्रात आम्ही फक्त 'गर्बा' चे ट्राय केलेले पण ते एवढ्या 'गर्भा'च्या थराला जातात असं स्वप्नात देखिल वाटलं नव्हतं असो ... "जो जे वांछिल तो ते लाभो .. आय पील जवळ असो " आज दा विंसींनी कळेल असा कोड लिहीला ... ते पण ओपन ओपन .. म्हणून ओपन "दा विंसी कोड" चं स्वागत आहे -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

In reply to by कलंत्री

यात सगळेच लोक येतात अमराठी काय आणि मराठी काय? श्रीमंत काय आणि गरीब काय? आणि हो कुठल्याच राजकीय पक्षाच्या हातात हा प्रश्न दिल्याने काहीही होणार नाही. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

मी जो अनुभव सांगितला तो आम मराठी घरातला आणि त्यातही "तो" आणि "त्या" चक्क मध्यमवर्गीय मराठी घरातल्या....आता बोला...

In reply to by वाटाड्या...

एकदा का "आपण"/ "आपले"/ "आपली संस्कृती"/ "आपली भारतीय संस्कृती"/ "आपली हिंदू संस्कृती"/ "आपली मराठी संस्कृती"/"आपली ब्राह्मणी संस्कृती"/"आपली (आपला जो काही सबसेट असेल तो त्याची) संस्कृती" ही तमाम दुनियेत सर्वश्रेष्ठ, "आमच्यात असलं काही चालत नाही बॉ!", हे आपलं आपणच ठरवून टाकलं, की मग झापडं आपोआपच लागतात, आणि मग आजूबाजूला काय चाललंय ते दिसेनासं होतं. आणि ही वृत्ती भारतीय/हिंदू/मराठी/ब्राह्मण यांच्यातच आहे असा मुळीच दावा नाही; ही मानवी वृत्ती आहे. "असलं काही" हे खरोखरच वाईट का, त्याचे निकष काय, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा.

काय बोलणार अश्या मुलामुलींना. नवरात्रानंतर असणारे गर्भपाताचे प्रमाण वाढते हे ऐकून होते पण ७० ते ८०च्या दशकात? एकतर साधारणपणे ऐकलेला आकडा हा दिवसाला २५ ते ३० असावा आणि सांगणारे लोक आकडा फुगवून सांगत आहेत असे वाटायचे. गरबा प्रकरण हे फार प्रसिद्ध का असतं हे समजूनही चार पाचच वर्षे झाली.मुलींना निदान आपल्या तब्येतीची तरी काळजी हवी. नंतर होणारे स्त्री देहाचे हाल (कॉम्प्लीकेशन्स) त्यांना सांगितले पाहिजेत. रेवती

In reply to by रेवती

गरबा प्रकरण हे फार प्रसिद्ध का असतं हे समजूनही चार पाचच वर्षे झाली.
साधारणतः १९८८ साली मुंबईच्या लोकलला लटकत असताना आजूबाजूच्या दोन वयस्क नव्हे तरी बर्‍यापैकी प्रौढ गुजराती सद्गृहस्थांच्या "आपला (गुजराती) समाज कुठे चाललाय / हल्ली आपल्या समाजात कायकाय म्हणून सर्रास चालतं / काय व्हायचं आपल्या समाजाचं" अशा काहीश्या आशयाच्या संभाषणातून उदाहरण म्हणून ही खंत ऐकली होती. त्यामुळे हे प्रकरण नवीन निश्चितच नाही. आणि तेव्हाही सर्रास चालत असावं / प्रसिद्ध असावं. आपल्याला उशिरा समजलं म्हणजे असं काही नव्हतंच असं मुळीच नाही.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आपल्याला उशिरा समजलं म्हणजे असं काही नव्हतंच असं मुळीच नाही हे असं काही नव्हतच असं मी कुठेही म्हटलेलं नाही. रेवती

मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणा नुसार नवरात्रीच्या काळात अहमदाबाद व बडोदा या ठिकाणी कंडोम ची विक्री अनुक्रमे २८% व ३५% वाढली .. असा निष्कर्ष होता... सुशिक्षितपणा बहुतेक हाच असावा...

हे तर बिहारी आक्रमणापेक्षाही जास्त घातक आहे. मला तर कधी वाटते मुला आणि मुलींच्या लग्नाच्या वय वाढल्यामुळे हे घडत असावे. हे जर असेच चालले तर अमेरिकन आईसारखीच भारतीय आईसुद्धा गर्भप्रतिबंधक गोळी आपण स्वःताहुन आपल्या मुलीला देत जाईल. आपल्या माहितीतील पालकांचे आणि मुला-मुलीचे प्रबोधन करायला हवे. शेवटी या गोळ्या सुद्धा शरीराला घातक असतात हे लक्षात घ्यायला हवे. ( यावर एक वेगळा लेख देण्याचा विचार आहे.)

मला तर कधी वाटते मुला आणि मुलींच्या लग्नाच्या वय वाढल्यामुळे हे घडत असावे. काय राव अवं टीव्ही वर असलेल्या सिरीयल्स मधे सुद्धा मुलीचा कोण ना कोण तरी बॉय फ्रेंड असतोच,, वयच वगरै सोडुन ध्या हो ज्या वयात हे प्रकार घडतात ते वय लग्नाच नसतंच मुळी !!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

मुलीचा कोण ना कोण तरी बॉय फ्रेंड असतोच
बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असण्यात नेमकं काय वाईट आहे? त्यानं भारतीय संस्कृती नेमकी का बुडावी? आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय? याइतका भारतीय संस्कृतीचा (ऍज़ इट वॉज़ मेंट टू बी) दुसरा अपमान नसावा.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

टग्याशेटच्या दोन्ही मुद्यांशी १००% सहमत. >> आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय? आणि मग स्वतःची निवड लादण्यासाठी स्वतः मुलांना जन्म देऊन वेठीस धरावं का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय? अहो पण ज्या मुलींचे ४ बॉयफ्रेंड असतात त्यांचे काय ?? मित्र हा सखा झाला तर चांगलच आहे पण लग्नापुर्वी संबंध ठेवण्याची घाई कशाला ? मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

>>मित्र हा सखा झाला तर चांगलच आहे पण लग्नापुर्वी संबंध ठेवण्याची घाई कशाला ? सहमत (१००%) हेच म्हणतो, आणि आजकाल आईबाप जबरदस्ती करत नाहीत, आणि ज्या मुले-मुली लग्ना आधी इतक्या गोष्टी करतात. ते जबरदस्ती करुन घेतील का? आजकाल व्यक्ती स्वातंत्र्यानावाखाली काहीही चालते असा गैरसमज पसरतो आहे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by सखाराम_गटणे™

>>>आजकाल व्यक्ती स्वातंत्र्यानावाखाली काहीही चालते असा गैरसमज पसरतो आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हा हेवढा स्वस्त शब्द झाला आहे कि त्याच्या नावाखाली काही ही चालते. ज्यांना धुवायची पण अक्कल आलेली नसते ते पण वापरतात. >>>वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. =)) =))

हे जे चालले आहे किंवा जितक्या सहजपणे आपण चर्चा करत आहोत त्याचा मला विस्मय वाटतो. आचारावर घाला घातला जातो मग विचारावर आपोआपच घाला पडतो. माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी. आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय? येशुचा कोणीतरी विचार उधृत केला आहे त्याचा विचार करायला हवा. ( अपूर्ण)

In reply to by कलंत्री

http://vipravani.wordpress.com/ कुठले खांब धरुन बसला आहात कलंत्री साहेब. चर्चेने घर सावरतील. जेव्ढी मोक्ळी तेव्ढ बरे. अर्थात मि.पा. चे नियम न मोडता. त्याची सुद्धा काळ्जी नसावी. तात्याच्या हाती बटन आहे की. पॉर्नोग्राफिक साईटला जास्त विझिट कोणाच्या असतात. १२ ते २५ वर्षे मुलांच्या. आई बाप झोपल्यावर. पॉप अप्स ची काळ्जी घेउन.

In reply to by कलंत्री

हे जे चालले आहे किंवा जितक्या सहजपणे आपण चर्चा करत आहोत त्याचा मला विस्मय वाटतो.
होते आहे म्हणून तर चर्चा होते. आणि सहजपणे, मोकळेपणाने चर्चा करून काय होते आहे, का होते आहे ते समजून घ्यायचे, की केवळ आपली चौकट मोडली म्हणून धक्क्यात जाऊन परत आपल्याच चौकटीत गुरफटायचे? मुळात आपली चौकट काय आहे, ते तरी आपल्याला कळले आहे काय? ते समजण्याचा आपण प्रयत्न करतो काय? की आपली चौकट तीच बरोबर, बाकी सर्व चूक, हेच मुळात गृहीतक असते? चौकटीबाहेरचे काही आले की धक्का कोणालाही बसतो, ते स्वाभाविकच आहे. आणि त्यासाठी आपली चौकट सुधारणे हे प्रत्येकाला प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही (मलाही नाही होत कित्येकदा!). पण म्हणून आपल्या चौकटीबाहेरही काही असू शकते, आपल्या चौकटीलाही मर्यादा आहेत हेच मुळात ऍक्नॉलेज का नाही करायचे? बरे, आपली चौकट बरोबर असेलही, अगदी ती १००% बरोबर आहे असे गृहीत धरू. पण ती का बरोबर आहे, चौकटीबाहेरचे नेमके का चूक आहे, हे तरी आपल्याला स्पष्ट आहे काय? समांतर चौकटींचे सोडून द्या, आपलीच चौकट जरी १००% खरी मानली, तरी त्या चौकटीत विश्व मावत नाही, त्याबाहेर जात आहे हे एकदा लक्षात आल्यावर त्यामागील कारणांसाठी विश्वाबरोबरच आपली चौकटही तपासून पाहायला नको काय?
आचारावर घाला घातला जातो मग विचारावर आपोआपच घाला पडतो.
मुळात हे आचार कोणी, कधी ठरवले, कशासाठी? ते नेहमी असेच होते का? बदल म्हणजे नेहमीच चूक का? किती बदल हा ग्राह्य आहे आणि किती नाही, आणि का? या मूलभूत मुद्द्यांवर विचार व्हायला नको का? याहीपुढे जाऊन, मी ठरवलेले आचार सगळ्यांनी पाळले पाहिजेत हे ठरवणारा मी कोण?
माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी.
'शास्त्रीय पद्धतीने' म्हणजे नेमके काय? आणि इथे नेमके काय वेगळे चालले आहे?
आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय?
'उद्ध्वस्त' म्हणजे नेमके काय? आणि आपल्या मनात जी 'उद्ध्वस्त'ची व्याख्या आहे (असे मला वाटते), ती जरी ग्राह्य मानली, तरी हा विचार आताच का सुचावा? ही काही नवीन गोष्ट नाही. मलाच माहीत होऊन २० वर्षे उलटून गेली. आपल्याला आज कळली असेल. कदाचित मला कळण्यापूर्वीही २० वर्षे चालत असेल, कोणाला माहीत. मग किमान २० वर्षे यातून काही 'उद्ध्वस्त' वगैरे होत आहे असे कोणाला वाटले नाही, तर मग आजच याचा विचार कशाला? (किमानपक्षी ज्यांचे काही 'उद्ध्वस्त' वगैरे झाले, त्यांना तर नक्कीच वाटले असते?) की 'कदाचित हे लोण आपल्यांपर्यंतही पोहोचले तर' ही यामागची भीती आहे? जर २० वर्षांत पोहोचू शकले नाही (आजूबाजूला सर्रास चालू असता), तर आजच (हे कळल्यावर - आणि तेही 'मिसळपावा'वर वाचून) का पोहोचावे? पण तरीही तुमची काळजी रास्त असू शकते. आणि त्याकरता वैयक्तिक पातळीवर, स्वतःच्या कुटुंबापुरत्या (तुम्हाला योग्य वाटतील त्या) पायर्‍या (तुम्हाला योग्य वाटत असतील तर) तुम्ही निश्चितच घेऊ शकता. त्या जर योग्य असतील आणि योग्य तर्‍हेने त्याची अंमलबजावणी करू शकलात (आणि ज्यांच्यासाठी त्या घ्यायच्या त्यांना ते पटवू शकलात) तर उपयोग होईलही, नाहीतर होणार नाही. पण समाजाने कसे वागावे, समाजाकरता योग्य काय हे आपण कसे ठरवणार?
येशुचा कोणीतरी विचार उधृत केला आहे त्याचा विचार करायला हवा.
त्याआधी मुळात 'पाप' म्हणजे काय, ते कोणी आणि कशाच्या आधारावर ठरवायचे हे स्पष्ट व्हायला हवे.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

http://vipravani.wordpress.com/ नतमस्तक आहे मी आपल्या पुढे. खुप आवड्ले ट्ग्या राव तुम्ही लिहिलेले.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सहमत टग्या! आय्.पिल्.ला कुणाचा आरोग्याच्या दृष्टीकोनातून विरोध असेल तर समजू शकतो. संस्कृतीवर आघात वैगेरेमुळे नाही. नवरात्रात या गोष्टी वाढलेल्या दिसणे हा कदाचित संधी मिळत असल्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असावा. ज्यांना असं वागायचंय ते कधी ना कधी वागणारच. मुळात आपण बाळबोधपणे आपल्या समाजात असं काही नाही , असलं तर हल्लीच वाढलंय वैगेरे समजतो किंवा तसा दावा करतो हेच चुकीचं आहे. विवाहबाह्य्,विवाहपूर्व संबंध हे इथे पूर्वीपासूनच आहेत, अन्यथा इतके अनाथाश्रम दिसले नसते. (आता अनाथाश्रमांच्या जागी आय. पिल. आणि निरोधची पाकिटे दिसतील कदाचित. यांपैकी चांगले कुठले हे कोण ठरवणार?) साती

In reply to by कलंत्री

माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी. आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय? चर्चा करुन घरं उध्वस्त होणार असं तर तुम्ही सुचवत नाही आहात ना? बाकी पुन्हा एकदा टग्याशेटशी सहमत.

>>> जे काही मुले-मुली करतात, ते काही चुक असे नाही, हा निसर्ग नियम आहे. पुर्वी मनावर ताबा असावा, जीवनाचा हेतु उदात्त असावा, मेणबत्तीसारखे दुसर्‍यासाठी जळावे इति. इति. आता, जो तो जीवन उपभोगणे च्या मागे लागला आहे, आता प्रत्येकाचे जीवन उपभोगणे वेगळे. बालविवाह पुन्हा चालु करावेत असे माझे मत आहे. हे जे आकडे आहेत ते इतर साधने फेल झाल्यानंतरचे आहेत. आणी दरवेळीच गर्भधारणा दरवेळीच होते असे नाही. काही पपया, धोतरा असे उपाय आहेतच. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.

लेखाचे नाव पाहून वाटले जरा "टंकलेखना"त गडबड असावी. आम्हाला बुवा ते "आय पी एल" वाटले. पण लेखकाचे नाव पाहून काही तरी नवीन प्रकार असणार म्हणून वाचले आन बॉ आपले डोके गरागरा फिराय लागले. गुगलावरुन "आय पील" काय आहे हे समजून घेतले. आम्हाला अगम्य अज्ञानातून बाहेर काढल्याबद्दल प्रभू साहेबांचे तसेच प्रतिसाद देणार्‍यांचे डोंगरा येवढे उपकार. आपला, (अज्ञानी) भास्कर आम्ही येथे वसतो.

लगे रहो मुन्नाभाय!!!:) जे काही मुले-मुली करतात, ते काही चुक असे नाही, हा निसर्ग नियम आहे. सहमत! आणि आज जेंव्हा आयुष्यातील बाकीची ध्येये मिळवण्याच्या ध्यासामुळे (चांगल्या अर्थाने) लग्नाला उशीर होतो. त्यामुळे हे असे वर्तन होणे सहाजिकच!! पुर्वी मनावर ताबा असावा, जीवनाचा हेतु उदात्त असावा, मेणबत्तीसारखे दुसर्‍यासाठी जळावे इति. इति. आता, जो तो जीवन उपभोगणे च्या मागे लागला आहे पूर्णपणे असहमत!! पूर्वीचे लोक काही उदात्त , सत्शील वगैरे नव्हते!! लग्नाआधी अनैतिक संबंध ही मनुष्यजातीची हजारो वर्षांची परंपरा आहे. कुंतीचेच उदाहरण घ्या. कर्ण कसा काय जन्माला आला? बालविवाह पुन्हा चालु करावेत असे माझे मत आहे. ह्ये मात्र तुफान ईनोदी!!! सख्या, तुझ्यासाठी आता एखादी १० वर्षांची बालिका शोधूयात!!!:) हे जे आकडे आहेत ते इतर साधने फेल झाल्यानंतरचे आहेत. आणी दरवेळीच गर्भधारणा दरवेळीच होते असे नाही. सहमत! पण ठराविक वयात गर्भधारणा व्हायचा संभव जास्त असतो. हे निसर्गतःच होते. विशितल्या मुलीला चाळिशीतल्या स्त्रीपेक्षा गर्भधारणा होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते असे म्हणतात! काही पपया, धोतरा असे उपाय आहेतच. पपया....!! कोणत्या युगात वावरतात आहेत रे हे लोक!!!! अरे दादरच्या गर्भपात क्लिनिकची जाहिरात गेली ३५ वर्षे तरी होते आहे रे मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये!!! जरा आजूबाजूला वाचा रे प्रवास करतांना!!!!!:) माझ्या मते कायद्याने सज्ञान असलेल्या पुरुष आणि स्त्रीयांनी आपखुषीने लैंगिक संबंध ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. फक्त त्यातून निष्पन्न होणार्‍या परिणामांची काळजी आनि जबाबदारी घेण्याची तयारी असणे आवश्यक आहे. परिणाम (गर्भधारणा) टाळण्यासाठी आज अनेक उपाय उपलब्ध आहेत. तेही जर आजकालच्या तरूण्-तरुणींना माहीती नसतील तर त्यांच्या अज्ञानाची कीव करावी तेव्हढी थोडीच!!! निरोधाची जाहिरात गेली ३०-३५ वर्षे तरी लोकलच्या डब्यात होत आहे. बाकी पालकांचं म्हणाल (ते १-५ प्रश्न आणि त्याची पालकांनी दिलेली उत्तरे) हा केवळ भोंदूपणा (हिपोक्रसी) आहे असे मी म्हणेन!! आपल्या मुला-मुलीना योग्य ते लैंगिक शिक्षण देण्याची अंतिम जबाबदारी पालकांची आहे. आपले किती पालक ती पार पाडतात? वरील प्रतिक्रियांमध्ये कुठेतरी अमेरिकन आया आपल्या मुलीना संततीप्रतिबंधक साधनांची माहिती देत असल्याबद्द्ल उपहासपूर्वक उल्लेख आहे. पण मला सांगा, त्यात काय चूक आहे? आपल्या मुलांवर आपण २४ तास तर लक्ष ठेवू शकत नाही (आणि तसे ठेवूही नये!) मग आपल्या पाल्याला या विषयात सज्ञान करण्यात काय चूक आहे? पालकांनो एक लक्षात ठेवा! तुम्हाला आवडो वा न आवडो, तुमची वयात आलेली मुलं-मुली हे लैंगिक संबंधांबद्दल उत्सुक असणारच! ते तुम्ही कितीही म्हटलं तरी टाळू शकत नाही!! आता त्यांना योग्य माहिती देऊन पुढील परिणामांविषयी (व ते टाळण्याविषयी) जागृत करणं ते तुमच्या हातात आहे. आपण ऍक्टिव्ह रोल घ्यायचा कि पॅसिव्ह राहुन फक्त माझी मुलं हे असं काही करणारच नाहीत या फोल कल्पनेमध्ये मश्गुल व्हायचं हे तुमच्या हातात आहे!!!! आमेन!!!!!:)

In reply to by पिवळा डांबिस

विचार प्रवर्तक आणि दिशा देणारा असा हा प्रतिसाद आहे. हा विषयावर आपल्या घरी चर्चा झाली तर त्यातुन शिक्षण होईल हे १००% मान्य. इतकेच कश्याला आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या मित्रमंडळींना एकत्र आणून यावर अभ्यास चर्चा करायला हरकत नसावी. प्रभूसाहेबांच्या मते आपण १९४७ ची विचारसरणी ठेवत आहे यातही तथ्य आहे.

In reply to by कलंत्री

http://vipravani.wordpress.com/ अय शेख तेरी तू देख. आपल्या मुलांचे आपण बघा. मित्रमंडळीचे पालक " आमच्या मुलाना बिघडवता का" म्हणुन जोडे हाण्तील. भारतीय प्रजासताकाचा विजय असो. असे जोडे अनेक वेळा खाउनही जिवंत आहे मी. आपला नम्र वि.प्र.

In reply to by विनायक प्रभू

असे जोडे अनेक वेळा खाउनही जिवंत आहे मी. जिवंत असल्याबद्दल अभिनंदन!!:) पण एक लक्षांत ठेवा विनायकराव! तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरच तर सर्व भिस्त आहे आमची!!! अन्यथा हिपोक्रिट संस्कृतीरक्षकांनी एव्हांना एका समस्त समाजाचा संपूर्ण नास केला असता....