✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • पाककृती
  • भटकंती

मानव : चिंपँझी आणि वराह यांच्या संकरातून बनलेला प्राणी ???

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Sun, 01/26/2014 - 17:19  ·  लेख
लेख
"प्रायमेट नावाच्या पूर्वज प्रजातीपासून माणूस आणि ग्रेट एप प्रकारची माकडे उत्क्रांत झाली" आणि "ही उत्क्रांती डार्विनच्या सिद्धान्ताबरहुकूम हळूहळू होत गेली" हे दोन सिद्धांत शास्त्रीय जगतात आणि जनसामान्यात चांगले मान्यता पावलेले आहेत. एका शास्त्रीय संशोधनाला सुरुंग लावणारे इतर शास्त्रीय सिद्धांत मांडले जात नाहीतच असे नाही. पण वरच्या या दोन गोष्टी शास्त्रीय जगतात बर्‍यापैकी जम धरून बसलेल्या आहेत... किंवा खरेतर "आताआतापर्यंत जम धरून बसलेल्या होत्या" असेच म्हणावे लागेल. कारण आता त्या गोष्टींनाही सुरुंग लावणारा सिद्धांत अमेरिकेतील जॉर्जिया युनिव्हर्सिटीतल्या डॉ युजीन मॅक्-कार्थी यांनी मांडला आहे. त्यांच्या सिद्धान्ताप्रमाणे माणूस चिंपँझी मादी आणि वराह नर यांच्या संकरापासून झालेला प्राणी असावा याला भरपूर शास्त्रीय पुरावा आहे. डॉ युजीन मॅक्-कार्थी ही आसामी सामान्य शास्त्रज्ञ नाही. संकरशात्रातल्या जागतिक स्तराच्या मोजक्या तज्ज्ञामध्ये त्यांची गणना होते. त्याचे प्राणी-संकरावरचे मूलभूत संशोधन हजारो संशोधन लेखांमध्ये दुवे (रेफरन्स) म्हणून वापरले गेले आहे. त्यांच्या सद्याच्या या सिद्धान्ताला शास्त्रीय जगतात सावध पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी त्यासाठी दिलेल्या कारणपरंपरेची स्तुतीच होत आहे... त्यांना सरळ सरळ वेडा म्हणायला शास्त्रीय जगतात अजून कोणी पुढे आले नाही यावरून त्यांच्या सिद्धान्ताच्या शास्त्रीय भक्कमतेची आपल्यासारख्या त्याबाबतीत तज्ज्ञ नसलेल्यांनाही अप्रत्यक्ष कल्पना यावी. त्यांच्या सिद्धान्ताच्या पाठिंब्यासाठी त्यांनी मांडलेले आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः १. माणूस आणि चिंपँझी जनुकशास्त्राप्रमाणे जवळचे असले तरी त्यांच्यामध्ये खूपच फरक आहेत आणि ते का हे विशद करणारा दुवा म्हणून कोणताच प्राणी या दोघांमध्ये नाही. २. चिंपँझीच्या जनुकांच्या जवळपासही येणार नाहीत अशी बरीच जनुके मानवात आहेत आणि ती जनुके वराहात आहेत. ३. मुख्य म्हणजे ही वेगळी जनुके इतर प्रायमेट्स मध्येही नाहीत... म्हणजे ती प्रायमेट, ग्रेट एप्स आणि सद्या मान्यता असलेल्या मानवाच्या पूर्वजांकडून मानवाला मिळणे शक्य नाही. त्यामुळे ती फार वेगळ्या प्राण्याच्या संकरातून मिळण्याची शक्यता सबळ बनते. ४. वराह व मानवाच्या जनुकीय साम्यांमुळेच हृदयाच्या झडपांचे, कातडीचे आणि मूत्रपिंडाचे रोपण किंवा मधुमेहाविरुद्ध वापरले जाणारे इन्शुलीन याकरिता वराह याच प्राण्याची निवड केली गेली आहे कारण काही जनुकीय साम्यांमुळे ते अवयव अथवा इन्शुलीन मानवी शरीर जास्त सहजपणे स्वीकारते (रिजेक्शन रिअ‍ॅक्शन कमी प्रमाणात होते). हीच गोष्ट जनुकशास्त्रीयदृष्ट्या वराहाला जवळचे आणि माणसाला वराहाइतकेच दूरचे असलेल्या कुत्रा, शेळी अथवा अस्वल या प्राण्यांबाबत शक्य होत नाही. ५. जनुकशास्त्रियदृष्ट्या बर्‍याच वेगळ्या असलेल्या प्राण्यांमधील संकर जरी नेहमीची गोष्ट नसली तरी प्रयोगशाळेत आणि निसर्गातही ही गोष्ट फार अशक्य अथवा अगदी फारच मोठा अपवाद नाही. डॉ युजीन मॅक्-कार्थी यांच्या Handbook of Avian Hybrids of the World या पुस्तकात पक्षीजगतातले ४,००० पेक्षा जास्त हायब्रिड्स नोंदलेले आहेत. येथे सस्तन प्राण्यांच्या अनेक संकरांची यादी व माहिती मिळेल. ६. संकरित प्राण्यांत वंध्यत्वाचे प्रमाण खूपच असते. जीव-इतिहासात असे बहुतेक संकर प्रजनन करण्यास असमर्थ असल्याने नष्ट झाले आहेत. आजही मानवात सर्वसाधारण प्राण्यांपेक्षा वंध्यत्वाचे प्रमाण लक्षणीय आहे. आधुनिक मानव जन्माला येऊन दोन लाख वर्षे लोटली आहेत. इतका काळ वंध्यत्व सुधारायला मिळूनही त्याचे इतके प्रमाण आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात तर ते खूपच मोठे असले पाहिजे. संकराच्या सिद्धान्ताच्या बाजूचा हा एक अप्रत्यक्ष पुरावा आहे. माणसाच्या दोन लाख वर्षांच्या इतिहासात त्याच्या अनेक वंशावळी तयार झाल्या. त्यातील इतर सर्व नष्ट होऊन फक्त आता जिवंत असलेली एकुलती एक वंशावळ एकाच नर आणि मादीपासून (जेनेटिक अ‍ॅडम व ईव्ह) निर्माण झाली आहे हे तर सिद्ध झाले आहेच. इतर वंशावळी हळूहळू अस्तंगत होण्याचे वंध्यत्व हे एक महत्त्वाचे कारण असू शकते आणि केवळ योगायोगाने निर्माण झालेल्या काही उत्परिवर्तनांमुळे आपली आताची वंशावळ शिल्लक उरली आहे असेही असू शकेल. (हा इटॅलिक्समधला आपला माझा लॉजिकल अंदाज... एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीत आपलेपण दोन पैसे असले पाहिजेतच ना राव ;) ) ७. डॉ युजीन मॅक्-कार्थींचा सिद्धांत केवळ शास्त्रीय ज्ञानावर आणि शास्त्रीय सारासारविवेकावर (लॉजिक) बेतलेला आहे, त्यामुळेच अजून तरी त्याला इतर शात्रज्ञांकडून सरळ सरळ आव्हान पुढे आलेले नाही किंवा त्याची चेष्टाही झालेली नाही.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29504 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

हसावे कि रडावे?

आयुर्हित
गुरुवार, 01/30/2014 - 13:58 नवीन
हा हा हा असे दात काढून हसणे किती सोपे असते नाही. हसा लेकांनो, हसा! मला हसावे कि रडावे हेच काळात नाही! पण कीव नक्की आली आपली, आपल्या अज्ञानामुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

व्युत्पत्ती पटली

प्रसाद गोडबोले
Wed, 01/29/2014 - 01:27 नवीन
अहो टीव्ही चा उल्लेख गीतेत सुध्दा येतो , उगाच मनाच नाही सांगत पुरावा आहे पुरावा ...हा पहा एक श्लोक>> दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२॥ पण काही विद्वानांच्या मते
कारण दिव्यदृष्टीच्या आधारे टिवटिव करीत म्हणून टिव्य अन मग त्याचे पुढे टिवी झाले.
दिव्य > टिव्य > टिवटिवाट > ट्विटर अशी व्युत्पत्ती आहे ... बहुधा महाभारतात लोकं ट्विट करत असणार आणि धृतशाष्ट्राचा नेटवर्क प्यॅक संपला असल्याने त्याने संजयाला सगळ्यांना फॉलो करायला लावले असणार ... असाही एक अंदाज आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी सहमत!!!!

बॅटमॅन
Sat, 02/01/2014 - 01:45 नवीन
अगदी सहमत!!!! गीतेत हर्षवर्धन राजाने रोमवर स्वारी केल्याचा उल्लेख आहे = रोमहर्षश्च जायते. सर्वांनी चहा हा सनी नामक ब्रँडच्या स्टोव्हवरच करावा अशी गीतेची आज्ञा आहे.- सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

शिवाय चार जूनला वाढदिवस

बॅटमॅन
Sat, 02/01/2014 - 01:46 नवीन
शिवाय चार जूनला वाढदिवस असलेल्या लोकांचा उल्लेखही आहे त्यात. - जन्मानि तव चार्जुन |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगस्त्य संहिता

आयुर्हित
Sat, 02/01/2014 - 01:15 नवीन
अगस्तीऋषी,जे (श्रीरामाचे वडील असलेल्या)दशरथ राजाचे गुरु होते, त्यांनी रचलेल्या (लिहिलेल्या नव्हे) "अगस्त्य संहिता" ह्या ग्रंथातील मित्रावरूण(विद्युत)शक्ती बद्दल हा एक श्लोक: संथाप्य मृणमये पात्रे ताम्रपत्रम सुसंकृतम| छाद्येच्छीखिग्रीवेन चार्दाभी: काश्ठापाम्सुभी:|| दस्तालोष्टो निधात्वय: पारदाच्छादितस्तत:| संयोगाज्जायते तेजो मित्रावरुणसंज्ञितम्‌ || थॉमस एल्वा एडिसन ह्याने भरपूर रद्दीतील पुस्तके गोळा करून एक संग्रहालय तयार केले होते. व त्यातील काही लागलेले शोध, प्रयोग करून पुनः जगासमोर आणले आहेत.त्याने फक्त प्रयोग करून पहिले त्यामुळे १००पेक्षा जास्त शोध तो पुन्हा दाखवू शकला. अजून एक उदाहरण: "मोहन जो दडो" येथील संस्कृती संपूर्ण नष्ट होण्याचे एकमेव कारण तेथे झालेला अणुस्फोट आहे, याचा अर्थ त्याकाळच्या लोकांना याची पूर्ण माहिती होती. आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

इंडियाना जोन्स

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/01/2014 - 04:17 नवीन
"मोहन जो दडो" येथील संस्कृती संपूर्ण नष्ट होण्याचे एकमेव कारण तेथे झालेला अणुस्फोट आहे, याचा अर्थ त्याकाळच्या लोकांना याची पूर्ण माहिती होती.
तुम्ही तो एक इंडियाना जोन्सचा सिनेमा पाहिला आहेत का? न्यू मेक्सिकोमधेमधला एक प्रसंग आहे त्यात. हा हिरो जिथे असतो तिथे अणूस्फोट होतो. नेमका तेव्हा हीरो एका खोपटात लपतो म्हणून जगतो. बाकीचे सगळे गावकरी मरतात. कस्सला भयंकर सीन आहे ना? माझ्यातर अंगावर बै रोमांचच आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

>>> माझ्यातर अंगावर बै

प्यारे१
Sat, 02/01/2014 - 12:30 नवीन
>>> माझ्यातर अंगावर बै रोमांचच आले. ऐला! बर्‍या आहात ना? इतिहास पाहता हा उपहास'च' अपेक्षित आहे. ;) अन्यथा रेसिस्ट कमेंट म्हणून समज देण्यात येईल. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आयुर्हित, आपण मेन्षन केलेले

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 02/02/2014 - 10:15 नवीन
आयुर्हित, आपण मेन्षन केलेले हे सुत्र मी पण वाचले आहे ही "ड्राय बॅटरी" बनयाची विधी आहे, ह्याचा उल्लेख मी पण वाचला आहे, मुळात आपण भारतीय ह्यात मागे का ह्यावर माझे एक मत आहे १. ज्ञान संक्रमणासाठी "मौखिक" मार्ग निवडला गेला :- त्याच्या मुळे त्या ज्ञानाला "जर्नलिस्टीक बेस" नाही (म्हणुन ते ज्ञान खोटे हे म्हणणे पण मला पटत नाहीच) २. आपण भारतीय आधुनिक पाश्चिमात्य शोध जसे की टीवी, इत्यादी पाहुन ते आपल्या ज्ञानाशी कोरिलेट करायचा यत्न करतो , हे मात्र मला चुक वाटते, कारण हे करताना आपण एक तर स्वतःचे हसे करुन घेतोच त्या उप्पर प्राचीन भारतीयांनी केलेली शुद्ध विज्ञान (नॅचरल सायन्सेस) मधली प्रगती सुद्धा नजरंदाज करतो उहापोह महाभारतात टीव्ही अन न्युक्लियर बाँब होते का ह्या पेक्षा १. आर्यभट्टाची गणिती सुत्रे २. बौधयान सुत्रे ( ह्या भाऊ ने पायथॅगोरस च्या ही पहिले त्याचे थेरम शोधल्याचे सांगतात ) *चुभुदेघे ३. औषध अन शल्यशास्त्रात भारताची प्रगती इत्यादी वर व्हावी अशी अपेक्षा मी बाळगतो उरता उरला सिंधु संस्कृती चा प्रश्न तर इतिहासकारांत त्या बद्दल अनेकोअनेक प्रवाद अस्तित्वात आहेत अन परमाणु बाँब त्या गणतीत नाही सिंधु संस्कृती च्या -हासा ची काही शक्य कारणे खालील प्रमाणे १. अंतर्गत कलह :- जगातील इतर संस्कृतींत यज्ञ किंवा बलिवेदी वर आढळणा-या मानवी हाडांची संख्या (बळी) अन मोहंजोदाडॉ इथे सापडलेल्या हाडांच्या संख्येत असलेली विलक्षण तफावत २. भौगोलिक कारणे :- तत्कालिन ग्लोबल वॉर्मिंग मुळे आलेले कॅटॅकॅलिस्मिक चेंजेस ज्याच्यामुळे ह्या विभागाच्या पर्जन्यमानात आलेला विलक्षण बदल ज्यामुळे बदलती पीक प्रणाली अन उपासमार अन त्यामुळे पसरलेले अराजक ३. नदीच्या पात्रात झालेले बदल (शिफ्टींग ऑफ रिव्हेराईन कोर्सेस) ज्यामुळे तहाने पोटी झालेला -हास (गुप्त सरस्वती नदी आजही राजस्थानात बाडमेर कडे भर वाळवंटात २०-२० फुटांवर पाणी देते!, कदाचित ह्या लोकांना ह्या मुळे पाण्यासाठी विहिरी खोदाव्या तरी कुठे हा प्रश्न पडला असावा) ४. साथीच्या रोगाने झालेले उच्चाटन (हा वाद क्षीण आहे) त्या उपर तिथे सापडलेल्या कुठल्याही मानवी हाडावर न सापडलेले रेडियेशन चे ट्रेसेस हे आपला युक्तिवाद नल अँड व्हॉईड करतात. मुळात अजुन सिंधु संस्कृती च्या भाषेचे "डी सायफरींग " झालेले नाही त्यामुळे त्यांनी नेमके लिहिले काय आहे हे आज ही आपल्या अंदाजाचाच प्रश्न आहे!!! सो अगदी आजही सिंधु संस्कृती ही जगातले एक गुढ कुतुहलच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

अणुस्फोटचे प्रमाण

आयुर्हित
Sun, 02/02/2014 - 13:00 नवीन
अणुस्फोटचे प्रमाण : दोन काळे दगड, ५० पट जास्त विकिरणे(Radiations), मुख्य रस्त्यावर पडलेले बाबा,आईच्या हातात हात असलेले मुलाचे सापळे. संदर्भ: David Davenport Ancient Alien ह्या स्फोटानंतर जी काही नवीन शहरे ती सिंधू खोरे पासून लांब ठिकाणी म्हणजे गंगा,यमुना व शरयू नदीच्या किनारी वसली आहेत, हेही महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

जर सभ्यता संपवणार मोठा स्फोट

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 02/02/2014 - 17:29 नवीन
जर सभ्यता संपवणार मोठा स्फोट होता तर रेडीयेशन्स देणारे फक्त दोन दगड ? अजुन काही एव्हिडंस ? त्या उपर जर मुलाचा सापळा आईबापासोबत सापड्ला आहे तर तिथे " फ्लॅश एपिडेमिक" ची पण शक्यता असतेच असते ( स्वातंत्र्या पुर्वी नाही का प्लेग च्या साथीत पुण्यासारखी शहरे रिकामी झालेली, गावंच्या गावं एका रात्रीत गावठाण उठवलेली)त्या उपर जर मानवी शरीराला एखादा जंतु जीवाणु नवा असला तर त्याचे प्रोग्रेशन कसे होईल ह्याचे काहीच फिक्स नसते, ग्रीक उल्लेखांत आढळणा-या "अथेन्स च्या प्लेग" सारखेच हे काही असले तर ? आपण उल्लेख केला आहे तो "पुरावा" नाही एक "संभावना" आहे कारण जोवर सिंधु लिपी डेसीफर होत नाही तोवर काही ही स्पष्ट नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. मला ह्या संभावनेवर ही अजुन वाचायला आवडेल जरा काही जास्त लिंक्स असल्या तर कृपया व्यनि करा ना आपण केलेला शरयु गंगातटीच्या संस्कृतींचा उदय हे इतिहासात "रेडियल प्रोग्रेशन ऑफ सिविलायझेशन" असे म्हणवते, ते जगभरात सर्वत्र पहावयास मिळते अन त्याच मुळे त्याचा अन सिंधु -हासाचा काही संबंध असेल असे टेक्नीकली वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

रेडियेशन फक्त दगडांवरच आढळले

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 02/02/2014 - 17:44 नवीन
रेडियेशन फक्त दगडांवरच आढळले का ? सापळ्यांवर नाही का ? नसल्यास असा कसा (क्षीण) अणुबाँब होता जो दगडाला ५० पट रेडियेशन देऊ शकतो पण मांसाच्या आत घुसुन मानवी अस्थीं ना नाही ? रेडीयेशन च्या ट्रेसेस (नॉर्मल पेक्षा ५० पट म्हणजे बरेच जास्त आहे) वरुन तो कुठला किरणोत्सारी पदार्थ असल्याचे सिद्ध झाले ? जर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ब्लास्ट तो ही परमाणु झाला आहे तर त्या ब्लास्ट मधे माणसे खलास झाली पण इमारती अभंग राहील्या ? कश्या ?? सिंधु संस्कृती आजही एक प्रचंड मोठे रहस्य आहे मानवी सभ्यतेचे हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

ब्लास्ट मधे माणसे खलास झाली

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/02/2014 - 18:11 नवीन
ब्लास्ट मधे माणसे खलास झाली पण इमारती अभंग राहील्या ? कश्या ?? हे न्युट्रॉन बांबच्या काही संकल्पनांत (डिझाईन) मध्ये हे शक्य असते. ही केवळ आधुनिक शास्त्रीय माहिती आहे आणि तिचा तसाच अर्थ घ्यावा. प्राचीन काळी अणुबाँब होते असा दावा करण्याइतपत त्याबाबतीत माझा अभ्यास नाही. :) ढिसक्लेमर दिलंय, तरीसुद्धा आता पळतोच... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

असे काय करता सोन्याबापू?

आयुर्हित
Sun, 02/02/2014 - 20:12 नवीन
रेडियेशन फक्त दगडांवरच आढळले का? : आता हे कुठे वाचेल/पहिले? हे वाचा :हे दोन दगड(२:१० min वर बघा) तेथे फक्त उच्च तापमानामुळेच तयार झाले आहेत (The CNR lead a serious analysis that amazed the researchers: the objects brought by him appeared to be fused, glassified by a heat as high as 1500°C, followed by a sudden cooling) एका सापळाहि आहे ज्यावर विकीरणचा परिणाम झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ओहो!!! असंय व्हय!!! ह्या

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 02/03/2014 - 07:23 नवीन
ओहो!!! असंय व्हय!!! ह्या संभावनेवर अजुन वाचायला पायजे मग आता आम्हाला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

अशा काही ठिकाणी रेडिअशन आहे

कवितानागेश
Mon, 02/03/2014 - 13:22 नवीन
अशा काही ठिकाणी रेडिअशन आहे हे खरच आहे. पण कधीपासून आणि कशामुले आहे त्याबद्दल सम्शोधन सुरु असल्यानी खात्रीलायक माहिती अजूनतरी 'बाहेर' आली नाहीये. ... तोपर्यंत आपण 'चर्चा' करु!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

म्हणजे एकुण काय ? सगळेच तारेत

सुहास..
Tue, 01/28/2014 - 18:48 नवीन
म्हणजे एकुण काय ? सगळेच तारेत होते म्हणा की ;)
  • Log in or register to post comments

हे संशोधन खरे ठरले तर 'मानव'

चिन्मय खंडागळे
Tue, 01/28/2014 - 22:31 नवीन
हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' हा प्राणी इस्लामला निषिद्ध ठरेल काय?
  • Log in or register to post comments

=))

बॅटमॅन
Tue, 01/28/2014 - 23:05 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/28/2014 - 23:16 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

@ 'मानव' हा प्राणी इस्लामला

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/28/2014 - 23:41 नवीन
@ 'मानव' हा प्राणी इस्लामला निषिद्ध ठरेल काय? >>> =)) खंप्लीट खपल्या गेलो आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

नक्कीच!!

कवितानागेश
Tue, 01/28/2014 - 23:50 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

मग काय ? म्हनुन त्यांनी

गब्रिएल
Wed, 01/29/2014 - 12:16 नवीन
मग काय ? म्हनुन त्यांनी कदिपासुनच माणसं संपवायचं काम चालू केलाय नाय्का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

ळॉळ

प्रसाद गोडबोले
Wed, 01/29/2014 - 16:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

ज..ह..ब..ह..रा

टवाळ कार्टा
Wed, 01/29/2014 - 17:01 नवीन
ज..ह..ब..ह..रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

ज्यूदेखिल

सुनील
गुरुवार, 01/30/2014 - 08:28 नवीन
हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' हा प्राणी इस्लामला निषिद्ध ठरेल काय?
इस्लामलाच काय पण ज्यूंनादेखिल निषिद्ध ठरेल! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

सहमत

विनायक प्रभू
Wed, 01/29/2014 - 12:28 नवीन
आमच्या सौ. ची सहमती स्विकारा.
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Wed, 01/29/2014 - 12:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

पन चिंपाझी आनि डुक्कर यांचा

परिंदा
Wed, 01/29/2014 - 18:10 नवीन
पन चिंपाझी आनि डुक्कर यांचा संकर कसा झाला? लयच ब्येशिक प्रश्ण हाय
  • Log in or register to post comments

चिंपॅन्ज़ी लय चावट असतय बघा.

सुबोध खरे
गुरुवार, 01/30/2014 - 10:27 नवीन
चिंपॅन्ज़ी लय चावट असतय बघा. काय पण करतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

शंका

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/30/2014 - 15:34 नवीन
खरेकाका , www.misalpav.com/user/21410/authored ही तुमची स्वाक्षरी आहे का ? कारण
चिंपॅन्ज़ी लय चावट असतय बघा. काय पण करतय. www.misalpav.com/user/21410/authored
हे असं वाचलावर , मला वाटलं की चावट चिंपाझी च्या करामती दाखवणारी लिन्क दीलीत की काय आपण ;) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मलापण तसंच वाटलं होतं.

कवितानागेश
गुरुवार, 01/30/2014 - 16:17 नवीन
मलापण तसंच वाटलं होतं. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बघा आता सर्व डॉ मॅक

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/30/2014 - 16:45 नवीन
बघा आता सर्व डॉ मॅक-कार्थीच्या विरोधकांनो... अपघाताने अचानक काही अनपेक्षित परिणाम पुढे येऊ याचे हे उत्तम उदाहरण आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

लोकहो, आंतरप्राणीय विवाहाचे

चिन्मय खंडागळे
Fri, 01/31/2014 - 19:52 नवीन
लोकहो, आंतरप्राणीय विवाहाचे हे भयंकर दुष्परिणाम पहा. http://www.youtube.com/watch?v=OSDRbX0zK6o
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा