आयुकाचे श्री चैतन्य राजर्षी आणि श्री उमेश वाघेला यांच्यासोबत या शनिवारी गिरवली गावाजवळ असलेल्या आयुकाच्या वेधशाळेला भेट देण्याची संधी मिळाली.
आयुकाचा टेलीस्कोप बघणे हे या भेटीचे मुख्य आकर्षण होते.
रिफ्लेक्टींग प्रकारच्या या टेलीस्कोपच्या आरशाचा व्यास २ मीटर आहे. आरशाच्या व्यासाच्या आकारावरून, कावलूर टेलीस्कोप (२.६ मीटर) आणि लडाख मधील एका टेलीस्कोपनंतर याचा नंबर लागतो. भारतातील तीन नंबरचा टेलीस्कोप.
टेलीस्कोप टेक्नॉलॉजीज लिमीटेड (लिव्हरपूल, UK) या कंपनीने हा टेलीस्कोप तयार केला व २००६ मध्ये आयुकाला हस्तांतरीत केला. या टेलीस्कोपसाठी अंदाजे २५ कोटी रूपये खर्च आला.
गिरवली गावाजवळील डोंगर निवडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्यापासून जवळ असल्याने सर्व प्रकारच्या दळणवळाच्या साधनांची सहज उपलब्धता. आयुका पुणे केंद्राच्या शास्त्रज्ञांना सोयीचे असणारे ठिकाण आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे समुद्रसपाटीपासून जसजसे उंचावर जावे तसे वातावरणातील अडथळे कमी होत जातात व ग्रह तार्यांची आणखी स्पष्ट प्रतिमा मिळते. ही वेधशाळा समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचावर आहे.
भीमाशंकरला निवांत भेट देवून सर्वजण दुपारी गिरवलीच्या डोंगरावर दाखल झालो.
टुमदार गिरवली गावापासून वेधशाळा सहा किमी दूर आहे.
पूर्वीपासून गिरवलीच्या डोंगरावर एक BSNL चा टॉवर आहे.. पूर्वी तेथपर्यंत रस्ता होता. वेधशाळा त्याच्याही वरच्या बाजूला आहे. वेधशाळेचा रस्ता हा एक प्रचंड मोठा कातळ फोडून केला आहे.
वेधशाळेचे आवार सुनियोजीत व आवश्यक त्या सर्व सोयींनी सुसज्ज आहे. सिक्युरीटी हाऊस, जनरेटर्स, गेस्ट हाऊस आणि टेलीस्कोप बिल्डींग विस्तीर्ण आवारात वसवले आहेत.
आत गेल्यानंतर या टेलीस्कोपची थोडक्यात माहिती, आयुकाची पार्श्वभूमी, टेलीस्कोपसाठी गिरवली गावाची निवड का केली अशी माहिती दिली गेली व सर्वांनी टेलीस्कोप बिल्डींगमध्ये प्रवेश केला.
टेलीस्कोप बिल्डींग
टेलीस्कोप डोम
तळमजल्यावर कंट्रोल रूम आहे, एका प्रेझेंटेशनच्या सहाय्याने आणखी विस्तृत माहिती दिली गेली.
वेगवेगळ्या ठिकाणी डिस्प्ले केलेले जुने फोटो व कात्रणे नक्की काय काय व कसे कसे घडत गेले ते सांगत होतेच!
कंट्रोल रूममध्ये टेलीस्कोपमधून दिसणार्या फोटोची एक झलकही दाखवण्यात आली.
वरच्या मजल्यावर टेलीस्कोप आणि डोम आहे.
टेलीस्क्प २२ अंश ते ९० अंशात व उभा फिरतो आणि स्वत: भोवती ३६० अंशात फिरतो त्यामुळे या मोजमापांमध्ये दिसणार्या सर्व ग्रहतार्यांचा अभ्यास करता येतो. एखादा ग्रह २२ अंशापेक्षा खाली असेल तर तो वर येण्याची वाट पहावी लागते.
या फोटोमध्ये छताला दिसणारा प्रकाशमान भाग म्हणजे आकाश आहे. डोमच्या वरून व एका बाजूने डोममध्ये असणारी स्लिट बाजूला होते व टेलीस्कोप आकाश पाहू शकतो.
वरच्या डोमच्या फोटोमध्ये जो उजवीकडे बाहेर आलेला उलटा L चा आकार दिसतो आहे तीच ही स्लिट
तसेच या फोटोमध्ये एक सलग पिवळी आडवी पट्टी दिसत आहे.. त्याच्या वरचा डोम ३६० अंशात फिरतो व टेलीस्कोपला हव्या त्या दिशेचे आकाश दिसते.
संपूर्ण डोम व टेलीस्कोप यांच्यामध्ये अत्यंत कमी अंतर होते त्यामुळे एका फोटोमध्ये टेलीस्कोप कव्हर करता आला नाही.
टेलीस्कोप बिल्डींगवरून दिसणारे सूर्यास्ताचे विहंगम दृष्य पाहिले.
दिवसभरात भीमाशंकर भेट झाली होती. सुदैवाने एका शेकरूने बराचवेळ दर्शन दिले होते आणि अनेक दिवसांपासून ठरवलेल्या टेलीस्कोपचीही व्यवस्थीत माहिती मिळाली होती. :)
******************
१) मी या ठिकाणी एक पर्यटक म्हणून भेट दिली होती. वरील तपशीलांमध्ये काही चुकीचे असल्यास अवश्य प्रतिसादावे.
२) मला खगोलशास्त्र व टेलीस्कोपची फारशी माहिती नाहीये. टेक्नीकल तर नाहीच नाही. मात्र आपल्या काही शंका असल्या तर त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न जरूर करेन
३) येथे दिलेली माहिती कमी / त्रोटक आहे याची कल्पना आहे. आलेल्या शंकांमधून व श्री चैतन्य यांच्याकडून मिळालेल्या उत्तरातून माहितीची भर पडेल असा विश्वास आहे.
४) श्री चैतन्य राजर्षी आणि उमेश वाघेला यांचे विशेष आभार!
******************
वाचने
15991
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहीतीपुर्ण लेख आणि त्याला
माहितीपूर्ण लेख. आणि वरच्या
In reply to माहीतीपुर्ण लेख आणि त्याला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
जाण्याची वेळ, ग्रुपच्या
In reply to माहितीपूर्ण लेख. आणि वरच्या by डॉ सुहास म्हात्रे
जाण्याची वेळ, ग्रुपच्या संख्येचे वगैरे काही बंधन आहे का? तिकीट आहे का?नाही.आधी परवानगी घ्यावी लागते का? प्रेझेंटेशन सगळ्यांना देतात का?हो.आणि महत्वाचे आपल्याला दुर्बिणीतुन बघायला देतात का?या टेलीस्कोपच्या प्रकारामध्ये इमेजेस सिस्टीमवर घेवून त्याचे अॅनालिसीस करतात. त्यामुळे प्रत्यक्षात मायक्रोस्कोप सारखा आयपीस बहुदा नसावा. जर असलाच तर आपण त्याची चौकशी करूया. उत्साही मिपाकर येण्यास तयार असतील कळवा. परवानगी आणि बाकी सोपस्कार करता येतील.शेकरुचा पण एखादा फोटो डकवा की
शेकरूचा फोटो काढला नाही कारण
In reply to शेकरुचा पण एखादा फोटो डकवा की by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
फोटो दिसत नाही आहेत
चांगली आणि नवीन माहिती
ही लिंक दिल्याबद्दल
In reply to चांगली आणि नवीन माहिती by बहुगुणी
मस्त रे.
आयुकाच्या दुर्बिणीबद्दल मला
धन्यवाद, अदिती!
In reply to आयुकाच्या दुर्बिणीबद्दल मला by ३_१४ विक्षिप्त अदिती
गुड क्वेश्चन.
In reply to धन्यवाद, अदिती! by बहुगुणी
मस्त रे मोदका. इथे नक्की
छान माहिती दिलीस रे मोदका !
छान माहिती
सहीच रे... एकदा जाऊया आपण
चांगली माहिती पोहोचवलीत
सुंदर
खूप छान माहिती मोदकराव
खासच!