Skip to main content

सर्व वास्तु पांडवकालीन कश्या ?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 24/01/2014 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कोणत्या ही ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) पहायला गेलात तर तेथील स्थानिक रहिवाशी ती वास्तु पांडवकालीन आहे असा उल्लेख करतात. माझे इतिहासाचे जे वाचन झाले ते थोडेसेच, आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा योगही जास्त नाहिये. आज पर्यंत जेवढ्या ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) गोष्टी पहिल्या, स्थळांचा इतिहास स्थानिक लोकांकडुन ऐकला त्यावरुन एक अनुमान निघते की या सर्व वास्तु पांडवांनी त्यांच्या वनवासातील काळात ते इथे होते तेव्हा बांधल्या आहेत. आता पांडवांना जो वनवास झाला तो १२ वर्षाचा आणि एक वर्षाचा एकांतवास होता. त्यानंतर ते कौरवांशी लढाई मध्ये गुंतले आणि जेव्हा युधिष्ठीर राजा झाला तेव्हा त्याने केलेल्या राज्यकारभारातील काळात इतर पांडव त्याच्या बरोबरीने होते. ही एवढी शिक्षेची १३ वर्षे सोडली तर पांडव हस्तिनापुर सोडुन बाहेर गेलेले नाहित. मग आता प्रश्न असा की एवढी देवळे, लेण्या त्यांनी कधी बांधल्या. मग त्यात लोणावळ्याची एकवीरा देवी, अंबरनाथचे शंकर मंदिर, दाभोळची चंडिकादेवी, नुकत्याच अतिवास यांनी केलेल्या भीमनी घंटींचा उल्लेख. आणि इतरही बरेच काही मंदिरे, वास्तु,लेण्या ज्या पांडवांनी बांधल्या असे सर्रास सांगितले जाते त्या आल्या. औंढा नागनाथ हे मंदिर तर एका रात्रीत बांधुन पुर्ण झाले असे म्हटले जाते. मग फक्त एकांतवासचे एक वर्षाच्या काळात भारतातील बहुतेक सर्व राज्यांना पांडवांनी भेटी दिल्या होत्या काय? आणि एकांतवास भंगु नये म्हणुन ते जर सतत जागा बदलत असतील तर किती कमी वेळात हे बांधकाम झाले असेल?. ( पण एकांतवासात पांडव हे विराट राजाच्या दरबारी आश्रयाला होते.) का त्यांनी फक्त कोनशीला बसवीली आणि नंतर ते बांधकाम तिथल्या स्थानिक लोकांनी बांधकाम क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मदतीने पुर्ण केले. कारण मुळात असे कोरिव बांधकाम करायला अनेक वर्षे लागतात. कारण ताजमहाल बांधायला ही ३० वर्षाच्या वर काळ लागला होता तेही हजारो मजुर असताना आणि कुशल कारागिर असताना. मग बांधकाम क्षेत्रातील कुशलता ५ पांडवांपैकी कोणत्या पांडवाकडे होती? कारण गुरुकुलातले शिक्षण तर शस्त्रविद्या संबंधी झाले होते. जाणकार लोक काही प्रकाश टाकतील काय?

वाचने 24780
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

मी कुठलीही जाहिरात केलेली नाही व मुद्दा सोडून लिहित नाही. आपल्या(तेच तेच)वाचण्यातच खूप मोठ्ठी चूक होत आहे असे दिसते. असो. असे अवांतर मुद्दा सोडून लिहिण्याऐवजी व्यनी चा चपखल पणे वापर करावा, हि विनंती.

In reply to by आयुर्हित

हे सर्व लिखाण भूर्जपत्रावर केले जात असे. हे सर्व लिखाण ज्याला बाड(लाल कपडयात)मध्ये बांधून ठेवले जात असे,जी परंपरा आजही भारतात पाळली जाते.
म्हणजे मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे म्हणजे त्यच्यातील त्याच्यातील हस्ताक्षर गणपतीचे असणार गणपती देव आहे...म्हणजे तो अमर आहे म्हणजे सोंड असलेला माणुस शोधला की सापडला गणपती =))

In reply to by टवाळ कार्टा

"मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे" ही शक्यता एक खर्व(१००,०००,०००,०००) मध्ये एक आहे. याचे कारण देशावर झालेलले अगणित आक्रमणे, लुटालूट व जाळपोळ. सोरटी सोमनाथावर १६ आक्रमण झालेले सर्वश्रुत आहेच. नुसते एका तक्षशीला(सध्याचे पाकिस्थान) विश्वविद्यालयाबद्दल बोलायचे झाले तर आक्रमणकर्त्यांनी लावलेली आग सलग अडीच वर्षे धुमसत होती, विचार करा किती लिखाण जळाले असेल येथे! अजून एक विनंती: आपल्याला विडंबनाची, फालतू जोक्स करायची आवड असेल तर नवीन धागा अवश्य काढावा, आम्हालाही हसायला आवडतेच कि! (किमान पक्षी, आपले अज्ञान लोकांसमोर येणार नाही याची काळजी घ्यावी.)

In reply to by आयुर्हित

"मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे" ही शक्यता एक खर्व(१००,०००,०००,०००) मध्ये एक आहे. याचे कारण देशावर झालेलले अगणित आक्रमणे, लुटालूट व जाळपोळ. सोरटी सोमनाथावर १६ आक्रमण झालेले सर्वश्रुत आहेच. नुसते एका तक्षशीला(सध्याचे पाकिस्थान) विश्वविद्यालयाबद्दल बोलायचे झाले तर आक्रमणकर्त्यांनी लावलेली आग सलग अडीच वर्षे धुमसत होती, विचार करा किती लिखाण जळाले असेल येथे!
अगदी बरोबर...हे मलासुध्धा माहित आहे माझा मुद्दा असा आहे की "जर महाभारत खरोखरच गणपतीबाप्पाने लिहिले आहे असे मानले तर त्याच्यामुळे मी लिहिलेले बाकी मुद्देसुध्धा बरोबर ठरतात की" मला इतकेच लिहायचे आहे की "ज्याने कोणी महाभारत लिहिले/सांगितले तो मर्त्य मानव'च' होता पण त्याला गणपतीबाप्पाने खरोखरच खुप बुध्धी दिली होती" याउप्पर जर बाकी काहिही अर्थ काढायचा असेल तर त्याला मी काय करणार
अजून एक विनंती: आपल्याला विडंबनाची, फालतू जोक्स करायची आवड असेल तर नवीन धागा अवश्य काढावा, आम्हालाही हसायला आवडतेच कि!
नक्की
(किमान पक्षी, आपले अज्ञान लोकांसमोर येणार नाही याची काळजी घ्यावी.)
माझ्या या प्रतिसादात मी काय अज्ञान दाखवले ते जरा इस्कटुन सांगता का?

In reply to by टवाळ कार्टा

गणपती देव आहे...म्हणजे तो अमर आहे म्हणजे सोंड असलेला माणुस शोधला की सापडला गणपती
सातच चिरंजीव आहेत, ज्यात गणपतीचा उल्लेख नाही. सोंड असलेला माणूस शोधून दाखवावा.

In reply to by आयुर्हित

सोंड असलेला माणूस शोधून दाखवावा.
हाहाहा...वाटलच होतं असा काहितरी प्रतिसाद येणार...माझ्याकडे उत्तर तयार आहे पण जोपर्यंत माझ्या "सगळ्या" प्रश्नांची उत्तरे येत नाहीत तोपर्यंत मी वाट बघणार तुम्हाला तुमच्या माहीतीवर विश्वास असेल तर माझ्या "सगळ्या" प्रश्नांची उत्तरे द्या...मग आपण पुढे बोलु

In reply to by आयुर्हित

हा ग्रंथ वेदव्यास यांनी सांगितला व प्रत्यक्ष गणपतीने याचे लिखाण केलेले आहे असे मानले जाते.
माझ्या मते ही महाभारत हे गणपतीने लिहिले हे बहुधा महाभारतातील सर्वात शेवटचे प्रक्षिप्तीकरण आहे. बहुधा सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान. संपूर्ण महाभारतात गणपतीचा उल्लेख इतर कुठेही नाही. याशिवाय महाभारताच्या सर्वच पर्वांची सुरुवात "नारायणं नमस्कृत्य....." या श्लोकाने होते हे विशेष.

In reply to by चित्रगुप्त

टोपीवाले इतिहास किंवा इतर लेखन करतांना खूप कष्ट घेतात हे खरे . कलिंजरची उत्सुकतापोटी मी पण मुंबईच्या वल्ड ट्रेड सेंटरमधल्या उ प्र पर्यटनातून बरीच पत्रके आणली होती . मी आता विल्यम डर्लिंपल (जयपूर लिट फेस्टि करणारा) चे 'व्हाईट मुघल्स' आणि 'लास्ट मुघल्स वाचतो आहे . इतिहास {रंजक} कसा लिहावा याचे उत्तम उदाहरण .

मूळ प्रश्न अजिबात अनुत्तरित राहिलेला नाही . एक एक देऊळ घ्या(पांडवांनी बांधले एका रात्रीत सांगतात ते) तेथील स्थानिक काहीही आख्यायिका सांगोत ती वास्तु पांडवांनी सोडा पांडवकालीन सुध्दा ठरणार नाही . पण यावरून असा आग्रह धरता येणार नाही की पांडवांनी /कौरवांनी काहीच बांधकाम केले नाही .

>>कोणत्याही प्रकारचे वर्चस्व हे प्रथम मनात निर्माण करायचे असते... मनाने गुलाम झालेल्यांना भौतीक, राजकीय, आर्थिक गुलाम बनवायला फार श्रम पडत नाहीत. गेल्या अनेक शतकांत रुजवलेली "पश्चिमेचे ते सगळे सोने" आणि "आपले ते सगळे माती" ही विचारसरणी किती भारतियांच्या मनातून गेली आहे? योगशास्त्रही भारतिय म्हणून बुरसटलेले होते, पण ते पश्चिमेकडून "योगा" बनून आले तेव्हा कॉन्व्हेंट-शिक्षित हुच्चभ्रू समाजालाही त्याच्यावर सोन्याची झळाळी दिसू लागली. १७-१८ व्या शतकापर्यंत भारत आणि चीन यांचा प्रत्येकी सर्व जगाच्या एक त्रितियांश व्यापारावर कब्जा होतो हा इतिहास आपण कधीच विसरून गेलो आहे. अमेरिकेच्या पहिल्या दोन शतकात तेथे गेलेले युरोपियन्स त्यांच्या राजांच्या जुलूमाला आणि गरीबीला कंटाळून जिवावर उदार होऊन गेले होते हे किती जणांना आठवते? युरोपच्या सम्राटांची आणि अगदी लहानसहान राजांची नावे आठवतात याचे आपल्याला किती कौतूक असते पण भारताच्या इतिहासाच्या अज्ञानाचे दु:ख वाटत नाही. डिसइन्फरमेशन / मिसइन्फर्मेशन कँपेन हे एक फार मोठे मानसिक साधन (सायकॉलॉजीकल टूल) आहे आणि त्याचा उपयोग युद्धकाळात होतो तितकाच (किंबहुना त्यापेक्षा जास्त) शांतताकाळातही होतो. आताही जागतिक आणि भारतिय राजकारणात आपण काय फार वेगळे बघतो आहोत काय? >>>भारतीय लोक मेंढरांसारखे असतात/ आहेत हा आजचा प्रवाद काही विचारवंत करताना दिसतात. फारसा चुकीचा नाही. पण त्यामागची मनोरचना, समाजरचना, इतिहास सोयिस्कर रित्या विसरला जातो का एवढंच पहायचं होतं. प्रचंड चळवळ्या युरोपियनांनी, अमेरिकेनं जगाला बंदिशाळेत परिवर्तित केलं, आपल्याला सोयिस्कर असे शोध लावले नि अत्यंत बहिर्मुख बनवलं. आज आम्ही भारतीय त्यांचं अंधानुकरण करण्यात कृतकृत्यता मानतो. बाकी कोलंबस महाशय भारताकडंच जाणीवपूर्वक निघाले होते म्हणे. (भय्ये मुंबईला येतात तसंच असावं) >> ई एफ पार्गिटर नामक एका साहेबाने तसा प्रयत्न केलेला आहे. पुराणांतील वंशावळींतून इतिहास शोधायचा अन तो मांडायचा महत्पराक्रम त्याने केलाय पण ते काम खूप जुने आहे. त्याच्यानंतर ते काम किती पुढे गेलं ते ठौक नाही. जळ्ळं....हे पण मेल्या त्या गोर्‍या मा**नेच केलयं की काय...?

In reply to by स्वप्नांची राणी

जळ्ळं....हे पण मेल्या त्या गोर्‍या मा**नेच केलयं की काय...?
तसं कै नै. आपल्याकडेही डॉ. ग. ह. खरे, डॉ. वा. वि. मिराशी, डॉ. भगवानलाल इंद्रजी, डॉ. शोभना गोखले यांसारखे जागतिक किर्तिचे इन्डोलॉजिस्ट होऊन गेले. जबरदस्त कार्य केलंय या लोकांनी. अर्थात ह्यांची जितकी कदर व्हायला पाहिजे तितकी झाली नै हेदेखील तितकेच खरे.

In reply to by प्रचेतस

हेच तर मी म्हणतोय. भारतीय लोकाना भारतीय गोष्टींपेक्षा "इंपोर्टेड" गोष्टींचे जास्त आकर्षण आहे हीच खरी शोकांतिका आहे :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आजकालच्या सुनांना लेकीच्या आडुन सांगावं लागत नाहि महाराज (फ्फ्फ्फु ची स्मायली)

इंपोर्टेड गोष्टि त्यान्च्या विस्तृत डोक्युमेन्टेशन मुळे लिलया उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील भारतिय संशोधन तसे उपलब्ध आहे का? कदाचित हीच खरी शोकन्तीका असावि. वल्ली नी दिलेली सगळि नावे शोधतेय. डॉ. वासुदेव वीष्णु मिराशी यान्चे विकी पान दिसले, पण डॉ. भगवान्लाल ईन्द्राजी आणि डॉ. शोभना गोखले यान्चे विकि पान सुद्धा दिसत नाहीये. काही लिंन्क्स मिळु शकतील का, सिरियसलि...?

In reply to by स्वप्नांची राणी

डॉ. भगवान्लाल ईन्द्राजी आणि डॉ. शोभना गोखले यान्चे विकि पान सुद्धा दिसत नाहीये. तर मग बनवायला नको? आपण नाही तर आपला इतिहास अजून कोण लिहिणार? 'अरे! डॉ.शोभना गोखले हे पान नाही. बनवू या! सगळे मिळून मदत करा.' असा धागा का नाही काढला? सगळ्यांच्या मदतीने पान सहज तयार झाले असते. अजूनही तयार करा. मजकूराच्या विकिकरणाची मदत मी करेनच.

In reply to by निनाद

तात्पर्य काय की लिन्का नाहियेत...धन्यवाद! अवांतरः माझे काम आणि आवड दोन्हीही वाचनाशी संबन्धित असल्यामुळे ते मी भरपुर करतेच. त्यामुळे लोकांना लिहितं करणार्‍या उपक्रमाचे अभिनंन्दन आणि खुप खूप शुभेछा!! ईतके लोक लिहिणार ते वाचायला माझ्यासारखे फडश्यापाडु वाचक हवेतच ना.. तुमच्यासाठी हे.मा.शे.पो. कारण चर्चा भरकटतेय. चर्चेशी सुसन्गत काही वाटले तर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. प्रत्युत्तर ना देण्यासाठी पुनःश्च धन्यवाद!

In reply to by स्वप्नांची राणी

लिंका शोधायचा बराच प्रयत्न केला पण दुर्दैवाने ह्या संशोधकांविषयी अत्यल्प माहिती जालावर उपलब्ध आहे.

In reply to by प्रचेतस

जाणकारांनी त्यांचे लेखन मराठी विकीवर (जर अधिकारमुक्त असेल तर) टाकायचा विचार केला पाहिजे असे वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांच्याबद्दलची माहिती मराठी विकीवर नक्कीच टाकू शकेन. बाकी इंद्रजी आणि मिराशी यांचे लेखन प्रताधिकारमुक्त असावे. अर्काईव्ह.ओआरजी वर ते उपलब्धही आहे.

In reply to by प्रचेतस

वल्लीसाहेब, मग घ्याच मनावर हे भले काम. तुमच्यासारखा व्यासंगी माणूसच ते उत्तम प्रकारे करू शकेल. मराठी विकीवर असे लेखन आले तर मराठी वाचकांना सबळ शास्त्रीय माहिती तर मिळेलच पण भारतिय इतिहासाबद्दलचे अनेक गैरसमज दूर व्हायलाही मदत होईल.

सर्वात जुन्या हिंदू लेण्या वेरूळ ,बदामी ,महामल्लपुरम येथे आहेत त्या चौथ्या शतकानंतरच्या आहेत . बांधलेली देवळे नाचणा ,देवघर (म . प्र ) पाचव्या शतकात गुप्ता काळातील आहेत . नशीब त्यांनातरी पांडवांच्या नावावर खपवत नाहीत .

वर वल्लींनी दिलेल्या नावांवरून थोडे जालोत्खनन केले तर वर उल्लेखिलेल्या चार इतिहाससंशोधकांच्या अनेक पुस्तकांचा खजीना हाती लागला. ते दुवे खाली देत आहे... डॉ भगवानलाल इंद्राजी (Dr Bhagvānlal Indrājī) https://www.google.com.sa/search?safe=active&hl=en&tbm=bks&q=Bhagv%C4%8… डॉ. ग. ह. खरे (Dr G H Khare) https://www.google.com.sa/search?safe=active&hl=en&tbm=bks&q=G+H+Khare&… डॉ वा वि मिराशी (Dr V V Mirashi) https://www.google.com.sa/search?safe=active&hl=en&tbm=bks&q=V+V+MIrash… डॉ शोभना गोखले (Dr Shobhana Gokhale) https://www.google.com.sa/search?safe=active&hl=en&tbm=bks&q=Shobhana+G… प्रत्येक संशोधकाच्या नावावर खूप पुस्तकांची यादी आहे. बहुतेक मोफत सगळी वाचायला उपलब्ध आहेत. बरीचशी मोफत उतरवूनही घेता येतात. त्याच दुव्यावर (http://books.google.com.sa/) इतर लेखकांच्या नावाने शोध घेतल्यास अजून बरीच पुस्तके मिळू शकतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खुप खूप धन्यवाद एक्का सर! मला ही पुस्तके फक्त दिसतात पण लॉगिन करुनही वाचता येत नाहियेत. नो ईबूक्स अवेलॅबल असचं का दिसतय कळत नाही. अर्थात डॉ शोभना गोखले यांची मराठीतही पुस्तके आहेत पण त्यासाठी वाट पाहाणे आले.

In reply to by स्वप्नांची राणी

पुस्तके वाचायला किंवा उतरावयाला जरा द्रविडी प्राणायाम करायला लागतो. १. प्रथम गुगलवर "G H Khare free download" अशी विचारणा करा. यात फक्त पुस्तकांची गाळीव यादी येईल. २. डाव्या कोपर्‍यार वरच्या बाजूला तांबड्या रंगाचे EBOOK - FREE हे बटण दिसेल त्यावर माऊस न्या आणि दिसणार्‍या ड्रॉपडऊन बॉक्समध्ये शेवटून दुसर्‍या ओळीतला PDF पर्यायावर क्लिक करा. ३.अ. आता पुस्तक तुम्ही ऑनलाईन वाचू शकता... किंवा ३.आ. उजव्या बाजूला वर असलेले download original बटण वापरून पुस्तक PDF फाईलस्वरूपात उतरवून घेऊ शकता. ३.इ. वाचण्याच्या खिडकीत कधी कधी केवळ गार्बल्ड कॅरॅक्टर्स दिसतात. पण उतरवलेली PDF फाईल उत्तम असते.