✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रिंकू पाटील १९९०

द
देव मासा यांनी
Fri, 01/24/2014 - 03:52  ·  लेख
लेख
काल एक कविता वाचनात आली . त्यात हि ओळ होती “कोण्या पुस्तकात झाला अपमान माझा, भडकून उठले जवामर्द. भर गर्दीत रिंकू पाटील जाळली तेव्हा सारे का झाले सर्द ? '' आणि अचानक मन १९९०चा दशकात गेले त्या वेळी मी ५वीत असीन. त्याच काळात रिंकू पाटील जळीत प्रकरण घडले होते , ९०च्या काळात १०वीत शिकणाऱ्या मुलीला प्रियकर असणे हीच मोठी अशचर्यचि गोष्ट होती . या प्रकरणात तर मुलीला १०वीच्या परीक्षा केंद्रातच पेटवून दिले होते . हरीष पटेल असे काहीतरी तिच्या प्रियकराचे नाव होते . आणि तिची दुसरी सख्खी बहिण सुधा याच परीक्षा केंद्रात परीक्षा देत होती म्हणे असे पुसटसे आठवत आहे . हे प्रकरण सहज गुगल वर शोधण्याचा प्रयत्न केला म्हंटले पुढे काय झाले असेल या प्रकरणाचे पाहावे . तिच्या शाळेचे नाव माहित पडले Century Rayon High School कल्याण मध्ये आहे कुठे तरी हि शाळा , आर्कुट वर याच शाळेचा ग्रुप वर एक माणुस रिंकूची आठवण काढीत म्हणत आहे Rinku Patil 1990 Batch Do anybody still remember rinku patil. Unfortunately I am also from that most infamous Batch. Rinku was my class mate. We were in the same examination Hall. I can still remember her bubbly face. She was so excited about the examination. तिच्या प्रियकराने तिला का मारले? या प्रकरणात पुढे काय झाले ? कुनाला माहित आहे का ? अगदी जुने मराठी वर्तमान पत्र ओन- लाइन कुठे वाचू शकतो ? तसेच पुर्वी मुंबईत जागो जागी सार्वजनिक ठिकाणी '' शिवाजी ताठे '' किंवा नुसतेच ''ताठे '' पांढऱ्या खडुने लिहलेले आढळून येत असे . हे काय प्रकरण आहे? तुम्हाला काय करायची आहे नसती उठाठेव म्हणाल , तर त्या वयात मी जर हेच प्रश्न विचारले असते लोकांना तर मला हेच उत्तर मिळाले असते '' तुला काय करायची आहे नसती उठाठेव. म्हणुन आता विचारीत आहे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
59030 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

इथे थोडी माहीती दिली आहे.

हंस
Fri, 01/24/2014 - 08:25 नवीन
इथे थोडी माहीती दिली आहे. http://mobiletoi.timesofindia.com/mobile.aspx?article=yes&pageid=3&sectid=edid=&edlabel=TOIM&mydateHid=20-12-2012&pubname=Times%20of%20India%20-%20Mumbai&edname=&articleid=Ar00301&publabel=TOI
Rinku Patil (16) was set ablaze in a classroom in Ulhasnagar by a 22-year-old spurned lover,Haresh Patel,on April 30,1990.She was appearing for an SSC examination As he committed the murder inside,Patels friends Anup Pratapsingh Verma and Ashok Wagh guarded the entrance to the classroom with a sword and a revolver Patel committed suicide a day after the killing by leaping in front of a running train Verma and Wagh were held guilty for murder conspiracy and sentenced to life imprisonment by a trial court State classified Verma as one who committed an offence with highest perversity,which entails a jail term of 28 years
  • Log in or register to post comments

रिंकू पाटीलच्या वडिलांची

हंस
Fri, 01/24/2014 - 09:36 नवीन
रिंकू पाटीलच्या वडिलांची मुलाखत, पान नं. १३ - http://documents.adventistarchives.org/Periodicals/OT/OT19911201-V35-11,12.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

हे शिवाजी ताठे काय प्रकर्ण

आदूबाळ
Fri, 01/24/2014 - 12:51 नवीन
हे शिवाजी ताठे काय प्रकर्ण आहे?
  • Log in or register to post comments

ताठे.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 01/24/2014 - 13:22 नवीन
ताठे.
  • Log in or register to post comments

मात्र या भाईगर्दीत शिवाजी

आदूबाळ
Fri, 01/24/2014 - 16:08 नवीन
मात्र या भाईगर्दीत शिवाजी ताठे नावाचा माणूस लख्ख आठवून जातो. फ्लेक्स नव्हते त्या काळापासून हा ताठे नावाचा माणूस मुंबईत सर्वत्र ‘ताठे’ असं आपलं नाव लिहून ठेवायचा. हा ताठे कोण होता, ते कधी कळलंच नाही. पण मोबाइल, चॅटिंग, एसएमएस, एफबी आणि व्हॉट्सअॅबपच्या काळातही जेवढा एखाद्याचा गाजावाजा झाला नसेल तेवढा या ताठे नावाच्या माणसाने खडूने मुंबईभर आपलं नाव लिहून केला होता.
धन्यवाद! गूढकथेचं भारी पोटेन्शियल आहे यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ताठे

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 01/24/2014 - 13:29 नवीन
मी पण ठिकठिकाणी , विशेषतः रेल्वे स्टेशनवर ही अक्षरे बघितली आहेत. पण काय प्रकरण आहे ते कळले नाही.
  • Log in or register to post comments

जला है जिस्म जहां दिल भी जल

Atul Thakur
Fri, 01/24/2014 - 13:36 नवीन
जला है जिस्म जहां दिल भी जल गया होगा..अब कुरेदते हो खाक..आरजु क्या है???????
  • Log in or register to post comments

तेंव्हा लहान होतो

अर्धवटराव
Fri, 01/24/2014 - 13:48 नवीन
पण त्याबद्दलच्या बातम्या वाचुन आईबाबांचे "हे काय चाल्लय" या भावनेचे काहिसे चिंताग्रस्त, काहिसे दु:खी चेहेरे अजुनही आठवतात. ज्या शेजार्‍यांना मुली होत्या त्यांचं धास्तावणं पण आठवतय. बहुतेक याच प्रकरणावरुन तेजस्विनी चित्रपटात एका मुलीला परिक्षा हॉलमधे जीवंत जाळण्याचा सीन आहे. ते सर्व बघुन मुंबईबद्दल एकप्रकारची धास्ती वाटायला लागकी होती.
  • Log in or register to post comments

हम्मम्मा..

मी_आहे_ना
Fri, 01/24/2014 - 16:25 नवीन
"ते सर्व बघुन मुंबईबद्दल एकप्रकारची धास्ती वाटायला लागकी होती." -अगदी असेच म्हणतो. शिवाय, ते अमृता देशपांडे (सांगलीचे) प्रकरण. (त्यावरही चित्रपट आलाच) आमच्या इंजिनियरिंगच्या वर्गातले बरेचसे तिचे पूर्वीचे बॅचमेट्स. आणि तेव्हाच तो 'दुश्मन' सिनेमा आलेला (काजोल आणि अशुतोष राणा) हे सगळ आठवूनही अंगावर काटा येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तसेच पुर्वी मुंबईत जागो जागी

मदनबाण
Fri, 01/24/2014 - 20:40 नवीन
तसेच पुर्वी मुंबईत जागो जागी सार्वजनिक ठिकाणी '' शिवाजी ताठे '' किंवा नुसतेच ''ताठे '' पांढऱ्या खडुने लिहलेले आढळून येत असे . हे काय प्रकरण आहे? हो, हे खरं आहे. त्याकाळी ठाणे एसटी डेपोत अनेक एसटींवर मी "ताठे" असे पांढर्‍या खडुने लिहलेले वाचले आहे. त्यावेळी मला असेच वाटले होते ही ताठे भानगड नक्की आहे तरी काय ?
  • Log in or register to post comments

अक्षर सारखंच असायचं का हो?

आदूबाळ
Fri, 01/24/2014 - 20:44 नवीन
अक्षर सारखंच असायचं का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आता ते कसं सांगणार ? पण

मदनबाण
Fri, 01/24/2014 - 20:59 नवीन
आता ते कसं सांगणार ? पण जवळपास आगारातल्या प्रत्येक एसटीवर हे लिहलेले असायचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हो अक्षर सारखंच असायचं

खटपट्या
Sat, 01/25/2014 - 05:38 नवीन
हो अक्षर सारखंच असायचं सगळीकडे. त्यातल्या त्यात "ठ" ची ठेवण सगळीकडे सारखीच असायची. आमची खूप चर्चा व्हायची या बाबतीत. आम्ही बरेच अंदाज बांधले होते उदा. या माणसाकडे इतके खडू येतात कुठून? हा खडूच्या कारखान्यात कामाला असावा. त्याच्या कामामध्ये लोकल चा आणि बस चा प्रवास भरुपुर असावा. विशेष म्हणजे शेकडो ठिकाणी लिहून ठेवले होते तरीही त्याला प्रत्यक्ष लिहिताना कोणीच पहिले नव्हते. एक अंदाज असा कि रात्री चा लिहित असावा. फुलटू चर्चेचा विषय होता त्या वेळी. आमचा ग्रुप तर कुठेही लिहिलेले दिसले कि मोठ्याने एक सुरात वाचन करत असे "ताठे sssssssss " *smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हंस आपल्या प्रतिसादा

देव मासा
Sat, 01/25/2014 - 01:34 नवीन
हंस आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद , ताठे मधला ''ठ '' वळणदार होता , विक्रोळतील एल .बि .एस मार्गावरील सिपला Cipla कंपनीच्या भिंती वर हे नाव वाचले होते ,रोजचा येण्या -जाण्याचा रस्ता होता तों माझा , म्हणुन लक्षात आहे वळणदार ''ठ '' आणखी रस्त्यावरील दिव्यान साठी electrical junction box असतात , या लाल रंगाच्या बॉकस वर त्याचे विशेष प्रेम असावे , घाटकोपर ते भांडुप दरम्यान असलेल्या अश्या बऱ्याच लोखंडी बॉकस वर हे नाव वाचलेले आठवत आहे .
  • Log in or register to post comments

रिंकू पाटील प्रकरण झालं

रेवती
Sat, 01/25/2014 - 02:08 नवीन
रिंकू पाटील प्रकरण झालं तेंव्हा मी मुलींच्या होस्टेलला रहायचे (दुसर्‍या गावात), तरी आईबाबा बरेच घाबरले होते. त्यातून आमच्या वसतीगृहातून एक मुलगी त्याचवेळी (योगायोगाने)मुलांच्या वसतीगृहातील एकाबरोबर पळून गेल्याने आमच्यावर आधीच असलेले निर्बंध कडक झाले. रोज मेंढरे सोडावीत तश्या मोजून मुली बिल्डींगीतून सोडायच्या व एक बंदूकधारी बुवा बरोबर असायचा. परत आल्यावरही गिनती व्हायची. मुलगी पळून गेली ती उंच भिंतीवरून उडी मारून पळाली, तीही अपरात्री. आमच्या रेक्टर बाईंना राजिनामा द्यावा लागला होता. त्यातून एकदा मुलीचा मित्र हिला भेटायला अपरात्री तिच्या रूमच्या खिडकीजवळ आला होता व नेमक्या तिच्या ठिकाणी झोपलेल्या दुसर्‍या मुलीला खिडकीतून हात घालून उठवायला लागल्यावर ती किंचाळून ओरडली असे आठवते आहे. एकंदरीतच रिंकू पाटील प्रकरण आम्हाला (काही कारण नसताना) महागात पडलं होतं. वर्ष संपल्यावर लगेच बाबांनी तिथून माझे नाव काढून घरी आणले.
  • Log in or register to post comments

सगळ्यांनाच धास्ती..

मयुरा गुप्ते
Sat, 01/25/2014 - 02:27 नवीन
रिंकु पाटील प्रकरण झालं तेव्हा माझी मोठी बहीणही दहावीच्या परिक्षेला बसली होती. खुपच तणाव व धास्ती बसलेली आठवते.ज्या क्रुर प्रकारांनी तीला मारलं गेलं तो प्रकार एवढ्या दिवसा ढवळ्या सगळ्या परिक्षार्थी,पर्यवेक्षकांसमोर,दहावीच्या केंद्रावर झाल्याने पुढची खुप वर्ष केंद्रांवर अधिकप्रमाणात सुरक्षा व्यवस्था लावायला सुरुवात झाली. दहावीच्या वर्षामध्ये अभ्यास्,शाळा आणि रिंकु पाटील प्रकरण हा पुढच्या अनेक बॅचेस चा विषय होता. --मयुरा.
  • Log in or register to post comments

हे ऐकून

विकास
Sat, 01/25/2014 - 06:51 नवीन
तसेच पुर्वी मुंबईत जागो जागी सार्वजनिक ठिकाणी '' शिवाजी ताठे '' किंवा नुसतेच ''ताठे '' पांढऱ्या खडुने लिहलेले आढळून येत असे . हे काय प्रकरण आहे? कुठल्या काळात (वर्षातले) म्हणता? मी कधी बघितल्याचे आठवत नाही... हे ऐकून एकदम मारूती कांबळेच आठवला. :(
  • Log in or register to post comments

कदाचित गिरणी संप सुरु झाला

देव मासा
Sat, 01/25/2014 - 17:42 नवीन
कदाचित गिरणी संप सुरु झाला त्या नंतर पासुन अगदी १९९५ पर्यांत *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz:
  • Log in or register to post comments

हरीश पटेल ला त्याबद्दल

वेताळ
Sat, 01/25/2014 - 19:33 नवीन
फाशी झाली होती..पुढे काही महिती नाही.
  • Log in or register to post comments

अजुन एक बाजु...http:/

रोहन कुळकर्णी
Sat, 01/25/2014 - 21:07 नवीन
अजुन एक बाजु... http://expressindia.indianexpress.com/ie/daily/19990527/ige27038p.html
  • Log in or register to post comments

नकोत त्या आठवणी

बंडा मामा
Sat, 01/25/2014 - 23:33 नवीन
जुन्या जखमेवरची खपली काढल्यासारख्या वेदना झाल्या..
  • Log in or register to post comments

त्यानंतरही अ‍ॅसिड फेकणे वगैरे

शिल्पा ब
Sun, 01/26/2014 - 05:49 नवीन
त्यानंतरही अ‍ॅसिड फेकणे वगैरे भयंकर प्रकार बरेच झाले. बंडामामा यांच्याशी सहमत. :(
  • Log in or register to post comments

रींकू पाटील आणि ताठे प्रकरण

माझीही शॅम्पेन
Sun, 01/26/2014 - 11:31 नवीन
रींकू पाटील आणि ताठे प्रकरण एकाच लेखात कस काय येऊ शकत हे काही कळल नाही? तेव्हा जे वाटल तेच आता ही वाटताय दहावीत असतानाच एकदम प्रिय-कर असण म्हणजे खूप झाल !!!
  • Log in or register to post comments

पुण्यात बहुतेक त्यानंतर दोन

सविता
Tue, 01/28/2014 - 12:01 नवीन
पुण्यात बहुतेक त्यानंतर दोन तीन वर्षातच फर्ग्युसन कॅालेज मध्ये एका मुलीचा खून झाला होता आणि मग त्या मुलाने पण स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती, बहुदा जान्हवी तुपे असं नाव होतं मुलीचं!
  • Log in or register to post comments

फर्ग्युसन मधील घटना

तुषार काळभोर
Tue, 01/28/2014 - 17:26 नवीन
थोडा अधिक संदर्भ तिकडे लिहिल्याप्रमाणे ती पुण्याचे माजी खासदार कै विठ्ठल तुपे यांची कोणीही नव्हती. आणि त्या मुलाच्या कुटुंबाचीही कहाणी दुर्दैवी होती. त्या घटनेमध्ये मुलाने आत्महत्या केली, त्या धक्क्याने त्याची आई गेली. मग त्याचे वडील व लहान भाऊ दोघे राहिले. पण काही वर्षांपुर्वी त्याच्या भावाचे निधन झाले, आणि त्या धक्क्याने त्याच्या वडीलांनी आत्महत्या केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

हे माहित नव्हते. वाचून अंगावर

सविता
Tue, 01/28/2014 - 17:48 नवीन
हे माहित नव्हते. वाचून अंगावर शहारा आला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हे ताठे प्रकरण आहे काय नेमकं?

वामन देशमुख
Tue, 01/28/2014 - 13:05 नवीन
हे ताठे प्रकरण आहे काय नेमकं?
  • Log in or register to post comments

हे

अनिरुद्ध प
Tue, 01/28/2014 - 19:19 नवीन
'ताठे' असे सर्व रेल्वे स्थानका वरिल स्थानकाच्या नाम निर्देश अस्लेल्या पाट्यांवर लिहिलेले वाचले आहे मुम्बैत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

असायची हो...

प्रभाकर पेठकर
Tue, 01/28/2014 - 15:24 नवीन
९०च्या काळात १०वीत शिकणाऱ्या मुलीला प्रियकर असणे हीच मोठी अशचर्यचि गोष्ट होती .
असायची हो. ९०च्या पूर्वीही खूप होती. साठच्या दशकाच्या शेवटच्या वर्षांमध्येही शालेय प्रेमप्रकरणे होती. माझ्या वर्गातच (१९६८-६९) २ प्रेमप्रकरणे होती. पण अगदी असफल प्रेमातही एवढी क्रुरता नव्हती.
  • Log in or register to post comments

@ पेठकर काका,

सुहास..
Tue, 01/28/2014 - 19:27 नवीन
@ पेठकर काका, तुमचे होते का काही ;) ( काही त्याकाळचे किस्से एकण्यास उत्सुक असलेला )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

समाजातील स्थित्यंतरं....

प्रभाकर पेठकर
Tue, 01/28/2014 - 20:51 नवीन
आम्हाला तर ह्या भानगडवाल्यांचं कौतुक वाटायचं. 'प्रेमा'च्या पुढचं पाऊल 'लग्न' आणि लग्न करायचं म्हणजे अर्थार्जन पाहिजे (जबाबदरीचं भान होतं). शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं त्यामुळे ह्या पासून दूर होतो. 'प्रेम' म्हणजे फक्त 'लग्ना आधीची मौजमजा' हे समीकरण तरूणाईत नंतर रुजलं. 'तुम मेरी नही हो सकी तो किसी़की भी नही होगी।' हा स्वार्थी आणि स्वामित्व भावनेला खतपाणी घालणारा विचार त्याही नंतर तरूणाईच्या एका वर्गात रुजला. ह्या वर्गाकडूनच 'रिंकू पाटील' सारख्या घटना घडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

पण अगदी असफल प्रेमातही एवढी क्रुरता नव्हती.

मुक्त विहारि
Tue, 01/28/2014 - 19:34 नवीन
प्रचंड सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अगदी सामान्य माणूस आणि

देव मासा
Tue, 01/28/2014 - 19:01 नवीन
अगदी सामान्य माणूस आणि सामान्य विचाराने मला असे वाटते १६ वर्ष रिंकूचे मारण्याचे वय न्हव्ते , हंस यांनी दिलेल्या मासिकातील दुव्या मधील तिचा फोटो पाहून असे वाटते ती खूप काही करू शकली असती , ९० नंतर आलेल संगणक युग ती पाहु शकली नाही .आर्कुट , फेस -बुकची गंमत तिला अनुभवता आली नाही . म्मोल मधली शॉपिंग . पदवी नंतर सामान्य कुटुंबातील मुलांना मिळणारी एमएनसी कंपनीतल मोठा पगार आणि त्या मोठ्या पगारुतून घेता येणारा भौतिक आनंद ती उपभोगु शकली नहि. साधारण ९०चा दशका पर्यंत सुधा तुम्हाला शिक्षण पूर्ण करून चंगली नौकरी मिळेल याची शास्वती न्हवती . अभाय्स करतोये असे म्हंटले कि गल्लीतली मोठी मुले म्हणायची '' अरे अभ्यास करून कुणाचे भले झाले आहे '' पेप्सी आणि कोला आल्या नंतरचा काळ , झपाट्याने सगळे काही बदलले . किमान पदवी मिळवली तर आज कुठल्याही बिपिओ मध्ये १०-१२ हज्जाराची नौकरी हमखास मिळणारच , अशी खात्री मिळते हल्ली .
  • Log in or register to post comments

Rinku patil

sarita gangurde
Tue, 02/07/2017 - 13:28 नवीन
Rinku patil Che classmate ahe ka KonI mala tichya Baddal ani ata tiche aai vadil kay kartat kuthe asatst he kalel ka
  • Log in or register to post comments

http://www.tatheagarbatti.co

प्राची अश्विनी
Fri, 12/11/2020 - 11:43 नवीन
http://www.tatheagarbatti.co.in/ ती ताठे अगरबत्तीची जाहिरात असावी का₹?
  • Log in or register to post comments

हो. ही सोलापुरची आहे असे

चौथा कोनाडा
Fri, 12/11/2020 - 13:25 नवीन
हो. ही सोलापुरची आहे असे दाखवत आहे. पंढरपुरची ताठे अगरबत्ती सुद्धा सुप्रसिद्ध आहे. (दोन्ही एकच आहेत का ते माहित नाही) अगरबत्ती उत्कृष्ट असते. बर्‍याच वेळा वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

हरीश पटेल

Rajesh188
Fri, 12/11/2020 - 12:57 नवीन
हरीश पटेल नी आत्महत्या केली त्याची बॉडी 2 दिवसानंतर सापडली होती. आणि त्याच्या दोन साथीदार ना पोलिस नी पकडले आणि त्यांना जन्म ठेप झाली. पोलिस च्या दृष्टी नी हे प्रकरण संपले.
  • Log in or register to post comments

हरीश पटेल

Rajesh188
Fri, 12/11/2020 - 12:57 नवीन
हरीश पटेल नी आत्महत्या केली त्याची बॉडी 2 दिवसानंतर सापडली होती. आणि त्याच्या दोन साथीदार ना पोलिस नी पकडले आणि त्यांना जन्म ठेप झाली. पोलिस च्या दृष्टी नी हे प्रकरण संपले.
  • Log in or register to post comments

हरीश पटेल

Rajesh188
Fri, 12/11/2020 - 12:57 नवीन
हरीश पटेल नी आत्महत्या केली त्याची बॉडी 2 दिवसानंतर सापडली होती. आणि त्याच्या दोन साथीदार ना पोलिस नी पकडले आणि त्यांना जन्म ठेप झाली. पोलिस च्या दृष्टी नी हे प्रकरण संपले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा