✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ओला रुमाल

व
विनायक प्रभू यांनी
Wed, 01/22/2014 - 07:02  ·  लेख
लेख
"चो, एक प्रॉब्लेम आहे, जरा मदत हवी आहे".़ कथानायक, वय ५५, सर्व काही व्यवस्थित. वयाचा टप्पा, जिथे पुढे काय चा कायमचा छळवाद. "हा प्रॉब्लेम झाला तो कोइमतुर एक्सप्रेस मधे, पूणे ते लोणावळा मधे" हम्म "मी माझा नंबर एका पॅसेंजर ला दीला आहे" बर मग? "त्याला मी ७००० देणे लागतो" ???. "अरे पत्यात हरलो" ३ पत्ती? "हो" अगदी सुरुवाती पासुन, डिटेल्स सांग. "ऑफीस च्या ़कामानिमित्त पूण्याला गेलो १५ मिनीटात काम झाले. १० लाखाची ऑर्डर्‍र मिळाली. अ‍ॅड्रीनलीन लेवल जरा जास्तच होती. ३एसी मधे बसलो. टी.सी बरोबर मांडवली पण झाली. शिवा़जी नगर आउटर गाडी थांबली होती. इतक्यात दोन प्रवासी पॅसेज मधुन जात असताना माझ्याकडे बघुन हसले. मी पण हसलो. टॉयलेट मधुन परत येताना त्यातला एक म्हणाला " कार्ड खेलते हो सर"? मी पण हाय मधे होतो... " नेकी और पुछ पुछ" त्याने नविन कोरा कॅट काढला. "चलो रमी खेलेंगे" पण कॅट एकच होता. " ३ कार्ड खेलते हो". जोश मधे होतो, हो म्हणालो. इतक्यात एक सरदारजी डोकावले. त्यांनी पण खेळायची तयारी दाखवली. पण बरोबर च्या प्रवाशांनी ऑब्जेक्शन घेतले. सरदार म्हणाला " चलो २एसी मे चलो. ऊधर कोइ नही खाली पडा है". १ ल्या डावात राणी हाय वर ३५० मिळाले. २ रा मायनस ५० ३ रा प्लस ४०० एकाने आपण लोणावळ्याला उतरणार असे जाहीर केले. ४ था डाव सगळे ब्लाइंड. दोन १०० ब्लाइंड नंतर मी पत्ते बघितले. बघ्तो तर काय एक्का, दुरी, तीरी- च्यायला ंआज माझा दिवस होता. बघता बघता टेबल ५००० ला पोचले. लोणावळा पॅक. नंतर २ रा. पण सरदारजी बधायला तयार नव्हता. अचानक त्याने ३००० ब्लाइंड ची खेळी केली. आणि शो ला ६००० माझ्याकडे नव्ह्ते. डाव सोडवत नव्हता. "पैसे नही है तो गेम छोडो"- सरदारजी तिढा झाला होता. गेम बद्दल खात्री होती. मी लोणावळ्या कडे बघितले. "मेरी तरफ से डालोगे" मी हार गये तो- लोणावळा ये लो मेरा नंबर, बोले वो जगह दे दूंगा २४ घंटेमे. - मी त्याने टाकले. मी शो मागितला. सरदारजी ़ कडे २,३,५. साला ब्लाइंड लक म्ह्णतात ते ह्याला. आता ह्यावर काही उपाय? ३० मिनिटाच्या टाइम पास साठी ६००० देणे जीवावर आले आहे. मी सरदारला फोन दिला आहे. तो बँक डीटेल पाठवेल मला. उपाय नसेल तर ट्रांसफर करावे लागतील". ........ " हसतोस काय"? तुझ्या अजुनही लक्षात नाही आले ़़़का? " नाय बॉ" अरे तू कोंबडा, ओल्या रुमालाखाली सापडलेला. ़क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
संस्कृती

प्रतिक्रिया द्या
5608 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

चांगलंय

खटपट्या
Wed, 01/22/2014 - 09:00 नवीन
चांगलंय
  • Log in or register to post comments

क्रमश :

झकासराव
Wed, 01/22/2014 - 09:44 नवीन
क्रमश : :( बा द वे, एक जुनी मराठी सिरियल आठवली. त्यात वेगवेगळे भाग असायचे. असाच एक पत्त्याचा भाग होता. पण त्याची स्टोरी वेगळी होती.
  • Log in or register to post comments

विशेष काही कळलं नाही (म्हणजे

आतिवास
Wed, 01/22/2014 - 09:59 नवीन
विशेष काही कळलं नाही (म्हणजे कथानायकाला गंडवलं गेलं हे कळलं, पण त्याव्यतिरिक्त आणखी काही असल्यास कळलं नाही). बघू, पुढच्या भागात कदाचित काही कळेल मला!
  • Log in or register to post comments

दोन शंका:

आदूबाळ
Wed, 01/22/2014 - 12:34 नवीन
दोन शंका: - सरदारजीला द्यायचे पैसे लोणावळ्याने टाकले होते ना? मग ते लोणावळ्यालाच परत द्यायला पाहिजेत - नंबर सरदारजीला का दिला? - शो ला ६००० लागत असतील तर देणे ७००० चे कसे? (आधीचे डाव कथानायक प्लसमध्ये होता.) पुभाप्र. (हा बुक्का सात हजारापेक्षा जास्त आहे असं वाटतंय.)
  • Log in or register to post comments

याला म्हणतात अकाऊंट्सचा माणूस!

संजय क्षीरसागर
Wed, 01/22/2014 - 14:34 नवीन
एकदम पॉइंटचा मुद्दा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

>>> क्रमशः

प्यारे१
Wed, 01/22/2014 - 12:40 नवीन
>>> क्रमशः मस्तच सर! ओल्या रुमालाखाली कोंबडा सापडला की पंख फडफडावयला येत नाहीत त्यामुळं पळता येत नाही नि पटकन सापडतो.
  • Log in or register to post comments

ओल्या रुमालाखाली कोंबडा हे

तुमचा अभिषेक
Wed, 01/22/2014 - 13:00 नवीन
ओल्या रुमालाखाली कोंबडा हे नव्याने समजले... लेख जरा घाईत लिहिल्यासारखा वाटला.. पुलेशु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>ओल्या रुमालाखाली कोंबडा हे

सूड
Wed, 01/22/2014 - 13:39 नवीन
>>ओल्या रुमालाखाली कोंबडा हे नव्याने समजले... असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

गुर्जींचा धागा आणि (अजुन तरी)

गणपा
Wed, 01/22/2014 - 16:02 नवीन
गुर्जींचा धागा आणि (अजुन तरी) क्रिक्प्टिक काय गावंना. दया.... कुछ तो गडबड है. (क्रमशःच्या प्रतिक्षेत.) -गणा
  • Log in or register to post comments

क्रिप्टीक

रामदास
Mon, 01/27/2014 - 12:50 नवीन
चो वय ५५ --ओला रुमाल -कोंबडा हे पुरेसे क्रिप्टी़क नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

__/\__ 'अनुभव' बोलत असावा!

प्यारे१
Mon, 01/27/2014 - 14:03 नवीन
__/\__ 'अनुभव' बोलत असावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मला काही समजले नाही.

अविनाश पांढरकर
Wed, 01/22/2014 - 16:03 नवीन
जर शेवटच्या डावात कथानायकाकडे १,२,३(sequence) असे पत्ते होते आणि सरदारजीकडे २,३,५ असे पत्ते होते तर कथानायक जिंकायला हवा होता. मग कथानायक कसे काय पैसे देणे लागत होता?
  • Log in or register to post comments

२,३,५ चा सेक्वेंस जास्त

अनुप ढेरे
Wed, 01/22/2014 - 17:02 नवीन
२,३,५ चा सेक्वेंस जास्त पावरबाज असतो तीन-पत्तीमध्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश पांढरकर

धन्यवाद!!!!!!!

अविनाश पांढरकर
Wed, 01/22/2014 - 17:35 नवीन
हे माहित नव्ह्तं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

डाव

विनायक प्रभू
Wed, 01/22/2014 - 17:01 नवीन
२,३,५ सर्वात लहान म्हणुन सर्वात् मोठी
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा....जाम आवडली...

मुक्त विहारि
Wed, 01/22/2014 - 17:35 नवीन
कारण.... मी आणि माझा मित्र , १९९१ साली नागपूर ते मुंबई , गीतांजली एक्सप्रेसने येत होतो.आमच्या समोर ३ व्यापारी होते.वर्धा स्टेशन ते पुलगांव येईपर्यंत असेच ३ जण आले. त्यातला एक सरदारजी होता.आधी रमी आणि नंतर ३ पत्ती चालू करून , बडनेरा येईपर्यंत त्या ३ही व्यापारांना त्यांनी ४०/४५ हजराला गंडा घातला.
  • Log in or register to post comments

पुढे?

पैसा
Sat, 01/25/2014 - 23:20 नवीन
नक्की किती गेले?
  • Log in or register to post comments

अनामिक कथानायकाच्या नावाखाली

मारकुटे
Mon, 01/27/2014 - 13:43 नवीन
अनामिक कथानायकाच्या नावाखाली स्वतःचीच फसल्याची कथा सांगणे आवडले.
  • Log in or register to post comments

तसेही मास्तरांचे क्रिप्टिक

ऋषिकेश
Mon, 01/27/2014 - 13:51 नवीन
तसेही मास्तरांचे क्रिप्टिक समजत नसे.. त्याचाच क्रमशः झाला म्हणायचे :) कथेच्या क्रमशः भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा