...तर गुजरातमध्ये उत्तरायण (संक्रांत) हा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जातो.
( याबाबत आता अधिक माहिती देण्याची आवश्यकता नसल्याने सरळ मुद्द्यावर येतो. ;) )
२००८ साली संक्रांत हा सण बडोद्यात कसा साजरा करतात हे प्रत्यक्ष पाहिले होते आणि पुन्हा येथे येवून हे सर्व अनुभवायचे आहे हेही त्याच वेळी ठरवले होते. नंतर दरवर्षी काही ना काही कारणाने गुजरात भेट शक्य होत नव्हती. मात्र ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा मित्रमंडळीत हा विषय निघाला व इतके दिवस सुट्टी मिळेल का हे सर्वजण चेकवू लागले.
डिसेंबर मध्ये घेतलेल्या सुट्ट्या.. नवीन वर्षाची सुरूवात.. त्याचा हाफिसातला लोड.. कौटुंबीक कारणे.. अशा अनेक कारणांमुळे एक एक जण कॅन्सल होवू लागला व शेवटी बहुदा एकट्यालाच जावे लागणार याचा अंदाज आला. प्लॅन डळमळीत होतो आहे असे दिसत असतानाच माझे बडोद्यामधील मित्र; मितेशजींना कॉलवून परिस्थितीचा अंदाज घेतला तर त्यांनी अत्यंत उत्साहाने "इसबार पक्का आना, अरे फेस्टीवल बहोत बदल गया है, नक्की आवो" असे सांगून माझा डळमळीत प्लॅन पक्का करवला.
या वर्षीची बाईक ट्रीपही व्हायची होती. मग बडोद्यालाच बाईकवरून का जावू नये असा विचार आला.
एकटाच..?? बाईकवरून..?? बडोद्याला..????
अरे तो खूप वर्दळीचा हायवे आहे रे..
वेडा आहेस का..? खूप लांब आहे ते.
अरे तुझी सिटी बाईक आहे, इतके अंतर झेपेल का..? (माझ्याकडे पॅशन प्लस आहे - साडेसत्त्याण्णव सीसी!)
एखादी बुलेट तरी अरेंज कर..
मुंबईत माझ्याकडे गाडी लाव आणि पुढे बसने / ट्रेनने जा!
जा.. पण बाईकने कशाला..???
अशा अनेक सूचना / कमेंट / बोलणी यांचा भडीमार झाल्यावर जाण्याचा विचार आणखी पक्का केला गेला. :D
सर्वप्रथम पुणे ते बडोदा रूट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात आली, मुंबई नंतर वापी-वलसाड-नवसारी-सुरत-कामरेज-अंकलेश्वर-भरूच अशी ठरावीक अंतरावर मोठ्या गावांची / शहरांची सोबत आहे आणि दरम्यानचे अंतरही फारसे नाहीये. त्यामुळे "गाडी घेवून गेल्यास फार काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आला तर बघू.." आणि जाण्याची तयारी सुरू केली.
पुणे ते बडोदा - मुंबईमार्गे. हा स्टँडर्ड रूट फायनल केला व टीमबीएचपी ची साईट मुंबई-अहमदाबाद रूटसाठी चेकवायला सुरू केली. टीमबीएचपीवरील मिळेल तो धागा आणि मिळेल त्या ठिकाणाहून माहिती मिळवल्यावर लक्षात आले की हा रूट एकदम शांत आणि निवांत आहे. घाट / बोगदे / डोंगर नसलेला सरळसोट मोठाला ३ लेनचा रस्ता आहे.
प्रवासाचे टेन्शन थोडेफार उतरले. त्यात मुंबईमध्ये मुक्कामाचा प्लॅन ठरला. आता आणखी निवांत जाता येईल याची खात्री झाली.
आता प्रवासाची खर्या अर्थाने तयारी सुरू केली.
सर्वप्रथम एक स्मार्ट फोन घेतला. मुंबई आणि बडोद्यातील रस्ते शोधण्यासाठी जीपीएसची नितांत गरज होती.
गूगल मॅप्सवरती पुणे ते वाशी, वाशी ते डोंबीवली (इस्ट) आणि डोंबीवली ते घोडबंदर या रूटची अनेकदा उजळणी केली (किमान ३० ते ३५ वेळा हा रूट चेक केला असेल!!)
गुजरात टुरीझमला कॉल करून बडोद्यातील पर्यटनस्थळे आणि बाकी काय काय बघता येईल याची चौकशी केली. गुजरात टुरीझमच्या बुवाने धो धो माहिती दिली. मेल आयडी विचारून घेतला आणि सगळी माहिती मेल केली.
मिपावरच मिळालेल्या सल्ल्याप्रमाणे बाईकचे ४०,००० च्या दरम्यान रनींग झाले असल्याने क्लच प्लेट, चेन सॉकेट, ब्रेकपार्ट्स आणि सगळ्या केबल्स बदलून घेतल्या.
'बफर' म्हणून पुणे बडोदा प्रवासानंतर एक व पुण्यात परतल्यावर दोन दिवस राखीव ठेवले.
सोबत नेण्यासाठी क्लच केबल, एक ट्यूब आणि एका बाटलीत पेट्रोल घेतले.
आणि शनिवार ११ जानेवारीची वाट बघणे सुरू झाले. या दिवशी सकाळी निघायचे होते. शुक्रवारी नाईट शिफ्ट करणे गरजेचे असल्याने दुसर्या दिवशीचा प्रवास कसा होणार याचे थोडेफार टेन्शन होतेच.
अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी झोप झाली नाहीच. मात्र दोनेक तासांच्या झोपेनंतर सहा साडेसहाच्या दरम्यान एकदम फ्रेश होवून जाग आली.
बाहेर पाहिले तर पुणे धुक्याची दुलई पांघरून शांत झोपले होते..
(पर्वती सापडते आहे का वरील फोटोत..?)
ट्रेकींग सॅक आणि त्याला अडकवलेली तेथे फिरण्यासाठी लागणारी छोटी सॅक असा सुटसुटीत जामनिमा ठेवला होता.
थंड हवेत गाडी चालवायला सुरूवात केली. आता पुढे हजार दीड हजार किमी प्रवास होणार होता.
सोमाटणे फाट्यावर पहिला थांबा घेतला.
लोणावळ्यात मगनलालकडे चिक्कीची खरेदी करून लोणावळ्यानंतरचा हायवेचा माझा आवडीचा सेक्शन लागला.
डोक्यावर दोन अजस्त्र पूल.. त्यांच्या बीम मुळे तयार होणारी एक गती आणि खाली गुळगुळीत रस्ता.. (खंड्याळयातून येताना हा रस्ता डोक्यावरच्या पुलांसकट वेगवान टर्न घेतो. खल्लास मजा येते त्या सेक्शनला!!!)
मुंबई-पुणे प्रवास गाडीवरून केला असल्याने एक्प्रेस हायवे आणि त्याच्या टूव्हीलरच्या एक्झिट्स माहिती होत्या. मात्र जाताना नक्की कसे हा मुद्दा होताच त्यातही कळंबोली सर्कलवरून वाशीला जावे की उरण मार्गे हा आणखी एक मुद्दा होता. यामुळे नक्की कुठून वाशीला पोहोचायचे ते शेवटपर्यंत ठरले नव्हते. लोणावळ्यानंतर अचानक टूव्हीलरला परवानगी नसलेला एक्प्रेस हायवे सुरू झाला. एकही पाटी नाही दिशादर्शक नाही.. मग पर्याय नाही म्हणून गाडी एक्प्रेसवेवर घेतली. अचानक खोपोली एक्झिटजवळ एक खाकी युनीफॉर्म दिसला. "च्याXX मामा घेतोय साईडला असे म्हणेपर्यंत तो युनीफॉर्म एक बस ड्रायव्हर आहे असे लक्षात आले."
बस्स्स!!!! डायवर मामा को ऑपरेटीव्ह होते. सगळ्या शंका आणि रस्त्यांची माहिती व्यवस्थीतपणे मिळाली.
त्यांना धन्यवाद देवून पुढे निघालो.
त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे उरण रस्त्यावर गाडी वळवली. अचानक एका पुलावर रस्ता चुकलेला हा दिसला.
वाशीला अमोल आणि माऊसोबत छोटेसा कट्टा झाला. भगत ताराचंद साहेबांकडे खादाडी केली.
गप्पा, हशा आणि दंगा करून झाल्यावर डोंबीवलीकडे कूच केले.
डोंबीवलीला मित्राकडे तासाभरात पोहोचून फ्रेश झालो व गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळालेच नाही. रात्री नऊ वाजता जाग आली. मित्राने एका अब्दुलमियाँकडून झकास बिर्याणी व लहसूनी चिकन अरेंज केले होती.
रात्री १२ पर्यंत गप्पा मारत बसलो व नंतर उद्याच्या प्रवासाची उजळणी करत दिवस संपला..
(क्रमशः)

वाचने
23497
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
लवकरात लवकर पुढचा भाग टाकणे
हा चुकून पब्लीश झाला आहे.
In reply to लवकरात लवकर पुढचा भाग टाकणे by आदूबाळ
ते आम्हाला काय सांगता ?
In reply to हा चुकून पब्लीश झाला आहे. by मोदक
झाला झाला.. नीट पब्लीश झाला
In reply to ते आम्हाला काय सांगता ? by सुहास..
संदर्भ म्हैस!
In reply to ते आम्हाला काय सांगता ? by सुहास..
वेळ कमी पडला काय रे ? हात
गणेशा झालाय !!
आता दिसले का फटू..?
In reply to गणेशा झालाय !! by सूड
नोप!!
In reply to आता दिसले का फटू..? by मोदक
चेपू.
In reply to नोप!! by सूड
हम्म्म!!
In reply to चेपू. by मोदक
+१
In reply to गणेशा झालाय !! by सूड
आयला...बैकवर... मजा आहे
मस्त रे. पुभाप्र
मस्तं मस्तं
वाचतीये.
वाचतो आहे.
मस्त, वाचतोय
छान
वाचलं!
असे काही अचाट करायचे असल्यास,
लेका
आँ!!!!
बाईक च्या पर्फोर्मंस बद्दल पण
वा वा ! मोदकाची खूप
वाचतोय. पुभाप्र
झकास...
म्स्त झालय रे भाग!!!
फोटु दिस्त नाहीत ....
फटु
जबरदस्त आहे.... पुढचे भाग
सही .. पु.भा.प्र.
फोटो चेपूवरून अपडेट केले आहेत
In reply to सही .. पु.भा.प्र. by मी_आहे_ना
अरे दाद्या, बर्याच
In reply to फोटो चेपूवरून अपडेट केले आहेत by मोदक
ओक्के.. मला वाटले फोनवरही
In reply to अरे दाद्या, बर्याच by प्रचेतस
वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण्या
In reply to ओक्के.. मला वाटले फोनवरही by मोदक
सुरवात छान झालीये!
पुभाप्र
मस्त.. वाचतोय
मस्त फोटो आणि धागा..:)
तुमच्या उत्साहाला सलाम!
मस्त धागा! पुढील भागांची
हैशा!
Cycle konti ghyavi
http://www.misalpav.com/node
In reply to Cycle konti ghyavi by nitin Pandharkar
Dhnyawad
Dhanyawad