कुठेतरी जायचयं,कुठेतरी जायचयं, असं आम्हां उभयतांना बरेच दिवस चालले होते. अनेक लोकांशी चर्चा झाल्या, अनेकांनी अनेक ठीकाणे सुचवली. काही तर परदेशातली होती.पण तिकडे जायचे नव्हते. मग मिपा च्या सदस्यांकडून मदत मागितली.http://www.misalpav.com/node/26383 जरा सांगा कुठे जाऊ !
हक्काची विनंती केली. मिपा सदस्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. खूप ठिकाणे सांगितली. पण परत प्रोब्लेम !
एवढी ठिकाणांची लिस्ट बघुन आम्ही कनफ्युज ! कारण सगलीच ठिकाणे बघण्यासारखी होती. मग आम्ही उभयतांनी फायनल चर्चा करुन मध्य प्रदेशात जायचे ठरवले. बरं दिवस फक्त ४-५ आणि आम्हाला स्वत:च्या गाडीने फिरण्याची भारी हौस! मग काय, बसलो नकाशा घेउन. आणि ठरलं की इंदौर, भोपाळ, ओंकारेश्वर आणि back to pavilion पुणे परत.
दर वेळेला आम्ही आगावू आरक्षण करुन जातो. होटेल चे, तिथे फिरण्याचे - taxi, city tour वगैरे. म्हणजे कसं एकदम सुट्सुटीत होतं. शिवाय त्रास पण होत नाही. पण या वेळेला मात्र असा कोणताही आगावूपणा न करता जो होगा सो देखा जायेगा असं म्हणुन १८ ला सकाळी ५.३० ला निघण्याचा संकल्प सोडला.
बरोब्बर ५.३० ला निघयचे असे ठरवून आम्ही बरोब्बर ६.४५ ला (सकाळीच) निघालो. अ.नगर-शिर्डी-मनमाड-धुळे मार्गे इंदौर ला संध्याकाळी ७.३० ला पोहोचलो. तिथे गगनगामी परिभ्रमण सूचना यंत्र ( इति चित्रगुप्त. मिपा सदस्य) आपलं जी. पी. एस. द्वारे अर्ध्या तासात राजवाडा परिसरात येउन पोहोचलो. शिर्डी परिसरातला रस्ता सोडला तर बाकी रस्ता टकाटक ! धुळे मार्गे तर एन.एच. ३ लागतो. जबरदस्त रस्ता आणि जबरदस्त टोल !अर्थात रस्ता चांगला असेल तर टोल द्यायला कोण नाही म्हणेल? नकळतच खेड्शिवापूरचा टोल आठवला.
असो.
तर हां ! राजवाडा परिसरात पोहोचलो. होटेल चे आगावू आरक्षण नसल्यामुळे निवारा शोधणे क्रमप्राप्त झाले. त्यात एक तास गेला.रूम मिळाल्यावर पटकन आवरुन ( फ्रेश होऊन ;) ), सराफा बाजार च्या दिशेने कूच केले.
सराफा बाझार हा पुण्यातल्या तुळशी बागे इतका प्रसिद्ध आहे. दिवसा तिथे सराफ बाझार असतो म्हण्जे सराफांची दुकाने आहेताणि रात्री खाद्यपदार्थांचे ठेले (स्टॉल) !तिथल्या सराफांनी रात्री आपली दुकाने सुरक्षित असावीत म्हणून दुकानांच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत या ठेल्यांना परवानगी दिली. हे केव्हापासुन चालू झाले ते माहिती नाही.पण आम्ही इंदौर ला येण्याचे ठरवले ते इथे येउन खाण्यासाठीच !
तर सराफा बाझारात काय नाही. चाट - आलु टिक्की, छोले टिक्की, भुट्टे का कीस, गराडू, डोसा, भेळ, पाणीपुरी, गोड पदर्थात- चमच्याने खाता येईल इतकी घट्ट रबडी, मसाला दुधासारखा प्रकार- शिकंजी, गुलाबजामुन, काला जामुन, जिलेबी, हाताच्या पंज्याएवधी ईम्रुती, जिलेबी विथ रबडी. अजुन बरेच काही.
भुट्टे का कीस
गराडू
चाट
गुलाबजामुन
स्टॉल
रबडी
म्हणजे हे सगळे पदार्थ एक एक करुन चाखायचे म्हटले तरी ४ दिवस रहावे लागेल. आम्ही थोडे पदार्थ खाल्ले. काय करणार मन हो म्हणत होते पण पोट नाही म्हणत होते. शेवटी पोटाचाच विजय झाला. ( नेहमीचच आहे ).
शेवटी पान मस्टच ! फुलचंद नाही म्हणून बनारस मीठा वर समाधान मानले.
पण पानाने कळस चढविला आणि आम्ही होटेल कडे मार्गस्थ झालो, उद्या राजवाडा बघायचाच हे ठरवुन !
क्रमशः
गराडू
चाट
गुलाबजामुन
स्टॉल
रबडी
म्हणजे हे सगळे पदार्थ एक एक करुन चाखायचे म्हटले तरी ४ दिवस रहावे लागेल. आम्ही थोडे पदार्थ खाल्ले. काय करणार मन हो म्हणत होते पण पोट नाही म्हणत होते. शेवटी पोटाचाच विजय झाला. ( नेहमीचच आहे ).
शेवटी पान मस्टच ! फुलचंद नाही म्हणून बनारस मीठा वर समाधान मानले.
पण पानाने कळस चढविला आणि आम्ही होटेल कडे मार्गस्थ झालो, उद्या राजवाडा बघायचाच हे ठरवुन !
क्रमशः
वाचने
11990
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला....सराफा बाजाराचं वर्णन
अगदी अगदी, उतारा म्हणून
In reply to आयला....सराफा बाजाराचं वर्णन by आदूबाळ
चला , मला पण बोलवा पान खायला.
In reply to अगदी अगदी, उतारा म्हणून by लॉरी टांगटूंगकर
फक्त औरंगाबादला च मिळेल
In reply to अगदी अगदी, उतारा म्हणून by लॉरी टांगटूंगकर
बरं !
In reply to आयला....सराफा बाजाराचं वर्णन by आदूबाळ
अर्र!! भूक चाळवली. ते गराडू
गराडू म्हणजे उकडलेले सुरण
In reply to अर्र!! भूक चाळवली. ते गराडू by सूड
माझ्या माहितीप्रमाणे गराडू/
In reply to अर्र!! भूक चाळवली. ते गराडू by सूड
उत्तर द्यायला उशिर झाला
In reply to माझ्या माहितीप्रमाणे गराडू/ by कवितानागेश
छान छान छान
हो हो. मिपा वर फोटो
In reply to छान छान छान by चित्रगुप्त
खादाडीचे सर्व फोटो पाहून
इंदौर ला एक आठवडा कमी पडेल
जोशी (की भट) का "दहीबडा" नाही
उत्तर द्यायला उशिर झाला
In reply to जोशी (की भट) का "दहीबडा" नाही by शैलेन्द्र
कचोरी नाही खाल्ली? कचोरी नाही
कार्यबाहुल्यामुळे उत्तर
In reply to कचोरी नाही खाल्ली? कचोरी नाही by मृत्युन्जय
+१ टु मृत्युंजय !!
म्रुत्युन्जय काचोरि खालि
राजवाडा
एम.जी. रोड
In reply to राजवाडा by नीलकांत
उत्तर द्यायला उशिर झाला
In reply to राजवाडा by नीलकांत
आह........ इंदोर... खाऊ....
उत्तर द्यायला उशिर झाला
In reply to आह........ इंदोर... खाऊ.... by वेल्लाभट
५६ दुकानमध्ये वेगवेगळ्या
उत्तर द्यायला उशिर झाला
In reply to ५६ दुकानमध्ये वेगवेगळ्या by मोदक
मस्त भटकंती!
गोराडुं
उत्तर द्यायला उशिर झाला
In reply to गोराडुं by राही
ईंदोर विषेशता म्हणजे
फोटो फारसे क्लीअर नसूनही सारे
उद्या इन्दोरला चाललो काय खाऊ
रबडिवाले पदार्थ खा .काचमंदिर
Thanks...!
In reply to रबडिवाले पदार्थ खा .काचमंदिर by कंजूस