Skip to main content

विषयांतर प्रतिसाद झाकण्याची सुविधा हवी

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/12/2013 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मूळ प्रस्ताव विषयास धरून नसलेले विषयांतरीत प्रतिसाद झाकण्याकरता विकिंवर विषयांतर साचा असतो. दाखवा म्हटलेतरच विषयांतरीत मजकुर दिसतो. त्या मुळे चर्चेचा मूळ विषयाचा ओघ टिकवणे सोपे जाते. म्हणून विषयांतर प्रतिसाद झाकण्याची सुविधा प्रस्ताव मांडणार्‍या सदस्यांना मिपा आणि इतर मराठी संकेतस्थळांनी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा हि नम्र विनंती धन्यवाद आणि येत्या नव वर्षाच्या हार्दीक मिपापरिवारास हार्दीक शुभेच्छा.

वाचने 646
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

माहितगार मित्रा, आपल्या प्रस्तावाला माझे अनुमोदन आहे. आपण विकीसाठी काम करता असे हे व अन्य धागे पाहून वाटते. धाग्यांचे विषयांतर हा तर काहींचा फावल्या वेळातील मुख्य धंदा असतो. त्याची वाढ काही कंपूत होते व नंतर अशा लोकांची गर्दी वाढली की ते दुसऱ्या चावड्यांची ठिकाणे शोधतात असे एकंदरीत वाटते. असो.