Skip to main content

मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत) (कृपया विषयांतर नको)

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 03/01/2014 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग- "त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता" संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक (पूर्वप्रकाशित)
वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला. माझ्या मते मधुमेह हा भारतातील सर्वात गम्भीर आजार आहे. आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "मी तज्ञ डॉक्टरांना हवी तेवढी भरघोस फी देतो व त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्या बिचाऱ्यांना काहीही कल्पना नसते कि मधुमेह जर ताब्यात ठेवला नाही तर खालील पैकी काहीही होऊ शकते. १)उच्च रक्तदाब : High Blood Presure/ Atherosclerosis २)हृदयरोग : Byepass / Angioplasty /myocardial infarction /Heart failure २)मूत्राशयाचे आजार : Kidney cancer/ Kidney failure/ Proteinuria 3)दृष्टी जाणे : Glaucoma ४)पाय कापावा लागणे : Leg Amputation ५)इतर कारणास्तव उद्भवणारी महत्त्वाची शस्त्रक्रिया टाळावी लागणे ६)मेंदूचे गंभीर आजार : Brain Hemorrhage ७)कर्ण बधिरता येणे ८)क्षयरोग असल्यास योग्य ती उपाययोजना न करता येणे ९)रक्तशर्करा अचानक कमी होऊन अपघात होणे १०)गोड न खाण्याच्या पथ्याबद्दल चीड चीड होऊन घरात/बाहेर सर्व मित्र/हीतचिंतकांशी भांडणे होणे. हो हो मला कळले तुम्ही काय म्हणाल ते!!! रुग्णांना न घाबरविता, त्यांना हवी ती माहिती पुरवून त्यांना सर्व तोपरी मदत व्हावी या उद्देशाने हा धागा सुरु करत आहे.कृपया आपल्या कुटुंबात/मित्रांमध्ये जर कोणी रुग्ण असतील, तर आवश्यकतेनुसार त्यांचीहि मदत घेऊन त्यांचे प्रश्न आपण सर्वांनी समजून घेऊयात. ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी. याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कळावे, गोडवा असावा. आपला लाडका:आयुर्हीत

वाचने 82848
प्रतिक्रिया 181

प्रतिक्रिया

In reply to by चिरोटा

हो हे १००% खरे आहे. यावरील अधिक माहिती साठी "शुगर हि टेन्शनमुळेही वाढते" हा प्रतिसाद परत एकदा वाचवा. कोणी अशी व्यक्ती आपल्या माहितीत असेल तर तिलाही हि माहिती पुरवावी, हि विनंती. धन्यवाद कळावे,लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत

अनेक डॉक्टर्स/आहार तज्ञांकडून 'वाट्टेल ते खा, व्यायाम केला की प्रश्न मिटला.' अशा स्वरुपाचे सल्ले मिळतात मिडियामधून. कितपत तथ्य असते त्यात?

In reply to by चिरोटा

मिडियामधून. कितपत तथ्य असते त्यात?
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे .. मीडिया मधल्या बातम्या बघून सल्ला घेण्यापेक्षा १०० रु. खर्च केलेले बरे

In reply to by चिरोटा

वाट्टेल ते खावे ते निरोगी माणसाने. पण कोणत्याही मधुमेही /रुग्णासाठी पथ्य फार महत्त्वाचे असते. (अपवाद: आपण हे वाक्य ऐकले असेल, तर ते त्या एकट्या व्यक्तीलाच लागू होऊ शकतात, ज्याची casestudy डॉक्टरांनी पूर्ण केली आहे, ज्याची इत्यंभूत माहिती त्यांना असली पाहिजे. पण ते न करताच जर वरील सल्ला देत असतील तर मात्र धन्य ते डॉक्टर! व धन्य तो रुग्ण!!!!) यावरील अधिक माहितीसाठी "मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था" हा श्री. प्रभाकार पेठकर यांचा प्रतिसाद वाचावा. कळावे, लोभ असावा. आपला लाडका:आयुर्हीत

आपल्या जीवन शैलीत तन आणि मन या दोनही पातळीवर बदल आवश्यक आहेत. पुढच्या पिढीची काळजी फारशी करू नये. एकंदरीत आपण एकटेच येतो एकतेच जातो मग नातेसंबधात अतिरिक्त गुंतवणूक मग साहजिकच ताण ही साखळी मोडावी. एका तंगडी वर दुसरी टाकून बसू नये. व्यायाम टाळण्यासाठी मन सबबी शोधत असते त्याला गप्प बसवावे. आपले वाहन आपल्या वास्तूतून रस्त्यावर हाताने ओढत न्यावे. वाहन लांब पार्क करून बँकेत वगैरे जावे. फायदे दोन साखर वापरली जाते व डबल पार्किंग म्हणून गाडी उचलून नेली जात नाही. घरातील धुणे वाळत घालणे , मशीनवर कपडे धुणे. घरातील केर काढणे , बागेतील काम ई कामे मधुमेहीने स्वतः वर लादून घ्यावीत. दोन मजल्यापर्यंत तरी लिफ्टचा वापर करू नये.

माझ्या विषयापुरते डायबेटीसचे अनुभव सांगते. डायबेटीस आणि हिरड्यांच्या आजारांचा जवळून संबंध असतो. डायबेटीक असल्याने हिरड्यांना लवकर जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे हिरड्यातुन रक्त येणे,दुर्गंधी येणे,पू येणे,दात हलायला लागणे असे प्रकार उद्भवु शकतात. डायबेटीसमध्ये जंतूंशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रक्रुती मात्र संसर्ग धार्जिणी झालेली असू शकते. तसेच या इन्फेक्शनमुळे रक्तातील साखर वाढायला लागली असेही होउ शकते.त्यामुळेही डायबेटीसची गुंतागुंत वाढू शकते. आणि म्हणुनच मुख आरोग्य अतिशय काळजीपूर्वक सांभळले पाहिजे. ते कसे.. डेंटीस्टकडुन नियमीत तपासणी करुन घेणे. दातांची साफसफाई दर सहा महिन्यानी डेंटीस्टकडुन करुन घेणे. रोज कसे दात घासावे हे समजावून घेणे.(कसे हे फार महत्त्वाचे आहे.) कवळी वापरत असल्यास ती अत्यंत स्वच्छ ठेवणे. डायबेटीसमुळे तोंडाला कोरड पडू शकते. त्याने दात किडायचा धोका वाढतो. रक्तातील साखर नियंत्रित झाल्यावर कोरड कमी होते,न झाल्यास त्यावर उपाययोजना करुन घ्यावी. किडलेले दात, लाल झालेल्या हिरड्या,हलणारे दात यांचा वेळीच बंदोबस्त करुन घ्यावा. अती झाल्यावर डॉक्टरकडे जाऊ अशी व्रुत्ती टाळावी. ( मराठी टायपींग नीट होत नाही आहे,अशुद्धलेखन माफ करा)

In reply to by अजया

डॉक्टर अजयाजी, एक स्त्रीशक्ती (woman power)चे जाज्वल्य उदाहरण म्हणून आपले सर्वप्रथम स्वागत असो.वेळात वेळ काढून फार मोलाची माहिती दिलीत त्याबद्दलही धन्यवाद. एक मोठ्ठी चूक लक्षात आणून दिलीत आपण. ह्या लेखात मधुमेहामुळे हिरड्यांना होणारे आजार मी तर विचारातच घेतले नव्हते(आता हे ११नंबर ला येतील),जंतूंशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होणे(आता हे १२नंबर ला येतील). फार फार महत्वाचा विषय हे हा.
इन्फेक्शनमुळे रक्तातील साखर वाढायला लागली असेही होउ शकते.त्यामुळेही डायबेटीसची गुंतागुंत वाढू शकते. आणि म्हणुनच मुख आरोग्य अतिशय काळजीपूर्वक सांभाळले पाहिजे.
त्यासाठी
डेंटीस्टकडुन नियमीत तपासणी करुन घेणे. दातांची साफसफाई दर सहा महिन्यानी डेंटीस्टकडुन करुन घेणे. रोज कसे दात घासावे हे समजावून घेणे.(कसे हे फार महत्त्वाचे आहे.) कवळी वापरत असल्यास ती अत्यंत स्वच्छ ठेवणे. डायबेटीसमुळे तोंडाला कोरड पडू शकते. त्याने दात किडायचा धोका वाढतो. रक्तातील साखर नियंत्रित झाल्यावर कोरड कमी होते,न झाल्यास त्यावर उपाययोजना करुन घ्यावी. किडलेले दात, लाल झालेल्या हिरड्या,हलणारे दात यांचा वेळीच बंदोबस्त करुन घ्यावा. अती झाल्यावर डॉक्टरकडे जाऊ अशी वृत्ती टाळावी.
इतके छान मार्गदर्शन आज फक्त मिपाकारानाच मिळतेय, ह्यापेक्षा अधिक ते सुख कोणते? तर आज पासून कोण कोण करतंय तंबाखू,१२०/३००,जर्दा, किमाम, पानमसाला इ.इ. बंद........ !!!! कळवा हो आम्हाला कसे वाटले ते. कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत

In reply to by आयुर्हित

>>>>ह्या लेखात मधुमेहामुळे हिरड्यांना होणारे आजार मी तर विचारातच घेतले नव्हते(आता हे ११नंबर ला येतील), ह्याहून गंभिर दुष्परीणाम म्हणजे लैंगिक इच्छाशक्तीचा र्‍हास होतो. आयुष्यातला शारीरीक प्रणय जवळ जवळ संपुष्टात येतो. (नंबर १ ला टाका).

In reply to by प्रभाकर पेठकर

Rachel Fiske, Certified Nutrition Consultant and Owner of Madrona Wellness in San Francisco लैंगिक शक्तीचा ऱ्हासाबद्दल काय सांगतो ते पहा: 10 Surprising Foods that Kill Your Sex Life सौजन्य : The New England Journal of Medicine, Bollywoodshaadis.com

मधुमेह या रोगाबद्दल आपल्या मित्र मंडळीनी बरेच काही छान आणि माहितीपूर्ण लिहिले आहे. या विषयावर प्रचंड माहिती जालावर पुस्तकात आणि इतरत्र उपलब्ध आहेच त्यात मी आपले चार थेंब टाकण्यात फार काही हशील नाही. पण काही मुद्दे वैद्यकीय शाखेत नसलेल्या मित्रांसाठी लिहित आहे. १) मधुमेहावर नियंत्रण ठेवणे एवढे कठीण का?(व्यायाम करणे किंवा वजन कमी करणे हे एवढे अवघड का याची पण उत्तरे यात आहेत) - आपण आपला चेहरा धुतला कि तो लगेच स्व्च्छ दिसतो. फेशियल केलें तर लगेच चमकू लागतो. हा ताबडतोब दिसणारा (मूर्त) प्रभाव आहे.(tangible effect) असा कोणताही ताबडतोबीचा प्रभाव मधुमेह नियंत्रणाने दिसत नाही. त्यामुळे आज खाउन घेऊ उद्यापासून पथ्य करू असे शंभरात नव्वद लोक करीत राहतात. २)मोठ्या प्रमाणावर लोक असे आहेत ज्यांना मधुमेहाचा त्रास असा काही होत नसतो त्यामुळे आपल्याला मधुमेह आहे हे त्यांना उशिरा लक्षात येते आणि निदान झाल्यावरही त्यांच्या "लक्षात"रहात नाही. ३) कित्येक व्यक्ती रक्तातील साखर तपासणी च्या आदल्या दिवशी उपास करून जातात. यात त्यांना हे लक्षात येत नाही कि ते स्वतःला फसवत असतात कि आपल्या नातेवाईकांना कि आपल्या डॉक्टरना. यात डॉक्टरला फार काही फरक पडत नसतो कारण रक्तातील साखर कमी दिसली कि डॉक्टर औषधाचा डोस कमी करतात त्यामुळे रुग्णाची साखर मधल्या काळात वाढलेली राहते आणि त्याचा दूरगामी परिणाम रुग्णालाच भोगावा लागतो. ४)मुळात हा रोग इतका गंभीर आहे हेच लोकांना पटत नाही त्यामुळे ते जो भेटेल त्याला सल्ला विचारत राहतात किंवा आपल्या स्वतःच्या अनुभवांची देवाण घेवाण करीत राहतात. दुर्दैवाने लोक सुद्धा भेटेल त्याला स्वताचे अनुभव हे वैद्यकीय सल्ला म्हणून देत राहतात आणि त्यातून अर्धवट ज्ञान वाढीस लागलेले असते. ५) मधुमेहाचे रुग्ण आपले डॉक्टर आणि/ किंवा (पाथी- आयुर्वेद होमियो किंवा आधुनिक वैद्यकशास्त्र) प्रणाली बदलत राहतात त्यामुळे कोणत्याच पाथी चा उपाय पूर्णपणे होत नाही. शिवाय दरवेळी डॉक्टरला पैसे कशाला द्यायचे म्हणून लोक वेळच्या वेळी डॉक्टरचा सल्ला घेत नाहीत. बहुसंख्य डॉक्टरांकडे येणारे रुग्ण हे सहा ते आठ महिन्यांनी येतात. मधल्या काळात त्यांच्या मधुमेहाची पातळी काय आहे हे त्यांना सांगता येत नाही (किंवा सांगायचे नसते-दुसर्या डॉक्टर/पाथी कडे गेलेले असतात. ६) आपला ज्या पाथी वर विश्वास आहे त्या डॉक्टरला कमीत कमी एक वर्ष वेळ द्यावा म्हणजे त्यांचा गुण येतो आहे कि नाही हे आपल्याला स्पष्ट कळेल. दर दोन चार महिन्यांनी डॉक्टर बदलणे म्हणजे आपल्या मुलाला तीन महीने एका शाळेत तीन महिने दुसर्या आणि तीन महिने तिसर्या शाळेत घातल्यासारखे आहे. त्याचा अभ्यास होईल काय?डॉक्टर पासून काहीही लपवू नये असे म्हटले जाते. परंतु डॉक्टर आपल्याला ओरडतील या भीतीने सर्रास लोक लपवा छपवी करतात किंवा खोटे सांगतात. (याचे प्रमाण जवळ जवळ ९९-१०० % आहे.) ७) केवळ रक्तातील साखर तपासून आपला मधुमेह पूर्ण नियंत्रणात येत नाही त्यासाठी Hb १ C (glyacated hempoglobin) याची तपासणी आवश्यक आहे. हि तपासणी आपल्या रक्तातील साखरेची गेल्या दोन ते तीन महिन्यातील सरासरी पातळी दाखवते. http://en.wikipedia.org/wiki/Glycated_hemoglobin. साती ताई या विषयातील तज्ञ आहेत त्यांनी यावर प्रकाश टाकला तर ते योग्य ठरेल. मी एक विकिरण विशेषज्ञ आहे मधुमेह तज्ञ नाही. चूक भूल द्यावी घ्यावी. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद सुबोध सर, फारच समर्पक रीत्या काही कुरितींचा उल्लेख केलाय आपण, ज्यात
मोठ्या प्रमाणावर लोक असे आहेत ज्यांना मधुमेहाचा त्रास असा काही होत नसतो त्यामुळे आपल्याला मधुमेह आहे हे त्यांना उशिरा लक्षात येते आणि निदान झाल्यावरही त्यांच्या "लक्षात"रहात नाही.
आणि
मुळात हा रोग इतका गंभीर आहे हेच लोकांना पटत नाही त्यामुळे ते जो भेटेल त्याला सल्ला विचारत राहतात व दुर्दैवाने लोक सुद्धा भेटेल त्याला स्वताचे अनुभव हे वैद्यकीय सल्ला म्हणून देत राहतात आणि त्यातून अर्धवट ज्ञान वाढीस लागलेले असते.
सुबोध सर,आपणा सर्वांना आपले डॉक्टर/path/प्रणाली न बदलण्यासही सांगतात:
आपला ज्या पाथी वर विश्वास आहे त्या डॉक्टरला कमीत कमी एक वर्ष वेळ द्यावा म्हणजे त्यांचा गुण येतो आहे कि नाही हे आपल्याला स्पष्ट कळेल.
एक जबरदस्त नवीन माहिती हाती आली आहे ती म्हणजे
केवळ रक्तातील साखर तपासून आपला मधुमेह पूर्ण नियंत्रणात येत नाही त्यासाठी Hb १ C (glyacated hempoglobin) याची तपासणी आवश्यक आहे. हि तपासणी आपल्या रक्तातील साखरेची गेल्या दोन ते तीन महिन्यातील सरासरी पातळी दाखवते.
From wikipedia_Glycated_hemoglobin In general, the reference range(that found in healthy persons)is about 20–40 mmol/mol (4–5.9 DCCT %). Higher levels of HbA1c are found in people with persistently elevated blood sugar, as in diabetes mellitus. The International Diabetes Federation and American College of Endocrinology recommend HbA1c values below 48 mmol/mol (6.5 DCCT %) A retrospective study of 47,970 diabetes patients found that patients with an A1C more than 48 mmol/mol (6.5 DCCT %) had an increased mortality rate कळावे,लोभ असावा आपला लाडका: आयुर्हीत

कोणीतरी आवरा हो या आयुर्हितचिंतक 'अखिल पाघळे'ना..!! चांगल्या प्रतिसादाच्य मागे पुढे हे शेपुट आहेच साऱखे..

In reply to by अस्वस्थामा

लाइव्ह कॉमेंट्री चा असाही आस्वाद घेता येतो .. ते आजकालच्या मेडिया ला झालेय नं... तेच तेच पुन्हा पुन्हा ... वाक्याची तोडफोड करून सांगणे मधुमेहापेक्षा भयानक खी खी खी

In reply to by नित्य नुतन

आस्वाद घेता येतो ही चांगली बाब आहे. आपल्याप्रमाणे सर्वांना(अगदी मधुमेही रुग्णांनाही)आयुष्यभर आस्वाद घेता यावी या साठीच आहे हा उपक्रम. अधिक खोलात जाऊन विचार करायची वेळ आली आहे, म्हणून हे बारीक तपशील परत उद्धृत (highlight)करणे महत्त्वाचे वाटते मला. गंभीरपणे(seriously) सांगतो, आत्तापासून फक्त एक आठवडा साखर/गोड/आवडीचे पदार्थ खाणे बंद करून पहा, म्हणजे समजेल आपल्याया! १५ जानेवारीला भेटूच परत. कळावे, लोभ असावा. आपला लाडका,आयुर्हीत

In reply to by आयुर्हित

ओक्के आयुर्हित काका आता तुम्ही डायरेक्ट १५ जानेवारीलाच या धाग्यावर परत प्रतिसाद द्या... तुमच्या हेतुंबद्दल कोणाच्याही मनात येथे शंका नाही... धागा खरोखर माहीतीपुर्ण व्हावा त्याचा सिरियसनेस रहावा यासाठीच सगळे तुम्हाला आवरायचा प्रयत्न करतायत.. . प्रत्येक प्रतिसादानंतर त्यातले मुद्दे हायलाईट करणारा उपप्र्तिसाद द्यायची खरच गरज नाहीये.. महत्वाचे मुद्दे स्वतः समजुन घेण्याईतका इथला प्रत्येक सदस्य सुजाण आहेच.. कुठलाही मुद्दा कोणाच्याही नजरेतुन मिस होणार नाही याची खात्री बाळगा... वाट्ल्यास चर्चा संपत आल्यावर तुम्ही ' कन्क्लूजन ' चा एक मोठा प्रतिसाद द्या.. त्यात सगळे मुद्दे अधोरेखित करा.. रादर आपण सगळेच करु.... या धाग्यावर अतिशय उत्क्रुष्ट चर्चा घडवुन आणण्यास मिपाकर समर्थ आहेत.. तुम्ही निश्चिंत रहा.. जस्ट वेट अँड वॉच!!!

उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. मधुमेहाविषयी प्रबोधन आणि चर्चा होणं जरुरी आहेच. पण .. तरीही मला मधेच होमशॉप १८ पाहात / ऐकत असल्याचा फील का येतोय? की हेही शुगर वाढल्याचं लक्षण ? ;)

In reply to by गवि

धाग्याचा बाजार उठणार हे आधीच्या प्रतिक्रियेत जाणल होत :) आयला मधुमेह परवडला पण प्रतिक्रिया आवरा म्हणाव , आमच्या कडे म्हणतात गाढव मारताय ओझाने अं शिंगरू मरताय हेलपाट्यने !!!!

आयुर्हित आपण स्वतः मधुमेहग्रस्त आहात का फक्त इतरांच्या मधुमेहाची काळजी जिकडेतिकडे घेता?

In reply to by प्यारे१

उत्तरासाठी परत एकदा डायबेटिस अर्थात मधुमेह: लक्षणे, कारणे व उपाय या प्रतिसादातील ताजा कलम वाचावे. कृपया विषयांतर टाळावे व मुद्द्याचे प्रश्न ह्या लेखात विचारावे, ज्याने सर्वांना याचा फायदा होईल(असे प्रश्न व्यनि तूनच विचारावे)ही विनंती.

रक्त तपासणी साठी स्वस्तात मस्त शुगर स्ट्रिप मशीन कुठे उपलब्ध आहे का?

शक्यतोवर जवळच्या मेडीकल शॉप मधून घेणे. सोबत medicated cotton व spirit ही घ्यावे. मार्केट भाव माहिती साठी Ebay वर Accu check १३९९/- व १०० स्ट्रिप्स २४०/(with free door delivery.)

In reply to by आयुर्हित

यांचा रेगुलर वापर करणारे लोक याची अ‍ॅक्युरसी किती यावर प्रकाश टाकू शकतील का?

In reply to by उद्दाम

क्षमा करा, मला वापरावे लागत नाही त्यामुळे अधिक माहिती देता येणार नाही. पण माझ्या मते अगदी ९५ ते ९९% accuracy असावी असा अंदाज आहे. यात calibration ची सोय नसावी. जर आपल्यात कोणाला मधुमेह असेल तर येणारे/असलेले अनुभव शेअर करावेत व आमच्या या धाग्याचा काही फायदा झाल्यास ते हि कळवावे हि विनंती. आपला मिपास्नेही : आयुर्हीत

हो वापरत आहे आई साठी ; रीलायबल आहे, डायबेटोलॉजीस्ट ने सा.न्गीतले आहे वाप्राय्ला आणी रीडी.न्ज त्या.ना चालतात आपण घेतलेले हे म्शीन वापरुन सोर्री फोर बॅड टायपी.न्ग

Journal of Nutrition मध्ये आलेले नवीन संशोधन आपल्या सर्वांसाठी उपयोगी आहे. रेड वाईन प्या मधुमेह टाळा! (अर्थात हे ज्यांची साखर व वजन दोन्ही नियंत्रणात आहे त्यांनीच याचा फायदा घ्यावा) कृपया लक्षात घ्या: यात चकण्याचा उल्लेख नाही, त्यामुळे फक्त रेड वाईन प्या! तेही प्रमाणात म्हणजे १ ते १.५ पेग, जेवण्याच्या अर्धा तास आधी! ज्यांना रेड वाईन चालत नाही त्यासाठी काळ्या गाजराची कांजी थोड्या फार प्रमाणात नक्कीच मदत करेल. (धन्यवाद विवेकजी) कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत

In reply to by आयुर्हित

मला वाटतं रेड वाईन मध्ये सर्वात जास्त साखर आणि उष्मांक असतात. मधूमेहासाठी कसे चालेल? >>>>चकण्याचा 'चकणा' नाही हो, 'चखना'. हा हिन्दी शब्द आहे. ह्याचा अर्थ, 'कांही तरी चाखून पाहण्याचा पदार्थ'. मद्याबरोबर कांहीतरी 'चाखतमाखत' खाण्यासाठी जे लागतं त्याला 'चखना' म्हणता. 'चकणा' हा डोळ्यांमध्ये समन्वय नसण्याचा शारीरीक दोष आहे.

In reply to by आयुर्हित

आयुर्हित साहेब, तुमच्या वरील प्रतिसादात 'रेड वाईन प्या मधुमेह टाळा!' असा सरसकट सल्ला आहे. त्यात किती प्या हे दिलेले नाही. म्हणजेच नुसत्या GI चा विचार मांडला आहे. GL चा नाही. तुम्ही देताय तो हिशोब व्हिस्कीच्या एका पेगाचा (३० ml) आहे. व्हिस्की आणि वाईन आणि बिअर ह्यांच्या संदर्भात पेगची व्याख्या बदलत जाते. . (1units=30ml whiskey =100 ml wine= 250 ml beer) कालच्याच पार्टीत माझ्या असं निदर्शनास आलं की सर्वसामान्य माणूस, एका बैठकीत, जवळजवळ पाऊण लिटर हाऊस वाईन पितो. तुम्ही हिशोब मांडला आहे तो ड्राय वाईनचा वाटतो आहे. स्वीट वाईन मध्ये जास्त साखर असते. नुसते रेड वाईन प्या आणि मधुमेह टाळा हा सल्ला गोंधळात टाकणारा आहे. रोज फक्त १ औंस (३० एम एल ) ड्राय वाईन प्या आणि मधुमेह टाळा असा सल्ला असू शकतो. वाईन मध्ये LCBO नांवाचा साखर मोजणारा कोड असतो. ० ते ३० ह्या अंकात तो मोजला जातो. १-२ हा ड्राय वाईनचा, ३ ते ६ हा मध्यम ड्राय वाईनचा ७ ते ३० स्वीट वाईनचा असतो. नुसते वाईन म्हंटल्यास १ ते ३० ह्या रेंज मधील सर्व वाईन्स येतात. जास्त साखरेचे प्रमाण आणि एका बैठकीत अर्धी बाटली वाईन पिणार्‍यांच्या (जे नॉर्मल आहे) पोटात किती साखर आणि उष्मांक जात असेल?

In reply to by प्रभाकर पेठकर

धन्यवाद पेठकर काका, अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे आपण. कृपया माझा प्रतिसाद सर्वांनी परत एकदा "in detail" वाचणे ही विनंती. पेठकर काकांचे मुद्दे व माझा प्रतिसाद यातील तफावत: १)सरसकट सल्ला आहे.: साफ चुकताय आपण conditions परत एकदा वाचणे. २)किती प्या हे दिलेले नाही.: साफ चुकताय आपण प्रमाण परत एकदा वाचणे. 3)नुसत्या GI चा विचार मांडला आहे, GL चा नाही.: zero आहे, त्यामुळे GL ही zero! ४)हिशोब एका पेगाचा आहे: अगदी बरोबर वाचले. याबाबतीत मी अधिकच काळजी घेतली आहे. एक पेग म्हणजे precisely १ औंस=२९.५ml (even तुम्ही म्हणता तेवढे ३०ml ही नाही). हे एक माप असते, जे bar मध्ये वापरले जाते. आपल्या जवळच्या bar मध्येहि जाऊन आपण चेक करू शकता. ५)सर्वसामान्य माणूस, एका बैठकीत, जवळजवळ पाऊण लिटर हाऊस वाईन पितो.: असेलही. किती प्यायची हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आपण येथे फक्त मधुमेही रुग्णांचाच विचार करतोय, त्याने प्रमाणातच, दिलेल्या पद्धतीत, conditions पूर्ण होत असेल तरच प्यावी हेच खरे., ६)जर आपण जेवणातही साखर कमी जावी असे म्हणतोय, तर वाईन मध्ये तरी कशाला हवी? त्यामुळे स्वीट हा शब्द वर्ज्य करू यात, अगदी वाईन मध्येही. In Short go for lesser GI only. ७)Wine Pairing with foods: याची अधिक माहिती घेतल्यास,स्वीट वाईन बद्दल काहीच शंका राहणार नाहीत.(कारण स्वीट वाईन फक्त स्वीट डिश बरोबरच घेतली जाते) कृपया काहीही गोंधळ वाटला असेल तर मिपावर विचारून मगच पेग उचला! कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत

In reply to by आयुर्हित

१ औंस=२९.५ml ही व्हिस्कीची सर्व्हींग साईज आहे. वाईनची नाही. ३० ml म्हणजे दोन टेबलस्पून होते. तेवढी तरी का घ्यावी मग? घेऊच नये नं. The standard portion size of dry red wine is 4 oz. (म्हणजे २९.५ X ४ = ११८ ml) and contains around 100 calories. मधूमेही माणसाने नुसती साखरच नाही तर उष्मांकावरही लक्ष द्यावे लागते. तेल, तेलकट पदार्थही टाळावे लागतात. नुसता इन्सुलीनचा विचार न करता यकृतावर ताण देणार्‍या गोष्टीही टाळाव्या लागतात. Although red table wine has a glycemic index of zero, it is important to remember that the sweet wines have more residual sugar, a higher carbohydrate content, more calories and a greater percentage of alcohol per ounce than the dry red table wines. तुमचे सरसकट विधान असे आहे की 'रेड वाईन प्या आणि मधूमेह टाळा'. रेड वाईन मध्ये तीन प्रकार येतात ड्राय, सेमी ड्राय (किंवा सेमी स्वीट) आणि स्वीट रेड वाईन. ह्यापैकी फक्त ड्राय रेड वाईनच चालू शकेल. सर्व रेड वाईन्स नाही. आपण स्वीट वाईन्सचा विचार करायचा नाही हे तुम्ही फक्त ह्या प्रतिसादात म्हंटले आहे. मूळ प्रतिसादात ड्राय रेड वाईन आणि स्वीट रेड वाईन असा फरक न करता सरसकट रेड वाईन असा शब्दप्रयोग आहे. तरीही तुमचा २९.५ ml रेड वाईनचा आग्रह असेल तर माझी हरकत नाही. व्यक्तिशः मी वाईनकडे पाहणारही नाही. मधूमेह नियंत्रणात ठेवायचे अनेक सोपे उपाय आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काकांचा मुद्दा अगदी रास्तच आहे.मधुमेही रुग्णांनी खूप खूप विचार करूनच आपला आहार ठरवावा. यासाठी शक्य असेल तर आहारतज्ञांचेही मार्गदर्शन घेतले पाहिजे. जे फक्त मधुमेह तज्ञ आहेत त्यांनीही आहाराबद्दल अधिक माहिती मधुमेही रुग्णांना द्यावी असे मला मनापासून वाटते. कारण “Let food be thy medicine and medicine be thy food” ― Hippocrates वाइन न पिणाऱ्या मधुमेही रुग्णासाठी साखरेशिवाय चहा, चॉकलेट व बेरी वर्गातील फळे उपयोगी पडू शक्तील असे संशोधन हाती आले आहे. पण याचा वापर करतांना पेठकर काकांचा मुद्दा लक्षात ठेवावा. सर्वात महत्त्वाचे आपल्या डॉक्टरांना विचारूनच ह्याचा फायदा घ्यावा. "मेरी बेरी के बेर मत तोडो" असे इतरांना सांगून फक्त मधुमेही रुग्णांनाच याचा फायदा घेऊ द्यावा म्हणजे स्वतः तोडून द्यावीत जेणे करून त्यांना काटाही लागणार नाही. चू.भू.दे.घे. धन्यवाद कळावे, लोभ असावा आपला लाडका :आयुर्हीत

ajoon ek taaka re Konitari

या धाग्यावर काही नवीन म्हणी/घोषवाक्ये सुचलीत. जिलब्या टाळा! मधुमेहाला आळा! किंवा आपलाच धागा नि आपलेच प्रतिसाद!

Clinical Oral Investigations च्या निष्कर्षानुसार motivational health coaching केलेल्या मधुमेही रुग्णामधील loose teeth disease च्या त्रासांपासून ५०% फायदा झाला आहे व रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी झाले आहे. यांत मुख्यत्वे योग्य आहार, तणाव मुक्त जीवन व मुख आरोग्य यावर ३ ते ६ वेळेला माहिती देण्यात आली होती.

आम्ही नेहमी मानत आलो आहे कि न्याहारी ही राजाप्रमाणे असावी, म्हणजेच नियमित पुरेसी व पौष्टीक असावी. हाती आलेल्या Public Health Nutrition च्या नवीनतम(latest) अहवालानुसार जी व्यक्ती आपल्या युवावस्थेत नियमितपणे न्याहारी/ नाश्ता/ breakfast करत असते, ती तीच्या पुढील प्रौढ आयुष्यात चयापचयाची क्रिया(metabolism) उत्तम ठेऊन पोटावरील चरबी (ढेरी) वाढणे (gut fat), उच्च रक्तदाब आणि रक्तात जादा साखर असणे(IGT/मधुमेह) अशा व चयापचयात बिघाड होण्यामुळे (metabolic syndrom) झालेल्या इतरहि अनेक आजारापासून स्वत:ला कायमस्वरूपी मुक्त ठेवू शकते. गेल्या २७ वर्षे चाललेल्या अध्ययनाअंती असे आढळून आले आहे की, नियमित न्याहारी घेणाऱ्या लोकांपेक्षा न्याहारी न घेणाऱ्या लोकांमध्ये चयापचयात बिघाड होण्याचा धोका ६८% ने जास्त आहे. तर मग मित्रांनो, घ्याल ना नियमितपणे न्याहारी! कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत

In reply to by आयुर्हित

तेल अविव विद्यापीठातील नवीन संशोधनानुसार जास्त उर्जादायी पौष्टिक न्याहारी व त्यामानाने कमीत कमी उर्जा असणारे रात्रीच जेवण घेवून रक्तातील साखरेचे प्रमाण २०%ने कमी करता येणे शक्य आहे. A new Tel Aviv University study published in Diabetologia proposes a new way to suppress deadly glucose surges throughout the day - eating a high-caloric breakfast and a more modest dinner Health tips for diabetics: Have high-energy breakfast

International Public Health Organization चा अहवाल. मधुमेह, ह्र्दयरोग व कॅन्सर या सारखे इतरही आजार काबूत यावेत म्हणून अवास्तव वाढणाऱ्या वजनाला रोखण्यासाठी सरकारने फास्ट फूड, शीत पेये, रासायनिक खते व जंतुनाशके यावर योग्य ते कडक निर्बंध घातले पाहिजेत हे म्हणणे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे (world health organisation) सरकारे रोक सकती है मोटापा

हाती आलेल्या U.S. Surgeon General’s Report नुसार धुम्रपानामुळे शरीराचे अतोनात नुकसान तर होतेच त्याच बरोबर मधुमेह(Type2)होण्याचा धोका ३० ते ४०% ने वाढतो.

माहितीचा अभाव हेच मोठे आव्हान आहे हे म्हणणे आहे पद्म श्री डॉक्टर व्ही मोहन यांचे. 'Lack of awareness biggest challenge in treating diabetes' ही बातमी वाचूनच थक्क झालो! कारण "telediabetology van" हा एक उत्तम मार्ग शोधला आहे पद्म श्री डॉक्टर व्ही मोहन यांनी माहितीचा प्रचार करण्यासाठी. The solution, according to him, is urgent implementation of four A's of diabetes care (availability, accessibility, affordability and acceptability) in the villages.

Nature Genetics च्या नवीन शोधानुसार,पेशीतील SLC30A8 जीन्स च्या Mutuation मुळे मधुमेहाचा धोका ६५% ने कमी होतो. SLC30A8 जीन्सचा स्वादुपिंडाच्या इन्सुलिन तयार करणाऱ्या Beta Cells च्या कामात महत्वाचा सहभाग आहे. ZnT8 प्रथिने इन्सुलिन तयार करणाऱ्या Beta Cells साठी झिंक Zinc वाहून नेतात, ज्यामुळे इन्सुलिनचे स्फटिक तयार होण्यास (the crystallization of insulin) मदत होते. पुढील शोधनिबंध हाती येई पर्यंत आपण अधिक झिंक मिळवण्यासाठी समुद्री ऑईस्टर Oysters(शिंपले), व्हीट जर्म Wheat Germ, भोपळ्याच्या व जवसाच्या बिया, काजू, बदाम,पिस्ता,अक्रोड,शेंगदाणे,पाईननट, हेजलनट, राजमा, काळेचणे Black beans, छोले खाऊ या!

नुकतेच मुधमेहाच्या रुग्णांना भविष्यात दिलासा मिळवून देईल, असे संशोधनही जगापुढे मांडण्यात आले आहे. मधुमेही रुग्ण इन्सुलीन हे संप्रेरक कमी प्रमाणात बनवतात; त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. स्वादुपिंडातील बीटा पेशीसमूहांमध्ये तयार झालेल्या दोषामुळे हे घडत असते. या वाढलेल्या साखरेमुळे मूत्रपिंड, डोळे यांवर दूरगामी परिणाम होऊन व्यक्ती कोमातही जाऊ शकते. मुधमेहींना इन्सुलीन किंवा अन्य औषधे घेऊन साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे लागते. मानवी शरीरातील इन्सुलीन बनवणार्‍या पेशींमध्ये रूपांतर करता आले आहे. या रूपांतरित मानवी पेशी उंदरांमध्ये चांगल्या प्रकारे इन्सुलीन बनवून रक्तातील साखरेचे प्रमाण राखताना दिसल्या. साभार: लोकमत वरदान स्टेमसेल्सचे

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने साखर खाण्याबाबत बंधनावर नवीन मार्गदर्शक मसुदा तयार करतांना कमीत कमी साखर(ज्यात गोड पदार्थ, मध, फळांचा रस, सिरप्स, शीतपेये व इतर पदार्थात लपलेली साखर)खावी असा आरोग्यसल्ला दिला आहे, जेणेकरून लोकांमधील स्थूलता, दंतक्षय, मधुमेह कमी होण्यास व गंभीर आजार टाळण्यास मोलाची मदत होईल. Pure, White and Deadly हे पुस्तक John Yudkin ह्या प्राध्यापक महाशयांनी १९७२ सालीच लिहिले होते, ज्यावर बऱ्याच भांडवलदारांनी बंधने घातली होती. परंतु त्यांनी मांडलेल्या साखरेवरच्या बंधनाचे विचार आज काळाची गरज ठरले आहेत.

दही जर तुम्हांला आवडत असेल तर ते अधिक प्रमाणात खा.. कारण दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो. युनिव्हरसीटी ऑफ केंब्रीजच्या नीता फोरौही यांनी केलेल्या संशोधनात असे समोर आले की, दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो. दह्यामधील गुणधर्मांमुळे हा धोका २८ टक्क्यांपर्यंत कमी होतो. या संशोधनासाठी ब्रिटनच्या २५००० पुरूष आणि महिलांचा समावेश करण्यात आला. या संशोधनात ७५३ जणांच्या एका आठवड्याच्या खाण्यामधील पदार्थांची तुलना करण्यात आली. या २५ हजार जणांना पुढील ११ वर्षात टाइप २ डायबेटीजची शक्यता आहे. दही आणि पनीर सारख्या दुग्धजन्य पदार्थ खाणाऱ्यांमध्ये ११ वर्षात टाइप २ डायबेटीजचा धोका २४ टक्क्यांनी कमी होतो. दुग्धजन्य पदार्थांतून प्रोबायोटिक बॅक्टेरिया आणि आंबविण्याच्या प्रक्रियेमुळे त्यात एक व्हिटॅमिन तयार होते. ते खूप लाभदायक असते. सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात दही खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दही खाल्याने मधुमेह म्हणजे डायबिटीजचा धोका कमी होऊ शकतो. साभार:Live कोल्हापूर

भारतातील प्रत्येकी १० माणसांमागे एकाला मूत्रपिंड विकार होण्याची शक्यता आहे. ह्या १० लोकांपैकी मधुमेह व त्यासोबत उच्च रक्तदाब असलेले ६ रुग्ण सापडतात. कोणत्याही क्षणी किमान ५ लाख लोकांना मूत्रपिंड बदलायचे असते किंवा डायलिसीस वर अवलंबून राहावे लागते. फक्त पुण्यात सांगायचे झाले तर किमान १०हजार रुग्णांना मूत्रपिंड विकार आहे. मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा. भरपूर पाणी प्या. स्वतःहून कुठलीही औषधे घेणे टाळा. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. फास्ट फूड टाळा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. रक्तदाब-मधुमेह असल्यास अधिक काळजी घ्या. ठराविक अंतराने लघवी-रक्त तपासा. डायबेटिस, बीपीच्या पेशंटने दर सहा महिन्यात रक्तातील चरबी (कोलोस्टरॉल), किडनीसाठी क्रेयाटिन, लघवी याच्या नियमित चाचण्या केल्यास किडनी विकार बळावणार नाही. साभार:किडनीची काळजी घ्या ‘डायबेटिस’च्या १० हजार पेशंटला किडनीचे विकार

In reply to by आयुर्हित

गुर्दे की बीमारी गंभीर समस्या बनती जा रही है। देश की करीब आठ फीसद आबादी जहां इसकी चपेट में है वहीं पूर्वाचल में यह तादाद इससे कहीं ज्यादा है। गंभीर बात तो है बीमारी के लक्षण तब सामने आते हैं जब गुर्दे सत्तर से अस्सी फीसद क्षतिग्रस्त हो चुके होते हैं। तब तक इलाज बेहद कठिन होता है। ये कहना है गुर्दा रोग विशेषज्ञ डा. आनन्द बंका जीका. आगे पढिये:मधुमेह, बीपी, दर्द निवारक दवाएं गुर्दे के दुश्मन

तुमचा संदेश मिळाला- सवडीने याविषयावर नक्की लिहीन- इथे अनेकांनी उपयुक्त माहिती दिली आहे, त्यामुळे पुनरावृत्ती करत नाही पण डायबेटिस यूकेची ही वेबसाईट नक्की बघा, छान माहिती आहे सर्वसामान्यांना कळेलशी. तसेच डायबेटिसच्या रुग्णांसाठी हेल्दी इंडियन कुकिंग फॉर डायबेटिस हे एक रेसिपी बुक सुद्धा सुचवू शकतो. आणखी एक- डायबेटिस आणि तत्सम दीर्घकालिन आजारांबाबत आता इथे यूकेमध्ये तरी विशेषज्ञांवर, हॉस्पिटल्स वर जास्त अवलंबून न राहाता कम्युनिटी केअर, स्पेशालिस्ट डायबेटिक नर्सिंग, इ.द्वारे एक सर्वंकष आरोग्य (holistic care) वा एकात्मिक आरोग्य (integrated care) पद्धतीने एकप्रकारे de-medicalisation of medicine करणारी मॉडेल्स आता आम्ही विकसित करत आहोत आणि त्यात यशसुद्धा येत आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

In reply to by बाळकराम

धन्यवाद, आपण मोलाची माहिती दिल्याबद्दल. लवकरच अजून इतर माहितीही येऊ द्यात. आता आपण सर्वंकष आरोग्य वा एकात्मिक आरोग्य पद्धतीने एकप्रकारे de-medicalisation of medicine करणारी मॉडेल्स विकसित करत आहात, हे वाचून बरे वाटले. पण आयुर्वेदात व हठयोगात या पद्धती सांगितल्या आहेतच की. योगगुरू बाबा रामदेव यांचे Yoga for Diabetes (Madhumeh Ke Liye) हे या विषयावर खूप मोठे योगदान आहे. आपले काय विचार आहेत या वर?

In reply to by आयुर्हित

नियंत्रणासाठी मोलाचा उपयोग होऊ शकतो, नव्हे होतोच विशेषतः त्यातल्या पथ्यापथ्य संकल्पनेचा. त्यामुळे आयुर्वेदाचा अर्वाचीन उपचार पद्धतीला पूरक म्हणून मोलाचा उपयोग होउ शकतो याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. रामदेव बाबांबद्दल माझे मात्र मत चांगले नाही- हा एक ढोंगी बाबा असून- अशा सातवी नापास माणसाने आरोग्यक्षेत्रात लुडबूड करावी हीच गोष्ट चीड आणणारी आहे. योग, ध्यान वा तत्सम भारतीय पद्धतींचे महत्त्व मी वेगळे सांगण्याची गरज नाही पण त्या आधारे रामदेव बाबा वा बालाजी तांब्यांसारख्या भामट्यांनी आपली दुकाने चालवून आपले खिसे भरु नयेत असे माझे स्पष्ट मत आहे.

In reply to by बाळकराम

Hippocrates, आचार्य चरक, महर्षी सुश्रुत हे तर सातवीच काय पण (मेकालेच्या पद्धतीच्या)शाळेतही गेलेले नाहीत. याचा अर्थ मग तुमच्या मते आरोग्यक्षेत्रात लुडबूड फक्त जास्त शिकलेल्या लोकांनीच, तज्ञ डॉक्टरांनीच करावी! असे आहे का?

In reply to by आयुर्हित

सारख्याची तुलना तुम्ही महर्षि चरक, सुश्रुत, वाग्भट वा हिप्पोक्रेटस यांच्याशी केलेली बघून डोळे पाणावले! हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं ;) असो तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा!

Journal Acta Neurologica Scandinavica मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या Kuopio Ischaemic Heart Disease Risk Factor Study (KIHD) अनुसार जी लोकं आठवड्यात दोन पेक्षा जास्त वेळा दारू(अल्कोहोल) पितात त्यांना स्ट्रोक चा धोका न पिणाऱ्या व्यक्तींपेक्षा निश्चित पणे जास्त असतो. हा अहवाल गेल्या २० वर्षात घेतलेल्या निरीक्षणांवर आधारित आहे. मेंदूपेशीघात(स्ट्रोक) चा धोका वाढवणारे घटक: दारू (अल्कोहोल) पिणे, उच्च रक्तदाब, ह्रदयाला रक्तपुरवठा करणार्यास रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, हृदयाघात, अलिंद विकंपन, मधुमेह, धुम्रपान, अतिरिक्त वजन, आभ्यंतर करोटीय धमनी (मेंदूला रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी) अरुंद होणे हा लक्षणे नसलेला आजार आणि वाढलेले कोलेस्ट्रोल

भुमध्यसागरीदेशांचे (ग्रीक) भोजन ताजी फळे आणि भाजीपाला,संपूर्ण(साबूत)धान्य, कडधान्ये, सुकामेवा,मासे आणि ऑलिवचे तेल वापरून बनवले जाते, जे खाऊन मधुमेहाचा धोका २१% ने कमी होऊ शकतो हा गेल्या साडे पाच वर्षाचा अभ्यास दर्शवितो. Mediterranean diet linked to lower risk of diabetes यात आश्चर्य म्हणजे चीज (चक्का)हा शब्द कोठे दिसला नाही.

नमस्कार मिपाकर मित्रहो, http://www.misalpav.com/node/27657:ब्रोकोली सॅलॅड (साभार:मस्त कलंदर) ही पाकृ मधुमेह आटोक्यात आणायला खरोखर उपयोगी ठरेल, अशी १००% खात्री आहे. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबात आईवडिलांना/आजी आजोबांना किंवा नातेवाईकांना मधुमेहाचा त्रास आहे तया सर्वांनी याचा खाण्यात जास्तीत जास्त वापर करावा ही नम्र विनंती. धन्यवाद.

मधुमेहामुळे डोळे, हृदय, मूत्रपिंड व नसा इत्यादींना होणारे गुंतागुंतीचे व जटील आजार रोखण्यासाठी वर्षातून एकदा तरी आपण आपली संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे. नाही तर, या एका आजारापायी बऱ्याच डॉक्टरांना वारंवार जाऊन भेटण्याची वेळ येऊ शकते. तुम्हाला काय सोयीस्कर वाटतं? वर्षातून एकदा भेट की वारंवार भेट? निवड तुमची! अशा या छुप्या आजाराला योग्य वेळी काबूत आणलं नाही, तर त्याचा विषारी विळखा सर्व महत्त्वाच्या अवयवांना बसल्याशिवाय राहणार नाही. दर महिन्याला केलेल्या रक्त शर्करेचे निष्कर्ष नियंत्रणातील साखर दाखवत असले तरी इतर महत्त्वाच्या अवयवांना जटील आजार झालेले आढळतात. याचं कारण म्हणजे दोन तपासण्यांतील (साधारण १ महिना) जो अंतरिम कालावधी असतो, त्यामध्ये सतत वर-खाली होणारी (अस्थिर) रक्तशर्करा पातळी. अशा या निदान न झालेल्या व अस्थिर रक्तशर्करा पातळीमुळे वेगवेगळे, जटील व गुंतागुंतीचे आजार, शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना (हृदय, डोळे, मूत्रपिंड, नसा इ.) होण्याची शक्यता दाट होते. केवळ आजार वाढण्याची वाट पाहून मग त्यावर उपचार करत बसण्यापेक्षा ते टाळण्यासाठी उपाययोजना करणं, खचितच शहाणपणाचं आहे. कारण मूत्रपिंड निकामी होणं किंवा मधुमेहामुळे आलेलं अंधत्त्व यासारखे काही आजार कितीही औषधोपचार केले, तरी पुन्हा पूर्वपदावर आणता येत नाहीत. तर, आजच आपली वार्षिक आरोग्य तपासणी करून घ्या आणि मधुमेहाला आटोक्यात ठेवा.

“Why do we need inner peace? because, for one thing, a calm mind is important for our health. Constant fear, anger and stress can make us ill. All sentient beings want to live a happy life, but most, like animals and birds seek to do so only a sensory level. Their intelligence is limited and yet they respond to affection and kind words. We human beings have intelligence that allows us to project into the future and remember the past. We invented language and writing, but we also developed faith.” His Holiness explained that in theistic terms there is faith in a creator god, but in non-theistic terms there is faith in causality. Both approaches have been of great benefit to humanity in the past and will continue to be so in the future. Living, Loving, Laughing and Dying: the Buddhist Way - Mumbai

मधुमेहींसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता ग्लुकोजची चाचणी रक्ताऐवजी लाळेच्या वापरातूनही करता येणे शक्य आहे, ही पद्धत विश्वासार्ह असून त्यामुळे सुई टोचून रक्त काढण्याची समस्या दूर होणार आहे. ब्राऊन येथील वैज्ञानिकांनी एक जैविक चीप (पट्टिका) विकसित केली असून त्यात लाळेसारख्या गुंतागुंतीच्या द्रवातून ग्लुकोज तपासता येते. ही एक प्रगत पद्धत विकसित करण्यात आली असून रक्त न काढताही शरीरातील शर्करेचे मापन करता येणार आहे. ही छोटीशी चिप अवघ्या एक इंच चौरस आकाराची असून त्यात क्वार्टझला चांदीचा थर दिला असतो. चांदीच्या पत्र्यात दोन मार्गिका कोरलेल्या असतात. त्यातील २०० नॅनोमीटर बाय १०० नॅनोमीटर आकाराच्या मार्गिका आहेत त्या मानवी केसाच्या १००० पट बारीक आहेत. ब्राऊन येथील डॉमनिको पॅसिफिकी यांनी सांगितले की, आम्ही लाळ तपासून अतिशय विश्वासार्ह पद्धतीने शर्करेचे प्रमाण सांगू शकतो. खरेतर रक्तापेक्षा लाळेत कमी शर्करा असते पण तरीही संवेदनशील मार्गाने शर्करा मोजता येते. लाळेत ९९ टक्के पाणी व १ टक्का मात्र वेगळा पदार्थ असतो त्यात विकर, क्षार व इतर घटक असतात त्यांच्या मदतीने रक्तातील साखर मोजता येते. ज्याचा माग काढता येईल असा ग्लुकोज दर्शक वैज्ञानिकांनी तयार केला व तो चिपवरील मार्गिकांमधून सोडला नंतर त्याची अभिक्रिया रक्तातील ग्लुकोजची दोन विकरांशी अभिक्रिया होते. पहिले विकर हे ग्लुकोज ऑक्सिडेज असून त्याची ग्लुकोजशी अभिक्रिया होऊन हायड्रोजन पेरॉक्साईडचे रेणू तयार होतात व त्यातून हॉर्सरॅडीश पेरॉक्सिडेज तयार होते त्यातून रिसोरुफिन बनते ते लाल प्रकाश शोषून घेऊ शकते किंवा बाहेर सोडते त्यामुळे द्रावणाला रंग प्राप्त होतो. त्यानंतर लाल रंगाच्या द्रावणातील रिसोरुफिन रेणू तपासता येतात. या पथकाने रंग रसायनशास्त्र व प्लासमोनिक इंटरफेरोमेट्री यांच्या मदतीने कृत्रिम लाळेतील ग्लुकोजचे प्रमाण तपासले, ही कृत्रिम लाळ म्हणजे, पाणी, क्षार व विकर यांचे मिश्रण होते ते खऱ्या लाळेसारखेच होते. त्यांना त्यातील ग्लुकोजचे प्रमाण लिटरला ०.१ मायक्रोमोल इतके आढळले. ते इंटरफेरोमीटरने मापन केलेल्या प्रमाणापेक्षा १० पट अचूक होते. आता मानवी लाळेवर याचे प्रयोग केले जाणार असून ही पद्धत ग्लुकोज तपासण्यासाठी सोपी व सुटसुटीत ठरणार आहे मधुमेहींना आता सुई टोचून रक्त देण्याची गरज नाही

बिएमजे जरनलमध्ये प्रकाशित झालेल्या ८ वर्षे सुरु असलेल्या रक्तशर्करा तपासणी अभ्यासात तिघा व्यक्तींत एक मधुमेहाच्या तावडीत किंवा उंबरठ्यावर आहे असे निदर्शनात आले आहे. One in three adults have borderline diabetes, study finds

एस डी एम आणि सायक्लिक मेडीटेशन या विषयावर इथे लेखन झाले नाही पण बंगलोरच्या स्वामी विवेकानंद योगा युनिवर्सिटी ने योगाद्वारे मधुमेहावर पूर्ण नियंत्रण मिळविण्याची पद्धत विकसित केली आहे. गुगलून पहावे , खूप माहीती मिळेल. गेल्या आठवड्यात पुण्यात एक शिबिर आयोजित केले होते आणि मी या शिबिराला जाउन आलो. ही उपचार पद्धती मधुमेही लोकांना वरदान आहे असे मला वाटते.

In reply to by विटेकर

अगदी महत्त्वाची माहिती! धन्यवाद. क्रुपया आपल्या सवडीनुसार एक कट्टा करु या कि! आम्हाला आवडेल ही माहिती समजून घ्यायला.

http://freedomfromdiabetes.org/ डॉ.प्रमोद त्रिपाठी....यांची कार्यशाळा... माझ्या मैत्रिणीची डायबेटीस ची गोळी पुर्ण बंद झाली आहे... तसेच तिच्या वडीलांना देखिल १८ वर्शांपासुन हा आजार होता त्यांची ही गोळी, ईन्शुलीन पुर्णपणे बन्द...