Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सचीन on Sat, 01/04/2014 - 15:52
ज्योतिष हा व्यवसाय आपल्या भारतात चांगलाच फोफावला आहे. जनतेला ज्योतिष ह्या अदभूत विद्येमुळे आपल्या आयुष्यात काय काय घटना घडणार आहेत ह्याची खडान्खडा माहिती होते. काही अप्रिय घटना घडणार असेल तर ग्रहांची शांती करता येते. आपली आपल्या समाजाची भविष्यकाळातील स्तिथी जनतेला ज्योतिष विद्येमुळे कळते. भविष्यात होणारे आजार, मिळणार असणारी नोकरी ह्या बाबत आधीच सारे कळते. त्यामुळे मनुष्याचे जीवन सुखी बनवण्यात हे शास्त्र अग्रेसर आहे. सध्या २०१४ ला निवडणुकांची रणधुमाळी चालू होईल. पण ज्योतीशाना मात्र भारताचे भविष्य माहित असणार कोण निवडून येईल कोणाला किती मते मिळतील तेही माहितच असणार. असे हे अद्वितीय शास्त्र आहे. काळाच्या उदरात काय दडलेले असते हे कोणालाच ठावूक नसते अपवाद ज्योतिष शास्त्र . काळाच्या उदरात जावून आतली बातमी हे शास्त्र काढू शकते अशा ह्या शास्त्र नि त्याच्या निर्मात्यांना सलाम .. ज्योतिष ह्या शास्त्रातले अनेक तज्ञ आपल्या देशात ज्योतिषांचा व्यवसाय करून जनतेचे भले करत आहेत. हा व्यवसाय आता मोठ्या उद्योग धंद्याचे स्वरूप धारण करत असताना सरकारने जर ह्या व्यवसायाला शॉप अॅक्ट, इन्कमट्याक्स, प्रोफेशन टॅक्स व सर्विस टॅक्स लावला तर सरकारच्या मह्सुलातही भर पडून देशाचे कल्याण होईल विकास साधता येईल. पुन्हा एकदा ह्या मानवजातीचे भले करणाऱ्या शास्त्राला दंडवत!
  • 13043 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Sat, 01/04/2014 - 15:55

Permalink

?

?

Submitted by सन्दीप on Sat, 01/04/2014 - 15:59

Permalink

+१००

+१००

Submitted by विद्युत् बालक on Sat, 01/04/2014 - 16:10

Permalink

तुमच्या लेखाला कायम दोनच

तुमच्या लेखाला कायम दोनच डायमेन्शन असतात बघा Y आणि Z !! मजा आली नाही . सचिन शून्यावर आउट झाल्यावर जसे वाटायचे तसेच वाटले तुमचे कूट पाहून

Submitted by मंदार दिलीप जोशी on Tue, 01/07/2014 - 13:00

In reply to तुमच्या लेखाला कायम दोनच by विद्युत् बालक

Permalink

तुमच्या लेखाला कायम दोनच

तुमच्या लेखाला कायम दोनच डायमेन्शन असतात बघा Y आणि Z !! :D :D :D :D अगदी अगदी

Submitted by जोशी 'ले' on Sat, 01/04/2014 - 16:15

Permalink

सब क्यू -तायपा है !

सब क्यू -तायपा है ! सहि आवडली... :-D

Submitted by रमेश भिडे on Sat, 01/04/2014 - 16:15

Permalink

Y आणि Z

Y Z सचिन ........... लै भारी विद्युत बालक भौ .......

Submitted by जेपी on Sat, 01/04/2014 - 16:35

Permalink

पुन्हा एकदा जिलबी पाडणार्या

पुन्हा एकदा जिलबी पाडणार्या ह्हा सचिनभाऊंना दंडवत !

Submitted by इरसाल on Sat, 01/04/2014 - 17:26

In reply to पुन्हा एकदा जिलबी पाडणार्या by जेपी

Permalink

हे बघा

तुम्ही त्यांचे नाव खराब करत आहात . ते स. ह. ची. ह. न. आहेत उगाच सचिन म्हणुन त्या दुसर्‍या सचिनला का उचक्या आणत आहात ?

Submitted by रमेश भिडे on Sat, 01/04/2014 - 17:45

Permalink

चीनला

या स ह ची ह न ला त्याच्या सामाना सह चीनला पाठवुन द्या बघू ! ;)

Submitted by विद्युत् बालक on Sat, 01/04/2014 - 17:56

In reply to चीनला by रमेश भिडे

Permalink

सामाना . .

सामाना
. =)) . =))

Submitted by मंदार कात्रे on Sat, 01/04/2014 - 18:20

In reply to सामाना . . by विद्युत् बालक

Permalink

सामाना सह.............!

सामाना सह.............! हसुन हसुन मुरकुण्डी वळली !

Submitted by चिन्मय खंडागळे on Sat, 01/04/2014 - 17:54

Permalink

जिलब्यांचा व्यवसाय आपल्या

जिलब्यांचा व्यवसाय आपल्या मिपावर चांगलाच फोफावला आहे. सततच्या जिलब्या टाकण्यामुळे जनतेला आपल्या धाग्यात काय सापडणार आहे ह्याची खडान्खडा माहिती होते. व्यक्तिगत आयुष्यात कुणी भाव देत नसेल तर मिपावर जिलबी टाकून मनाची शांती करता येते. आपली व आपल्या मेंदूची स्तिथी जनतेला जिलबोत्पादनामुळे कळते. भविष्यात यांचे धागे उघडून येणारे आजार, मिळणार असणारा मनस्ताप ह्या बाबत आधीच सारे कळते. त्यामुळे वाचकांचे जीवन सुखी बनवण्यात हे शास्त्र अग्रेसर आहे. आता २०१४ च्या नवीन कुरकुरीत जिलब्यांची रणधुमाळी चालू होईल. पण सतीशाना मात्र मिपाचे भविष्य माहित असणार कोणत्या विषयांवर आठवड्याला किती जिलब्या टाकाव्या तेही माहितच असणार. असे हे अद्वितीय जिलबीपाकशास्त्र आहे. धाग्यांच्या उदरात काय दडलेले असते हे धागा उघडल्याशिवाय कोणालाच ठावूक नसते अपवाद जिलबीसम्राट . यांच्या धाग्यावर क्लिक करण्याआधीच आत काय भरले असेल ही माहिती वाचक काढू शकतात अशा ह्या जिलबीशास्त्र नि त्याच्या आचार्‍यांना सलाम .. ह्या शास्त्रातले अनेक तज्ञ जिलब्यांच्या चळती टाकून करून जनतेचे भले करत आहेत. हा व्यवसाय आता मोठ्या उद्योग धंद्याचे स्वरूप धारण करत असताना मिपामालकांनी जर ह्या व्यवसायाला शॉप अॅक्ट, इन्कमट्याक्स, प्रोफेशन टॅक्स व सर्विस टॅक्स लावला तर मिपाच्या मह्सुलातही भर पडून संस्थळाचे कल्याण होईल विकास साधता येईल. पुन्हा एकदा ह्या मिपाकरांचे भले करणाऱ्या शास्त्राला दंडवत!

Submitted by पैसा on Sat, 01/04/2014 - 18:17

In reply to जिलब्यांचा व्यवसाय आपल्या by चिन्मय खंडागळे

Permalink

=)) =)) =))

=)) लै भारी!

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 01/05/2014 - 06:29

In reply to जिलब्यांचा व्यवसाय आपल्या by चिन्मय खंडागळे

Permalink

चुरचुरीत विडंबन

चुरचुरीत विडंबन =))

Submitted by मंदार दिलीप जोशी on Tue, 01/07/2014 - 13:01

In reply to जिलब्यांचा व्यवसाय आपल्या by चिन्मय खंडागळे

Permalink

:D

:D :D
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Sat, 01/04/2014 - 18:04

Permalink

(No subject)

=))

Submitted by मनीषा on Sat, 01/04/2014 - 22:00

Permalink

खरोखर अदभूत !!

खरोखर अदभूत !! अगदी अरेबियन नाईटस मधल्या कथांसारखं -- सुरस आणि चमत्कारिक.

Submitted by सस्नेह on Sun, 01/05/2014 - 13:39

In reply to खरोखर अदभूत !! by मनीषा

Permalink

+१

अति अद्भुत !! बादवे, आपल्या धाग्याचे अद्भुत भवितव्य स'चीन'भौंना माहितच असेल ! Image removed.

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Sun, 01/05/2014 - 09:28

Permalink

ज्योतिर्भूषण!!!

खेतवाडीतल्या ज्योतिर्भूषण विर्पाक्षशास्त्री घोट्टाळगेकारांच्यानंतर ज्योतिषाचा एवढा "दांडगा" आणि "सखोल" अभ्यास असणारे हे एकमेव! बहुधा हे जल्श्रुन्खला योगावर जन्मलेले दिसतात (कळ्फलक सरसावून लिहायला बसले कि त्यातून "ठ्ठो" आवाजाशिवाय दुसरं काहीही बाहेर येत नाही).

Submitted by मारकुटे on Sun, 01/05/2014 - 10:06

Permalink

शनीवारी प्रकाशन?

बरोबर मुहूर्तावर टाकला नाही तुम्ही लेख.. त्यामुळे शंभरी काही होत नाही. उलट सुलट प्रतिसाद काही येत नाही.

Submitted by आयुर्हित on Sun, 01/05/2014 - 15:14

Permalink

२०१४मध्ये कोण पंतप्रधान बनतो?

जाणकार मंडळींनी कृपया मार्गदर्शन पर धागा सुरु करावा आणि देशालाही मार्गदर्शनही करावे २०१४ मध्ये कोण पंतप्रधान बनतो ते! आपला लाडका: आयुर्हीत

Submitted by सचीन on Mon, 01/06/2014 - 12:18

Permalink

गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी

गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी ज्योतिषशास्त्र उपयोगी ठरू शकेल का? तेव्हडाच पोलिसांवरचा ताण कमी होईल.

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 01/06/2014 - 15:14

In reply to गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी by सचीन

Permalink

अप्रतिम

अप्रतिम :)

Submitted by बर्फाळलांडगा on Tue, 01/07/2014 - 15:05

In reply to अप्रतिम by टवाळ कार्टा

Permalink

खिक्क!

.

Submitted by आनन्दा on Mon, 01/06/2014 - 13:13

Permalink

बहुधा आपण आता आचार्याचा धंदा

बहुधा आपण आता आचार्याचा धंदा सोडून आचार्‍याचा धंदा करायला हरकत नाही.

Submitted by सचीन on Mon, 01/06/2014 - 16:18

In reply to बहुधा आपण आता आचार्याचा धंदा by आनन्दा

Permalink

बहुधा आपण आता आचार्याचा धंदा

बहुधा आपण आता आचार्याचा धंदा सोडून आचार्‍याचा धंदा करायला हरकत नाही.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>समजले नाही कृपया स्पष्ट कराल का?

Submitted by गब्रिएल on Mon, 01/06/2014 - 18:37

In reply to बहुधा आपण आता आचार्याचा धंदा by सचीन

Permalink

हॅ... हॅ... हॅ... काय

हॅ... हॅ... हॅ... काय सचीन्भौ तुमी यवढ्ये हुश्शार आणि ह्ये सम्जत नाय व्हय... हीतं बगा कसा ब्येष्टंब्येष्ट धंदा लिवलाय पेश्शल तुम्च्यासाठी. आता अश्या किती जिल्ब्या फुकट वाटणार मिपावर. चार पैश्ये पन मिळत्याल नी लोकं च्येष्टा करन्याऐवजी खर्रीखर्री स्तुती बी करत्याल. तुमी तेच्तेच दळन दळून आणि जिल्ब्या टाकून आर्ती कर्ता त्या देवांचं काय खर दिसत नाय बा येत्या पाच-सा म्हैन्यात ;) बगा बाबा, तुमी लै हुश्शार, तुमाला आमी आडानि काय सान्गनार ?

Submitted by आयुर्हित on Mon, 01/06/2014 - 16:53

Permalink

२०१४ मध्ये कोण पंतप्रधान बनतो?

कालच विचारले आणि आज बेजान दारूवाल्यांनी सांगितले ही ईश्वराचीच कृपा. आता हे त्यांनी नेमक्या कुठल्या अभ्यासावरून सांगितले? की एक ठोकटाळा आहे? असा विषय (विद्या) आणि त्याचे अभ्यासक पंडित असतीलच कि मिपावर! आपले काय मत? कळावे, लोभ असावा. आपला लाडका, आयुर्हीत.

Submitted by आयुर्हित on Mon, 01/06/2014 - 16:53

Permalink

२०१४ मध्ये कोण पंतप्रधान बनतो?

कालच विचारले आणि आज बेजान दारूवाल्यांनी सांगितले ही ईश्वराचीच कृपा. आता हे त्यांनी नेमक्या कुठल्या अभ्यासावरून सांगितले? की एक ठोकटाळा आहे? असा विषय (विद्या) आणि त्याचे अभ्यासक पंडित असतीलच कि मिपावर! आपले काय मत? कळावे, लोभ असावा. आपला लाडका, आयुर्हीत.

Submitted by सचीन on Mon, 01/06/2014 - 17:27

Permalink

ते पोपट घेवून भविष्य सांगतात

ते पोपट घेवून भविष्य सांगतात ते ज्योतिष खरे असते का? अनुभवी लोकांनी जरूर मार्गदर्शन करावे नि कोणाला काही अनुभव असतील तर जरूर सांगावेत. आपल्या प्राचीन, अदभूत विद्येचा प्रचार आपणच करायला हवा.

Submitted by चिरोटा on Mon, 01/06/2014 - 18:16

In reply to ते पोपट घेवून भविष्य सांगतात by सचीन

Permalink

ते

तो पोपटावर अवलंबून असते. टी.व्ही. चॅनेल्स नामक पिंजर्‍यात अनेक पोपट स्वतःहून येतात.हल्ली अनेक पोपटांनी 'आप'चा निभाव लागणार नाही असे भविष्य दिले होते.ते खोटे ठरले.लोकसभा निवड्णूक जवळ येतेय्.अनेक पोपटांचे दर्शन चॅनेल्सवर आपणास होईल्.पोपट काय भविष्य वर्तवणार हे त्यांनी कुठ्ल्या पक्षाचा पेरू खाल्लाय ह्यावर अवलंबून असते.

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 01/06/2014 - 20:37

In reply to ते by चिरोटा

Permalink

कोणाचा?

>>>>तो पोपटावर अवलंबून असते. म्हणजे पोपट कोणाचा आहे, ह्यावर का?

Submitted by यसवायजी on Mon, 01/06/2014 - 18:31

In reply to ते पोपट घेवून भविष्य सांगतात by सचीन

Permalink

पोपट घेवून भविष्य सांगतात

पोपट घेवून भविष्य सांगतात
:)) *fool* :))

Submitted by मंदार दिलीप जोशी on Tue, 01/07/2014 - 13:02

In reply to ते पोपट घेवून भविष्य सांगतात by सचीन

Permalink

तुम्ही काँग्रेसचे पोपट का?

तुम्ही काँग्रेसचे पोपट का?

Submitted by दर्यावर्दी on Tue, 01/07/2014 - 15:14

Permalink

जोशी,तूमी भगवे पोपट का?

जोशी,तूमी भगवे पोपट का?

Submitted by अनिरुद्ध प on Tue, 01/07/2014 - 16:31

In reply to जोशी,तूमी भगवे पोपट का? by दर्यावर्दी

Permalink

भगवा पोपट?

मला तर दोनच रंग माहित होते,एक हिरवा आणि दुसरा पंचरन्गी?

Submitted by सचीन on Tue, 01/07/2014 - 16:07

Permalink

ज्योतिष ह्या व्यवसायाला शॉप

ज्योतिष ह्या व्यवसायाला शॉप अॅक्ट, इन्कमट्याक्स, प्रोफेशन टॅक्स व सर्विस टॅक्स लावणे योग्य ठरेल का? ह्यावर मत प्रदर्शन करणारी एकही प्रतिक्रिया नाही.

Submitted by प्यारे१ on Tue, 01/07/2014 - 16:20

In reply to ज्योतिष ह्या व्यवसायाला शॉप by सचीन

Permalink

हात, चेहरा, कुंडली.... नाडी

हात, चेहरा, कुंडली.... नाडी दाखवता का बघता त्यावर ते अवलंबून असावं!

Submitted by सुहासदवन on Tue, 01/07/2014 - 16:28

In reply to ज्योतिष ह्या व्यवसायाला शॉप by सचीन

Permalink

मग घ्या ही प्रतिक्रिया .....

ज्योतिष ह्या व्यवसायाला शॉप अॅक्ट, इन्कमट्याक्स, प्रोफेशन टॅक्स व सर्विस टॅक्स
ज्योतिष सांगणे हा व्यवसाय नाही म्हणून टॅक्स नाही कोणताही ज्योतिषी मी धंदा करतोय, दुकान टाकलेय असं सांगत नाही म्हणून शॉप अॅक्ट नाही ज्योतिषी कोणतीही कमाई करत नाही आपण स्वखुशीने त्याला किंवा त्याच्या आराध्याला पैसे देतो म्हणून इन्कम टॅक्स नाही ज्योतिषी हे प्रोफेशन नाही तर एक परंपरा किंवा कला आहे म्हणून प्रोफेशन टॅक्स नाही ज्योतिषी सर्विस देत नाही तर दैवी ज्ञान आपणास देतो म्हणून सर्विस टॅक्स नाही. आता बोला …

Submitted by अनिरुद्ध प on Tue, 01/07/2014 - 16:33

In reply to मग घ्या ही प्रतिक्रिया ..... by सुहासदवन

Permalink

अगदि अगदि

अगदि अगदि +१ सहमत

Submitted by सचीन on Tue, 01/07/2014 - 16:56

In reply to मग घ्या ही प्रतिक्रिया ..... by सुहासदवन

Permalink

ज्योतिष सांगणे हा व्यवसाय

ज्योतिष सांगणे हा व्यवसाय नाही म्हणून टॅक्स नाही >>>>> ज्योतिष हा व्यवसायच आहे. वृत्तपत्रात ह्या बद्दल अनेक जाहिराती असतात (उदा. चेहरा बघून भविष्य सांगू, तीनच प्रश्न विचारा फी -५००० रुपये इ) ज्योतिषी कोणतीही कमाई करत नाही आपण स्वखुशीने त्याला किंवा त्याच्या आराध्याला पैसे देतो म्हणून इन्कम टॅक्स नाही>>>>ज्योतिषाची फी ठराविक असते त्या फीशिवाय सुहास्वादन तो तुमचा हात काय थोबाडहि पहायचा नाही. ज्योतिषी हे प्रोफेशन नाही तर एक परंपरा किंवा कला आहे म्हणून प्रोफेशन टॅक्स नाही>>> पुराण काळातून बाहेर या. ज्योतिषी सर्विस देत नाही तर दैवी ज्ञान आपणास देतो म्हणून सर्विस टॅक्स नाही>>>>>हे मात्र बरोबर ज्योतिष हेच दैवी असते. मात्र हे ज्ञान चुकले तर त्याला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का?

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com