नाना ची मनी ( सनी)
आम्ही सनी घेतली तेव्हा ती आमच्या सोसायटीतील ४८ सभासदांपैकी ३ री स्कूटर होती . यथासांग पूजा करून आम्ही आमच्या सनीचे स्वागत केले . त्यावेळी माझी मुलगी ७ - ८ वर्षांची असेल . तिला आमच्या सनी बद्दल अतिशय अभिमान होता . दर शनिवारी तिला मी स्नीवरून शाळेत सोडत असे.
तेव्हा इतर मुलांसमोर स्वतः च्या सनी वरून चढण्या - उतरण्याचा तिचा रुबाब काही औरच होता .
यथावकाश मला मुलगा झाला . तो तर सनीच्या मधल्या भागात धरून हरून उभा राहायला शिकला आणि इयत्ता ६ वीत जाईपर्यंत तो सनी चालवू लागला
आमची सनी म्हणजे ' मूर्ती लहान पण कीर्ती महान ' अशी होती . वांद्रे ते दादर पर्यंतच्या भागात सनी वर मी , नानी तिच्या मांडीवर माझा लहान मुलगा व मधल्या भागात माझी मुलगी उभी असे फिरताना बर्याच जणानी बघितले आहे .
पाठीवर एवढे वजन घेऊन प्फिरताना तिने कधीच कुरबुर केली नाही . तिला कधीच उन पावसाचा त्रास झाला नव्हता , त्यामुळे जवळ जवळ ११ - १२ वर्षात तिला कधीच डॉक्टर कडे (मेकेनिक )न्यावे लागले नाही . या ११ - १२ वर्षात वाहनाचे चाक पंक्चर होते हे मी विसरून गेलो होतो . परंतु २६ जुलै २००५ ला सनी ला स्टेशन जवळ ठेवले होते. त्यादिवशी च्या न भूतो न भविष्याती अशा पावसामध्ये तिच्या आजूबाजूला उभे असलेले तिचे भाऊ बहिणी ( इतर स्कूटर / मोटर सायकल ) इतस्त: पडलेल्या होत्या पण ही मात्र ताठ मानेने उभी होती . परंतु पूर्णपणे पाण्यात १ दिवस राहिल्यामुळे तिला बराच त्रास झाला व डॉक्टरांना (मेकानिक ) तिची मोठी शस्त्रक्रिया (दुरुस्ती ) करावे लागले . थोडे दिवस आराम केल्यावर तिची पुन्हा घर ते स्टेशन अशी दौड सुरु झाली आमची कार आल्यावर आम्ही मोटारीला 'मोठी' आणि सनीला 'छोटी' अशी नवे दिली .
यानंतर बर्याच स्कूटर घेतल्या पण अजूनही सनीचे गुणगान करावेसे वाटते .
नानीचा नाना
वाचने
5522
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
नानाची मनी (सनी )
शिर्षक वाचुन वाटल लिओनेच्या सनीची गोष्ट हाय काय?
In reply to नानाची मनी (सनी ) by जेपी
+११११११११११
In reply to नानाची मनी (सनी ) by जेपी
+१... असेच म्हणतो.....
In reply to नानाची मनी (सनी ) by जेपी
है शाबास!!!! आमच्या सारखे
(No subject)
In reply to है शाबास!!!! आमच्या सारखे by कैलासवासी सोन्याबापु
चुकीचे कौतुक.....
यक्दम णोस्टॅल्जिक
पहिली गाडी
ब्रम्हे काका
In reply to पहिली गाडी by सुज्ञ माणुस
हे तर
काय म्हणालात???? ताक? भांडे??
In reply to हे तर by इरसाल
अस्स काय करता
In reply to काय म्हणालात???? ताक? भांडे?? by बॅटमॅन
अभिनंदन योग्य*
In reply to अस्स काय करता by इरसाल
तो बुवांचा किस्सा एथे द्या ना गडे
बॅटन्....श्लेष अलंकारासाठी बॅटमनांकडे देण्यात येत आहे. योग्य* शब्दातील अंतर सुयोग्य राखून अर्थ मर्यादीत ठेवल्या बद्दल.आम्हाला तर शाहीर दादा
In reply to अभिनंदन योग्य* by नाखु
तुमाला
In reply to आम्हाला तर शाहीर दादा by धन्या
म्हाग्रु आनी तेंची बायकुचे
In reply to तुमाला by इरसाल
है शाब्बास
In reply to म्हाग्रु आनी तेंची बायकुचे by धन्या
सनी च्या {दुचाकी हो...
सनी...
मुळ म्हण ताकाला जाऊन भांडे
इथे लपवलेले ताकाचे भांडे आहे.
In reply to मुळ म्हण ताकाला जाऊन भांडे by नानीचा नाना
जुन्या आठवणी