सावळ्या तुझ्याविना...
सख्या कधीच लोपली मधाळ धुंद बासरी
तरी अजून गुंजते मुकुंद नाम अंतरी
अबोलशी पहाट ही उदास रे तुझ्याविना
अजून सांज सावळ्या, शोधते तुझ्या खुणा
सुनी सुनीच वाहते सुनी नदी सुन्या तिरी
अजून माय साठवी घटा घटात क्षीर रे
अधीरता मनात त्या लोचनांत नीर रे
अशांत ती पुकारते फिरून ये पुन्हा घरी
पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात या
मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया!
कशास शोधु रे वृथा, मनात या वसे हरी...
अदिती
लेखनविषय:
याद्या
4950
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
सुरेख.
वा, सुरेख!
अतिशय सुरेख रचना. अगदी तालात
धन्यवाद!
व्वा..व्वा..व्वा..व्वा..व्वा.
आवडली.मनात हर्ष-शोक ना,
मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया! पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात याया दोन ओळींचा क्रम बदलून मला त्या अधिक परिणामकारक वाटल्या. अवांतरः 'नदि' शब्द वृत्तासाठी असा घेतलाय का? तो थोडा खटकला - 'नदी' असा करता येईल का तो?नाही तो टायपो होता. मलाही
अगदी सुरेख रचना
+१
In reply to अगदी सुरेख रचना by चाणक्य
आवडली कविता.
धन्यवाद!! माझी कविता संपादित
डन!
In reply to धन्यवाद!! माझी कविता संपादित by आनंदमयी
सुरेख!
माफ करा, आणखी एक,
मीटर मध्ये बसावा म्हणून 'ति'
In reply to माफ करा, आणखी एक, by आतिवास
अत्तिशय आवडली...
+१
In reply to अत्तिशय आवडली... by इन्दुसुता
मनापासून धन्यवाद....
तुमची कविता आणि तुमची
कविता आवडली...
अगदी मनापासून
सुंदर अतिशय सुंदर, मनापासून
:)
खूप छान
+१
In reply to खूप छान by michmadhura
धन्यवाद!
मनापासून आवडली..
ओहो...
खलास पूर्ण जाहलो, कवित्व येथ
खरेच धन्य जाहले सुनोनि काव्य
In reply to खलास पूर्ण जाहलो, कवित्व येथ by बॅटमॅन
अगदी मनापासून