स्ट्रॉबेरी सेवबा / Strawberry Sevba
लाल चुटुक गोळे हिरव्या रंगाच्या गोंड़यावर! ओळखा बर मी कोण? अशी लहानपणी ओळख झालेली स्ट्रॉबेरी थंडीची खास ओळख. नाजूक पिवळ्या कणात गुंफलेली लाले लाल स्ट्रॉबेरी महाबळेश्वर च्या स्ट्रॉबेरी फार्म मध्ये जाऊन खाण्यात वेगळीच मजा आहे. नुकतेच mapro च्या फार्म मध्ये फ्रेश स्ट्राबेरी मेलबा चाखले. ती अप्रतिम चव जीभेवर रेंगाळत असतानाच सुचले त्याचे variation. ताबडतोब try केले आणि एक hit dish यादीमध्ये add झाली.
स्ट्रॉबेरी लवर्स साठी स्ट्रॉबेरी सेवबा :)
साहित्य:
५०० ग्रॅम स्ट्रॉबेरीज,
तीन मोठे चमचे शेवया,
तीन चमचे साखर,
एक चमचा तूप,
एक कप पाणी,
एक कप दूध,
दोन वाट्या व्हिप्ड क्रीम,
तीन मोठे चमचे स्ट्रॉबेरी जॅम,
ड्रायफ्रूट्स चे काप
कृती:
१. सर्वप्रथम शेवया, एक चमचा तुपावर हलक्या तांबूस भाजून घ्याव्यात. त्यात एक कप पाणी घालून त्या शिजवून घ्याव्यात. शिजवताना त्यात साखर घालावी. हे मिश्रण गार करायला ठेवून द्यावे.
२. स्ट्रॉबेरीज चे अर्धे काप करून फ़्रीज मधे ठेवावेत. व्हिप्ड क्रीम, जॅम आणि दूध एकत्र मिक्सर मधून फिरवून घ्यावे व फ़्रीज मधे सेट होण्यास ठेवावे.
३. सर्व्ह करतेवेळी सर्व पदार्थ फ़्रीजमधून काढावेत. एका ग्लासमधे सर्वात तळाला शेवया घालून त्यावर क्रीम, मधे स्ट्रॉबेरीचे काप, त्यावर पुन्हा क्रीम, आणि सर्वात वरती ड्रायफ्रूट्स चे काप घालून थंडगार सर्व्ह करावे.


वाचने
7543
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंडाला पाणी सुटले!!!!
आयचा घो!
छान पाककृती.
अगदी बरोबर!
In reply to छान पाककृती. by प्रभाकर पेठकर
स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रीम
In reply to अगदी बरोबर! by टक्कू
धन्यवाद!
स्ट्रॉबेरी नाय आवडत, दुसरं
आंबा
In reply to स्ट्रॉबेरी नाय आवडत, दुसरं by किसन शिंदे
जबरी!
आवडली...
Masta!
वॉव!
मस्त
मस्त
खुप छान
आहाहा... {लिची प्रेमी}
मस्त....
छानच..
छान, सोपी पा.कृ.
जबरदस्त!